Diwana dil kho gaya - Part 4 in Marathi Love Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | दिवाना दिल खो गया (भाग ४)

दिवाना दिल खो गया (भाग ४)

सिलूचे हे पुढचे चार दिवस भलतेच व्यस्त जाणार होते. त्याला त्याच्या बॅगेत सध्या तरी गरजेचे सर्व सामान भरणे आवश्यक होते.

कारण कंपनी पॉलिसीनुसार पुढचे २ वर्ष तरी सिलूला भारतात येता येणार नव्हते आणि तशीच काही एमर्जन्सि आली तर त्याला स्वत:च्या खर्चाने येण्या-जाण्याचा प्रवास करावा लागणार होता.

आज त्याचे मामा-मामी त्याला शुभेच्छा द्यायला घरी आले होते. आज अम्माने जेवणासाठी खास बेत केला होता. जेवण आटोपल्यावर सगळे गप्पागोष्टी करायला बसले. थोडावेळ झाल्यावर सिलूने मामा-मामीचा आशीर्वाद घेऊन त्यांचा निरोप घेतला आणि मग तो त्याच्या खोलीत आराम करायला गेला.

त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि मेसेज बॉक्स ओपन केला व तो मुग्धाबरोबर केलेला पहिला संवाद वाचू लागला. तो वाचता वाचता मनोमनी हसत होता. तो विचार करीत होता की, ज्या मुलीला तो इतके दिवस न्याहळत होता. तिच्याशी एक शब्द बोलता यावा ह्यासाठी तरसत होता. त्याच मुलीने त्याला चक्क प्रपोस केले होते. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण तर होते पण ही सत्य परिस्थिती होती.

पण राहून राहून त्याला उद्या मुग्धा काय उत्तर देणार याची चिंता वाटत होती. त्याला हे माहीत होते की, कोणतीही मुलगी अशा मुलासाठी का थांबेल, जो २ वर्ष साता-समुद्रा पलीकडे असेल. ज्याच्याशी फक्त फोनवर बघता-बोलता येईल पण त्याला प्रत्यक्ष भेटता येणार नाही.

ह्या गोष्ठी बोलताना जरी सोप्या वाटल्या तरी त्या जो अनुभवतो त्याचे त्यालाच माहीत!!

प्रेमामध्ये पण किती इमोशन असतात ना. तुम्ही पण हे कधीतरी नक्की अनुभवले असणार. म्हणजे बघा ना, कधी कधी आपल्याभोवती सगळेजण असतात, तरी त्या एका खास व्यक्तीची उणीव तुम्हाला नेहमी भासते. प्रत्येक सुख-दु:खात त्या व्यक्तीने तुमच्या आसपास असावे असे वाटत राहते. तर कधी कधी त्या व्यक्तीला किती बघितले तरी मन भरत नाही. तर कधी त्या आपल्या वाटणाऱ्या व्यक्तीबरोबर एकांत हवाहवासा वाटतो. तर कधी किती बोलले तरी अजून बोलावेसे वाटते. असे वाटते की हे बोलणे कधी संपूच नये.

पण तो व्यक्ति आपल्या आसपास तर असतो. कधीतरी आपण त्याला भेटू तरी शकतो. पण सिलू-मुग्धाच्या बाबतीत ते पण शक्य नाही. जर एखादा चमत्कार झाला तर......हे नक्की शक्य होईल ना.

पण एक मिनिट त्यासाठी ही मूवी नाहीये. ही तर एक असामान्य अशी प्रेमकहाणी आहे. सिलू आणि मुग्धाची.

सिलू आणि मुग्धा दोघेही कॉफी शॉपमध्ये भेटले. त्यांनी आपापली आवडती कॉफी मागवली. आज त्यांची ही प्रत्यक्षातली शेवटची भेट होती. आता जर मुग्धाचं उत्तर हो असेल तर ते २ वर्षानी पुन्हा भेटणार होते. काहीवेळ दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन बसले होते.

काहीवेळानंतर मुग्धाने एक कागद सिलूला दिला. सिलूने तो उघडला आणि त्याला मुग्धाचे उत्तर मिळाले.

माहीत आहे त्यामध्ये काय लिहिले होते.

Dear Silu,

Though we’re apart, You’re in my heart.

Sweet memories….Keep haunting me,

And deep in my soul, I know you’re mine,

And my heart Belongs To you. (Your love & life, Mugdha)

प्रिय सिलू,

जरी आपण वेगळे असलो, तरी तू माझ्या हृदयात आहेस. तुझ्या गोड आठवणी मला नेहमी त्रास देत असतात आणि माझ्या अंतर्मनात खोलवर, मला माहित आहे की, तू फक्त माझा आहेस, आणि माझे

हृदय तुझ्याशी जोडलेले आहे.

(तुझे प्रेम आणि तुझे जीवन मुग्धा)

सिलूला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने अॅस्पेक्ट केले नव्हते की, मुग्धा त्याला हो म्हणेल. तो कागद वाचल्यावर सिलूच्या डोळ्यात टचकण पाणी आले. त्याने मुग्धाला घट्ट मिठी मारली. दोघांनाही तो क्षण त्यांच्या आठवणीत साचवून ठेवायचा होता. ती दोघं एकमेकांत इतकी अखंड बुडाली होती की, त्यांना ते असलेल्या जागेचा सुद्धा विसर पडला होता. असाच काही वेळ गेला आणि मग ती दोघ भानावर आली.

सिलूला मुग्धाला काय म्हणावे तेच कळत नव्हते. २ वर्षांचा विरह काही सोपी गोष्ट नव्हती. सिलूने मनात विचार केला की, पुन्हा एकदा मुग्धाला याबाबत विचार करायला सांगावे.
पण आजचा पूर्ण दिवस दोघांनी एकमेकांबरोबर घालवायचा ठरविल्यामुळे आज तरी त्याला तिचा हिरमोड करायचा नव्हता. मुग्धा आज खूप खुश होती. तिला जास्तीतजास्त वेळ सिलू बरोबर घालवायचा होता. ती दोघे तिथून चौपाटीवर फिरायला गेले. तिथे त्यांना हवा तसा एकांत मिळाला. प्रथम दोघे किनाऱ्यावर मनसोक्त फिरले आणि मग एक आडोसा बघून तिथे बसले आणि फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आनंद अनुभवू लागले.

“सिलू, किती छान वाटतय न इथे. असे वाटतंय की, इथे फक्त तू, मी आणि हा अथांग समुद्र आहे.”, मुग्धा म्हणाली.
“हो मुग्धा, मला तर ही वेळ इथेच थांबावी आणि तू अशीच कायमची माझ्याजवळ असावीस असे वाटतंय” मुग्धाला जवळ घेत सिलू म्हणाला.
“मी तुझ्या जवळच तर आहे सिलू आणि कायम राहीन. आता तर मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार ही करू शकत नाही. तुझ्यासाठी २ वर्ष काय मी आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे”, मुग्धा म्हणाली.
“मुग्धा, इतके पण प्रेम करू नकोस ग. मला ते सांभाळता नाही आले तर.”, सिलू म्हणाला.
“सिलू, असे नको बोलूस्. मला माहीत आहे तू ते नक्की सांभाळशील. मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर”, मुग्धा म्हणाली.
सिलू तिच्याकडे पाहतच राहिला.
“हे सगळे जाऊदेत. तुझी पॅकिंग झाली का सगळी? उद्या कधी निघणार आहेस? तिथे राहायची, जेवणाची काही सोय आहे की नाही? तू मला हे काहीच नाही सांगितलंयस”, मुग्धा म्हणाली.
“अगं, राहायची, जेवणाची सगळी सोय कंपनी करणार आहे. सो, सध्यातरी नो टेंशन. पण टेंशन एकाच गोष्टीच आलंय की, अम्मा-अप्पा पासून इतक्या दूर ते पण एका परक्या देशात मी कसा सर्वाइव करेन आणि आता तर तू पण अॅड झाली आहेस. मी कधी एकटा कुठेच नाही राहिलो ग”, सिलू म्हणाला.
“मग नको जाऊस. इथेच रहा”, मुग्धा म्हणाली.
“हे माझ्या हातात असतं तर मी नक्की निर्णय घेतला असता पण मी कंपनीचे कॉंट्रॅक्ट साईन केले आहे त्यामुळे आता तरी मी मागे नाही फिरू शकत ग”, सिलू म्हणाला.
“रोज मला कॉल आणि मेसेज करायला विसरू नकोस आणि वेळ नाही मिळाला तर स्वत:चा व्हिडिओ काढून तो मेल कर. सिलू, आय विल मिस यू ईच अँड एव्री मोमेंट. लव यू सिलू”, असे म्हणत मुग्धाने स्वत:चे ओठ सिलूच्या ओठांवर टेकविले.
यावेळी दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते.

सिलूने वेळेवर मुग्धाला घरी सोडले आणि तिचा जड अंत:करणाने निरोप घेतला. सिलूने तिला निघण्याची वेळ मेसेज करतो असेही सांगितले.

दुसऱ्या दिवशी दिवसभर सिलू घरीच होता. आज दुपारी तर तो चक्क अम्माच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. अप्पा ही त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होते. सिलूसाठी त्याचे अम्मा-अप्पा हेच सगळं जग होते आणि आता मुग्धा ही अॅड झाली होती. संध्याकाळी त्याचे जवळचे मित्र त्याला निरोप द्यायला घरी आले होते. त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता कधी वेळ निघून गेला हे कळलेच नाही. सिलूची पहाटे ४ वाजता ची फ्लाइट होती आणि त्याला घरातून २ वाजता निघायचे होते. अप्पा आणि त्याचा जवळचा मित्र साहील त्याला सोडायला एयरपोर्टवर येणार होते.

सिलूने मुग्धाला मेसेज करून त्याच्या फ्लाइट डिटेल्स पाठविल्या. मुग्धा कदाचित त्याच्या मेसेजची वाट बघत होती. तिने लगेच तो रीड केला आणि “हॅप्पी अँड सेफ जर्नी सिलू.” असा रिटर्न मेसेज सिलूला पाठविला.
मग सिलूने २ हार्ट आणि किस् चा इमोजी असलेला मेसेज मुग्धाला रिटर्न सेंड केला.

सिलूला जाण्याआधी एकदा तरी मुग्धाला भेटण्याची खूप इच्छा होती. पण त्याला माहीत होतं की हे शक्य नाही. साहीलला काही कारणांमुळे एयरपोर्टला येणे शक्य नव्हते. त्याने फोन करून तसे सिलूला कळविले. म्हणून मग सिलूने त्याच्या अप्पाला एयरपोर्टवर येऊ नये असे सुचविले. कारण अप्पा एकटे आले तर मग तो जाण्याची हिम्मत एकवटू शकणार नाही हे त्याला माहीत होते. अप्पाला ही ते पटले कारण त्यांनाही सिलूला असे जाताना बघणे कठीण जाणार होते.

सिलू अम्मा-आप्पांचा निरोप घेऊन एयरपोर्टच्या दिशेने निघाला. त्याच्या अम्मा-अप्पाने ही हसत हसत त्याला निरोप दिला.

सिलूने सामान गाडीत भरले आणि मग सिलू एयरपोर्टच्या दिशेने निघाला. इंटरनॅशनल एयरपोर्टवर गाडी पोहचल्यावर ट्रॉलीमध्ये त्याने समान भरले आणि तो आत जाणार इतक्यात त्याला कोणीतरी जोरात हाक मारली.

सिलूने पाठी वळून बघितले तर तिथे मुग्धा होती. मुग्धाला असे अचानक बघून सिलू आधी आश्चर्यचकित झाला आणि मग त्याने पाहिले की, तिला साहील एयरपोर्टवर घेऊन आला होता. सिलूला आता साहीलचे महत्वाचे काय काम होते ते कळले. त्याने साहीलचे खुणेनेच आभार मानले.

मुग्धाने सिलूला गच्च मिठी मारली. सिलूला तो क्षण डोळ्यात भरून ठेवायचा होता. मुग्धाने सिलूला मनभरून बघून घेतले त्याला भरपूर किस् केले. ती अजिबात रडली नाही कारण तिला सिलूला वीक करायचे नव्हते. सिलू खरंच खूप खुश झाला.

सिलू आनंदाने एयरपोर्टच्या आत शिरला आणि मुग्धा आणि साहीलला त्याने निरोप दिला.
आणि कोणाचीही पर्वा न करता जोरात ओरडला, “आय लव यू टू मुग्धा.”

सिलू लॉबीमध्ये त्याच्या फ्लाइटची वाट बघत बसला होता. त्याने वेळ जायला म्हणून एक रॅंडम सॉन्ग मोबाइलवर लावले आणि ते ऐकताच तो मुग्धाच्या आठवणीत रमून गेला.
♬♬ये क्या हुआ कुछ पता ना चला
क्यूँ हादसा बन गया सिलसिला
टुकड़ो में तुम थे, टुकड़ो में मैं भी
टुकड़े बने तो हम बने
ये दिल ज़िन्दगी से खफ़ा हो चला था
जिसे फिर से जीने के बहाने तुम बने♬♬

क्रमश:

(सिलू आणि मुग्धाची लवस्टोरी अशीच सुरू राहील. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा आणि हो, हा भाग आवडला तर ह्या भागाला लाइक आणि शेअर नक्की करा)

धन्यवाद

@preetisawantdalvi

Rate & Review

uttam parit

uttam parit 2 years ago

Manali Sawant

Manali Sawant 2 years ago

jayesh zomate

jayesh zomate Matrubharti Verified 2 years ago

Anjali Shinde

Anjali Shinde 2 years ago

छान स्टोरी मॅम.... पण पुढील पार्ट लवकर पाठवा 😊

Dnyanu

Dnyanu 2 years ago