Bandini - 4 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 4

बंदिनी.. - 4

..... मी स्वतः ला सावरलं आणि केबिन मधून बाहेर पडले...

पुढे..

Monday म्हटलं की अस्सा कंटाळा येतो ना ऑफिस ला जायला... ? फक्त 'अनय' च्या ओढीनेच उत्साह येतो... ? आणि पावले भराभर उचलली जातात... Saturday, Sunday सुट्टी असते त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तो दिसत नाही.. ? आजही त्याला बघण्यासाठी म्हणून मी घाई घाईने ऑफिस ला आले..केबिन मध्ये येऊन पर्स टेबलवर ठेवली..आणि समोर बघते तर पीसी जवळ एका कोऱ्या कागदावर एक स्मायली फेस आणि खाली 'गुड मॉर्निंग परी ' चा एक मेसेज प्रिंट केलेला होता... हा 'परेश' पण ना! ह्याचं तर रोजचंच आहे हे... मी यायच्या आधी रोज हे असं काहीतरी प्रिंट करुन टेबल वर ठेऊन जायचं... हो! तो लाइक करायचा मला.. तसं कबूल ही केलं होतं त्याने माझ्याजवळ...'परी' म्हणायचा मला... अधून मधून माझ्या केबिन मध्ये येऊन मला काहीतरी जोक सांगून हसवून जायचा... चांगला होता मनाने... पण मी त्याच्याबद्दल कधी तसा विचार केला नव्हता.. त्याच्याबद्दलच काय.. अनय शिवाय इतर कुणाचाच विचार मी करू शकत नव्हते...? पण अनय या सर्वापासून दूर होता.. त्याच एक वेगळं विश्व असायचं.. त्याच्या मनात काय चाललंय कधी कळायचंच नाही.. कधी वाटायच तो मला लाइक करतो... कधी वाटायचं ह्याचा प्रेमावर वगैरे विश्वासाच नसावा... तर कधी वाटायचं ह्याची कुणी गर्लफ्रेंड तर नसेल ना... आणि जर असेल तर.... तर माझं काय...?? असे विचार आले की मन उदास व्हायचं.. पण मग मीच स्वतः ची समजूत घालायचे की असं काही नसेल....


एके दिवशी मी माझं थोडं काम आवरून एक राऊंड मारून यावं म्हणून मेन रूम मधे गेले.. अनय ला एकदा बघून यावं तसेच तन्वी सोबत दोन मिनिटे बोलावं म्हणून तिच्या टेबल कडे जात होते.. बघते तर तन्वी आणि अनय एकमेकांच्या शेजारी बसून बोलत होते.. छान हसत होते...त्यांना तसं एकत्र बघून माझी पावले जागेवरच थबकली.. मी तिथे आल्याचं त्या दोघांच्या लक्षातही आलं नाही.. ते दोघे एवढे छान गप्पांमध्ये रंगले असताना मी तिथे जाऊन त्यांना डिस्टर्ब करावंसं नाही वाटलं मला... मी हळूच मागे फिरले... माझ्या केबिन मधे येऊन बसले.. मन अचानक उदास झालं.. असं का व्हावं.. मी जो विचार करतेय खरंच तसं काही आहे की त्या दोघांमध्ये निव्वळ मैत्री आहे... काही कळत नव्हतं पण लगेच मनातले विचार झटकले... मीच चुकीचा विचार करत असेन असं मनाला समजावलं.. आणि पीसी ला लॉग इन केलं...


घरी गेल्यानंतर ही मूड ऑफ़ च होता.. ऋतू ने न राहवून विचारलंच.. "तायडाs.. ओके ना?" खरं तर तिने चुकीचं काही विचारलच नव्हतं.. तरीही मी तिच्यावर ओरडलेच..


"हे बघ ऋतू, मी आज खूप दमलेय... मला जरा शांतता आणि एकांत हवाय?.. तू प्लीज गप्प बैस...?"


बिचारी निमुटपणे रूम च्या बाहेर निघून गेली... मला नंतर वाईट वाटलं.. उगीच तिला बोलले.. पण राहून राहून तन्वी आणि अनयच डोळ्यांसमोर दिसत होते.. ?.. त्यामुळे मी थोडी रिअ‍ॅक्ट झाले... थोड्या वेळाने ऋतू ला सॉरी ही बोलले... बिचारीने झटकन् मिठी मारत हसत हसत मला माफ ही करून टाकलं....!



- - - - - - - - - - XOX - - - - - - - - - - -


परेशचं माझ्या केबिन मध्ये येणं नेहमीचंच होतं.. रोज तो अधून मधून येऊन मला डिवचून जायचा..?? हसवायचा... म्हणायचा "तू ऐसे गुमसूम बैठी रहती है.. मुझे अच्छा नही लगता.."... अस्सल मराठी माणुस पण सतत हिंदी मध्येच बोलण्याची सवय! अ‍ॅक्च्युअली अर्ध हिंदी अर्ध मराठी ??


पण आजकाल अनय आणि तन्वी ला एकत्र बघून माझा मूड च खराब व्हायचा .. त्या दोघांचा विचार करून करून हल्ली मी गप्प गप्पच रहायला लागले होते.. आणि हेच परेश ला आवडत नव्हतं.. त्याला माझ्या गप्प राहण्यामागचं कारण माहीत नव्हतं.. पण मी नेहमी हसत राहावं असंच त्याला वाटायचं.. त्याने एक - दोन वेळा मला माझ्या गप्प राहण्याचं कारणही विचारलं होतं पण मी उत्तर द्यायचं टाळलं होतं....


आजही तो माझ्या केबिन मध्ये आला....


"हाय परी .." - परेश


त्याच्याकडे न बघताच मी त्याला "हाय .." केलं..


"हे काय.. असं नाही हां.. विथ स्माईल ☺" - परेश


मी त्याच्याकडे बघून उगीचच हसल्यासारखं केलं.. मनात आलं, आत्ता माझ्या चेहर्‍यावर फक्त एकच व्यक्ति स्माईल आणू शकते... अनय! पण तो तर तन्वी सोबत बिझी होता.. ?


परेश ने पुन्हा बोलायला सुरुवात केली..


"अगं ऐक ना.. तुला माहितीये.. मी ऑफिस च्या कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये गेलो की सगळे तुझ्याच बद्दल विचारत असतात... ?"


मी काहीसं वैतागूनच त्याच्याकडे बघितलं.. आधीच मूड गेलेलाच होता..


"का? त्यांना काही कामं नसतात का??" - मी


"अरे यार.. तू है ही अपने ऑफिस की परी.. तो तुझे ही पूछेंगे ना! ?"- परेश


खरं तर त्याच्या या बोलण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नव्हता.. पण केवळ मी त्याच्याबद्दल तसं काही फील करत नाही म्हणून मी त्याच्यासोबत वाईट वागू शकत नव्हते.. म्हणूनच मी त्याला विचारलं-


" हो का ?.. बरं.. कोण विचारत होतं माझ्याबद्दल? "


त्याने तीन - चार जणांची नावे घेतली.. आणि शेवटी म्हणाला, "हमारे डिपार्टमेंट में भी कुछ कम फॅन्स नही है आपके ?"


"तुला बरं सर्व माहीत असतं रे... कोण आहेत ते फॅन्स ??"


तो म्हणाला.. "एक तो मैं खुद?.. दुसरा अपने मॅनेजर का ड्रायवर, जो हमेशा अपने डिपार्टमेंट में ही पडा रहता है... और तिसरा... अनय!!!"


'अनय' चं नाव ऐकल्याबरोबर मी चमकून त्याच्याकडे बघितलं.. आणि जवळ जवळ ओरडलेच..


" काsssय?? तुला कुणी सांगितलं हे? "


" अगं सांगायला कशाला पाहिजे.. बॉइज ना बॉइज च्या गोष्टी माहीत असतात ?"


मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं.. असं कसं होईल.. अनय तर माझ्यासोबत नीट बोलत सुद्धा नाही.. तो तर नेहमी तन्वी सोबतच असतो... नक्कीच परेश ला काहीतरी गैरसमज झाला असेल...


तितक्यात तन्वी तिथे आली.. आमचं थोडंफार बोलणं तिच्या कानावर पडलं होतं बहुतेक.. तिने आत येत विचारलं.. "काय झालं, कोणाच्या गोष्टी माहीत आहेत कोणाला...?"


मी काहीच बोलले नाही.. तसा परेश च म्हणाला - "अरे अपना 'अनय' लाइक करता है परी को"..


हे ऐकल्यावर तन्वी चा खाडकन पडलेला चेहरा माझ्या नजरेतून सुटला नाही..



ऑफिस मधून घरी जातानाही बस मध्ये ती शांतच होती.. रोज अनय बद्दल भरभरून बोलणारी ती - आज त्याच्याबद्दल काहीच बोलली नाही.. एरव्ही बस मध्ये येता जाताना 'अनय' हा आमचा खास टॉपिक असायचा.. पण आज ती गप्प होती... निदान त्याच्या बद्दल तरी ती काहीच बोलत नव्हती.. मी ही मग त्याच्या बद्दल बोलणं टाळलं.. तिला अनय आवडायला लागला होता यात शंकाच नव्हती.. अनय सुद्धा तिच्यासोबत बोलताना नेहमी खुश असायचा... मी ठरवलं... आजपासून अनय पासून जरा लांबच राहायचं.. ??


To be continued..

?

#प्रीत ?


Rate & Review

gajanan tayde

gajanan tayde 2 years ago

Rajashri

Rajashri 3 years ago

Rushali

Rushali 3 years ago

Darshana Borse Ahire
s s

s s 3 years ago