Rahasyachi Navin Kinch - 4 books and stories free download online pdf in Marathi

रहस्याची नवीन कींच - भाग 4

सचिनने सांगीतलेल्या गोष्टीचा राम विचार करत होता. तो विचारात ऐवढा मग्न झाला की त्याला वेळेचे भानच राहले नाही. त्याच्या Flight चा वेळ झाला होता. त्याला भान येताच तो विमानतळाकडे निघाला तो विमानतळावर पोहोचला व त्याने त्याची Flight पकडली. तो विमानात बसला व आराम करण्याच्या प्रयत्न करु लागला पण सचिन चे शब्द त्याच्या डोक्यात घोंगावत होते. त्याच विचारामुळे त्याला झोप सुद्धा लागत नव्हती. लॉकेटची गोष्ट ऐकल्या पासून एक विचित्र प्रकारची काळजी आणी भिती त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती. त्या लॉकेट च्या मागे असे काही रहस्य दडलेले आहे ज्याच्या मुळे राम हा खुपच घाबरला होता.
रामची Flight ही विशाखापट्टनम विमानतळावर Land झाली. राम विमानातून खाली उतरला. त्याने येण्यापुर्वीच Taxi बुक केली होती ,Taxi आली, राम Taxi मध्ये बसला व सचिन आणि मूल जिथ थांबली होती. त्या फार्म हाऊस कडे निघाला. त्याने सचिनला फोन केला. पण मात्र सचिन ने फोन उचलला नाही तो एकटक लाॅकेटकडे बघत होता.
आणी त्याला त्याचे काहीच भान राहले नाही जणू त्या लॉकेटने त्याला मोहीतच केले. प्रविण सरच्या खोलीत आला व त्याने सरांना आवाज दिला त्याच्या आवाज ऐकूण सर प्रविण राम आला म्हणून सांगाला आला होता. राम आला ऐकताच सचिन त्याला भेटाला गेला. ते दोघे भेटली व राम आराम कराला गेला. सायंकाळी सचिन व राम निवांत बसले. सचिन रामला विचारत होता की काय झाल इतक्या तातडीन तू का आला इथे का तू व इतका घाबरला होता. सगळ सांगतो पहले ते लॉकेट दाखव म्हणाला. सचिनने अलमारी मधून लॉकेट काढले व रामला दाखवत म्हणाला हे ते लॉकेट आहे ते लॉकेट पाहताच राम एकदम घाबरला व तो थोड्या वेळासाठी नीशब्द झाला. तो थोडावेळ स्थब्द होऊन काही विचार करत होता. तो लॉकेट घेऊन रडू लागला तो रडायचे नाही म्हणत स्वतःहाल साभाळत होता पण त्याला रडणे आवरतच नाही होते. सचिन विचारात पडला का राम रडत होता. रामने सांगायला सुरुवात केली तो म्हणाला याच लॉकेट मुळे माझ्या बॉसला आपला जीव गमवावा लागला. आम्ही विशाखापट्टणम पासून 930 की. मी दूर एक गुफा आहे. तेथे आम्ही पुरात्व विभागात असल्यामुळ खनन संशोधन करत होतो. तिथे संशोधन करत असतांना आम्हाला काही गोष्टी बद्दल कळाले. त्या गुहाच्या भिंतीवर एका प्राचीन भाषांमध्ये काही लिहिलेले होते. त्या भाषेबद्दल संशोधन करुन माहीत पडले की या गुहातून एक दरवाजा उघडतो जो एका अशा जगात उघडतो की जीथे सर्व मायावी व रहस्यमयी आहे. पहीले आम्हाला ही फक्त एक कथा वाटली. पण काम करताना काही दिवसांनी तेथे एक लॉकेट सापडले ज्यामध्ये एक प्रखर चमकनारा हिरा होता. ज्याच्या उल्लेख त्या शीला लेखावर होता. तो लॉकेट म्हणजेच त्या दरवाज्याची चावी होती व तो लॉकेट खुप मायावी शक्ती साठवून ठेवणारा होता. त्यामुळे जो कोणी त्या लॉकेटला धारण करणार तो सर्वशक्तीमान होणार असे त्या शिलालेखात लिहीले होते पण . . .
जो कोणी तो लॉकेट धारण करणार तो सर्वशक्तीमान होणार पण त्याच बरोबर काही दृष्ट शक्ती लॉकेट धारकावर आपले नियंत्रण प्रस्थापीत करते व त्याच्या मनाला आपल्या वश मध्ये करते. ती दुष्ट शक्ती म्हणजे त्या लॉकेटचा खरा मालक जो एका श्रापामुळे त्या लॉकेट मध्ये त्याची आत्मा अडकलेली आहे. सचिनला लॉकेट व मालकाची गोष्टी ऐकून त्याला एक गोष्ट आठवली जी त्याने त्या बंद हवेलीत पाहली होती.
काय असेल ती घटना जी सचिनला आठवली?
कृपया कथेला रेट करा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏