Shodh Chandrashekharcha - 19 books and stories free download online pdf in Marathi

शोध चंद्रशेखरचा! - 19

शोध चंद्रशेखरचा!

१९ ---

संधी प्रकाशात पीटरचे ते गोडाऊन भूत बंगल्या सारखे दिसत होते. मुख्य रस्त्याच्या खोल आतल्या बाजूला ते होते. दोन किलोमीटरवर समुद्रकिनारा होता. गोडाऊन पर्यंत कच्चा रास्ता होता. त्या कच्या रस्त्यावरून, एक छोटा जुना तरी दणकट टेट्रा ट्रक तोल सांभाळत गोडाऊनच्या मागच्या बाजूला भिंतीला खेटून उभा राहिला. त्यातून दोन काळ्या सावल्या उतरल्या आणि आपल्या कामाला लागल्या!

त्यांनतर साधारण अर्ध्या तासाने, एक मारुती झेनच जून डबडं पीटरचा झोपड्या जवळ थांबलं. त्यातून आधी सिगारेटचं पेटत टोक आणि त्यामागे सुलेमान बाहेर आला. दुसऱ्या बाजूने बक्षी उतरला.

"तेरा ये सिग्रेट बुझा! सौ किलोमीटरसे जलता सिग्रेट लॉकेट होता! काम के वखत मत पिया कर!" बक्षीने आपली नाराजी पुन्हा व्यक्त केली. सुलेमान कडवट हसला. या भागात कॉर्पोरेशनचे लक्ष नव्हते. स्ट्रीट लाईटची सोय नव्हती. इथल्या कारभाराला हा अंधार पूरकच होता म्हणा.

सुलेमानने पीटरला फोन लावला.

"पीटर हम आयेले है!"

पीटरने हळूच डोकावून पहिले. एका गाडीजवळ दोघे उभे होते! एकाच्या तोंडात पेटलेली सिगारेट होती. दोघे? बरोबर एक सुलेमान आणि दुसरा बक्षी असणार. पीटर पुढे झाला.

'बक्षी?"

"पीटर?"

दोघांनी डोकी हलवली!

ती तिघे गोडाऊनकडे निघाली. अजून माणिक आला नव्हता. पीटरने डुप्लिकेट चावीने गोडाऊन उघडले. उघड्या फटीतून हात आत घालून तीन थर्मल ओव्हर कोट बाहेर काढले. आतल्या तपमानात ते घालणे गरजेचे होते! तिघे आत घुसले!

पर्स जवळ ठेवून इरावती माणिकची वाट पहात सिसिडेत बसून होती. बक्षी आसपास असल्याची खबर तिने आपल्या वरिष्ठांना कळवली होती. मध्यंतरी केव्हातरी त्या खप्पड गालाच्या माणसाचे शिंदेकाकानी रेखाचित्र पाठवले होते. ते ती पहात होती.

"मी माणिक!" या आवाजाने तिची तंद्री भंगली. मोबाईलच्या चित्रातला माणूस समोर उभा होता. तो हावरट नजरेने इच्या जवळच्या पर्स कडे पहात होता!

"मला कशे ओळखलंत?" इरावतीने आश्चर्याने विचारले.

'सोप्पय, मॅडम आता फक्त तुम्ही एकट्याच येथे बाईमाणूस आहेत! वाट पहाणाऱ्या! माझी!" आपले तंबाखूने पिवळे पडलेले घेणेरडे दात दाखवत तो रुंद तोंडभर हसला.

"चलायचं?" इरावतीने विचारले.

"कशाला? इथंच ते पैशाचं ओझं माझ्याकडे द्या! मोबाईलवर तुम्हाला चंदूभाऊचा मुडदा दाखवतो! कोल्ड स्टोरेज मध्ये यवस्था केलीय! राज्या सारखा झोपलाय!" ख्यिक करून पुन्हा तो स्वतःशीच हसला.

"नाही! बॉडी मी स्वतः पहाणार! प्रत्यक्ष आणि मगच पैसे देईन!"

"इतकी डेरिंग बरी नाही! स्टोरेजवाला एरिया डेंजर हाय! बेईमान खरतनाक लोकांचा! पैशाचं सोडा! तुमच्या सारख्या जवान बाईचं कधी मुटकुळं बांधून उचलतील नाय सांगता येत!" या घेणेरड्या माणसाच्या कवटीत चार गोळ्या घालाव्यात असे त्या क्षणी इरावतीला वाटले. पण तिने सयंम बाळगला. टी शर्ट खाली जोवर सर्व्हिस रोव्हॉल्वर होत तोवर तिला फिकर नव्हती!

"त्याची तू काळजी करू नकोस! मी माझं पाहून घेईन! तू तुझ्या त्या गोडाऊन मध्ये, असलेली चंद्रशेखरची बॉडी दाखव, पैसे घे अन मोकळा हो!"

या नाजूक दिसणाऱ्या कस्तुरीबाई कडून, माणिकला हि अपेक्षा नव्हती. मरना! आपण मोका बघून हिची पर्स हिसकून घेऊ अन, हिला तिच्या यार बरोबर कोल्ड स्टोरेजात बंद करून टाकू! हाय काय अन नाय काय? पीटर कोल्डस्टोरेजच गोडावून जवा उघडलं, तवर जिंदी ऱ्हायली तर बर, नायतर --- अपनाला काय करायचं? बंदे को कफन से काम!

"मग निघायचं काय?" इरावतीनेच विचारले.

"हा! चला कि, तुमच्या साठी गाडी घेऊन आलोय!"

तो आणि इरावती गाडीत बसले. आणि त्याने ज्या सफाईने पहिले वळण घेतले, त्यावरून तो जगातला नंबर दोनचा निशाणात ड्राइव्हर असल्याचे प्रमाण पत्र, इरावतीने त्याला देऊन टाकले, अर्थात पहिल्या नंबरवर ती स्वतःहा होती!

पीटरचा गोडाऊन समोर माणिकने त्याची कार उभी केली. खिशातल्या किल्लीने गोडाऊनचे दार उघडले. गार हवेचा भपका बाहेर आला. दार उघडताच आतील दिवे लागले होते.

"हू, व्हा म्होरं!" माणिक इरावतील म्हणाला!

"उहू! तू पुढे हो! आतून पांघरायची थर्मल ओव्हरकोट असतात अश्या गोडाऊन मध्ये! ये घेऊन! मग मी आत येते!" इरावती खंबीरपणे म्हणाली.

तो उघड्या फटीतून आत गेला!

००००

पीटर, बक्षी आणि सुलेमान गोडावून मध्ये आले, तशे तेथील दिवे आपोआप लागले. ऑटोलॉकिंग ते दार पुन्हा बंद झाले. पीटरने पुन्हा दिवे लावले. सगळ्यात पुढे पीटर होता. चंद्रशेखरच्या बॉडीची ट्रॉली होती, त्या कोपऱ्यात काही तरी हलल्या सारखा भास त्याला झाला होता. एकदम उजेड पडल्याने असे वाटले असेल, असे त्याला वाटले. चंद्रशेखरच्या ट्रॉलीकडे पीटरने बोट केले.

"बक्षी ये रहा मुर्दा! मेरी बिदागी?"

"पहिले ज्याचं तो करलू!" बक्षी पुढे सरकत म्हणाला.

सुलेमानने नवी सिगारेट ओठात खुपसली आणि सर्रकन काडी ओढून ती पेटवली. बाक्षीचे डोके सरकले. त्याने खिशातले पिस्तूल काढले त्यावर सायलेन्सर चढवले आणि दोन गोळ्या झाडल्या.

पीटर आणि सुलेमानला, किंकाळी फोडायलाही वेळ मिळाला नव्हता! त्यांच्या मेंदूच्या चिंधड्या उडाल्या होत्या. दोघेही लाकडाच्या ओडक्या सारखे जमिनीवर कोसळले!

"सुन्ता नही हरामजादा! और इस हवाले, पीटरको जनकारीकी बिदागी चाहिये!" बक्षी स्वतःशीच पुटपुटला. आणि नाही तरी या दोघांचीही बक्षीच्या दृष्टीने युटिलिटी संपली होतीच!

तो सावकाश चंद्रशेखरच्या बॉडी जवळ आला. हाताने त्यावरचा बर्फाचा थर बाजूला करून ती बॉडी चंद्रशेखरचीच असल्याची खात्री करून घेतली. त्याचे उघडे पंजे गारठून गेले. ओव्हर कोटीच्या खिशात त्याने ते पुन्हा खुपसले. खिशात ग्लोज होते. तोच त्याच्या कानावर कोणाचा तरी आवाज आला.

"व्हा म्होरं!"

तो क्षणभर कोपऱ्यात सरकला. साल, कोण तडमडलं? आणि एक काळा पंज्या त्याच्यासमोर आला. त्याच्या मागे कोणी तरी उभे होते! काय होतंय कळायच्या आत, तो चिकट पट्याच्या विळख्यात जखडला गेला! पहिला टेप त्याच्या तोंडावर आणि दुसरा विळखा डोळ्यावर मग कोटातल्या खिशातल्या हातावर आणि पायावर! दुसऱ्या क्षणी त्याचे धूड खांद्यावर उचलले आणि त्या काळ्या छायेने, त्याला टेट्रा ट्रॅक मध्ये फेकले!

"उहू! तू पुढे हो! ---' इरावती म्हणत असताना, तो टेट्रा ट्रक गोडाऊन पासून तोल सावरत निघून गेला!

माणिकने आत जाऊन भिंतीच्या हुकला अडकवलेले दोन ओव्हरकोट घेतले. आधी आपल्या अंगावर एक चढवला! उरलेला कस्तुरीकडे दिला. ती तो अंगावर घालतच आत आली आणि माणिकने सरकून तिला पुढे जाण्यासाठी रस्ता दिला.

आणि माणिक एकदम ताठ झाला! धोका! साली, हि कस्तुरी नाही! तरी तिची डेरिंग बघून हॉटेलातच त्याला शंका आली होती! ओव्हर कोट घालताना, इरावतीच्या कमरेच्या लाल लेदर बेल्टला लटकवलेले रिव्हॉल्व्हर चमकले होते!

मागचा पुढचा विचार न करता माणिकने एक आचकट विचकट शिवी हासडली, आणि एक जोरदार समोर चालणाऱ्या इरावतीच्या कमरेत लात घातली! अनापेक्षित हल्ल्याने इरावती क्षणभर हादरली. खाली पडता पडता तिने स्वतःला सांभाळले, पण तोल सावरण्याच्या बहाण्याने अजून एक लोळण जमिनीवर घेतली. या लोळणीत तिने दोन गोष्टी केल्या, एक कमरेचे पिस्तूल हातात घेतले आणि हातातली मोठी पर्स समोर धरून त्या आड ते धरले!

धडपडत ती उभी राहिली.

"माणिक, हा काय गाढवपणा आहे?" रागाने इरावतीने विचारले.

"हलकट! तू कस्तुरी नाहीस! कोण तर पोलीस हैस? बोल तू कोण हैस?"

"हो, मी इन्स्पेक्टर इरावती आहे! आणि तुला अटक करण्यासाठी आले आहे!"

"पर कवा करनार? जिंदी राहिलीस तर ना?"

माणिकच्या डोळ्यात इरावतील वेडसरपणाची झाक दिसू लागली. त्याच्या हातात गावठी कट्टा होता आणि त्याने तो तिच्या कपाळावर रोखला होता. त्याचा हात हि कमालीचा स्थिर होता. त्याच्या मेंदूचा एक आदेश आणि गोळी सुटणार होती! इरावतील फक्त एकच क्षण हवा होता, स्वतःचा जीव वाचवायला!

"माणिक गाढवपणा करू नकोस! तुला पैसे हवे असतील तर ते घे! आधी ते हातातलं पिस्तूल बाजूला कर!" पैशाचे नाव निघताच त्याच्या डोळ्यातील भाव क्षणभर बदलले. एकाच वेळेस दोन गोळ्या सुटल्या. इरावतीने डावीकडे झेप घेत गोळी झाडली होती. ती माणिकच्या छातीत घुसली होती! माणिकने झाडलेली गोळी इरावतीच्या उजव्या दंडाला चाटून गेली होती.! बाहेर कोठेतरी पोलीस गाडी आणि ऍम्ब्युलंसचा सायरन वाजत होता!

******