Nationalism A New System in Marathi Philosophy by ADV. SHUBHAM ZOMBADE books and stories PDF | राष्ट्रवाद: एक नवी प्रणाली

राष्ट्रवाद: एक नवी प्रणाली

         राष्ट्रवाद ही मानवांची मानसिक आणि भावनिक संकल्पना आहे. राष्ट्रवाद ही अत्यंत गुंतागुतीची संकल्पना आहे. राष्ट्र या शब्दाशी राष्ट्रवाद ही संकल्पना संबंधित आहे. राश्ट्र या शब्दापासूनच राष्ट्रवाद या संकल्पनेचा जन्म झाला आहे. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणे आणि राष्ट्रांशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टींचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे. राष्ट्र आणि नागरिकांच्या कल्याणासाठी राष्ट्रवादाचे मानसिक आणि भावनिक बळ घेऊन राष्ट्रांचे नागरिक काही तरी करण्याची धडपड करीत असणे म्हणजेच राष्ट्रवाद असतो.
         राष्ट्रवादाचा जन्म हा जागरूक नागरिकांच्या मनामध्ये होत असतो; तसेच राष्ट्रवादाच्या राष्ट्रीय भावनेतून ऐकामकांविषयी आपुलकीची भावना निर्माण होत असते. राष्ट्रवादामुळे राष्ट्र आणि मानवकल्याणासाठी नागरिक नैतिक उच्चकोटीचे त्याग करण्यासही नेहमी तत्पर असतात; परंतू राष्ट्रवादातून व्यक्तीहित ही जोपसिले पाहिजे याची दक्षता आपण घेतली पाहिजे. राष्ट्रवादाची मानसिक आणि भावनिक संकल्पना ही नागरिकांना वास्तविक बळ देत असते.
         माझ्या मतानुसार राष्ट्रवादाची व्याख्याः ‘‘ राष्ट्रीय भावनेतून एकता साधित राष्ट्र आणि त्यातील नागरिकांचा मानवाकरीता विकासवाद म्हणजेच राष्ट्रवाद होय.’’
         राष्ट्रवादातून राष्ट्रीय भावनेचा विकास होत असतो. राष्ट्रातील विषमता यांना राष्ट्रीय भावनेच्या माध्यमातून दूर करता येते. एखाद्या राज्याला राष्ट्र ही मानसिक आणि भावनिक सज्ञा मिळविण्यासाठी राष्ट्रीय संस्कृती, राष्ट्रीय भाषा इत्यादी राष्ट्र पातळीवरील सर्व गोष्टीं एकात्मतेने स्वीकारावे लागतात. परंतू भारत हा देश विविधतेचा आणि वांशिक, धार्मिक व जातीय विशमतेचा देश असून, आपल्याला विविधतेतून एकता साधत भारत या देशाला राष्ट्रीय भावनेतून राष्ट्र ही पदवी बहाल करावयाची आहे. तसेच राष्ट्रीय भावनेचा विकास कोणत्याही पारतंत्री राज्याला देशाला स्वतंत्रता मिळवून देण्यासाठी पे्ररित करीत असतो. कोणत्याही देशाची सार्वभौमता, स्वातंत्र्यता, एकता व एकात्मताचे रक्षण त्या देषातील नागरिक आपल्यामध्ये राष्ट्रवादी भावनेचा विकास करून करीत असतात.
        राष्ट्रवादातून सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक समानताची साध्यता इतर दुसÚया कोणत्याही पध्दतीच्या तुलनेने अधिक वेगाने होत असते. भारतामधील विषमता ही देशातील अत्यंत गंभीर बाब आहे; जी भारताच्या सार्वभौमतेला आणि राष्ट्रीयत्वाला तारक नसून मारक आहे. भारतामधील विषमता दूर केल्याशिवाय भारत हे एक राष्ट्र केव्हांच ठरू शकत नाही. भारतामधील जनता ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात ही धर्म आणि जातीच्या जाळयामध्येे एका मास्यागत अडकलेली आहे; जोवर तिला पाणीरूपी राष्ट्रीय भावनाद्वारे समानतारूपी जीवदान देत सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक विषमता दूर केली जात नाही; तोपर्यन्त एकता मिळणार नाही; परिणामी ती मरण्याची वाट पाहतच तडपती राहिल.
        राष्ट्रवादातून राष्ट्रीय विकास अधिक गतीने करता येतो; कारण राष्ट्रवाद हा राष्ट्रातील जनतेमध्ये राष्ट्रीय भावनेद्वारे नागरिकांना एकसूत्रात बांधण्याचे कार्य करीत असतो. राष्ट्राच्या विकासाचे स्वप्न ऊराशी बाळगून नागरिकलोक संघटित होतात आणि संघटित होऊन व्यक्तीशक्तीचे रूपांतर जनशक्तीमध्ये करून; राष्ट्राच्या विकासाच्या चाकाला जनशक्तीची उर्जा देऊन गतीमान करण्याचे प्रयत्न करीत असतात. त्यामुळे राष्ट्राच्या विकासासाठी जनतेने आपापसातील सर्व मनभेद आणि मतभेद दूर करून राष्ट्रीश् एकता व एकात्मतेला प्रेरणा द्यावी. राष्ट्रवादासाठी संकुचित बुध्दीचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. संकुचित बुध्दी ही स्वहिता शिवाय इतर काहीही पाहू शकत नसते; त्यामुळे ती राष्ट्राची एकता व एकात्मता कायम राखण्यासाठी केव्हाही प्रयत्नशील असूच शकत नाही. एखाद्या देशाला राष्ट्र ही पदवी असेल तर संकुचित बुध्दीच्या प्रादुर्भावाने ती संपुश्टात येऊ शकते. संकुचित बुध्दी समानतेची वागणूक केव्हाच देऊ शकत नाही; त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांने राज्याची राष्ट्र ही पदवी कायम राखण्यासाठी समानतेचा स्वीकार करून राष्ट्रीय एकता व एकात्मतेचा स्वीकार केला पाहिजे.
         राष्ट्रवादाचे पुरोगामी राष्ट्रवाद व प्रतिगामी राष्ट्रवाद हे दोन प्रकार समाजामध्ये अद्यापही प्रचलित आहेत; पंरतू या बदलत्या काळामध्ये राष्ट्रवादामध्ये आता आपण बदल केला पाहिजे. कारण मनुष्य स्वतःची प्रगती करीत त्याने आधुनिक शस्त्राचीही प्रगती केलेली आहे; जी शस्त्रे संपूर्ण मानवी जात नष्ट करू शकते. त्यामुळे मानवी जातीवर आणि या जगावर विध्वसंतेचा काळोख अंधकार अमावस्या सारखा पसरलेला आहे. त्यामुळे पुरोगामी राष्ट्रवाद आणि प्रतिगामी राष्ट्रवाद आता काळाच्या पडद्याच्या मागे पडलेले आपल्याला दिसतात. तसेच मानवी जातीचे अस्तित्व आणि जगाच्या अस्तित्वातर अधिकचा ताण आलेला आहे; त्यामुळे आपण नवा राष्ट्रवाद स्वीकार करणे आता गरजेचे झाले आहे. कारण पुरोगामी राष्ट्रवाद आणि प्रतिगामी राष्ट्रवाद हे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करू शकत नाहीत.
          पुरोगामी राष्ट्रवाद आणि प्रतिगामी राष्ट्रवाद यांची विचारप्रणाली या अमर्याद आधुनिक काळामध्ये मर्यादित स्वरूपाची झालेली आहे. त्यामुळे ती आता मानवतावाद्यांचे व राष्ट्रवाद्यांचे योग्य मार्गदर्शन करू शकणारी राहिली नाही. त्यामुळे आता आपणाला या अमर्याद आधुनिक काळामध्ये मानवतावाद्यांच्या व राष्ट्रवाद्यांच्या मार्गदर्शनासाठी नवी प्रणाली आपण स्वाकारली पाहिजे.
          माझ्या मतानूसार पुरोगामी राष्ट्रवादाच्या जागी पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद ही प्रणाली अमर्याद आधुनिक काळामध्ये प्रभावी ठरेल असा माझा ठाम विश्वास आहे. तर प्रतिगामी राष्ट्रवाद ही विचारधारा अविकसित विस्खळीत समाजव्यवस्थेचा भाग असल्याने अपरिपक्व मानवांनी ती प्राथमिक मानवी समाजात रूजू केली होती; हे आपण जाणले पाहिजे. ती अधिकच गंभीर झाल्याने त्याचे स्वरूप आता प्रतिगामी राष्ट्रवादातून आतंकवाद या प्रणालीत स्थलांतरित झालेले आहे. याची कल्पना आता आपण सर्वानी घ्यावयास हवी.
          विश्वहितासाठी, राष्ट्रहितासाठी व मानवीहितासाठी जो राष्ट्रवाद आपल्याला करावयाचा तो आहे; पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद. पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावादामध्ये वैश्विक सहकार्यता, राष्ट्रीय सार्वभौम, व्यक्ती व राष्ट्रीय स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता, न्याय आणि समाजातील सर्व व्यक्तींच्या कल्याणाचा विचार केला जातो. पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद हा विश्व, राष्ट्र आणि मानवांचा सर्वागीण विकास साधण्याकरीता प्रयत्नशील असतो. या राष्ट्रवादातून विश्व सहकार्य भावना, राष्ट्राचा अणि मानवांचा शाश्वत विकास शांततेच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न केला जातो. विश्व सहकार्यता तसेच राष्ट्रासोबत इतर राष्ट्राचींही आणि मानवांची प्रगती व्हावी हा मानवतावादी उद्देश पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीमध्ये असतो. इतर राष्ट्रांशी चांगले हितसंबंध कायम करीत आपल्या राष्ट्रांची व त्यातील नारिकांची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला जातो. पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून आधुनिकतेकडे जाण्यासाठी नव्या विश्वकल्याणाच्या, राष्ट्रकल्याणाच्या आणि मानवकल्याणाच्या संकल्पनेचा अवलंब करीत त्याचा प्रचार व प्रसार केला जातो. आपण अमर्याद काळात अमर्याद प्रणालीचाच स्वीकार करावा; तशी बदलत्या काळाची ही प्रखर मागणी मानवाकडे आहे.
          प्रतिगामी राष्ट्रवादातून आतंकवाद नेहमीच विघातक असणारे कार्य करीत असतो. तो साम्राज्यवाद, वसाहतवाद, आतंकवाद, आक्रमकता व युध्द याचा पुरस्कार करीत असतो. प्रतिगामी राष्ट्रवादातून आतंकवाद हा बदलत्या काळानूसार चालू शकत नसल्यामुळे तो अविकसित प्राथमिक समाज घटकाचा भाग राहून प्राचीन कालबाहय रूढी, परंपरांना अधिकच महत्त्व देत असतो. सार्वभौम, स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता, न्याय तसेच ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कार यांना स्थान न देता अनैतिक वंशवाद, धर्मवाद, जातीवाद, आतंकवाद, वसाहतवाद, साम्राज्यवाद, आक्रमकता व युध्द यांना स्थान देत असतो. प्रतिगामी राष्ट्रवादातून आतंकवाद हा विश्वकल्याण, राष्ट्रकल्याण, मानवकल्याण यांची मुल्ये कधीच स्वीकार करू शकत नाही; याचे जीवंत उदाहरण पाकिस्तान आहे. परंतू पूरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद हा विश्व, राष्ट्र आणि लोक कल्याणाचा पुरस्कार नेहमीच करीत असतो.
          पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद हा विश्वासाठी विघातक असलेले कार्य, राष्ट्रासाठी विघातक असणाÚया जुन्या रूढी, परंपरांना महत्त्व न देता; त्यात सुधारणा घडवितो त्यासोबत नवा विचार, नवी संकल्पना, नवा मार्ग, नवी दिशा, नवा दृष्टीकोण देत आणि काळानूसार होणाÚया परिवर्तनाचा स्वीकार करीत असतो. आणि संहारक व आक्रमक वृत्ती न बाळगता मानवतेला प्राधान्य देत असतो. पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद हा वंश, धर्म, अस्पृष्यता, जात, लिंग, भाषा, पेहनावा, भूप्रदेष आणि प्रांत इत्यादीत विषमता न बाळगता मानवांना मानवाप्रमाणे वागवून विविध गटांना विकासाची समान संधी देऊन राष्ट्राचे पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून विकासाचे चक्र गतिमान करतो.
            जो राष्ट्रवाद बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यात फरक न करता; त्यांना आपल्या राष्ट्राचा नागरिक म्हणून राष्ट्रीय भावनेतून सर्वांच्या हितांचे संरक्षण करतो व राष्ट्रांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक विकासाकरीता सर्वांना समान संधी प्रदान करीत असते; ती पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद प्रणाली.


= माझे प्रश्न आणि तुमचे उत्तरः
1. राष्ट्रवादाची मानसिक आणि भावनिक संकल्पना ही नागरिकांना वास्तविक बळ देेते का ?
2. कोणत्याही देशाची सार्वभौमता, स्वातंत्र्यता, एकता व एकात्मताचे रक्षण त्या देशातील नागरिक आपल्यामध्ये राष्ट्रवादी भावनेचा विकास करीत करू शकतात का ?
3. राष्ट्रवादातून सामाजिक समानतेचा विकास दुसÚया कोणत्याही पध्दतीच्या तुलनेने अधिक वेगाने होऊ शकतो का ?
4. राष्ट्रवादातून राष्ट्राचा सर्वागीण विकास साधण्याकरीता प्रयत्न केला जातो का ?
5. राष्ट्रवादाचा जन्म हा जागृत नागरिकांच्या मनामध्ये होत असतो का ?
6. राष्ट्रवादातून राष्ट्रीय भावनेचा विकास होत असतो का ?
7. राष्ट्रातील विषमता ही राष्ट्रीय भावनेच्या माध्यमातून दूर करता येते का ?
8. भारतामधील विषमता ही अत्यंत गंभीर बाब आहे का ?
9. राष्ट्रवादासाठी संकुचित बुध्दीचा त्याग करणे आवश्यक आहे का ?
10. संकुचित बुध्दी समानतेची वागणूक देऊ शकते का ?
11. एखाद्या देशाला राष्ट्र ही पदवी असेल तर संकुचित बुध्दीच्या प्रादुर्भावाने ती संपुष्टात येऊ शकते का ?
12. देशाची राष्ट्र ही पदवी कायम राखण्यासाठी राष्ट्रवादातून राष्ट्रीय भावनेचा विकास करून एकता व एकात्मतेचा स्वीकार केला पाहिजे का ?
13. पुरोगामी राष्ट्रवादातून राष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याकरीता प्रयत्न केला जातो का?
14. प्रतिगामी राष्ट्रवाद नेहमीच विघातक असणारे कार्य करीत असतो का?