Diwana dil kho gaya- Part 3 books and stories free download online pdf in Marathi

दिवाना दिल खो गया (भाग ३)

"हाय, सिलू", मुग्धा म्हणाली.
"हाय, मुग्धा", सिलू म्हणाला.
"तू झोपला नाहीस अजून", मुग्धा म्हणाली.
"आता झोपतच होतो तर तुझा मेसेज आला", सिलू म्हणाला.
"ओ, आय एम सॉरी मी तुला डिस्ट्रब केले का?", मुग्धा म्हणाली.
"हेय, इट्स ओके. डोन्ट वरी. तू बोलू शकतेस माझ्याशी. तसे पण मी बारा वाजेपर्यंत जागा असतो रोज", सिलू म्हणाला.
"अच्छा. तुझ्या घरी कोण कोण असते", मुग्धाने सिलूला विचारले.
"मी आणि माझे अम्मा-अप्पा आणि तुझ्या घरात कोण कोण असते", सिलूने विचारले.
"माझ्या घरी माझे आई-बाबा, माझी एक लहान बहीण, माझे दोन काका-काकी, त्यांची मुले आणि कधी कधी माझी आत्या आणि तिची फॅमिली ही राहायला येते घरी. एकंदर आमची जॉइन फॅमिली आहे”, मुग्धा म्हणाली.
“मस्त किती मजा करत असाल तुम्ही”, सिलू म्हणाला.
“हो, भरपूर. तुझे ऑफिस कुठे आहे? तू रोज माझ्या ट्रेनला असतोस न म्हणून विचारले”, मुग्धा म्हणाली.
“माझे ऑफिस टाऊन मध्ये आहे आणि मी तुझ्या नंतरची ट्रेन पकडतो.”, सिलू म्हणाला.
“सिलू, एक विचारू का तुला?” मुग्धा म्हणाली.
“विचार ना”, सिलू उद्गारला.
“तू नेहमी मी ट्रेनमध्ये चढेपर्यन्त मला एकटक का बघत असतोस?’, मुग्धा म्हणाली.
“मी. तुला बघतो.. नाहीतर .. पण मला एक सांग तुला कसे कळले की, मी तुला इतका निरखून बघतो ते म्हणजे तू पण??”, सिलूने मुग्धाला पेचात पाडले.
खूप वेळ समोरून काहीच मेसेज आला नाही.
तेव्हा सिलूने पुन्हा मेसेज केला, “आता बोल. आता का गप्प बसलीस.”
“ओके. आय अॅक्सेप्ट की, मी पण तुला बघते”, मुग्धा उत्तरली.
“का?”, सिलूने तिला अजून कोड्यात टाकले.
“सिलू आता तू झोप. आपले संभाषण काही संपणार नाही आणि बाकी सगळ्यांचे अॅन्सर उद्या देइन. सो आता बाय आणि गुड नाईट “, मुग्धाने प्रतीउत्तर दिले.

सिलूला जे समजायचे होते ते तो समजला आणि उद्याच्या दिवसाची वाट पाहत झोपी गेला. आज त्याचा इथल्या ऑफिसचा लास्ट डे होता. त्यामुळे आज त्याने अम्माने आणलेला नवीन शर्ट घातला होता. सिलू आज खूप हँडसम दिसत होता. अम्माने जाण्याआधी त्याची नजर ही काढली.

सिलू स्टेशनवर पोहोचला तर त्याला मुग्धा कुठेच दिसली नाही. सिलूची नजर तिलाच शोधत होती. इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. सिलू पहिला घाबरला आणि नंतर बघतो तर ती मुग्धा होती.

मुग्धा आज खूप सुंदर दिसत होती. तिने आज पिंकीश चुडीदार घातला होता आणि सिलू पण आज काही कमी दिसत नव्हता. काहीवेळ दोघेही देहभान विसरून एकमेकांत हरवली. पण एका व्यक्तीच्या धक्क्याने दोघेही भानावर आली आणि मग दोघेही हसू लागली. आज दोघांनाही ऑफिसमध्ये जाण्याचा मूड नव्हता. पण सिलूला आज ऑफिसला जाणे भाग होते म्हणून त्याने ईवनिंगला मुग्धाला कॉफीसाठी विचारले. तिनेही हो म्हटले. मग दोघेही आपापल्या कामाला निघून गेले.

सिलूचा ऑफिसमध्ये आज सत्कार झाला. त्याने त्याच्या सहकाऱ्यांना आज लंच पार्टी सुद्धा दिली. सर्वांकडून त्याला खूप शुभेच्छा मिळाल्या. ऑफिसमध्ये सगळ्यांचा निरोप घेऊन सिलू कॉफी शॉपकडे निघाला.

तिथे पोहचल्यावर पाहतो तर काय !! आपल्या मुग्धा मॅडम आधीच कॉफी शॉपच्या बाहेर सिलूची वाट पाहत उभ्या होत्या.
सिलू तर अगदी वेळेवर आला होता पण मुग्धाच वेळेआधी तिथे हजर होती.
वाह !! क्या प्यार है ||

दोघांची पण ही पहीली डेट होती. दोघांनी आपापल्या आवडत्या कॉफीची ऑर्डर दिली.
सिलूला त्याच्या अमेरिकेत जाण्याबद्दल मुग्धाला सांगायचे होते पण का कोणास ठाऊक त्याला मुग्धाबरोबरचा हा क्षण अजिबात खराब करायचा नव्हता. म्हणून त्याने तो टॉपिक काढलाच नाही.

तर इथे मुग्धाला सिलूची चलबिचल समजत होती. पण तिने त्याचा वेगळाच अर्थ काढला आणि तिने वेळ न घालवता चक्क सिलूला प्रपोज केले. यावर सिलूला काय रिअॅक्ट करावे हेच सुचत नव्हते.
पण सिलू खूप समजूतदार मुलगा होता आणि स्वार्थी तर तो मुळीच नव्हता. त्याने मुग्धाचा हात हातात घेतला आणि तिला त्याच्या अमेरिकेत बदली झाल्याबद्दल सांगितले आणि निदान २ वर्ष तरी तो लग्नाचा विचार करू शकत नाही हे ही सांगितले.

मग नंतर त्याने मुग्धाला पहिल्यांदा पाहिल्यापासून तो त्याच्या ऑफिसची बस असून सुद्धा कसा रोज ट्रेनने प्रवास करू लागला ती ही हकीकत सांगितली.
मुग्धा अमेरिकेत बदली झाली हे ऐकून प्रथम शॉक झाली पण नंतर सिलूची हकीकत ऐकल्यावर आपल्या नकळत इतके प्रेम करणार कोणी असू शकते असा विचार करून ती भावुक झाली.

सिलूने प्रथम तिला जवळ घेतले आणि म्हणाला, “मुग्धा माझं उत्तर हो आहे. पण तू पुढची २ वर्ष माझी वाट पाहू शकशील. तू याचा नीट विचार कर आणि तुझे उत्तर मला सांग. आपण २ दिवसणी परत इथेच भेटू. तुझे उत्तर काहीही असले तरी ते मला स्वीकार आहे.”

मग त्याने तिला घरी सोडले आणि मग तो स्वत:च्या घरी निघून गेला.

मुग्धाचं आज कशातच लक्ष लागत नव्हतं. तिला सिलूला रोज बघायची इतकी सवय झाली होती की, काही दिवसांनंतर तो प्रत्यक्षात इथे नसेल आणि ती रोज त्याला बघू शकणार नाही ही कल्पना सुद्धा तिला सहन होत नव्हती.

तिला तो दिवस आठवला जेव्हा तिने प्रथम सिलूला पाहिले होते. फॉर्मल ब्ल्यू शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट मध्ये तो कसला हँडसम दिसत होता. नंतर नंतर तर तिला कळले की, तो ही तिला बघतोय ते. पण त्याच्याशी बोलण्याची योग्य संधी तिला मिळत नव्हती. पण ती संधीही जणू चालून आली जेव्हा तिची मैत्रीण उमा चक्कर येऊन पडली त्यावेळेला सिलूने च तर तिला मदत केली होती. त्यावेळेला ला ही मुग्धा पूर्णवेळ सिलूलाच बघत होती पण त्याच्या नकळत.

आणि मग तो पावसाचा दिवस आणि धावत जाऊन सिलूला मारलेली मिठी. तो क्षण जेव्हा केव्हा ती आठवत असे तेव्हा ती रोमांचित होत असे. काही दिवसात तिला सिलूचा नंबर ही मिळाला होता आणि आज.. आज तर चक्क तिने सिलूला प्रपोज केले होते.

किती रोमॅंटिक आहे न हे सगळं!!

पण सिलू तर काही दिवसांनी कायमचा अमेरिकेत जाणार? तिला हा विचार सध्या तरी नको होता. म्हणून तिने वेळ घालवण्यासाठी रेडियोवर एक रॅनडम गाण लावलं.
♫ ♫ मुझे एक पल चैन न आये
सजना तेरे बिना सजना तेरे बिना
मेरे दिल को कुछ नहीं भाये
सजना तेरे बिना सजना तेरे बिना ♫ ♫

क्रमश:

(मुग्धा सिलूला काय उत्तर देईल? हे तुम्हाला लवकरच कळेल. तोपर्यंत हा भाग आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा)

धन्यवाद
@preetisawantdalvi