Novel -premaavin vyarth he jivan Part- 23 rd. books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २३ वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग-२३ वा

-----------------------------------------------------------------------

रंजनादीदी आणि अजय यांच्यात पहिल्यांदा इतका सविस्तर संवाद झाला होता.

अजय रंजनाला म्हणाले – अनुशाने आपल्याला तिच्या कार्यात सामील करून घेतले आहे,

ही तिची मोठी मेहेरबानी झाली असे मला आटत वाटते आहे , त्यामुळेच आपल्यात पहिल्यांदा

या घरगुती विषयवार आणि या माणसांबद्दल बोलणे झाले . इतके दिवस मी विषय काढलेला

नव्हता आणि तू कधी आपणहून बोलली नाहीस. असो.

अनुशामुळे अभिजित आणि या दोघांच्यामुळे आपण .असे मिळून आपल्या घरातील हरवलेले

श्रेयस “परत आणू या , आणि हे सगळे करीत असतांना या आधी काय घडून गेले , ते तसे

का घडले , ? याची जबाबदारी टाकून आपण मोकळे नाही व्हायचे ,आणि कुणाला दोष पण नाही

देत बसायचे .

त्या ऐवजी ..मनाने आपण कसे जवळ येऊत ? हा विचार करणार्या अनुशाला

आपण सपोर्ट करीत राहू . रंजना तुला सांगतो..या अनुषा कडून माझ्या खूप अपेक्षा आहेत.

मोठ्या आशेने रंजना म्हणाली – तुमचे शब्द खरे होवो ..हीच माझी प्रार्थना आहे.

रंजना – अनुशाने उद्या आपल्याला किती वाजेपर्यंत बोलावले आहे कोलेजला ?

अजयच्या प्रश्नाला उत्तर देत रंजना म्हणाली –तिने सांगितले आहे की -

दुपारी साडेबारा पर्यंत कॉलेजमध्ये पोंचा ,प्रिन्सिपलसरांच्या केबिन मध्ये बसा ..आणि मला

मेसेज करा ..सगळी तयारी झालेली असेलच , मी तुम्हाला सभागृहात घेऊन जाण्यासाठी इतर

विद्यार्थी मित्रांच्या सोबत येईन . आपला कार्यक्रम एक ते तीन .असा दोन तास चालणारा आहे.

हे ऐकून ..अजय म्हणाले ..

आपण सकाळी अकरा वाजता कॉलेजमध्ये जाऊ या , कारण ..या कॉलेजचा परिसर ,आणि वातावरण

याबद्दल मी खूप ऐकून आहे..तेव्हा या निमित्ताने ..मला माझा आवडते निसर्ग निरीक्षण काम

करायला मिळेल. त्यसाठी मी आज लगेच प्रिन्सिपल सरांना फोन करून यांची परवानगी घेतो ,

आणि आपल्या मदतीला कुणी संबंधित व्यक्ती दिल्यास फार बरे होईल “अशी विनंती करतो.

हे ऐकून ..रंजना म्हणाली ..

तरीच म्हटले .. फक्त एक कार्यक्रम करून तुमचे समाधान कसे काय होणार ?

कारण एकच वेळी अनेक गोष्टी साधण्याची तुमची सवय मला नवी नाहीये.

रंजनाच्या बोलण्य्वर अजयने हसून मान डोलवली ..आणि प्रिन्सिपल सरांना फोन केला .

सर बोलू लागले –

अजय जी नमस्कार , बरे झाले तुम्ही या वेळेत फोन करा ,अगोदर केला असता तर मिटिंग

मध्ये डिस्टर्ब नको म्हणून मी माझा फोन स्वीच ऑफ “ठेवला होता.

उद्याच्या तुमच्याच कार्यक्रमाची तयारी कशी झाली आहे ? याची मिटिंग होती.

अनुशाने खूप मेहनत घेतली आहे ,कार्यक्रम नाविन्यपूर्ण आणि आकर्षक व्हावा म्हणून.

तुम्ही साडेबारापर्यंत या उद्या , मी वाट पाहीन तुमची.

सरांचे बोलून झाल्यावर ..अजय म्हणाले ..

सर, एक विनंती आहे तुम्हाला , करू का ?

सर म्हणाले – अरे विनंती वगरे म्हणू नका बुवा ..तुम्ही पाहुणे आहात आमचे ,सांगा काय इच्छा

आहे तुमची ?

अजय सांगू लागले –

सर जी – उद्या आम्ही दोघे सकाळी अकरा वाजतच कोलेजला येत आहोत .

मला ..तुमच्या कोलेजच्या परिसराला भेट द्याची आहे , पर्यावरणबद्दल तुमचा स्टाफ खूप

जागरूक आहे, असे ऐकून आहे मी .

साहजिकच माझ्या आवडीच्या कार्याला हातभार लावणार्या व्यक्तीना भेटणे ,त्यांचे कार्य पाहणे

मला खूप आवडेल. या साठी तुम्ही उद्या एक संबंधित व्यक्ती आमच्या मदतीला दिलात तर ,

मी माझे काम करीन . तुमची परवानगी असेल तरच.

प्रीन्सिपाल सरांन अजयच्या या विनंतीचे खूप आसच्र्य वाटले ,आणि आनंदही झाला ..

ते म्हणाले

उद्या तुम्ही अकरा वाजता या ,मग तुम्हाला काय काय मदत लागेल ती मी उपलब्ध करून देईन.

आमच्या कार्याबद्दल तुम्हाला इतकी आस्था आणि उत्सुकता आहे “ हे पाहून मी खूप प्रभावित

झालो आहे .

प्रिन्सिपल सरांच्या या रीस्पोंस मुले अजयंना खूप आनंद झाला .

कोलेजमधली मिटिंग संपवून अनुषा आता घरी आलेली असणार ..या अंदाजाने त्यांनी अनुशाला

फोन लावला ..

अनुशाने रिंग वाजली म्हणून .मोबिल स्क्रीनवरचे नाव वाचले ..”अजय जीजू “..!

पहिल्यांदा त्यांचा फोन आलेला होता ..

क्षणभर तिच्या मनात नको तो विचार चमकून गेला ..

“उद्याचा कार्यक्रम ओमफस तर नाहीये ना ? देवा,असे काही होऊ देऊ नको रे बाबा !

तिने ..बोलण्यास सुरुवात केले ..

बोलावे अजयसर ..कसा काय फोन केलात ?

ठीक आहे ना सगळे ?

तिचा घाबरून गेलेला आवाज जाणवून ते म्हणाले ..

उद्याच्या कार्य्क्रमची आठवण देण्यासाठी केलाय तुला फोन.

तुझ्या सुचणे प्रमाणे , तू दिलेल्या वेळेवर आम्ही दोघे हजर असुत .

ऑल द बेस्ट टू यू...!

हे शब्द ऐकून अनुशाला खूप बरे वाटले .तिला तिच्याच मनाचा राग येत होता ,

विनाकारण येणाऱ्या वाईट विचारांना थांवले पाहिजे असे तिला वाटले.

ती म्हणाली ..थान्क्स तुम्हाला आणि रंजनादीदीला . मी खूप उत्सुक आणि अधीर आहे उद्याच्या

तुमच्या कार्यक्रमासाठी , कारण ..हे पाहून .सागर देशमुख काय प्रतिक्रिया देतील ?

यावर माझ्या पुढच्या स्टेप्स डिपेंड असतील.

अजयजीजू तिला धीर देत म्हणाले ..

अजिबात काळजी करू नकोस अनुषा , तुझा उद्देश आणि हेतू नेक आहे ..

त्याचा रिझल्ट छानच असणार आहे.

तू धीराने आणि शांतपणे तुझे एकेक पाउल उचलत पुढे

पुढे चालत रहा , तुला नक्कीच यश मिळेल .

भेटू अनुषा उदयाला . बाय.

अजयनी फोन बाजूला ठेवल्यावर रंजनादीदी म्हणाली –

अहो , आपण उद्या अकरा वाजताच कोलेजला येणार आहोत , हे तर तुम्ही अनुशाला

सांगितलेच नाहीत , आणि तुम्ही जरी नाही सांगितले ..

पण,उद्या प्रिन्सिपल सरांच्या कडून तर तिला

समजेलच ना ?

रंजना कडे हसत पाहत अजय म्हणाले –

प्रिन्सिपल सरांना ..मी आपले बोलणे झाल्यावर लगेच मेसेज पण केलाय .

.की आम्ही सकाळी लवकर येत आहोत आणि माझा कोलेज परिसर पाहण्याचा कार्यक्रम..

या बद्दल कुणलाच काही सांगू नका .

हे ऐकून रंजना म्हणाली –

बाप रे ..कमाल आहे बाई तुमची ..कधी काय कराल याचा नेम नसतो , आणि एकाच वेळी काय काय

करता याचा अंदाज करणे मला अजून जमलेले नाही.

हे ऐकून अजय म्हणाले ..

मी कसा आहे , माझ्या अपेक्षा ,आवडी-निवडी , माझे कार्य क्षेत्र याचे तुझे अंदाज अजिबात चुकले नाहीत .

तुझ्या बिनचूक अंदाजाचे कौतुक वाटून तर ..

तुझ्या प्रेमात पडलो रंजना , आणि तू पण प्रतिसाद दिलास ..

हे ऐकून ..रंजनाला हसू आले ..

बरे झाले बाई ..अनुशाला थांक्यू म्हणायला पाहिजे उद्या ..

तिच्यामुळे तर..आज तुम्ही माझ्याबद्दल काय वाटते हे सांगितले , आणि हे आभार-प्रदर्शन केले .

इकडे त्याच्या ऑफिसात असलेला अभिजित ..विचार करीत बसला होता..

अनुशाने हाती घेतलेले काम फारच डेंजर आहे याची त्याला कल्पनां होती ,कारण लहानपणापासून

तो आपल्या बाबांचे –सागर देशमुख यांचे ..जे जे रूप पाहत मोठा झालेला होता ..ती दरवेळी एकदम

अनपेक्षित अशीच असत .

आपल्या बाबांचे आणि आईचे परस्परातील नाते साधारण जोडप्यांचे असते तसे नाहीये “ हे त्याच्या

मनावर बालपणा पासून उमटत होते. तो विचार करीत असायचा ..

असा काय अपराध घडला असावा आपल्या आईच्या हातून ..की ज्याची शिक्षा ..ती जन्मठेप शिक्षा

भोग्ल्यासारखी भोगते आहे .

बाबा तिच्याशी कधी प्रेमाने बोलत नाही, दोघे सोबत बसून हसत-खेळत बोलत असल्याचे त्याला कधीच

पाहायला मिळत नसत .

सभोव्तालीच्या लोकांच्या बोलण्यातून ..कधी कधी त्याच्या कानावर काही काही पडे ..ते बहुतेक वेळा

तिच्या विषयी वाटणाऱ्या सहानुभूती या भावनेतून बोलले गेले आहे” हे त्याच्या मनाला जाणवत असे.

अशा वेळी अभिजित ..लक्षपूर्वक आपल्या आईकडे पहायचा ..तिची वागणे , बोलणे ,घरातले वावरणे,

आल्या-गेल्या माणसांशी तिचे वागणे “..

यात ती एकटी असतांना काही वावगे वागते , विचित्र वागते ,असम्न्ध बोलते “,तिला तारतम्य नसते ,

भान नसते “हे असे काही त्याला तिच्या सोबत असतांना दिसायचे नाही आणि जाणवायचे सुद्धा नाही.

मग ..आपले बाबा घरात असतांनाच तिला एकदम काय होऊन जाते ? कळत नाही.

त्यांच्या समोर ती खूप प्रेशर मध्ये असते , लहान –सहान गोष्टी करतांना तिच्या हातून मोठ्या चुका

घडत राहतात ..

हे सगळ सुरु झालं की ..मग ..आक्रस्ताळी बाबांचे रूप त्याला दिसायचे ..

आजोबांना शिव्या , आईला घालून –पाडून बोलणे सुरु ..इतके की ..आई तिच्या रूम मध्ये जाऊन

बसायची ..ती बाहेरच येत नसे.

अभिजित अशा विसंवादी वातवरणात मोठा होत गेला ..आणि आई-बद्दल बाबांच्या मनातल्या भावना

का आहेत ? या प्रश्नाची उत्तरे तो शोधू लागला ..

तेव्हा त्याला जाणवले ..

हो ,आहे आपली आई, थोडी मंद बुद्धी , एका पायात दोष आहे जन्मजात , उपाय झालेच नाही ,

त्यामुळे तिच्यात आत्मविश्वास नाहीच , त्यात ..जन्मापासून आईविना वाढलेली मुलगी ,

वडिलांनी जरी सांभाळले तरी ..आईच्या प्रेमाची उब ,आईचे प्रेम तर नाहीच मिळाले .

आजोबांनी प्रेमाच्या पोटी ..सागर देशमुख सोबत केलेला व्यवहार ..मानसिक पातळीवर पूर्णपणे फसला

,आणि आपल्याला फसवले गेले , आपल्या पारिवारिक जीवनाची वाट लावणार्या आजोबांचा आणि बायको

झालेल्या ..एका निरपराध स्त्रीचा , आपल्या आईचा " त्यांच्या पत्नीचा -बाबांनी आयुष्यभर फक्त दुस्वास्च केला आहे.

काय मिळवले , ?आजोबांची इस्टेट , त्यांचे उद्योग-धंदे , पैसा ,वैभव हवे होते त्यांना ,पण, आजोबांनी

त्यांच्या गळ्यात बांधलेली पोरगी ..गळ्यातली धोंड “म्हणून बाबांनी आईला आयुष्यात जागा दिली.

असे वागणार्या बाबांच्या बद्दल .आपल्या मनात कधीच आपलेपणा निर्माण झाला नाही”हे सत्य आहे.

म्हणूनच ..त्यांच्या शिवाय आपण घडू शकतो ,राहू शकतो .

हे सिध्द करून दाखवण्याच्या जिद्दीने आपणत्यांचे घर सोडले .

ते बाहेरगावी जातात तेव्हा आईला भेटून ,पाहून येतो.

बाबांच्या तर्हेवाईक वागण्याने ..रंजनादीदीने देखील त्यांच्यापासून दूर जाण्याचा मार्ग निवडला .

पण,बाबांनी आपणहून कधीच तिच्या बद्दल काही बोलायचे नाही असेच ठरवले .

हे सगळे असे आपले विचित्र जग , अनुषा हे जग बदलण्यास निघाली आहे..

मला तर काही चांगले घडेल ? फार कमी शक्यता वाटते.

पण, अनुशाच्या भावनांचा आदर करीत तिला सपोर्ट करायचा “हे तिच्वरच्या प्रेमा पोटी मी ठरवले.

आणि आता तर ..माझी दीदी आणि अजयजीजू देखील अनुशाच्या पाठीशी भक्कमपणे उभेआहेत

हे पाहून खरेच खूप आनंद झालाय.

उद्याचा कार्यक्रम आणि त्यावर बाबांची प्रतिक्रिया नेमकी काय नि कशी असेल ?

अनुशाने या परीक्षेत पास व्हायलाच हवे आहे .

तोपर्यंत मनाची धडधड अशीच चालू राहणार आहे ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग – २४ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि. देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------