firangi in Marathi Love Stories by Manini Mahadik books and stories PDF | फिरंगी - एक निराळी प्रेमकथा

फिरंगी - एक निराळी प्रेमकथा

फिरंगी

जुहू बीच वर गर्दी निवळत आलेली.एकांत मिळावा म्हणून मुद्दाम रेंगाळलेली काही जोडपी अन काही फेरीवाले, अशी काही तुरळक मंडळीच उरली होती.

समोर फेसाळणारा समुद्र अन क्षितिजाला टेकलेला लालजर्द सूर्य बघत रॉबर्ट मग्न झाला होता.

ज्या सुखासाठी तो भटकत होता ते साक्षात मूर्त स्वरूपात त्याला भेटलं होत. समोरच्या दृश्याने त्याला एक आत्मिक समाधान दिलं होतं. एकटक सूर्याकडे पाहून त्याच्या डोळ्याला पाणी आलं. त्याच्यासमोर सगळा भूतकाळ तरळला.

ऍना, त्याची आई, सुंदर अन सोनेरी केसांची. तिचं हसणं लाघवी. अतिशय कोवळ्या वयात ती त्याच्या वडीलांच्या प्रेमात पडलेली. त्यातून बहरलेला अंकुर म्हणजे रॉबर्ट. ऍना चा रॉबर्ट वर खूप जीव.रोबर्ट चं ही अक्ख जग आईभोवतीच फिरायचं. लास-वेगास मधे त्यांचं सुंदर, रमणीय घर होतं.

ऍना ची माहेरची संपत्ती खूप. अन रोबर्टचा बापही सधनच.पण रॉबर्ट ला जन्म द्यायचा नाही हा त्याचा आग्रह.

त्याच्या आग्रहाला न जुमानता ऍना ने रॉबर्ट ला हे जग दाखवलं, तसं त्याचा बाप ऍना पासून दूर गेला. दुसरा संसार थाटून मोकळा झाला.

ऍना खचली. ‛एक आयुष्य,एक प्रेम' या भारतीय विचारांची ती अभ्यासक होती. तिच्या संस्कृतीत मोकळीक होती पण त्याने आयुष्य उध्वस्त होतात, हे तिला उमगलं होतं. ती बऱ्याचदा रॉबर्ट ला म्हणायची, “माझ्यासारख्या विचारांच्या मुलीनं भारतात जन्माला यायला हवं होतं."

तिला भारतभेट द्यायची होती पण ती गेली. अनंतात विलीन झाली.

आईमागे रॉबर्ट पोरका झाला. बापामुळे प्रेमावरचा विश्वास उडालेला पण आईमुळे प्रेमाच्या संकल्पना बदललेला रॉबर्ट वारंवार भारतात येऊ लागला. इथल्या मौलिक विचारांत कुठेतरी आई गवसेल असं त्याला वाटायचं.


तो शून्यात बघत होता अन घुंगरांचा मधुर आवाज त्याच्या कानावर पडला. त्यानं जमिनीवरच नजर वळवली. एका मुलीचे सुंदर पाय त्याच्याजवळ येऊन स्थिरावले होते पायातले पैंजण, लांब निमुळती बोटं, अंगठ्याजवळ छोटासा तीळ, सगळंच किती आकर्षक भासत होतं.

“बाबूजी......गजरा घेणार का?.." आवाजही तितकाच सुंदर. आपसूक त्याची नजर पावलांवरनं तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली अन तो बघतच राहिला. अर्धवट मोकळे कुरळे केस वाऱ्यासवे भुरभुरत होते. तिच्या कपाळावरच्या चंद्रकोरीत त्याला तिचेच प्रतिबिंब दिसले. मोठाले डोळे अन रेखीव भुवया सारंच कसं सौंदर्याची परिसीमा गाठणारं होतं.


आपल्या अश्या नजरेनं त्या मुलीला अवघडल्यासारखं वाटतंय हे त्याच्या लक्षातच आलं नाही.

ती परत एकदा त्याच्या डोळ्यांसमोर हात हलवीत म्हणाली “बाबूजी.. " तसं तो भानावर आला अन ओशाळून बोलला " “oh sorry".

ती पाठमोरी होऊन जाऊ लागली.

त्याला तिला जाऊ द्यायचं नव्हतं, अजून काही बोलायचं होतं.

"excuse me..." त्यानं हाक मारली. ती वळाली, माघारी आली. तो बोलावेल अस तिलाही वाटलं होतं. त्याची ती नजर तिला घाणेरडी नक्कीच वाटली नव्हती. उलट आवडलीच होती. पण खोटा राग आणून म्हणाली “घ्यायचाय का ते सांगा, मला घरी जायचंय."

त्याला थोडीफार मराठी कळत होती, पण बोलता येत नव्हती.

तो: will u speak in english ?

ती: yes. afcorse.

तो: (आश्चर्याने) ohh...i thought...

ती:what?..u thought that I'm uneducated.

तो: not like that.

ती: i m tourists guide.

तो: tourists like me?

ती: not like u, because u just seat here for an hours, i had seen u many times.

तो: then why dont u become my guide?

ती: yes,i will.मग उद्या भेटूया,इथंच.


दुसरा दिवस उजाडला. रॉबर्ट ला पहाटेच येऊन तिची वाट बघत बसावं वाटत होतं. वातावरण मंतरल्यासारखं झालं होतं. ती दुरून येताना दिसली अन तो उभा राहिला. तिच्यावर गुलाबी पंजाबी ड्रेस खुलून दिसत होता. कालच्याएवढीच कमालीची सुंदर दिसत होती ती. ती जवळ-जवळ येताना त्यानं डोळे मिटुन घेतले. तो घुंगरांचा आवाज त्याला कानात अन मनात साठवायचा होता. तिच्या बाह्य सौंदर्यापेक्षा ती आतून किती निरागस आहे याचा त्याला प्रत्यय आला होता. एका नजरेत त्यानं तिला निवडलं होतं. त्यानं काही न सांगताच तिनं ते ओळखलं होतं अन ओळखीचं हसून दुजोराही दिला होता.


रोबर्ट: u did not told your lovely name.

ती: मानसी.आणि तुझं?

रॉबर्ट: रॉबर्ट.


आता अनोळखी पणा संपला होता.तो म्हणाला "तू शिकलेली दिसतेस,मग अस फेरीवल्यासारखं गजरे का विकत होतीस?

मानसी: माझी आई गजरे विकायची ईथेच. मला आवडत नसायचं, लाज वाटायची, पण ती गेली मला सोडून. हयात होती तोवर सुगंध माळत राहिली लोकांच्या मनात. त्याच सुगंधाने आजतागायत माझं आयुष्य सुगंधित केलंय.

लोकांना गजरे माळताना पाहिलं की तिच्याजवळ असल्यासारखं वाटत मला.


दोघांच्या आयुष्यात इतकं साधर्म्य देणाऱ्यांनच तिला आपल्या आयुष्यात पाठवलंय हा त्याच विश्वास दृढ झाला.

दोघे मनाने, तनाने जवळ आले. एकरूप झाले.


रोबर्टचा व्हिसा आता संपत आला होता. आता सहा महिने तो इकडे येणार नव्हता. तिला घेऊन जावं असं त्याला वाटत होतं पण ती भारत सोडायला तयार नव्हती. त्यामूळे सुवर्ण मध्य म्हणून रॉबर्ट ने आणि मानसीने ठरवलं की रॉबर्ट जेव्हा भारतात येईल तेव्हा त्यांनी सोबत राहायचं.सहा महिने सोबत अन सहा महिने वेगळं. आपल्या प्रेमाची कसोटी तपासण्याची देवाचीही इच्छा असेल असं त्यांना वाटलं.

दोघांनीही एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका घेतल्या अन रॉबर्ट निघून गेला. मानसी परत एकटी पडली पण त्या एकटेपणात आता अनाथ असल्याची भीती नव्हती. ती आता रॉबर्ट ची झाली होती.त्याच्यावरती तिचा पूर्ण विश्वास बसला होता. रॉबर्ट गेला पण त्याच्या प्रेमाचा अंकुर तिच्या उदरात पेरून गेला. तिला लगेच रॉबर्ट ला सांगावस वाटलं पण दुराव्याच्या काळात एकमेकांशी कसलाही संपर्क ठेवायचा नाही हेही दोघांनी मिळूनच ठरवलेलं. सहा महिन्यांनी जेव्हा तो येईल तेव्हा बाळाच्या अगमनाला तो असेलच की. त्याला आपण सरप्राईज देऊ म्हणाली.

रॉबर्ट तिला पैसे पाठवायचा, ती नको म्हटली तरी त्यानं ते मात्र ऐकलं नव्हतं. तिला आता काम करायची गरज नव्हती. सहा महिने पुर्ण झाले, रॉबर्ट ची येण्याची वेळ टळून गेली. तशी तिची घालमेल सुरू झाली.त्याच्याशी संपर्क होत नव्हता, अन जास्त हालचाल तिला जमत नव्हती. बाळाचा पहिला स्पर्श तिला त्याच्या बरोबर अनुभवायचा होता. हळूहळू पैसे ही येईनासे झाले.

रॉबर्ट आपल्याला फसवू शकतो, ही गोष्ट तिच्यालेखी अशक्यप्राय होती. पण जे घडत होतं ते नाकारता येत नव्हतं. बाळाची चाहूल तिला सुखावत होती पण आपल्यासारखाच हे पोर पण बापाविनच असेल ही भावना तिला अस्वस्थ करायची.

बाळाचा जन्म झाला, निळ्याशार डोळ्याचा, सोनेरी केसांचा अन गोऱ्यापान कांतीचा छोटा रोबर्टच हातात घेतलाय अस तिला वाटलं. “रॉबर्ट असायला हवा होता..." तिने डोळे टिपून घेतले आणि बाळाकडे बघत हरवून गेली.

वॉर्डच्या बाहेर, दाराआड, रॉबर्ट तिला न्याहाळत होता. त्याला यायला उशीर झालेला पण तो आला होता. तिला बाळात हरवलेलं पाहून त्याला ऍना ची आठवण झाली. त्याच्या शिवाय बाळाला जन्म देणाऱ्या मानसीत त्याला ऍना अवचित गवसली होती. पण तो त्याच्या बापासारखा होणार नव्हता. त्याला त्याचं एकमेव प्रेम आयुष्यभर हवं होतं. अन आता तो तिला कधीच डोळ्याआड करणार नव्हता.

बेड वर मानसी डोळे मिटून विचार करत होती.आज रॉबर्ट असायला हवा होता...............

तेवढ्यात तिला बाळाचा रडण्याचा आवाज आला अन तिची तंद्री तुटली,तिने डोळे उघडले.. समोर रॉबर्ट बाळाचे मुके घेत होता.Rate & Review

Bharat Deshmukh

Bharat Deshmukh 3 months ago

Anjali Shinde

Anjali Shinde 10 months ago

👌🏻👍

Vaishali Kamble

Vaishali Kamble 11 months ago

Manini Mahadik

Manini Mahadik 11 months ago

Karuna

Karuna 11 months ago