anokhe prem - 2 books and stories free download online pdf in Marathi

अनोखे प्रेम - 2

Hello friends... मागच्या part मध्ये आपण पाहिलं कि दोघांनाही एकमेकांच्या भेटीची किती ओढ लागलीये.... या part मध्ये आपण पाहणार आहोत कि त्या दोघांची भेट होते कि नाही ते... आणि हे सर्व वाचताना तुम्ही enjoy करताय कि नाही हे मला नक्कीच comment मध्ये कळवा... धन्यवाद 🙏🏻
काही दिवस हे एकमेकांच्या आठवणीतच निघून गेले. पण भेट होण्याची काही लक्षणे दिसत नव्हती. सोनू ने कसबस आपल्या ताई कडून साऊंड इंजिनीर च नाव काढून घेतलेलं असत. त्याच नाव असत मुक्तार. पण त्याला कोणताच मार्ग नव्हता सोनूचं नाव समजायला. एक दिवस सोनूच्या चुलत भावाचं लग्न ठरत. Show ही घरातल्या घरात असल्याने सगळे खुश असतात फक्त कमी असते ती साऊंड ची. त्यामुळे साऊंड साठी मुक्तार ला बुक केल जात. ही बातमी कळतच दोघांनाही परमानंद होतो. सोनू तर उड्याच मारायला लागते. इकडे मुक्तार चे पाय जमिनी वर नसतात. दोघांनाही काय करू काय नको असेल झालेलं असत 😊... किती cute प्रेम आहे ना खरंच 😘.... लग्नाची तारीख 25 जानेवारी ला ठरते आणि सर्वांची घाई गडबड सुरु होते सोनूचं मात्र लग्नात लक्ष नसतंच 😂... तिला फक्त एकच विचार असतो आता हा मुक्तार कधी येणार.. सगळे लग्नासाठी तयार होऊन कार्यालयात जातात. मुक्तार ही तेथे येतो. सोनूचा तो गुलाबी कलर चा ड्रेस त्यावर्ती ते वाऱ्याच्या वेगाने उडणारे केस.. गुलाबी कलर ची faint lipstick.. हे सर्व पाहून मुक्तार तर त्याच्या धुंदीतच होता. आणि सोनू ही काही वेगळी नव्हती बर का... त्याचा तो लाल कलर चा आकर्षित करणारा शर्ट . ब्लॅक कलर ची जीन्स... आणि त्यावर्ती black color चा gogal.. या सर्व गोष्टींनी तीच लक्ष वेधून घेतलं होत. दोघांची ही नजर एकमेकांवरून हटतं नव्हती. काही वेळाने शो सुरु झाला. दोघे ही एकमेकांच्या विचारात गुंग होते. एकमेकांकडे बघून ते स्मिथ हास्य देण..सोनूचं सारं लक्ष मुक्तार कडेच होत. त्याच्या नादात anchoring करताना तिच्या हातातून माईक खाली पडतो आणि फुटतो तरीही मुक्तार तिला स्मिथ हास्य देतो आणि तिला काहीच बोलत नाही.. त्यावेळी तर सोनूला तो खूप जास्त आवडायला लागतो. आणि मुक्तार ला ही तिने केलेल्या चुकीचा राग येत नाही. का कोणास ठाऊक दोघांनाही एकमेकांबद्दल आपुलकी, प्रेम, माया वाटत होती😊... पण हे प्रेम यशस्वी होईल का आणि नाही झालं तर काय करायचं हा प्रश्न दोघांनाही पडला होता... दोघांच्या ही मनात एकमेकांबद्दल आदर होता, प्रेम होत, आपुलकी होती, दोघांच्या ही गोष्टी एकमेकांना आकर्षित करणाऱ्या होत्या. पण पहिला कोण विचारणार 🤔.... सोनूला वाटत होत तिने विचारलं आणि तो नाही म्हणाला तर मग 😔... आणि त्याची ही कंडिशन काही वेगळी नव्हती बर का😂... त्याला ही असच वाटत होत. त्याने विचारलं आणि सोनू नाही बोलली तर मग काय करायचं😔... किती cute आहेत ना दोघेही😊... प्यार तो दोनो तरफ से है प्रेम इझहार करणेसे डरते है😂😘...काही वेळाने शो संपला सगळे जेवायला गेले. पण सोनू आणि मुक्तार दोघेही जेवायला गेले नाहीत. दोघेही बसले पण एकमेकांसोबत बोलले नाहीत फक्त एकमेकांकडे बघायचे आणि स्मिथ हास्य द्यायचे. पण अचानक सोनूच्या मनात आलं अस किती दिवस चालणार... जेव्हा शो असेल तेव्हाच भेट होणार आणि हसण्याशिवाय अजून आम्ही काही केलंच नाही.. आजपर्यंत साधं आम्ही बोललो पण नाही.. आणि प्रेम तर खूप लांबची गोष्ट आहे😔.. त्यामुळे आपण याला विसरून गेलेलंच बर असा विचार सोनुने केला.. नकळत तिचे डोळे गच्च पाण्याने भरले 😥... आणि ती त्याच्याकडे एकही नजर न बघता तिथून निघून जाते. त्यामुळे मुक्तार ला ही खूप वाईट वाटत. त्याला या गोष्टीचा खूप त्रास होतो😔... पण शेवटी तो विचार करतो.. माझा तिच्याशी काय संबंध आहे..शेवटी तिची मर्जी. तिने सांगितलं नाही तर राहील एवढं काय त्यात... थोडीच ती माझ्यावर प्रेम करते.. माझं oneside love आहे. आणि ती जर नाही बोलली तर मला खूप त्रास होईल. त्यापेक्षा तिला विसरून गेलेलं बर. त्यालाही खूप वाईट वाटत. नकळत त्याच्या ही डोळ्यात पाणी येत 😥... पण दोघांनीही एकमेकांना विसरायचा विचार केलेला होता. 😔
तर friends आजचा part कसा वाटतो हे नक्कीच comment मध्ये कळवा. यानंतर दोघेही खरंच एकमेकांना विसरतात कि परत त्यांची कधी भेट होईल हे आपण पाहुयात पुढल्या परत मध्ये😊... तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा... आणि येणाऱ्या part चा आनंद घेत chala😊