Yaad lagla - 1 in Marathi Love Stories by Sanjay Kamble books and stories PDF | याड लागलं - 1

Featured Books
  • સાચો સગો મારો શામળિયો!

    ' સ્વામીજી, કોઈ ભાઈ આપને મળવા આવ્યા છે.' પ્રૃફ-વાચનન...

  • ફરે તે ફરફરે - 36

    મુંબઇમા વાન્દ્રા  વેસ્ટમા હીલ રોડના બીજા છેડે એક રેસ્ટો...

  • આશાબા

    સુરજ આજે અસ્તાચળ પર હતો છતાં પણ કાઈક અલગજ રોશની ફેકી રહ્યો હ...

  • ભાગવત રહસ્ય - 107

    ભાગવત રહસ્ય-૧૦૭   જ્ઞાની પુરુષો –પરમાત્માના રૂપમાં એવા મળી જ...

  • ખજાનો - 74

    " તારી વાત પરથી એવું લાગી રહ્યું છે કે તમે લોકો મિચાસુને ઓળખ...

Categories
Share

याड लागलं - 1

याड लागल...'

Story by Sanjay Kamble

सरकारी दवाखान्याच्या आवारात लोकांची बरिच गर्दी होती , नेहमीचीच म्हणायची.. गोरगरीब रूग्णांचा तोच एकमेव आधार, नाहीतर सर्दी खोकला झाला तरी I.C.U. मधे अॅडमिट करून 50,000₹ च बिल करणारे दवाखाने आणी ते पैसे सहज चुकवणारे गर्भश्रिमंतही आपल्यात कमी नाहीत, पन सरकारी दवाखाना म्हंटल तरी अंगावर शहारा येतो, तीथली दुरावस्था, पेशंटसोबत हीनतेच बोलण , खालच्या दर्जाची वागणुक आणी त्यांच्या शरिराची होणारी हेळसांड... अशाच एका सरकारी दवाखाण्याची ती भव्य इमारत, पुराण पण भक्कम बांधकाम, इमारतीच्या आवारात उभी पिंपळाची आणी तशीच निरनिराळी झाड , आणी उन्हाच्या तडाख्यापासुन बचाव करण्यासाठी या झाडांच्या आस-याला बसलेले रूग्णांचे नातेवाईक पदराला बांधुन आणलेली चटणी भाकरी खात होते, त्यातच एखादा तुकडा बाजुला शेपटी हालवत आशेन पहाणा-या कुत्र्याला टाकत होती. पन अशातच एका वॉर्ड मधे थोड गंभीर वातावरण निर्माण झालेल.

" डॉक्टर ...तु माझा आयुष्य संपवलस.. माझ हसत , खेळत कुटूंम्ब आज माझ्या डोळ्यादेखत संपल..."
एक तीशीतला तरूण त्या सरकारी दवाखाण्याच्या गजबजलेल्या वॉर्डमधे उभा होता..आजुबाजूला पेशंटचे नातेवाईक, सफाई कर्मचारी, शिकाऊ डॉक्टर ऊभे त्याच्याकडच पहात होते... डोळ्यात पाणी होत मन त्यात दुखा:सोबतच राग दडलेला. संताप दडलेला... समोर उभ्या डॉक्टर गिरीष कडे पहात त्याच्या मनातला वाढणारा आक्रोश स्पष्ट दिसत होता... डॉक्टर गिरीष म्हणजे शहरातल्या नावाजलेल्या डॉक्टर्स पैकी एक... उंच, देखणे मजबुत बांधा ... चमकदार काळे केस , चकचकीत दाढी मिशा.. पोपटाच्या चोचीसारख नाक जे त्यांचा उभट चेहरा आणखी रागिट भासवत असायच...
आणी व्हाईट अॅप्रॉनवर नेहमी लटकणारा स्टेटोस्कोप... त्या तरूणाकडे पहात डॉक्टर गिरीष जबर घाबरला असला तरी चेह-यावरची भिती लपवण्याचा प्रयत्न करत बोलु लागलो...

" ये काय बोलतोयस....? डोक ठिकाणावर आहे का तुझ....?"
चढलेल्या आवाजात डॉक्टरांनी समोरच्या त्या तरूणाला खडसावल...
" आवाज वाढवू नको डॉक्टर... काल डिलीव्हरीला आलेली माझी बायको आज या जगात नाही... ती एका मेलेल्या बाळाला जन्म देऊन निघुन गेली...."
बाजुच्या स्ट्रेचरवर पडलेल्या एका तरूण स्त्रीच्या मृतदेहाकड पहात त्याच्या वेदना भरलेल्या डोळ्यातुन वाहु लागल्या... त्या स्त्रीच्या निष्प्राण , भावनाशुन्य चेर-याकड पहात त्याच काळीच फाटत होत पुन्हा त्याची नजर पांढ-या कपड्यात गुंडाळुन ठेवलेल्या एका मृत अर्भकावर पडली.. त्याच्या जवळ आपले थरथरणारे हात नेत त्याला हातात घ्यावस वाटल पन सार काही संपल होत...
" तु संपवलस माझ घर... तु संपवलस माझ्या बायका मुलांना..."
तो आक्रोष करत राहीला..
तसे डॉक्टर गिरीष आजुबाजुला जमलेल्या लोकांकडे पहात चेह-यावर उसन आवसान आणत दरडावुन म्हणाला....
" तुमच्या कर्मान गेली आणी दोष आमच्या माथी मारतोयस.. बाहेर काढा रे याला...." त्याच्या या बोलण्यान तरूण संतापला. रागाने तो धावतच डॉक्टरच्या अंगावर झेपावला आणी मुस्काटात लगावली...
दवाखान्यातील कर्मचा-यांनी त्या तरूणाला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केल.... त्याचा रडण्याचा आवाज दवाखाण्यात घुमत राहील...

पन त्याच्या या अवस्थेला जबाबदार डॉक्टर गिरीषला कोणीच हात लाऊ शकल नाही... त्या तरूणान प्रेग्नेन्सीपर्यान्तची ट्रिटमेंट गिरीषच्या खाजगी दवाखाण्यात केली पन खर्च आवाक्याबाहेर गेल्यान त्यान डिलीव्हरी सरकारी दवाखान्यात केली आणी आपल्या हातातले बकरे निसटल्यान त्यान त्या महीलेच्या ट्रिटमेंटमधे हलगर्जीपना केला... त्यातच ती आणी तीच बाळ... जे त्या सरकारी दवाखाण्याच्या स्टेचरवरच अंत्यसस्काराची वाट पहात पडुन होत....

*****


बाहेर बरीच गर्दी आहे म्हणजे तशी रोजच असेल पन मी इथ आज आलोय... सकाळचे सात सव्वासात झालेत... सुर्यनारायणांच अजुन दर्शन झालेल नाही कदाचीत या ढगाळ वातावरणात कुठतरी लपुन बसले असावेत. तसही पावसाळ्याचे दिवस त्यामुळे सुर्याच दर्शन जवळ जवळ नसतच... पन पावसाचे तुरळक थेंब मात्र बाजुच्या खिडकीतुन आत वा-याच्या हलक्या झोक्यासोबत झेपावतात... अशी एखादी पावसाची सर आली की एस.टी. तली लोक पन कशी पटापट खिडक्या बंद करून घेताहेत... एरवी विंन्डो सिट साठी भांडणारी मंडळी आज त्या विंन्डोसिटवर बसायला तयार नाहीत... मी ही आज महामंडळाच्या एस.टी. न निघालोय...

'आज तीला भेटायच...!
आज तीला भेटायच..?
किती ही उत्सुकता, हा उतावीळपना, किती ही ओढ... तीला भेटायची... कारण नुसत भेट नाही तर तीला प्रपोज करायच आहे.... अगदी तीच्या समोर गुडघ्यावर बसुन हे गुलाबाच फुल तीच्या समोर अस धरायच आणी मग म्हणायच.....

" पाच रुपये.... पाच रूपये... फक्त पाच रूपये... काही घ्या.... पाच रूपये"
मधेच कोणाच्यातरी बोलण्यान त्याच लक्ष वेधुन घेतल... मान किंचीत तीरकी केली तर शेंगदाणा , चिक्की विकणारा बसमधे आपल्या जीन्नस विकायला येत होता.... मी बसमधुन प्रवास करत होतो माझ्या शेवटच्या मुक्कामाकडे...
हो शेवटचाच मुक्काम... कारण आता आयुष्यात तीच्या शिवाय काहीच महत्वाच नव्हत.. तीच हसण, बोलण लाजणं सार काही माझ्यासाठी आयुष्यात स्वता:पेक्षाही महत्वचा झालेल.... समोर त्या गुलाबाकडे पहात मनात गोड गुलाबी भाव उमटु लागले आणी त्याच प्रतिबिंब चेह-यावर झळकत होत.... गाडी एव्हाना सुरू झाली आणी पावसाच्या पाण्यान भीजुन अधिकच गडद्द दीसणा-या काळ्या कुळकूळीत डांबरी रस्त्यावरून घुंईईई घुंईईईई करत धावत सुटली... पावसाच्या अधुनमधुन येणा-या हल्क्या सरी थंड वा-याच्या झोक्यासोबत बाजुच्या खिडकीतुन आत झेपावताना अंग मोहरून जायच आणी डोळे बंद करताच तीची आठव यायची...

'तशी आमची ओळख फेसबुकवरची.. म्हणजे कुणाच्यातरी पोस्टवर तीची कमेंट आलेली म्हणजे तक्रारच, एका घाणेरड्या फोटो पोस्ट करणा-याला तीन चांगलच फैलावर घेतलेल... त्या रात्रीच मी तीला रिक्वेस्ट चिकटवली आणी तीन ही आढेवेढे न घेता ती एक्सेप्ट केली, तीच्या फोटोवरून तर ती सोशल कामात जास्त रस घेत असल्यासरख वाटत होत.... मग समजल की ती मेडीकलच्या शेवट वर्षात आहे, आणी मग एका पर्वाची सुरवात झाली.... मेसेज मधुन बोलण वाढल , थोडे मनमोकळे झालो तस फोनवरच बोलण वाढल आणी कसे एकमेकांच्या जवळ आलो कळलच नाही... तीन महीण्यांपुर्वी घडलेल्या त्या अपघातानच कदाचीत आम्हाला जवळ आणल... मे महीण्याच्या झळांनी अंगाची लाही होत होती काही कामानिमीत्त त्या दिवशी मी बाईक वरून घराबाहेर पडलो होतो... दुपार बरीच झालेली की मोबईल वाजला... बाईक बाजुला घेतली आणी पाहील ..... तीचा कॉल... रिसीव्ह केला तशी खुप घाबरलेली... रडुन रडून काहीतरी सांगत होती , नेटवर्क प्रॉब्लम त्यात तीच रडण काहीच समजत नव्हत पन ती अशी ढसाढसा रडताना कधीच पाहील नव्हत. काहीतरी गंभीर घटना घडलेली हे नक्की,... तीला शांत करायचा प्रयत्न करू लागले तशी तीनं हुंदका आवरत घटना सांगायला सुरवात केली...

क्रमशः