world of elusion books and stories free download online pdf in Marathi

वर्ल्ड ऑफ इल्युजन

आपला ब्रह्मांड, आपली सौरमाला, आपली पृथ्वी पासून ते आपण, किती सुंदर रचना आहे ना ह्या दुनियेची. ब्रह्मांडाची निर्मिती, फक्त आपली सौरमालाच नाही, आपली ग्लॅलेक्सिच नाही तर पूर्ण ब्रह्मांड हे फक्त एका पॉईंटतुन निर्माण झालेला आहे. त्या पॉईंटला सिंगुल्यारीटी आणि ज्या ज्या धमाक्याने झाली त्याला बिग ब्यांग असे म्हणतात. म्हणजे बिग ब्यांगच्या आधी काहीच न्हवतं, म्हणजे एकदम झिरो... ह्या धामाक्यानंतरच पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली.

ब्रह्मांडाच्या निर्मितीपासूनच पूर्ण ब्रह्मांड वाढत आहे, तो पुढेही वाढत राहील, पण शेवटी पूर्णता वाढून पूर्ण नष्ट होईल. पुन्हा ते झिरो मध्ये रूपांतरित होईल. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू एकमेकांपासून जुळून आहे, सर्वाना मिळूनच ब्रह्मांड बनत आहे. ह्यात गुरुत्वाकर्षणनही खूप मोठी विचित्र संकल्पना आहे, जी आस्तित्वात आहे, ज्याने आपली सूर्यमाला आपल्या ग्यालेक्सी भोवती फिरत आहे, पृथ्वी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणमुले त्याच्या भोवती फिरत आहे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बळाने चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे आणि आपण सर्व जीव पृथीच्या गुरुत्वाकर्षने पृथ्वीवर टिकून आहोत.

प्रत्येक जीव, प्रत्येक वनस्पती व प्राणी, प्रत्येक वस्तू जी पृथ्वीतलावर स्थित आहे, जी पृथ्वीवरच्या जीवाला, मानवाला जगण्यास मदत करत आहे. एवढेच काय?, सूर्याची दुरी पृथ्वीपासून तेवढीच, जेवढी त्याची गरज आहे, जेवढी पृथ्वीच्या जीवाला जगण्यास मदत होईल. त्या पेक्षा जास्त दूर नाही, की पृथ्वीवरचे तापमान शून्य अंश च्या खाली जाईल, वा एवढे जवळही नाही की, तापमान शंभर अंश पर्यंत जाऊन सर्व जीवांचा नाश करेल. सोबतच पृथ्वीवरचे आवरण जे ओझोन वायूंचे बनले आहे, ते सूर्याच्या हानिकारक किरणांपासून इथल्या प्रत्येक जीवाला वाचवत आहे. आणि हरितगृह वायू म्हणजेच ग्रीन हाऊस गॅसेस पृथ्वीवर आलेल्या सूर्यकिरणांना रिफ्लेक्ट होऊन अंतराळात जाऊ देत नाही तर, त्याला पुन्हा पृथ्वीवर आणून पृथ्वीचे वातावरण गरम करते. सोबतच पृथ्वीवरचे ऋतू जे बदलत असतात, ह्याने पावसाची कधी कमी भासू देत नाही.

आपण ढगांना कसे विसरू शकतो?, सूर्याच्या गरम किरणाने समुद्राचे पाणी भाप बनून त्याचे ढग बनतात, तेच ढग पुढे सरकून जमिनींवर पाऊस पडतात. पाऊस पृथ्वीवरच्या सर्व जीवांना पाणी पुरवून काही पाणी जमिनीत जिरून, उरलेलं सर्व पाणी पुन्हा समुद्रात, नदीवाटे मिळून जाते. झाडेही सूर्यापासून ऊर्जा मिळवून अन्न तैयार करत असतात. ते अन्न सर्व जीवांना पुरवत असतात, ते डायरेक्ट असो वा इंडायरेक्ट पण सूर्याची ऊर्जा प्रत्येक जीवात आढळते. एव्हढेच काय?, जर कुठलीही वस्तू, जसे उल्कापात पृथ्वीवर आदळायला येते, पण पृथ्वीच्या वातावरणाने ते पृथ्वीच्या जमिनीवर येण्याआधीच वातावरणातील वायूंच्या घर्षणाने जळून जाते, ह्याने कुठल्याही जीवांचा नाश होत नाही. पृथ्वीवरचा प्रत्येक जीव जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतो. ते आपली भूक भागविण्यासाठी एकतर झाडांचा सहारा घेतो, तर दुसरा झाडे खाणाऱ्या प्राणांचा. पण सर्व आपले जीवन जगल्यानंतर पुन्हा जमिनीतच विलीन होतात. त्यांचे जीवन जमिनीतूनच होते आणि मृत्यूही जमिनीतच होते. एवढेच नाही तर, प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याच स्पेसिस सोबत प्रजनन करून आपली पिढी पुढे चालवत असतात.

खरेतर प्रत्येक जीव इंडायरेक्टली प्रजनन करण्यासाठीच जगत असतात. इथल्या प्रत्येक जीवांना वेगळा रंग आहे, रूप आहे, ओळख आहे, तर काही कमीपणा ही आहे, पण सर्वच आपापले योगदान पूर्ण जीवसृष्टी चालविण्यासाठी देतच असतात. जर एखादा जीव पूर्णता नष्ट झाला तर पृथ्वीवर ह्याचा परिणाम कसा ना कसा होतोच. इथली प्रत्येक जीव प्रत्येक वस्तू दुसऱ्या जीवांच्या व दुसऱ्या वस्तूंना आकर्षित करत असतात. इथे असे नियम आहेत, जे नसल्यास सर्वाना आश्चर्य होईल, जसे कुठलाही जीव एखाद्या ठोस वास्तुतून आरपार जाऊ शकत नाही. बिना पंख शिवाय उडू शकत नाही, असे असंख्य नियम आहेत, ज्याने पृथ्वी अस्तित्वात असल्याची जाणीव करून देत असते. पृथ्वीवर मानव खूप वर्षांपासून राज करत आलेला आहे. कारण त्याची बुद्धीच सर्व जीवांपेक्षा जास्त तेज आहे. प्रत्येक मानवाला असे वाटत आहे की, तो स्वतःचे आयुष्य जगुण, आपली पिढी पुढे चालवत आहे. मानवाला वाटत आहे की, तो फक्त आपल्या मर्जीचा मलिक आहे. पण तोही निसर्गाच्या नियमांसोबत जखडलेला आहे. मानवाला भावना आहेत, ते दुसऱ्यांवर आणि स्वतःचे आयुष्य घडविण्याकरिता.

पण असेच का? जे आपण बघत आहोत, हेच सत्य आहे काय? की काही अशी वेगळी शक्ती जी आपणा सर्वाना कॅट्रोल करत आहे? सर्वाना समतोल ठेवत आहे. का गुरुत्वाकर्षण आपल्याला जवळ खेचते, दूर ढकलत का नाही? पूर्ण ब्रह्मांडात आपणच फक्त जिवंत आहोत काय?, दुसऱ्या कुठल्याच ग्रहावर जिवश्रुष्टी नाही काय? जर आहे तर ते आपल्या जवळ अजून का नाही आले? पण आपण जन्माला आलोच का?, आपल्या जगण्याचा काय उद्देश आहे? फक्त काही क्षण जगणे आणि पुढे पिढी ढकलून मरून जाणे, हेच का? आपल्याला जन्म आपल्या आईवडिलांनी दिले, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी, असेच पुढे, पण पहिल्या जीवाला कुणीतरी जन्म दिलेले नसावे का? का आपला ब्रह्मांड भौतिकीच्या नियमांचे पालन करतो? ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या आधी होतं तरी काय? समांतर ब्रह्मांड असेल तर कुठपर्यंत? जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्याला स्वप्न पडत असतात. तेव्हा आपण वेगळ्याच दुनियेत आलेलो असतो. त्या स्वप्नाच्या दुनियेत आपण काहीही करू शकतो, जे खऱ्या आयुष्यात करू शकत नाही, आणि तेही झोपेतच, म्हणजे कुठल्याही शरीराची हालचाल न करता, फक्त मेंदूच पूर्ण कार्य पार पडत असतो, स्वप्नाच्या दुनियेत. अशी कुठली शक्ती आहे जी, हे जग आपल्याला खरे असल्याचे सांगतो? झोपेतून उठलो की, वेगळ्याच दुनियेत!, तेव्हा आपण कुठे जातो? कधीकधी आपल्याला असे का वाटते की आपण इथे आधी आलेलो आहे?, पण ती जागा आपल्यासाठी एकदम नवी असते, कधीकधी असे वाटते की आपण ही गोष्ट आधीही केलेली आहे, पण ती गोष्ट आपण पहिल्यांदा करत असतो, ह्याला देजा-वू असे म्हणतात, पण असे का घडते?
मानवाला आतापर्यंत सर्वात कॉम्प्लेक्स गोष्टीबद्दल म्हणजे मानवी मेंदूबद्दल, म्हणजे ते कसे काम करते, ते अजून कळले नाही. मेंदू आपल्याला जे दाखवते तेच सत्य आपण मानतो.त्याच्या पूर्ण नियंत्रणात आपण काम करतो. आपल्याला आपला मेंदूच सांगतो की आपण जिवंत आहोत. पण जे मेंदू आपल्याला दाखवते तेच सत्य आहे काय?, काय सत्य वेगळेच आहे? काय आपण म्हणू शकतो की हे एखादी भ्रम किंवा एखादी पसरलेलं जाळे नाही म्हणून? वर्चुअल रिऍलिटी एक अशी टेक्निक आहे जिथे, आपल्याला खऱ्या जगासारखे अनुभव करून देतात. हे कॉम्पुटर जनरेटेड सिन्यरिओ आहे, जे आपल्या इंद्रियांना त्याने दाखवलेले खरे असल्याचे भासवून देतो.
वरच्युअल रिऍलिटी (VR) म्हणजेच आज बाजारात उपलब्ध असलेले एक डिव्हाईस आहे, जे आपण आपल्या डोळ्यांवर लावले आणि काही खास मूवी किंव्हा विडिओ गेम लावले तर आपल्याला तिथे असल्यासारखे भासवून देतात. आपण पूर्णपणे त्या जागेत असल्याचे आपला मेंदूच भासवून देतो. ह्याचा अर्थ आपला मेंदूच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. ह्याचा अर्थ असा की आपली रिऍलिटी इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीने बनलेली आहे.
थेरोसिस्ट फीसिस्ट जेम्स गेट्स ने सुपर सिमेंट्री थेअरीचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांना सर्व कॉम्पुटर कोड दिसलेत. जेव्हा आपण टीव्ही बघतो जर त्याला खूप जवळून बघितले तर आपल्याला त्याचे पिक्सेल दिसतात. जर्मनच्या एका शास्त्रज्ञाने ज्याचे नाव जेम्स हैझनबर्ग होते त्यांनी क्वांटोम मेकॅनिक्सच्या पहिल्या इक्वेशनची निर्मिती केली होती. त्यांनी हा शोध गणिताच्या माध्यमातून लावला, ज्याला आज म्याट्रिक्स थेरी म्हणतात. ह्याने माहीत झाले की, स्पेस आणि टाइम 3d रुपात आहे, जे टेट्राहैड्रॉल आहे. म्हणजेच इकवील्याट्रल ट्रँगल आहे, ह्याची लांबी तेवढीच आहे, जेवढी अणूच्या सर्वात लहान अंश म्हणजे प्लॅंक लेंथ एवढी आहे. जेम्स हैझनबर्ग ने सांगितलं की रिऍलिटी पण पिक्सलने बनलेली आहे. सर्व छोटे छोटे युनिट मिळून एक सावली बनवत आहेत, आणि आपण त्यालाच खरे मानत आहोत. सर आईन्स्टाईनच्या मते वेळ(time) पूर्णत: इल्यूजण आहे, म्हणजेच एक प्रकारे मायाजाळ आहे. वेळ भूतकाळातून वर्तमानात येऊन भविष्यकाळात जातो. प्लॅंक टाइम, प्लॅंक लेंथ पेक्षाही खूप छोटा असतो. हे सर्व म्हणजेच प्लॅंक लेंथ आणि प्लॅंक टाइम एका चित्रपटाच्या फ्रेमप्रमाणे भासतो, तेही आपल्याला आपला मेंदू भासवून देतो. आपण वेळेला चालत्या क्रमात बघतो, फक्त पुढे जाताना.
एकोणिसाव्या शतकात एका शास्त्रज्ञाने ज्याचे नाव थॉमस होते, त्यांनी एक एक्सपिरिमेन्ट केले, त्याचे नाव डबल स्लीट एक्सपिरिमेन्ट आहे. ह्यानुसार, जर आपण दोन लांब छिद्रातून पार्टीकल पाठवले तर ते तसेच पुढल्या भिंतीवर दोन लांब रेषेप्रमाणे पॅटर्न बनवेल, त्याला पार्टीकुलार पॅटर्न म्हणतात. पण पार्टीकलच्या ऐवजी पाण्याला तिथून सोडलं तर ते वेव भीतीला आदळायच्या आधीच एकमेकांना आदळून, भीतीवर खुप जास्त रेष बनवेल, ह्याला इंटरफिअरन्स पॅटर्न म्हणतात. पण आपण एका स्लीट वरून म्हणजे एका छिद्रातून इलेक्ट्रॉनला पाठवलं तर पार्टीकल सारखाच बिहेव करतो, पण जर दोन स्लीट वरून म्हणजे दोन छिद्रातून पाठवलं तर वेगळीच घटना घटते. इलेक्ट्रॉन पार्टीकल असूनही दोन छिद्रातून जाऊन पाण्याच्या लहरीप्रमाणे पॅटर्न बनवतात, पण पार्टीकल असे कसे करू शकतो?, त्याला तर पार्टीकुलर पॅटर्न बनवायला हवं होत. म्हणूनच पुढल्या वेळी विज्ञानिकाने इलेक्ट्रॉनवर नजर ठेवण्यास स्लीटच्या पुढे एक कॅमेरा लावला, म्हणजे त्यावर नजर ठेऊन आपल्याला कळेल की इलेक्ट्रॉन कसा छिद्रातून जाऊन इंटरफीअरन्स पॅटर्न बनवतो. पण जेव्हा त्यावर नजर ठेवण्यात आली, तेव्हा निर्देशनास आले की, इलेक्ट्रॉन पार्टीकुलर पॅटर्नच बनवत आहे. असे खूप वेळेस एक्सपिरिमेन्ट करण्यात आले, पण प्रत्येक वेळेस तो पार्टीकुलर पॅटर्न बनवत होता, जेव्हा त्यावर नजर ठेवली नाही तर पुन्हा इंटरफीअरन्स पॅटर्न बनवत होता, जणू इलेक्ट्रॉनला माहीत झालं की त्याला कुणीतरी बघत आहे. ह्यातून हे कळत की, जर इलेक्ट्रॉनला बघण्यात येईल तेव्हाच निश्चित आकार घेईल, अन्यथा तोपर्यंत ती संभावनाच राहील.
आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी आपल्याकडे असे मोबाईल फोन होते, ज्याने फक्त फोन करता येत होते. पण हळूहळू खूप एडवांस मोबाईल बनविण्यात आलेत. ज्याने जवळजवळ सर्वच काम करू शकतात. आता फोनवर बोलण्यासोबत पुढल्या व्यक्तींना बघूही शकतो. आपल्या मनानुसार चालवू शकतो. कॉम्पुटरमध्ये एक गेम ज्याचे नाव GTA-5 अँड 6 हे एवढे विकसित करण्यात आली आहे की ते एकप्रकारे वर्चुअल वर्ल्ड आहे, तो गेम खेळताना आपल्याला वर्चुअल वर्ल्डचा भास करून देतो. गेममध्ये आपल्यासारखेच नियम असतात, जसे आपण उडू शकत नाही भिंत पार करू शकत नाही. म्हणजे आपल्याला खऱ्या जगाप्रमाणे भास होण्याकरिता.आताच असे गेम आहेत म्हणजे पुढल्या काही वर्षात असेही आपण गेम विकसित करू शकतो की, जसे एक खऱ्या जीवनाचे भास करून देण्यास सक्षम राहील. सोबतच आपण एक वर्चुअल वर्ल्डही बनवून घेऊ जिथे तिथली लोकं आपल्यासारखा विचारही करू शकतील. पण त्यांना कधीही माहीत होणार नाही की, ते एखाद्या गेम मध्ये आहेत. ते गेम मध्येच आपले जीवन काढणार. त्यांना त्यांचे विश्वच वास्तविक वाटेल.
आपण जेव्हा GTA-5 खेळतो, तेव्हा एवढे चांगले डिटेल्स, आणि एवढी तिथे घडणारी प्रोसेस जर होईल तर कॉम्पुटरवर खूप जास्त प्रेशर येईल, खूप लोड पडेल. म्हणून त्या गेमला बनवणारे लोक एक ट्रिक लावतात, म्हणजे गेम खेळणारा व्यक्ती जो भागात आहे, त्याला फक्त तोच भाग GPU दर्शवतो, म्हणजेच तुमचा पुढचा भाग जो तुम्ही बघत आहेत, फक्त तोच दिसेल, आणि तुमच्या मागचा भाग आहेच नाही. तुम्ही जो भाग ओबसर्व कराल फक्त तोच भाग तुम्हाला दिसेल, बाकी पूर्ण म्हणजे मागच्या बाजूला काहीही नसेल.
ज्याप्रमाणे कॉम्पुटरचा CPU, GPU च्या मदतीने कॉम्पुटर कोडला ग्राफिक्स रेंडर मध्ये कॉन्व्हर्ट करतात, त्याचप्रमाणे आपला मेंदू माहितीला खऱ्या आयुष्यात रेंडर करून आपणही ज्यावेळी जो भाग बघतो, तेव्हा फक्त तेवढाच भाग वास्तवात असतो, आणि बाकीचचे पूर्ण वस्तू आपल्याला ते असल्याचे संभवनीय करून देतात. ह्याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही ती वस्तू बघाल नाही तोपर्यंत ती वस्तू वास्तवात नसतेच. ज्याप्रमाणे डबल स्लीट एक्सपिरिमेन्ट मध्ये आपल्या बघण्यावर प्रभावित करते. खऱ्या आयुष्यातही तुमच्यासोबत असेच होत आहे.
झोपेत असताना बिना हालचाल करता आपण पूर्ण कार्य करत असतो, स्वप्नाच्या दुनियेत. आपण तिथे पूर्णता रमलेले असतो. तेच जग आपल्याला खरे वाटत असते, पण ते जग खोटे तेव्हाच वाटते जेव्हा आपण झोपेतून उठतो. ह्याचा अर्थ असा की, आपला मेंदूचं डीसाईड करतो कि आपण काय करावे. सोबतच आतापर्यंत एवढ्या मोठ्या ब्रह्मांडात फक्त आपणच का आहोत?, जर कुणी दुसरे परग्रहवासी असतील तर ते आपल्याला भेटायला का आले नाहीत?, कधी संपर्क का केला नाही? कारण एवढं सर्व फक्त आपल्यासाठीच बनवलेलं आहे. आपल्याला हाच ब्रह्मांड खरा वाटावं म्हणून सर्व स्थित बनवलेलं आहे. हेच कारण आहे की प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने कुठलीही वस्तू जाऊ शकत नाही आणि आपण पाठवूही शकत नाही. पण जर आपण प्रकाशाच्या गतीने जाऊ लागलो तर, बाहेरचा वेळ खूप वेगात जाईल. आपल्यासाठी वेळ हळुवार चालेल. हे तसेच, जेव्हा आपण विडिओ गेम खेळताना गेमची स्पीड वाढवली तर, ते गेमही ल्याक खाईल, म्हणजेच तो पात्र हळूहळू काम करेल.
पण ते काय आहेत? जे भौतिकीचे नियम पालन करत नाही?, म्हणजेच पृथ्वीच्या एखाद्या क्षेत्रात गुरुत्वाकर्षण बळ नसणं, किंवा एखाद्या अपंग मुलाचा जन्म, किव्हा आंधळ्या, किंवा बहिऱ्या व्यक्तीचा जन्म?, किंवा भूत-प्रेत, आत्मा दिसल्याचा भ्रम, हे काय आहे? कॉम्पुटर गेम खेळत असताना तिथेही अश्या काही गोष्टी घडत असतात, त्यांना तिथल्या भाषेत बग्स म्हणतात. सोप्या भाषेत तांत्रिक अडचण. आपल्या खऱ्या दुनियेतही असे बग्स, तेच आहेत. आत्ताच आपल्याकडे एवढे रिअल भासणारे गेम्स आहेत, आता कॉम्पुटर विकासित होऊन जवळजवळ फक्त 80 वर्षच झालेत, आणि एका सर्वेनुसार प्रत्येक वर्षी कॉम्पुटर दोन पटीने जास्त प्रगती करत आहे. म्हणजे आपणही काही वर्षात अश्या आपल्यासारख्या रिअल जग बनवू शकतो त्या गेम कॅरेक्टरला आपल्या मनमर्जीप्रमाणे नाचवू शकतो. आणि त्यांना वाटेल की, ते त्यांचे खरे आयुष्य जगत आहे. त्यांना जेव्हा माहीत होईल की त्यांचे हे विश्व खरे नाही आणि आपण त्यांना आपले विश्व दाखवणार तर त्यानाही विश्वास बसणार नाही. हे आपल्यासोबत घडू शकत नाही काय?, आपल्याला आपल्यापेक्षाही प्रगत सभ्यताने बनवलेलं नसावं?, त्यांच्या मनोरंजनासाठी, किंवा त्यांना एखादी विश्व कसे चालू शकते हे बघण्यासाठी?
मला ह्या सर्व विषयाबद्दल काही वर्षांपूर्वीच कळलं. एक शास्त्रज्ञामूळे. निक बोस्ट्रोम ह्यांच्यामुळे, ह्यांनीच स्टीमुलेशन हैपोथॅसिसचा विषय जगापुढे मांडला. त्यांनीच हे जग खरे आहे किंवा नाही? ह्यावर प्रश्न उभा केला होता. मग त्यानंतर मीही खूप ह्यावर रिसर्च केले. आपलेही काही थेरीज बनवल्या. जवळजवळ तीन ते चार वर्षांपासून ह्या विषयावर काम करत होतो. मग दोन महिण्याआधीच मी एक फॉर्म्युला बनविला. त्यानुसार आपल्या मेंदूला सर्व मायाजाळेतुन मुक्त करून खरे जग बघता येईल. मी ह्याला सर्वात आधी आपल्यावरच एक्सपिरिमेन्ट करण्याचे ठरवले. त्यानुसार रात्रीच्या वेळेस न्यू यॉर्कच्या एक बिल्डिंगच्या टेरिस वरून ध्यान मग्न केलो. नंतर कुठल्याही सेफ्टी शिवाय तिथून उडी मारली. पण मनात जराही भीती बाळगली नाही. मी याआधीही माझ्या घरच्या टेरिस वरून उडी मारलेली होती, पूर्ण ध्यान मग्न केल्यावर खाली पडताना जरा वेगळाच अनुभव होतो. पण तो अनुभव जास्तवेळ अनुभवू शकलो नाही कारण तो वरून खालचा डिस्टन्स खूप कमी होता. म्हणून जास्त डिस्टन्स साठी न्यू यॉर्कला गेलो. तिथून उडी मारताना मनात जराही भीती न्हवती, कारण मला खऱ्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे होते. तोच ध्यास ठेऊन, सर्व सुखसुविधा त्यागून, सर्व सुख दुःख त्यागून, घ्यानमग्न होऊन तिथून उडी मारली. खाली पडताना काही दुरीवरच मला वेगळा अनुभव आला. माझी खाली पडण्याची गती खूप कमी झाली. रात्र असूनही मला सर्व गोष्टी दिसू लागल्या होत्या. माझी गती हळू झालेली होती पण पूर्ण विश्व खूप वेगाने पुढे जाऊ लागलं होत. मी त्यांचा घटनाक्रम बघू शकत होतो. एखादी व्यक्ती कुठून आली?, पुढे कुठे जाणार?, त्याचे पुढे काय होणार?, त्याच्या भावना, त्याची इच्छा पूर्ण मला माहीत होत होते. काही क्षणातच माझे पाय जमिनीवर खाली टेकले. टेकताच मला जाणवलं की, मी सर्व लोकांना, सर्व वस्तुंना बघू शकतो, पण कुठलीही जीव मला बाघु शकत नाही. प्रत्येक माणसाचे सेल्स, त्याच्या आत असलेले, ओर्ग्यानल्स, वस्तूंचे अटोम्स, इलेक्ट्रॉन, त्याच्याही आत गेल्यास मला दिसले की सर्व गोष्टी बायनरी कोड्स होते. हे तसेच कोड्स आहेत जे कॉम्पुटर मध्ये, मोबाईल मध्ये त्याचा वापर केल्या जाते. सोबतच मी दुरदूरवरही बघू शकत होतो. कितीतरी किलोमीटर पर्यंत. माझ्यासाठी पास्ट-प्रेजेंत-फुचर एक झालेलं होत. मी एक नजर आकाशात टाकली. पूर्ण गतिनिधी मला दिसत होते. पूर्ण ब्रह्मांड अकरा डायमेंशन मध्ये स्थित होते. सर्व इल्युजन होतं, पूर्ण भ्रम. काही वेळ पूर्ण माहिती घेतल्यानंतर मला जाणवले की, आपणही ह्याच विश्वाचा भाग आहोत, जे एका आपल्यासारख्याच विकसित सभ्यताने आपल्यालाही इथे टाकलेलं आहे. आपण सर्व एका कॉम्पुटर मध्ये कैद आहोत. आपण त्यांचा सध्याचा ट्रेंडिंगचा गेम आहोत. इथे पृथ्वीवर खूप लोक, काहि लोकांचे मनोरंजन करण्यासाठीच जन्म घेतलेला आहे. काही लोक असे पात्र आहे जे विकसित सभ्यता त्यांना कंट्रोल करत आहेत. विकसित सभ्यताच्या प्रत्येक कॉम्पुटरवर ब्रह्मांडाचा हा गेम आहे. आपण त्यांच्या जगात गेलों की आपल्याला विश्वासच बसणार नाही. आपण तिथे एक क्षणही रमु शकणार नाही. आपल्याहून ते खूप जास्त विकसित असल्याने आपण त्यांच्या कॉम्पुटरला ह्याक करू शकत नाही, किव्हा ब्रह्मांडाच्या गेमला बदलवू ही शकत नाही. फक्त आपले योगदान देऊ शकतो, गेम साठी. ""



सभेतून एक वैज्ञानिक उभा झाला, आणि म्हणाला, "काय हे तुमच्यासोबत खरच घडलं आहे काय?"


"मग तुम्हला काय वाटतं? मी हे मुव्हीची स्क्रिप्ट सांगत आहो?, पूर्ण माझ्यासोबत घडलेलं आहे."



तो वैज्ञानिक, "मग पुरावे काय आहे?"

"पूर्ण माझ्यादेखता घडलंय, पूर्ण हकीकत तुमच्यापुढे माडलीय, आणि माझा पूर्ण अनुभव लिखीत स्वरूपात देऊ इच्छित असून तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाही आहे?"


दुसरा वैज्ञानिक, "कसा विश्वास बसणार सर?, मी हे मानतो की तुम्ही खूप मोठे वैज्ञानिक आहेत, पण तुमचे पुरावे सिद्ध करण्यास पात्र नाही."

तिसरा वैज्ञानिक, "हे सर्व फक्त ऐकण्यासाठी छान वाटतं. पण सत्यात मात्र सारेच लोक पैश्यांच्या मागेच लागणार आहेत ना?, अश्या थेरीच्या मागे लागून काय फायदा, ज्यात कुठलीही बाजू सत्य दर्शवत नसेल तर?"

पुन्हा दुसरा वैज्ञानिक, "सॉरी सर, पण तुमची थेरी ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, तुम्हाला पुन्हा ह्याचा अभ्यास करावा लागेल, पण कदाचित तरीही अश्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही कुणाचा."


"म्हणजे माझा पूर्ण वेळ, पूर्ण कष्ट, पूर्ण चिकाटी वाया गेली अस समजावं काय?"


एक वैज्ञानिक, "कदाचित सध्यातरी, कारण कदाचित तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले असावेत पण सर्वाना तो अनुभव घेण्यासाठी खूप वाट बघावी लागेल., आय एम सॉरी!"


त्यांच्या ह्या थेरीला मान्य करण्यात आले नाही म्हणून, ते खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेलेत. त्यांना संशोधन केलेले एवढे वर्ष वाया गेल्यासारखे वाटले. त्यांना पुढे जीवन जगण्यात कुठलेही कारण दिसत न्हवते वा इच्छाच उरली न्हवती. त्यांनी पूर्ण जगाला समजून घेतलं होत. त्यांनी आपल्या थेरीचे बुक, त्याच्या शेवटच्या पेजवर लिहिले की, "माहीत होणे, हाच जगाचा नाश आहे" असे लिहून, सांभाळून त्याला ठेवले, आणि पुन्हा न्यू यॉर्कच्या त्याच बिल्डिंग वर गेलेत आणि ध्यान न करताच तिथून उडी मारली. ह्यावेळी ते खऱ्या आयुष्यातून गेलेत. पण त्याची थेरी होतीच, तशीच...


कॉम्पुटर डेव्हलपर, "मी तुम्हाला म्हटलो होतो, असे कुणाला माहीत होऊ देऊ नका त्यांच्या अस्तित्वाबद्दल. असे कॅरेक्टरला अश्या प्रकारे पुन्हा डेव्हलप करू नका, अन्यथा पूर्ण थ्वीपृ म्हणजेच त्यांच्यासाठीची पृथ्वी नष्ट होऊ शकते. पुन्हा एवढं डेव्हलप करणं खूप कठीण होईल. सध्या हा गेम ट्रेंडिंग वर आहे, अश्या चुकीने आपले नुकसान होऊ शकते.

दुसरा कॉम्पुटर डेव्हलपर, "सॉरी सर, पुन्हा असे नाही होणार, मी फक्त टेस्ट करत होतो, की असे केल्याने काय होईल!"



उत्कर्ष दुर्योधन लिखीत…