A New Key of Mystery - Part 3 in Marathi Horror Stories by Om Mahindre books and stories PDF | रहस्याची नवीन कींच - भाग 3

Featured Books
Categories
Share

रहस्याची नवीन कींच - भाग 3

राधाला हळूहळू शुद्ध येत होती. डॉक्टरने राघव व प्रविणला राधाला भेटण्यासाठी बोलावले. राधाला बघताच प्रविण रडू लागला त्याने तिचा हात हातात घेऊन रडू लागला प्रविण म्हणाला, "राधा काय झाल तुला राधा म्हणाली, मला नाही माहित काय झाल पण कोणी तरी तरा मला पायऱ्यावरून धक्का दिला व मी खाली पडले. पण टेरेसवर वर तुझ्या शिवाय कोणीच नव्हत तर धक्का कोणी दिला. ती म्हणाली, "मला माहीत नाही सांयकाळी ५ : ०० वाजता डॉक्टरने राधाला सुट्टी दिली सर बस घेऊन आले व सर्व जण फार्महाऊसला जाण्यासाठी नीघाले तितक्यातच गाडी पुढे एक काळी मांजर आली त्या मांजरला वाचवण्यासाठी डॉहरने जोरात ब्रेड मारला व गाडीचा तोल गेला व गाडीचा मोठा अपघात टळला. सर्वे जण बसच्या बाहेर आले तर लिये कोणतीच मांजर नव्हती. सर्वांना अचंबा वाटला का आता गाडी पुढे होती व आता काहीच नाही. सर्वजण बसमध्ये चढले पण सर्वांना आश्चर्य वाटल होत. पण राधाच्या तब्यतीचा कडे सर्वांच लक्ष गेले. सर्व फार्महाऊसला पोहोचले व राधाला तीच्या खोलीत नेले व तीला आराम कराया सांगीतले सरांनी त्याच्या एका मित्राला फोन केला व घडलेल्या सर्व गोष्टी बद्दल सांगीतले. त्यांच्या मित्राचे नाव राम होते. राम हा बंद हवेलीच्या मालाचा सहकारी होता. हवेलीच्या मालाचे नाव अक्षय रॉय होते ते पुरात्त्वविभागाचे एक उच्च पदावरील अधीकारी होते. ते होते. ते एका खुप गुप्त अशा ठीकाणावर खनन करत होते राम हा त्यांचा या कामावर त्याचा प्रमुख सहकारी होता. सरांनी रामला सर्व सांगून झाल्यावर रामच्या मनात संशय निर्माण झाला पण त्याने नाही फार लक्ष नाही दिले मात्र, राम ने सरांना वीचारले की तुमच्या पैकी कोणी त्या बंद हवेलीत नाही गेले होते ना? व फोन ठेऊन दिला. सर रामच्या बोलण्याबद्दल विचार करत होते. रात्रीच्या जेवणाच्या वेळी सर्व विद्यार्थी जेवण करण्यासाठी जमा झाले. सरांनी तेथे सर्वांना विचारले की कोणी गेले तर नाही होत ना त्या बाजुच्या बंद हवेलीत हे ऐकताच राघव व प्रविनच्या चेहऱ्यावर चींता जाणवली. सर्वांनी नाही म्हणून उत्तर दिले पण सरांना राघव व प्रविणच्या चेहऱ्यावरील चींता जाणवली जेवन आटपल्यानंतर सरांनी राघव त प्रवीनला स्वताच्या खोलीत बोलावले. प्रविनला नाही कळाले की का संरांनी भेटाला बोलावले व सरांनी विचारले का त्या हवेली हवला बदल विचार त्याच्या मनात येऊ लागले. प्रविण व राघव संरच्या खोलीत बोलण्यासाठी आले तेवढ्यात सरनी प्रविनला त्या बंद हवेली बद्दल विचारले. हे ऐकताच प्रविन निशब्द झाला.
सरानी पुन्हा प्रविणला विचारले तेवढ्यात राघव बोलला सर प्रविण हा त्या हवेलीत गेला होता व तेथून त्याने एक विचित्र लॉकेट आणले. प्रविनने राघवला हे का तू सांगीतले हे ऐकताच सर त्याच्यावर रागावले. प्रविणला सर म्हणाले का तू न विचारता त्या हवेलीत गेला व कशासाठी तू त्या हवेलीत गेला. प्रविण म्हणाला सर मला उत्सुकते पोटी मी त्या हवेलीत गेलो. सर म्हणाले, आणी ते लॉकेट कुठे सापडले तुला. प्रविण बोलला सर त्या हवेलीत हे लॉकेट मला वरच्या खोलीत एका कपाटामध्ये एका डब्ब्यात सापडले व त्याला खुप सारे तावीज बांधून होते. सर प्रविण वर खूप चिडले व त्याला ते लॉकेट आणाला सांगीतले तसाच प्रविग लॉकेट आणाला धावला. सरांनी राघवला पण रागावले व म्हणाले का तू नाही सांगीतले की प्रवीन त्या हवेलीत गेला म्हणून.
तेवढ्यातच प्रविण लॉकेट घेऊन येतो. तो ते लॉकेट सरांच्या हातात देतो व म्हणतो की, हेच ते लॉकेट जे मला त्या हवेलीत सापडल. तेलॉकेट खूपच विचीन असते दिसायला ते लॉकेट एका राक्षसाच्या उघडया मुखा सारखे होते व त्याच्या मुखात एक लाल रंगाचे हिरा होता. आणि त्याच्या मध्ये एका विलक्षण प्रकारची चमक होती. त्या त्या चमकला पाहताच कोणी पण त्याच्या मोहात पडेल अशी चमक होती त्याच्यामध्ये ते लॉकेट पाहताच सरांचे डोळे चमकले पण ते सावरले.
त्यांनी ते लाकेर स्वता जवळ ठेऊन राघव व प्रविन ला आपआपल्या खोल्यामध्ये पाठवले. सरांनी ते लॉकेट हातात घेऊन विचार करत होते ते जवळ जवळ मध्यरात्र पर्यंत झोपले नाही होते व इतका वेळ जागे असल्यामुळे त्यांना झोप कधी लागली कळालेच नाही. सरांची झोप दुपारच्याला उहाडली. झोप उघडल्या नंतर त्यांनी रामला फोन केला व सर्वा झालेला प्रकार कळवीला हे एकताच रामप्पा अंगाला शाहारे उडाले व त्याचे शरिर थंड पडले व तो नीशब्द झाला. थोड्यावेळाने जेव्हा त्याला शुद्धी आल्यासारखे वाटले त्यांने फक्त ऐवढेच म्हणाले की, संकट येणार - संकट येणार. सरांचे नाव सचिन होते. राम सचिनला म्हणाला मी यत आहे. मी येत आहे सचीनने विचारले काय झाले ? राम म्हणाला, मी तिथे आल्यावर तुला सर्व काही सांगतो, फक्त मला तिथे येऊ दे सांगतो. जे काही सचीनने रामला सांगीतले ते ऐकून राम खुपच घाबरला होता.
________________________________________________

* काय झाल असेल रामला त्या लॉकेटबद्दल ऐकून काय रहस्य आहे.

* काय रहस्य आहे व काय त्या लॉकेटच संबंध आहे रामचा त्या लॉकेट सोबत.

* कृपया कथेला रेटींग दया.