Bandini - 3 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 3

बंदिनी.. - 3

.. इकडे माझं मन पाखरु होऊन उंच उंच आकाशात भरारी मारून आलं होतं... केव्हाच..!!

पुढे..

आज आमचे प्लानिंग डायरेक्टर ऑफिस ला आले नव्हते.... त्यामुळे जरा रिलॅक्स्ड होतो .. लंच ब्रेक मधे सगळे जण थोडा वेळ एकत्र बसून गप्पा मारत होतो... सगळे जण गप्पांमध्ये गुंग असताना अनय माझ्या बाजूच्या चेअर वर येऊन बसला.. म्हणाला माझ्या नंबर वर कॉल कर जरा... मी म्हणाले... का? तो म्हणाला अगं कर तर... मी डेस्क वरच्या फोन चा रिसीव्हर उचलला आणि धडाधड फोन ची बटणे दाबली.. आणि पटकन जीभ चावली...!!! ..... का माहितीये?? अनय ने त्याचा नंबर सांगायच्या आधीच मी त्याचा नंबर डायल करून मोकळी झाले होते...?? पण अनय च्या लक्षात आलं नव्हतं बहुतेक... मी हुश्श केलं... नंबर डायल केल्यावर पलीकडून गाणं वाजायला लागलं.... 'जिंदगी दो पल की.. इंतज़ार कब तक हम करेंगे भला.. तुम्हे प्यार कब तक ना करेंगे भला....'♥️
त्याने विचारलं "कशी आहे रिंगटोन?" ..
मी म्हणाले "मस्त आहे ?" ..
तो म्हणाला.. "चांगली नाही वाटत ना... चेंज करतो"
मी म्हणाले.. "अरे खरच खूप छान आहे.. नको चेंज करू"
तो थोडा नाराज होऊनच उठला.. पण तरीही जाताना त्याने विचारलंच.. "माझा नंबर पाठ आहे वाटतं?.." आणि हसून बाहेर निघून गेला... म्हणजे.... त्याच्या लक्षात आलं होतं...?... मला तर लाजल्यासारखंच झालं... ?

अ‍ॅक्च्युअली... अनय च्या टीम मधल्या सर्वांची शिफ्ट वाईज लिस्ट लावलेली असायची बोर्ड वर.. प्रत्येक आठवड्याची.. आणि प्रत्येकाच्या नावापुढे त्याचा मोबाईल नंबर ही असायचा... त्यामुळे तिथूनच मला त्याचा नंबर मिळाला होता.. आणि मला तो तोंडपाठ ही झाला होता ??
पण...... आज एवढ्या चांगल्या मूड मध्ये होता तो... अचानक काय झालं त्याला.. अचानक नाराज का झाला...? मी तर रिंगटोन छान आहे असंच म्हणाले.. मग त्यात रागावण्यासारखं काय होतं.. ? खूप विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याने इन्टेन्शनली ते गाणं मला ऐकवलं नसेल ना... 'तुम्हे प्यार कब तक ना करेंगे भला..' OMG!! ? म्हणजे अनय सुद्धा मला लाइक करतो का...??माझ्या तर पोटात गुदगुल्या झाल्या... खूप खुश होते मी... पण तो अजून प्रत्यक्ष काही बोलला नव्हता... त्यामुळे मी सध्यातरी या बाबतीत मौन धारण करायचे ठरवले..

- - - - - - - - - XOX - - - - - - - -

अरे बापरे! दोन वाजून गेले... कामाच्या गडबडीत 'भूक' नावाची पण गोष्ट असते हे पार विसरूनच गेले मी... मागे वाकून तन्वी च्या टेबल कडे बघितलं तर ती केव्हापासून माझीच वाट बघत होती.. भुकेने कासावीस झालेला तिचा चेहरा बघितला आणि मला हसूच आलं?.. पण मी तरी काय करणार! आमचे प्लानिंग डायरेक्टर सुट्टीवर असल्याने त्यांच थोडं पेंडिंग काम मलाच करावं लागलं होतं.. लोकल पॉलिटिशियनच्या मुलाच्या रिसेप्शन ची प्लानिंग चालू होती...त्यामुळे वेळ कसा गेला समजलंच नाही..

मी लगबगीने उठले... तन्वी ला खुणावलं की चल जाऊया जेवायला... आणखी थोडा वेळ जरी मी उशीर केला असता ना तर कदाचित तिने मलाच खाऊन टाकलं असतं...
???

मी बाहेर जाऊन हात धुवून आले... आणि माझा लंच बॉक्स आणण्यासाठी माझ्या केबिन मध्ये गेले.. आणि तिथे अनय ला बघून दचकलेच!.. तो चक्क माझ्या केबिन मध्ये बसून टिफीन खात होता.. एखाद्या लहान मुलासारखा त्याचा तो जेवतानाचा चेहरा बघून मला हसू आलं.. किती क्यूट आहे हा!! ?
आता तो तिथे बसला असताना कॅन्टीनमध्ये जेवायला जायची माझी तरी इच्छा नव्हती... तितक्यात तन्वी पण तिथे आली... मी तिला विचारलं.. आपणही इथेच बसुन जेवूयात का?... ती ही लगेच तयार झाली आणि आम्हीही तिथेच जेवायला बसलो.. जेवता जेवता खूप गप्पा मारल्या... माझ्या टिफीन मधलं नॉन व्हेज त्याला खूप आवडलं.. म्हणाला रोज घेऊन येत जा माझ्यासाठी.. ?
मला तर त्याच्यासोबत वेळ घालवायला मिळाला याचाच जास्त आनंद होत होता.... ?

दुसर्‍या दिवशी ही काम जास्त असल्याने जेवायला जायला उशीरच झाला... मी हळूच अनय कडे बघितलं;पण तो बिझी होता.. म्हणून मग मी आणि तन्वी - आम्ही कॅन्टीन मध्ये गेलो.. जेवून आल्यावर मी माझ्या केबिन मध्ये आले तर - अनय तिथे टिफीन खात बसला होता....!... म्हणजे.... तो माझ्यासाठीच तिथे आला होता का? ?.... एक सुखाची लहर उठून गेली हृदयात.. ?!! पण तो एकही शब्द बोलला नाही माझ्याशी... शांतपणे मान खाली घालून जेवत होता.. याचा अर्थ मी त्याला एकट्याला सोडून जेवायला गेले म्हणून रागावला का तो माझ्यावर??.. 'नाही.. नाही... असं काही नसेल मीरा... तू जे ऐकलंयस त्यातला एक शब्द ही तो कधी बोलला नाहीये तुझ्याजवळ.... मग तरीही तू असा का विचार करतेयस...?' - माझं एक मन म्हणत होतं...
कदाचित त्याच्या मनात असं काही नसेलही.. तो मला फक्त एक चांगली मैत्रीण म्हणूनही बघत असेल, जिच्या जवळ तो सर्व शेअर करू शकतो... हो, असही असू शकतं.. माझं दुसरं मन म्हणत होतं.... मी स्वतःला सावरलं आणि केबिन मधून बाहेर पडले...


To be continued...
#प्रीत ?

Rate & Review

gajanan tayde

gajanan tayde 2 years ago

Rajani

Rajani 3 years ago

Shubhangi

Shubhangi 3 years ago

SWATI MOTGHARE

SWATI MOTGHARE 3 years ago

Rushali

Rushali 3 years ago