kokan... ek anubhav. books and stories free download online pdf in Marathi

कोकण...! एक अनुभव.

कोकण....!

           अथांग सागर, पांढरेशुभ्र समुद्रकिनारे, घाटवळणाचा रस्ता, सह्याद्रीच्या पर्वतरांगा यामुळे कोकण प्रत्येक माणसाच्या मनावर आदिराज्य करून
बसलाय. त्यामुळे सुट्टी आली आणि फिरायचा बेत झालाच तर मनात कोकण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे यावेळीच्या सुट्टीला पण कोकणात च
जायचं हेच ठरलं होत. तळकोकणाबद्दल खूप ऐकून होतो पण पाहण्याचा योग कधीच आला नव्हता. गोव्याच्या भूमीला लागून असलेला हा निसर्गरम्य परिसर
मालवण. गोवा हे खूप मोठे पर्यटनाचे स्थळ जरी असले तरी त्याहूनही किती तरी सुंदर असलेले, प्रेमळ स्वभावाची माणस असलेले, लोककला, संस्कृती आणि
कोकण जपत असलेले हे तळकोकण. त्यामुळे या प्रवासाबद्दल खूप उत्साह होता.
          सकाळी लवकर जायचं ठरलेला होता. आणि नेहमीप्रमाणेच माझ्यामुळे आम्हाला थोडा ऊशीर झाला. सकाळी ९ वाजता आम्ही बहिणभावंडानी सातारहून
मालवण चा प्रवास चालू केला. अगदी आमच्यातले सर्व च जन पहिल्यांदाच तळकोकणात चालले होते. त्यामुळे route ठरवताना जरा अडचणी येत होत्या.
पण गुगल map च्या मदतीने ते आम्हाला शक्य झाल. सकाळी घरूनच नाश्ता करून निघालेलो आणि आम्हाला सर्वाना sunset पाहायला पोहचायच
होत, त्यामुळे लवकर stop नाही घेयचा हे पक्के करून कोल्हापूर च्या दिशेने रवाना झालो. कोल्हापुरातून २ मार्ग मालवण ला जातात. राधानगरी अभयारण्य करत
कणकवली मार्गे आणि गगनबावडा मार्गे. आम्ही गगनबावडा मार्गे जायचा ठरवलं. पश्चिम महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे इथे ५० किमी ला लोकं, लोकांची भाषा,
संस्कृती बदलत राहते. त्याचाच अनुभव घेत आम्ही कधी कोल्हापुरात येऊन पोहचलो कळलाच नाही.
             कोल्हापुरातून गगनबावडा मार्गे आम्ही पुढचा प्रवास चालू केला. डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवड्यातील तो दिवस, रम्य अस वातावरण, लोकांची रस्त्याला गर्दी
पण होती. ख्रिसमस च्या सुट्टी चे दिवस होते त्यामुळे आमच्या सारखेच खूप लोक तळकोकण अनुभवायला चालले होते. गाडीमध्ये गप्पा गोष्टी, कोकणात गेल्यावर काय काय
मज्जा करायची, अगदी खायचा काय, कोणते watersport करायचे ह्या सर्व गोष्टीवर चर्चा चालली होती. प्रवासाला सुरुवात करून बराच वेळ झाला होता, आणि प्रचंड
भूक पण लागली होती. आम्ही दुपारच जेवण घरूनच घेऊन आलो होतो. आम्ही रस्त्याच्या बाजूला शेतात कुठे जागा मिळतेय का शोधात होतो. आम्हाला थोडा पुढे गेल्यावर
खूप अस छान झाड दिसले. त्या झाडाखाली बसून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. एका ५ स्टार हॉटेल पेक्षा पण तिथ जेवायला छान वाटत होता. आंब्याची, नारळाची अशी
बऱ्याच प्रकारची झाडे, छान अशी सावली, सभोवतालाची शांतता, आणि विविध पक्ष्यांचे आवाज, हे सर्व त्या जेवणासोबत एक वेगळाच अनुभव देऊन जात होता.
             जेवण करून आम्ही पुढील प्रवास चालू केला. जेवण केल्याने मागे बसलेले सर्व लोक आता झोपी गेले होते. मी आणि दादा आता गप्पा मारत कोकणच्या दिशेने चाललो होतो.
एव्हाना आम्ही गगनबावडा घाट पार केला होता. आसपासचा निसर्गरम्य परिसर आता कोकणात प्रवेश केलाय असच खुणावत होता. घाटवळणाचा रस्ता, गर्द झाडी, नजर पडेल
तिकडे सुखद अस वातावरण कोकणची ओळख करून देत होते. आता सर्व आम्ही चहा घेयाला थांबलो चहा नाश्ता करून आम्ही पुढील प्रवास चालू केला. आमच्या plan मध्ये
थोडा बदल झाला होता. आम्हाला जाताना ओरस मध्ये दीदी च्या एका मैत्रिणीला भेटून जायचं अस ठरलं. आणि आम्ही कणकवली मार्गे मालवण ला निघालो मार्गावरच कासाल पासून
अगदी थोड्या अंतरावर ओसर आहे. दीदी ची मैत्रीण मुळची सातारची पण सरकारी नोकरी मुळे तिकडेच स्थायिक झालेली. सरकारी सेवेत एका उच्च पदावर काम करत होत्या.
            आम्ही ओसर मध्ये पोहचलो, त्यांची भेट घेतली, धावती भेट म्हणाल तरी चालेल, त्यांनी केलेला पाहुणचार आणि त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी आमचे मन जिंकले होते.
मी त्यांना म्हणालो, madam तुम्ही पण चला ना आमच्या सोबत मालवण ला, तर त्या बोलल्या अरे madam काय म्हणतोस मी तुझ्या मोठ्या दिदिसारखीच आहे. एवढी आपुलकी
आणि प्रेमळ स्वभावामुळे अस वाटले कि कदाचित कोकण च माणसाना प्रेमळ आणि मनमिळावू बनवत असेल. त्यांचा निरोप घेऊन आम्ही मालवण च्या दिशेने प्रवास चालू केला.
आता मालवण अगदी एका तासाच्या अंतरावर राहिला होता. कोकणातील त्या नयनरम्य मार्गावरून आम्ही मालवण च्या दिशेने चाललो होतो. सूर्य आता मावळतीस चालला होता.
           कोकणातील सायंकाळचे ते रूप बगून खूप अल्हायदायी वाटत होते. पक्षी घरट्याकडे परतत होते, तिथला परिसर वेगवेगळ्या ऋतू मध्ये कसा दिसत असेल याची कल्पना करायला
भाग पाडत होता. आता आम्ही मालवण मध्ये पोहचलो होतो. तिथली गर्दी, कोळी संस्कृतीचे लोक, विविधतेने नटलेला परिसर पाहत आम्ही समुद्राकिनाऱ्यावर येऊन पोहचलो.
आम्ही मालवण बीच वर येऊन पोहचलो होतो. समोर सिंधुदुर्ग दिमाखात उभा होता. सिंधुदुर्ग, समुद्रकिनारा आणि सूर्यास्त पाहताना अस वाटत होता कि स्वर्ग सुख म्हणतात ते हेच का....!
लाटांचा जोरजोरात येणारा आवाज, आणि उसळणाऱ्या लाटा बगून जणू समुद्र आपल्यालाच खुणावत असल्याचा अनुभव देत होता....! मी पण मनात बोलून गेलो, उद्या यायचं आहे तुझा
हे सुंदर रूप अनुभवायला, एव्हाना सूर्य मावळतीस गेला होता.आम्हाला अजून आमच्या होम स्टे कडे जायचं होत.सूर्यास्ताच्या नंतर आम्ही होम स्टे कडे वाटचाल चालू केली.
          क्षणाक्षणाला कोकण आमचा मन जिंकत होता. तिथला निसर्गरम्य परिसर,तिथली संस्कृती आणि प्रेमळ स्वभावाची माणस...! सूर्यास्त डोळ्यात टिपून आता आम्ही होम स्टे ला पोहचलो होतो.
आमच्या होम स्टे चे मालकांनी आमचा खूप छान अस स्वागत केल, "कसो झालो प्रवास..? कसे इलाक तुम्ही?, एकावर एक अशा प्रश्नाचा भडीमार त्यांनी केला. त्यांचा ते मालवणी भाषेतील प्रेमळ
बोलण, त्यांचा साधा आणि मनमिळावू स्वभाव, त्यांचा मालवणी पेहराव, आणि सावळा रंग त्यांच्या व्यक्तीमहत्वाबद्दल खूप काही सांगून जात होता..! त्यांनी आम्हाला आमची रूम दाखवली.
खूप छान आणि सुंदर अशी रूम, सर्वत्र स्वच्छता होती. होम स्टे बद्दल सांगायचं झाल तर, जस मनात वाटल होता त्याहून किती तरी सुंदर होत ते. २ मजली अस भव्य होम स्टे, समोर प्रशस्त
पार्किंग ची जागा, त्याला लागून नारळाची भली उंच झाडे, समोरच थोड्या अंतरावर समुद्र, होम स्टे च्या बाजूलाच थोड्या थोड्या जागेत टेबल खुर्ची आणि छोटे झोपाळे जेणेकरून आपण शांत आणि
निवांत बसता येईल. मागील बाजूस खूप मोठी अशी आंबा, नारळ, सुपारी, यांची भरपूर झाडे होती.यामुळे एकदम perfect अशा होम स्टे ला आम्ही राहिलोय याबद्दल थोडी पण शंका नव्हती.
दिवसभर झालेल्या प्रवासामुळे आम्ही खूप कंटाळलो होतो. त्यामुळे आम्ही सर्व फ्रेश होऊन आलो. आणि काकांनी दिलेल्या चहा चा आस्वाद घेतला. आता थोडा निवांत वाटत होत. थोडा वेळ बसून
आम्ही जेवायला हॉटेल बद्दल चौकशी करत होतो. तिथे पण त्या काकांची मदत घेऊन आम्ही एका छान अशा हॉटेल मध्ये कोकणी जेवणाचा आस्वाद घेतला. आता होम स्टे वर येऊन शांत अस खुर्ची झोपाळे यावर बसून आमच्या गप्पा चालल्या होत्या. खूप शांतता आणि समुद्राच्या लाटांचा आवाज, खूप निवांत वाटत होता तेव्हा. खरच लोक निवांत होयला, stress दूर करायला कोकणात का येतात. याची खात्री पटली.रात्रीचे ११ वाजले होते. आमच्या गप्पा चालूच होत्या. त्याच वेळी मी हॉरर गोष्टी सांगून त्या शांततेत अजून च भर घातली होती. लोकांना भीती पण वाटते आणि ऐकू पण वाटत....! उद्याच्या दिवसच planning करून मग रात्री उशिरा आम्ही झोपून गेलो.
         दुसऱ्या दिवशी सकाळी मला लवकरच जाग आली. मी आणि दादाने बाहेर येऊन पहिला तर समुद्रांचा लाटांचा प्रखर आवाज आमच्या कानी येत होता. जणू काही टो आम्हालाच साद घालतोय अस वाटत होता.लगेचच मी आणि दादा फेरफटका मारायला समुद्रकिनारी निघालो. माझा चेहरा आता प्रसन्न वाटत होता. सकाळच्या प्रसन्न वातावरणाने माझ्या चेहऱ्यावर तेज आले असावे. शांत वातावरण आणि पक्षांचा किलबिलाट मन अधिकच प्रसन्न करत होता. आम्ही आता समुद्रकिनारी येऊन पोहचलो होतो. हवेतला तो गारवा, सूर्योदयापूर्वी चांदण्यांनी भरलेले आकाश, आणि समुद्राच्या लाटांचा आवाज, मनाला स्वर्गसुखाचा अनुभव देत होते.आता सूर्योदय झाला होता. त्याचबरोबर पक्षांचा किलबिलाट पण वाढला होता. एवढी रम्य सकाळ मी या आधी कधीच अनुभवली नव्हती. आम्ही ते अनुभवून होम स्टे कडे परतलो. आता आमच्या दीदींचा पण आवरून झाल होत. मी आणि दादा ने पटकन आवरून घेतला, आणि काकांनी बनवून दिलेल्या चहा आणि पोह्यावर ताव मारला. पेटपूजा झाल्यावर आम्ही स्कूबा डाइव ला जायचा plan केला होता. स्नेहल दीदी ला पाण्याची भीती वाटत होती त्यामुळे ती तयार होत नव्हती.पण शेवटी आम्ही तिची भीती दूर करून तिला तयार केला. आम्ही पूर्ण watersport चा package च घेतलं होता. त्यांचा guide आम्हाला घेयाला होम स्टे ला आलेला मग आम्ही त्यासोबत च मालवण बीच वर पोहचलो.हा आमचा सर्वांचा पहिलाच स्कूबा डाइव चा अनुभव असल्यामुळे सर्वामध्ये खूप उत्साह होता. बोट स्कूबा डाइव ला जायला थोडा वेळ असल्याने आम्ही तिथ फोटो सेशन करून घेतला.
           जवळपास सकाळचे १० वाजले होते. सूर्य आता प्रखर सूर्यकिरणे घेऊन वरती आला होता. समुद्रकिनारी पण भरपूर गर्दी झाली होती. watersport साठी येणारी लोक, छोटे मोठे foodstall आणि समुद्रकिनार्यावरील बोटी अस सर्व वातावरण होत. इतक्यात आमची बोट आली. आम्हाला जवळपास २० लोकांना ती बोट स्कूबा डाइव ला घेऊन चालेली. सिंधुदुर्ग किल्ल्याला लागुनच स्कूबा डाइव चा अनुभव घेयाचा होता. आमच्याबरोबर आता बोट मध्ये वेगवेगळ्या भागातील लोक होती. कोणी तरुण मुला मुली, कोणी नवीन लग्न झालेला जोडपे, अस सर्व आम्ही आता स्कूबा डाइव ला चाललो होतो. मला आता सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव दिसत होते. काहीच्या मनात दडपण, भीती, तर काही खूपच उत्साहीत लोक होती. माझा पहिलाच अनुभव असला तरी मी मात्र खूपच उत्साहीत होतो. आता guide आम्हाला स्कूबा डाइव बद्दल सर्व माहिती देत होते. मला पोहायला येत असल्याने मला पाण्याची अजिबात च भीती नव्हती, पण guide नुसार
पोहायला येण्याचा आणि स्कूबा डाइव करण्याचा काहीच संबध नाहीये.उलट ज्यांना पोहायला येत नाही तेच लोक छान स्कूबा डाइव करू शकतात. फक्त मनात आत्मविश्वास हवा. खूप उत्साहाने स्कूबा डाइव ला उतरलो होतो.पाण्यात गेल्यावर आता खरी कसरत करायची होती. माझा अतिआत्मविश्वास मलाच नडतोय कि काय अस वाटू लागले. पाण्याबद्दल भीती नव्हती पण पहिलाच अनुभव असल्याने मला नीट श्वास घेता येत नव्हता. पण मी मला थोडा वेळ दिला आणि स्कूबा डाइव करू शकलो.जवळपास १० ते १५ मिनिटे पाण्यामध्ये एक वेगळाच अनुभव देऊन गेले. समुद्राच्या तळाशी असलेल्या विविध वनस्पती, त्यामध्ये लपंडाव करणारे वेगवेगळे मासे, खरच खूप छान अनुभव आला.खर तर मी आणि दादा पहिल्यांदा स्कूबा डाइव करून आलेलो कारण बाकी वेळ आम्हला पोहता येईल म्हणून..! पण पोहता येत असूनही तिथ पोहायला आम्हला परवानगी मिळालीच नाही. मग जे ते लोक आम्हला आमचा स्कूबा डाइव चा अनुभव विचारात होते. कदाचित बहुतेक लोकांचा कदाचित हा पहिलाच अनुभव असेल. मी पण, मला स्कूबा डाइव करताना आलेल्या अडचणी आणि त्यांना मागे सारून कस नीट स्कूबा डाइव करायचं याबद्दल आता प्रत्येकाला
सांगत होतो. मला माझ्या दीदींची शंका येत होती, पाण्याबद्दल खूप भीती असल्यामुळे या तिघी ते पूर्ण करू शकतील कि नाही....! आणि माझ्या शंकेवर त्या तिघी पण खऱ्या उतरल्या. एकीलापण नीट अनुभव घेता आला नाही.फक्त बोटीतून समुद्रामध्ये उतरून फोटो काढून तिघीपण खूप खुश होत्या. जवळपास २ तास आम्ही स्कूबा डाइव चा अनुभव घेऊन समुद्रकिनारी परतलो होतो.
         आता बाकीचे watersport आमची वाट पाहत होते. आम्ही लगेचच बनाना राईड, जेट स्कीइंग, याचा अनुभव घेतला.बाकीचे watersport आम्ही आधीच अलिबाग ला केले होते पण ते पुन्हा पुन्हा कोणाला नको असतंय तेव्हा... त्यांचा मनमुराद आनंद घेऊन आम्ही आता पुन्हा समुद्रामध्ये परासैलिंग चा अनुभव घेयाला निघालो. एका स्पीड बोट ने आम्ही समुद्राच्या खूप आतील भागात येऊन पोहोचलेलो. सर्वांकडे लाइफ जाकेट होताच. आणि आता फक्त परासैलिंग चा अनुभव घेयाची उत्सुकता. तो अनुभव शब्दात व्यक्त नही करता येणार. खूप छान असा अनुभव, असे adventure करताना कितीही म्हणाल तरी थोडी भीती वाटतेच. एव्हाना आम्ही समुद्रकिनारी पोहचलो होतो. दुपारचे २ वाजून गेलेले, सर्वांनाच प्रचंड अशी भूक लागली होती. अगदी समुद्रात मज्जा करत होतो तोपर्यंत भुकेची जाणीव ही नसलेलो आम्ही आता कोकणी जेवणाची आतुरतेने वात पाहत होतो. कधी एकदा होम स्टे ला जातोय अन कधी जेवण करतोय....! सर्वांनी फ्रेश होऊन मस्त असा जेवणावर ताव मारला. खूप थकलेलो असल्याने सर्वच झोपेच्या आहारी गेलो.
            संध्याकाळच कोकण किती छान वाटत होत. दिवसभर खूपच थकलेलो असल्याने सायंकाळी मात्र आम्ही होम स्टे वरच शांत झोपाळ्यात बसून गप्पा गोष्टी करत होतो. इतक्यात काका चहा घेऊन आले. अजून एका थकलेल्या माणसाला काय हव असत...? थोड्याच वेळाने आंम्हाला परतीचा प्रवास करायचा होता. पण आमचा तिथून पाय निघत नव्हता. शेवटी काकांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परतीच्या प्रवासा मात्र शांत मनाने, आणि कोकणच्या सुखद अनुभव घेऊन आम्ही सातारच्या दिशेने वाटचाल चालू केली. आजही या ट्रीप बद्दल आठवण जरी आली तरी खूप हवहवस वाटत.....!

- प्रणव भोसले.
९५०३६३२९४९