Cinema Cinema books and stories free download online pdf in Marathi

सिनेमा सिनेमा

“सिनेमा सिनेमा ...
सिनेमा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय
खुप कमी लोक असे भेटतील ज्यांना सिनेमा आवडत नाही
आपल्या कडे बॉलीवुड ...हॉलीवुड ...आणी टोलीवुड अशा इंडस्ट्रीज प्रसिद्ध आहेत
मला पण सिनेमा खुप आवडतो !
खरे तर ही आवड आली मला माझ्या वडीला कडूनच मिळाली .
वडिलांना आणी त्यांच्या वडिलांना पण हिंदी मराठी सिनेमाची अतिशय आवड
त्यांच्या काळात फारसे सिनेमा निघत नसत
शिवाय प्रत्येक सिनेमा पाहणे ही चैन ..ही त्या वेळेस परवडणारी नव्हती .
वडील त्या काळी काही दिवस एका सिनेमा थिएटर मध्ये डोअरकिपरचे काम करीत असत .
ही नोकरी त्यांनी “आवड “म्हणुन आणी आर्थिक जबाबदारी पेलण्या साठी अशा
दोन्ही प्रकारे पत्करली होती .
त्यानंतर त्यांना चांगली सरकारी नोकरी मिळाली
व मग त्यांनी आपला सिनेमा पहायचा छंद जोपासायला सुरवात केली
किमान महिन्यातुन चार तरी सिनेमे ते पहात च असत .
त्या काळी ही चैन खुप हौशी माणसेच करू शकत असत
त्यांना राजेंद्रकुमार फार आवडत असे
त्यामुळे राजेंद्रकुमार चा प्रत्येक सिनेमा ते पहात असतच ,,
आणी त्यांना सोबत असे माझी .!!
अगदी लहान पणा पासुन सिनेमाच्या बाबतीत ते मला खुप जवळीकीने वागवत
अभ्यास व इतर शिस्त यात अत्यंत कडक असणारे वडील मात्र माझ्याशी
सिनेमा त्यातील गाणी नट नट्याचे वाचलेले ऐकलेले किस्से या बाबतीत भरभरून बोलत असत .
या बाबतीत मला ते अगदी मित्रत्वाने वागवत .
त्यानंतर मला शम्मी कपुर आवडू लागला मग त्याचे पण सारे सिनेमे आम्ही दोघे ही पाहायला जात असु .
त्यानंतर मी कॉलेजला जाऊ लागले आणी मग माझी सिनेमा पाहायची कंपनी
बदलली ..मी माझ्या मैत्रिणी त्यांच्या बहिणी अथवा माझ्या बरोबरीच्या भावंडा बरोबर सिनेमा पाहु लागले .
तरी पण मी सिनेमा पाहुन आले की त्या विषयी वडील माझ्याशी गप्पा करीत
मला त्यातले सारे बारकावे विचारात ..त्या विषयी टिप्पणी करीत .
मी सिनेमाच्या बाबतीत इतकी लकी होते की खरेच मला अक्षरशःअनेक
सिनेमे पाहायला मिळाले !!!
माझा आवडता हिरो होता राजेश खन्ना ..आणी हिरोईन होती रेखा
मग त्यांचे सारे सिनेमे पाहणे मला क्रमप्राप्त ..च होते ना
माझ्या एका खास मैत्रिणीला देव आनंद आवडे ...मग तिच्या बरोबर देव चे सिनेमे ..माझ्या चुलत भावाला राजकपूर आवडे मग तो मला राजकपूर चे सिनेमे पाहायला नेत असे एका मैत्रिणीला इंग्रजी सिनेमा खुप आवडे मग आम्ही दोघी जमेल तसे इंग्रजी सिनेमे पाहत असु अशा रीतीने माझे सिनेमा विश्व खुप समृद्ध होते !

मात्र माझ्या काही मैत्रिणी कडे सिनेमा अगदी निषिध्द होता मग अशा वेळी मैत्रिणी कडे अभ्यासाला जाते असे सांगुन तीला सिनेमाला यावे लागे नशीब त्या काळी फोन नव्हते..
त्यामुळे आपली मुलगी खरेच अभ्यासाला गेली होती का आणखी कुठे ही चौकशी पालकांना करता येत नसे .
आम्ही कॉलेजमध्ये असताना त्या वेळेस आम्हास पॉकेटमनी वगैरे कधी मिळत नसे .पण कोणी नातेवाईक आले तर ते परत जाताना आमच्या हातावर काही पैसे ठेवत असते
पुण्यातुन आजी मामा असे कोणी आले की परीक्षेतल्या यशा बद्दल
अथवा इतर कोणत्याही प्राविण्या बद्दल काही पैसे हातावर ठेवत असत .
कधी घरातुन बाजाराचे सामान आणायला सांगितले तर त्यात काही पैसे वाचत असत मग आई कौतुकाने काम केल्या बद्दल ते पैसे ठेव तुझ्या जवळ असे म्हणे
असे पैसे साठवुन आम्ही सिनेमे पाहत असु .
त्यावेळीस सिनेमा तिकीट दे १.२५ ..१.५० ..२ रुपये असा असे
पण तितके पैसे पण सतत सर्व मैत्रीणी कडे असायचेच असे नाही
मग जमेल तसे पहायचे सिनेमे ..!
घरी पाहुणे रावळे आले की घरचे सर्व जण सिनेमाला जायचे असा एक शौक असायचा च !

एकदा तर माझे वडील ५२ दिवस संपावर होते तेव्हा अचानक त्यांना त्या रिकाम्या वेळात . एका चित्रपटात काम करायची संधी मिळाली .खरे तर हे काम फक्त काही मिनिटाचे होते .पण आपण मोठ्या पडद्यावर दिसणार याचे इतके अप्रूप होते की त्यांनी घरातल्या व शेजार पाजारच्या चोवीस लोकांना तो सिनेमा दाखवला होता
कॉलेज मध्ये गेल्या वर मात्र ,
कॉलेज बुडवुन लेक्चर बंक करून सिनेमा पाहणे ही मज्जा काही और च असे
मला आठवते त्या वेळी या सिनेमांची गाणी असलेली पुस्तिका मिळत असे
ती पैदा करणे त्यातील गाणी पाठ करणे हा आम्हाला फार मोठा छंद होता
शिवाय नट नट्यांचे फोटो एकमेकात शेअर करणे ही गोष्ट तर खुप पॉप्युलर
होती
.मला राजेश खन्ना खुप आवडत असे
माझी मुंबईत एक मैत्रीण होती तीने माझ्या साठी राजेश खन्नाच्या घरी जाऊन (खरे खोटे माहीत नाही ) त्याने स्वतः सही केलेला फोटोत मिळवला होता
व तो मला पाठवला होता .
त्या फोटो मुळे कॉलेज मध्ये मी जाम फेमस झाले होते
खुप दिवस तो फोटो सर्वाना दाखवून मी भाव मारत असे !



आता यानंतर कॉलेज संपवुन आम्ही हळू हळू नोकरी शोधू लागलो.
मग जिला नोकरी लागे ती त्या आनंद प्रीत्यर्थ हॉटेल ला मसाला डोसा
आणी एक सिनेमा दाखवत असे .
आता नोकरी लागलेल्या प्रत्येकीला पगारातून पॉकेटमनी पण मिळू लागला
त्यामुळे त्या आम्हा नोकरी नसलेल्या मैत्रिणीच्या सिनेमा तिकिटांचा खर्च अगदी
आनंदाने करीत असत .
तेव्हा रविवार सुटी हा मैत्रिणीचा आणी सिनेमाचा वार अगदी ठरलेला असे
घरचे लोक पण फार काही बोलू शकत नसत कारण ..आम्ही नोकरीवाल्या होतो ना तेव्हा ..!
आणी यानंतर एक नवीन क्रेझ आमच्यात फोफावू लागली
ती म्हणजे एका दिवसात दोन अथवा तीन सिनेमे पाहणे.
मग अशा वेळेस आम्हाला दिवसभर जेवायला मिळाले नाही अरी चालत असे
त्या वेळी एक सिनेमा पहायचा म्हणजे तिकीटा साठी लाईनीत उभे राहावे लागत असे
मग अशा वेळी एका दिवशी तीन सिनेमे कसे पाहत असु ?
त्यासाठी खुप तयारी लागत असे तेव्हा नव्या सिनेमाचे आदल्या दिवशी तिकीट मिळत असे मग असे तिकीट काढुन ठेवायचे बाकीच्या दोन तीन सिनेमासाठी तिकिटांचा बंदोबस्त आमचे भाऊ अथवा त्यांचे मित्र करीत असत.
अर्थात त्या बदल्यात त्याना काही “मोबदला ..मात्र द्यावा लागत असे
पण आम्ही मिळवत्या असल्याने ..हे सारे जमून जात असे !!!
अजुन पण कधीतरी एका दिवशी सलग दोन अथवा तीन सिनेमा पाहणे
असली क्रेझ “करायला खुप आवडते कोणीतरी त्याला वेडेपणा म्हणेल पण ज्याला त्यात रुची आहे त्यालाच त्याची गंमत कळेल !

सिनेमातील नट नट्या त्यांचे दागिने बुट चप्पल वगैरे पण लोकांचा चर्चा विषय असतो नट नट्यांनी सिनेमात घातलेले कपडे हे लोकांचे खुप मोठे आकर्षण असते
या कपड्यावरून च तर फ्याशन निर्माण होतात
एखादा सिनेमा प्रदर्शित होण्या पूर्वीच नुसत्या पोस्टर्स वरून त्याच्या फ्याशन
लोकामध्ये आत्मसात केल्या जातात
इतका सिनेमाचा प्रभाव जनमानसा वर आहे .
पूर्वीच्या काळात टी शर्ट .टोपी बुट यांच्या अनेक फ्याशन देव आनंद या नटाने आणल्या होत्या
बेल बोटम प्यांट व शर्ट वापराच्या असंख्य फ्याशन राजेश खन्ना ने आणल्या
उमराव जान सिनेमातील रेखाचे दागिने हा खुप चर्चेचा विषयं होता
तसेच रेखाच्या साड्या या स्त्रियांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या .
कीती तरी वर्षे लोटली मुकपटा कडून बोल पटा कडे सिनेमाचा प्रवास होऊन सुध्दा खुप काळ लोटला आहे. अजूनही सिनेमाची “मोहिनी “लोकांच्या मनावर कायम आहे आणी राहील.
त्यातील नट नट्या त्यातील गाणी संगीत नृत्ये याची जादु तशीच आहे आणी राहील
आजकाल तर नट नट्या ची वैयक्तिक आयुष्ये पण मोठ्या चवीने चर्चिली जातात
पुर्वी करमणूक किंवा नेहेमीच्या आयुष्यात काही बदल म्हणुन सिनेमा पहिला जात असे
त्यानंतर त्यातुन समाज सुधारणा करण्यासाठी काही विषय दाखवले जाऊ लागले त्यानंतर त्यातून काही संदेश दिले जाऊ लागले
या संदेशामुळे तर अनेक वेळा समाजात आवश्यक ते बदल घडलेले आहेत
भूतकाळ अथवा इतिहास आपण परत जगु शकत नाही
पण सिनेमा मुळे आपल्याला थोर माणसांची चरित्रे माहिती होवु शकतात
पुराण काळात पण आपल्याला फक्त सिनेमाच घेऊन जाऊ शकतो
काही कादंबऱ्या अथवा कथा इतक्या उत्कृष्ट असतात
की त्याच्या वर सिनेमा काढुन तो माणसांच्या अधिक जवळ पोचवण्याचे काम
अनेक दिग्दर्षक करीत असतात
एखाद्या व्यक्तीचे अख्खे आयुष्य अथवा कीती तरी वर्षाचा पुराण काळ
सिनेमा मुळे आपण तीन तासात अनुभवू शकतो
इतके सिनेमा मध्ये सामर्थ्य आहे .!!!
सिनेमा माणसाना त्याच्या स्वप्नाच्या जवळ पोचवतो
आयुष्य आहे म्हणजे सुख दुख्ख चढ उतार हे तर असणारच
पण सिनेमांच्या तीन तासाच्या वेळेत माणुस आपल्या दुख्खां पासुन दुर जातो
सिनेमा संपला तरी त्याच्या आठवणी खुप काळ राहु शकतात

जे अनेक प्रकारचे प्रसंग सिनेमात दाखवले जातात त्यामुळेच कदाचित माणसांच्या आयुष्याला सुध्दा “सिनेमा “..ची उपमा दिली जाते
सिनेमा हा माणसाचा विरंगुळा आहे त्याला त्याच्या आयुष्या पेक्षा वेगळे काहीतरी
करायचे असते आणी जे त्याला शक्य होत नाही त्याचे समाधान तो सिनेमा पाहुन मिळवतो
असा हा सिनेमा सिनेमा ...!!!