Anokhe Prem books and stories free download online pdf in Marathi

अनोखे प्रेम - 1

आज घरी थोडी गडबडच चालली होती रोजच्यापेक्षा जास्तच म्हणाल तरी चालेल.. भैय्या ताई आवरून तयार झाले होते आज त्यांना त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी जायचं होत..भैय्या आणि ताई गाडीवरती बसले तेवढ्यात आवाज आला... कुठे चाललात रे मला सोडून माझ्या शिवाय तुमचा शो होऊच शकत नाही कारण तुमच्या शो ची संचालक अजून इथेच आहे.. ताई आणि भैय्याने पाठीमागे वळून पहिले तर आज सोनू वेगळीच दिसत होती... ब्लॅक कलर ची जीन्स,त्यावर पर्पल कलर चा शर्ट, त्यावर शॉर्ट केस सोडलेले, नॅचरलं लुक... एकदम मॉडर्न दिसत होती सोनू.
त्यानंतर तिघेही निघाले जाऊन 5 मिन. झाले होते तिघेही साऊंड इंजिन्नर ची वाट पाहत होते... तोच साऊंड इंजिनीर आपली साऊंड सिस्टिम घेऊन तिथे आले. त्यांची एन्ट्री म्हणजे जाणू हिरो यावा आणि हिरोइन ने पाठीमागे वळून पाहावं असच काहीस सोनूच्या बाबतीत झालं..त्यांची एन्ट्री झाली आणि सोनुने पाठीमागे वळून पहिले तिचे केस अचानक वाऱ्याच्या प्रवाहाप्रमाणे उडायला लागले..तिचे डोळे उघडझाप करू लागले..सोनू ला बघून तर साऊंड इंजिनीर ही थोडासा बावरला होता कारण सोनू होतीच अशी... थोड्या वेळाने तो भानावर आला आणि तेवढ्यात त्या साऊंड इंजिनीर ने हाक दिली मॅडम सेटअप रेडी आहे तुम्ही शो स्टार्ट करा तेव्हा कुठे सोनू भानावर आली. आणि तिने कार्यक्रमाला सुरुवात केली. आपल्या आवाजाने आणि आपल्या बोलण्याच्या कौशल्याने तिने लोकांवर छाप तर पडलीच होती पण काहीशी छाप ही साऊंड इंजिनीर वरही पडली होती बर का😊... तीच जेव्हा साऊंड इंजिनीर कडे लक्ष जाईल तेव्हा त्याच लक्ष मात्र तिच्याकडेच होत... दोघेही एकमेकांना पाहून स्मित हास्य देत होते 😊.. पण दोघांनाही माहिती नव्हतं आपल्या मनात नेमकं काय सुरु आहे... सोनू तर खूप confuse झाली होती. काहीशी अवस्था साऊंड इंजिनीर ची ही तीच झालेली म्हणून तो कदाचित बाहेर गेला असावा तो बाहेर जाताच सोनू थोडीशी बावरली. इकडे - तिकडे त्याला शोधू लागली सगळे तिला विचारात होते काय झालं काय शोधतेस तू.. पण तीच कोणाकडे ही लक्ष नव्हतं... तिला फक्त एकच प्रश्न सतावत होता कि हा कुठे गेला असावा 🤔... तिचा चेहरा हिरमूसला 😔... तिला धड त्याच नाव ही माहिती नव्हतं दोघांनीही पहिल्यांदाच एकमेकांना पाहिलेलं... त्यामुळे दोघांची ही ओळख नव्हतीच... तरी ही त्याचा ती एवढा का विचार करते आहे अस तिला मनात वाटत होत... आणि हीच condition त्या साऊंड इंजिनीर ची ही झालेली... दोघांची पहिलीच भेट होती तरीही एकमेकांची एवढी ओढ का वाटते आहे या प्रश्नाचं उत्तरंच सापडत नव्हतं... थोड्या वेळाने शो संपला.. साऊंड काढून सगळे जेवायला जाणार होते... पण सोनू ला त्याच्या सोबत जायचं नव्हतं आणि त्याला ही तिच्या सोबत जायचं नव्हतं असेल त्यांच्या चेहऱ्या वरून स्पष्ट समजत होत... जाऊ वाटत नव्हतं अशातला पण काही भाग नाही बर का... पण मनात भीती होती थोडीशी... तसेच सगळे जेवायला गेले योगायोगाने सोनू च्या जवळच त्याला खुर्ची भेटावी.. सगळे गप्पा मारत हसत जेवण करत होते... मात्र सोनू आणि साऊंड इंजिनीर दोघे ही जेवत होते वरती लक्ष गेलं कि फक्त स्मित हास्य देत होते. दोघांनाही कधी एकदा इथून उठतोय असेल झालं होत.. पण तस उठता ही येत नव्हतं... थोड्या वेळाने सगळ्यांनी आपलं जेवण आवरलं आणि सगळे उठून गेले... साऊंड इंजिनीर ही जायच्या तयारीत होता त्याने सर्वांना सांगितलं कारण पुढे त्याला दुसऱ्या शो साठी जायचं होत. सगळ्यांना सांगून त्याने सोनुकडे पहिले आणि तिच्याकडे पाहून त्याने विचारले मी येऊ का? त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या त्या आवाजाच्या tone मध्ये काहीतरी वेगळंच फील होत होत. सोनूला मात्र आता त्याला जाऊ नको असेल बोलायचं होत पण कशी बोलणार वेडी कुठली 😂.... तिने हलकीशी मन हलवली आणि तो निघून गेला... जायचं तर त्याच्या ही मनात नव्हतं पण शो ही होता त्यामुळे त्याला जान महत्वाचं होत. तो ही आपल्या गाडीत बसून गेला आणि सोनू ही आपल्या घरी जायला निघाली... दोघांचे ही चेहरे एकदम nervous दिसत होते. दोघांना ही एकच प्रश्न सतावत होता कि खरंच हे प्रेम असेल का.. पण 3 तासामध्ये प्रेम कस होईल 🤔अस शक्य आहे का 🤔... पण आता या विचारपेक्षा त्यांना दोघांच्या भेटीची ओढ लागलेली.. आता दुसरी भेट कधी होणार 😔.. होईल तरी कि नाही 😔.. आणि नाहीच झाली तर 😔... मग आजची भेट ही लास्टच असावी का 😔... नाही नाही 😔... Pls देवा आमची लवकर भेट होउदे अशी दोघेही जणू प्रार्थना करत होते 😊
Hello friends... हा part कसा वाटतो हे नक्कीच comment मध्ये कळवा तुमच्या comment मुळे मला पुढचे part लिहायला एक energy मिळेल🙏🏻
तर friends आपण पुढल्या part मध्ये बघुयात कि दोघांची परत भेट होईल कि आजची भेट ही last होती 😊.