marriage Journey - 7 in Marathi Love Stories by सागर भालेकर books and stories PDF | लग्नप्रवास - 7

लग्नप्रवास - 7

लग्नप्रवास- ७

दर्शन झाल्यानंतर दोघेही गाडीत बसले. तेव्हा दोघांनाही जोराची भूक लागली होती. म्हणून रोहनने ड्रायव्हरला सांगितले, की गाडी एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबव. ड्रायव्हरने लगेच गाडी तारा पलेस म्हणून हॉटेलमध्ये थांबवली. दोघांनीही मेजवानीचा आनंद घेतला. आनंद घेत असताना रोहनला एक खूप जुनी गोष्टी आठवली. एकदा तो असाच मित्राबरोबर हॉटेलला गेला होता.आणि तो त्याचे पाकीट पण विसरला होता. सगळ्यांनी भरपूर जेवायला मागवले होते. परंतु कोणाकडेच एवढे पैसे नव्हते. तेव्हा तो व त्याच्या मित्रांना भांडी घासायला लागले होते. ह्या गोष्टीवरून रोहन आणि प्रीती खूप हसले.
रोहन : जेवण खुपचं सुंदर होत ना?
प्रीती : हो, खरच. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जर आपण गेलो तर काहीना काही विविधता आढळतेच.
रोहन: ते, खरच आहे.महाबळेश्वरची खासियत म्हणजे स्ट्रॉबेरी. इकडे जागोजागी तुला स्ट्रॉबेरी दिसेल. ह्या लोकाचा मुख्य उपजीविकेचा साधन टुरिझम आहे.
प्रीती: हो, आणि किती उंचावर आहे महाबळेश्वर. आणि थंडी ती पण किती?
दोघांना समजलेच नाही, की गप्पाच्या ओघात त्यांच्या जेवणच bill सुद्धा आल.
जेवण करून आता दोघेही परत गाडीत बसले. आता त्यांना फिरायच होत महाबळश्वरमधील मार्केट. अर्ध्या तासाने गाडी मार्केटमध्ये येऊन थांबली. ड्रायव्हरने रोहनला सांगितले तुम्ही मार्केट फिरून २ तासाच्या आत ह्याच जागेवर मला भेटा. मी नाही दिसलो तर मला फोन करा. हा घ्या माझा नंबर.
रोहन: ठीक आहे.
आणि दोघेही निघाले मार्केटच्या दिशेने. मार्केट खूप मोठ असल्याकारणाने रोहनने प्रीतीला आधीच सांगितलं, दोघांनीही एकत्र राहायचं. दोघांनीही एकमेकांना सोडून जायचं नाही.
प्रीती: हो, समजलं. इकडची स्ट्रॉबेरी चांगली आणि छान लागते, म्हणून आईने स्ट्रॉबेरी आणण्यास सांगितले आहे. आई कडे एक पाकीट, मामा, काका एक एक पाकीट.
रोहन आणि प्रीती दोघेही खूप खुश होते. honeymoon ला आल्यामुळे त्यांना त्याच्या मनासारखे वागायला मिळत होते.
दोघेही रस्त्याच्या बाजूला दुतर्फा बघत चालत होते. मार्केट मध्ये आत जाण्यासाठी एक मोठा गेट होता, त्या गेटवर त्या दोघांनाही खूप फोटो काढले. ते दोघेही स्ट्रॉबेरीेचा ज्यूस प्यायले. आणि सगळ्यासाठी स्ट्रॉबेरी पण त्यांनी घेतली.

लग्न हे माझ्यासाठी नसेल फक्त

त्या तीन अक्षरांचे बंध,

अग्नीच्या साक्षीने घेतलेले

जन्मोजन्मीचे ऋणानुबंध.

नसेल त्यात फक्त सहवास वासनेचा

असेल गोडवा प्रेमाचा,

स्नेहाचा आणि घराच्या घरपणाचा..

नसतील कुठलीच बंधने

असेल श्वास मोकळ्या मनाचा,

सुख दुःख येतील नव्याने

ध्यास सोबती येऊन लढण्याचा...

घेऊन अर्धागिनीस सोबती

जाईल स्वप्नांच्या गावी,

सोबत नसतील कोणी तेव्हा

साथ मात्र तिची हवी....

नवीन अश्या या सोबतीचा

प्रीती बंध कायम राहावा,

साथ आणि आशीर्वाद

फक्त तुमचाच हवा.....

सूर्य मावळताना दिसत होता.सगळीकडे अंधार पडायची सुरुवात होत होती. पण प्रीतीला मात्र महाबळेश्वरला येण्याअगोदर नातेवाईकांनी भली मोठी लिस्ट दिली होती. रोहन आणि प्रीती दोघेही खूप आनंदात होते. हनिमून काळात त्या दोघांनाही आपल्या मनासारखे वागता येत होते. प्रीती आणि रोहन खूप दुकानात फिरले. पण ज्या ज्या दुकानात ते फिरले तिकडे प्रीती काहींना काही खराबी दाखवतच होती. पण रोहन मात्र चांगला कंटाळला होता. त्याला असं वाटत होत की, कधी एकदाचा हॉटेलवर जातोय आणि झोपतोय असं वाटत होत. पण प्रीतीच्या पुढे त्याच काही एक चाललं नाही. शेवटी रोहनने प्रीतीला सांगितले, मी इथेच थांबतो, तू शॉपिंग करून ये. मी तुझी वाट बघतो आणि हो जास्त लांब जाऊ नकोस. पण प्रीतीने मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. ती आपल्याच धुंदीत चालत होती. अखेरीस तिने रोहनच न ऐकताच पुढे निघून गेली.तिला जणू सर्व स्वप्नच वाटत होत.

एक स्वप्न ते हरवलेले,

तुझी वाट बघत बसायचे.

एक स्वप्न ते हरवलेले,

तुझा हसरा चेहरा डोळ्यांत साठवायचा..

एक स्वप्न ते हरवलेले,

तुझ्या सोबत चांदण्या रात्री फिरायचे...

एक स्वप्न ते हरवलेले,

तुझेच स्वप्न बघायचे....

बराच वेळाने प्रीती एका दुकानात शिरली. आणि तिने आपल्या आईसाठी साडी, वडिलांसाठी सफारी, बहिणीसाठी पंजाबी ड्रेस आणि भावासाठी शर्ट आणि पॅन्ट. आणि आपल्या प्रिय लाडक्या नवऱ्यासाठी tshirt घेतला. प्रीती दुकानाच्या बाहेरपडता क्षणीच तिचा मोबाईल switch off झाला. आता मात्र प्रीतीला समजत नव्हते काय करावे ते. त्यात रोहन कुठे थांबला आहे हे ही ती विसरली होती. इथे रोहनही चिंतेत होता. प्रीती अजून आली कशी नाही. रस्ता तर चुकली नसेल ना ती? असे नानाप्रकारच्या प्रश्नांनानि त्याच्या डोक्यात थैमान घातले होते. तो स्वतःला अपराधीची उपमा देत होता. त्याच मन सारखं खात होत ह्या गोष्टीने कि का त्याने प्रीतीला एकटं सोडलं. तिच्यासाठी हे नवीन शहर आहे. आणि इथल्या रस्त्याची आणि माणसाची तिला सवय नाही आहे. ह्या विचाराने तो खूप वैतागला होता आणि मनातून त्याला भीतीही वाटत होती.बराच वेळ वाट पहिली आणि नंतर तो तिला शोधण्यास पुढे गेला. पण प्रीतीचा काही थांगपत्ता लागत नव्हता. म्हणून त्याने परतीची वाट पकडली. थोडयावेळाने तो पार्किंग स्लॉट मध्ये आला. आणि गाडीपाशी आला.

ड्राइवर: साहेब, मॅडम नाही आल्या का?

रोहन: रोहन ह्या प्रश्नाने एकदम गोंधळून गेला. त्याला समजत नव्हते काय करायचे ते. पण परक्या शहरात कोणीच आपले ओळखीचे नसल्यामुळे रोहनने ड्रायव्हरला सर्व सांगितले. आणि ढसाढसा रडू लागला. स्वतःला अपराधीची भावना देत होत होता.

का? कुणास ठाऊक काय झाले आहे

आज तुझी आठवण सारखी येत आहे

आपल्या प्रेमाचा प्रत्येक क्षण ......

का? कुणास ठाऊक आज माझ्या डोळ्यात वाहत आहे

आज डोळयांनाही काय झाले आहे

ते हि आज वेड्यागत वागत आहे

की.. तू जवळ नसण्याचे

दुःख मला सांगत आहे

किती छान झाले असते

जर वेळेला मागे नेता आले असते तर

जर घड्याळाची काटे उलटी

फिरवता आली असती तर

जर तुला वेळेत बांधता आले असते तर....

मी ही वेडा झालो आहे

मी काय बोलतो मलाच कळत नाही

पण हे खरं आहे तुझ्याशिवाय

मी हे आयुष्य धरतच नाही

का? कुणास ठाऊक.....

ड्राइवर: साहेब, आपण पोलीस मध्ये तक्रार नोंदूया. पोलीस नक्कीच बाईसाहेबाना शोधून काढतील. विश्वास ठेवा.

रोहन: हो, बरोबर आहे तुझं.

दोघेही ताबडतोब पोलीस स्टेशनच्या दिशेने गाडी वळवतात.

रोहन: साहेब माझी बायको हरवली आहे.

इन्स्पेक्टर: कुठे? नुसती बायको हरवली आहे. ह्या तुमच्या एका वाक्यावर आम्हला समजणार आहे का? मुद्द्याचं बोला. नक्की कुठे हरवली आहे. सविस्तर सांगा.

ड्राइवर: हो,साहेब. मी सांगतो तुम्हला. मी दीपेश. त्याचा टूर गाईड. हे दोघेही मुंबई मधून इथे हनिमूनला आले आहेत. मी संध्याकाळी त्याना मार्केट मध्ये सोडले. तिथून बाईसाहेब परत आल्याचं नाही. कृपया करून तुम्ही शोधून काढा इन्स्पेक्टर साहेब.

इन्स्पेक्टर: तुमच्या बायकोचा फोटो वैगरे आहे का?

रोहन: हो. आहे साहेब. हा घ्या. इन्स्पेक्टर साहेब. कृपया करून माझ्या बायकोला शोधा. ती ह्या शहरात नवीन आहे. आणि खूप साधी भोळी आहे. मला खूप काळजी वाटते आहे तिची. का मी ही तिच्याबरोबर गेलो नाही. तिला का मी एकट सोडलं.

इन्स्पेक्टर: ह्या गोष्टीचा विचार आधी करायला पाहिजे होता. माझ्यावतीने जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करू. आम्ही तुमच्या बायकोला शोधण्याचा प्रयत्न करू.

रोहन: ठीक आहे.

हताश होऊन रोहनला ड्राइवर हॉटेलवर सोडतो. रोहनच्या चेहऱयावर निराशेचे भाव उमटताना दिसत होते. कोणाचा फोन आला तर सांगणार तरी काय. हा प्रश्न त्याला सारखा उद्भवत होता. तो स्वतःला ह्या संपूर्णपणे आरोपी मानत होता. तो सारखा प्रीतीच्या आणि त्याच्या आठवणींना उजाळा देत होता. आणि मध्येच हा प्रसंग आठवला की, ढसाढसा रडायचा. त्याच्या मनात ह्या सर्व गोष्टी साठल्या होत्या. पण त्याला ह्या सर्व गोष्टी कोणापुढे तरी सांगायच्या होत्या आणि स्वतःचे मन हलके करायचे होते. रोहनने ह्या सर्व गोष्टी त्याचा बालपणीचा मित्र संदेश ह्याला सांगितल्या. प्रथम तो खूप त्याच्यावर रागावला पण नंतर त्याने त्याची समजूत काढली. हळूहळू रोहनला धीर आला.

आता पुढे काय होणार प्रीती परत रोहनला भेटेल का. तिला पोलीस शोधतील का? ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा भाग बघावा लागेल. आजचा भाग कसा वाटला मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तो पर्यंत भेटू पुढील भागात. तो पर्यंत थांबतो.

Rate & Review

I M

I M 11 months ago

सागर भालेकर