Saptpadi - 6 in Marathi Love Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 6

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 6

विक्रांत घरी आला तसे सुरेखा मावशी बोलल्या साहेब जरा थांबा . काय झाले मावशी तो विचारत होता तितक्यात मावशी आरतीच ताट घेवून आल्या विक्रांत चे औक्षण करायला. मावशी माझा विश्वास नाही या सगळ्या वर . माझ आणि देवाच कधी पटले नाही. असु दे ख़ुप मोठ्या अपघातातून सुखरूप बाहेर आलात ही त्या देवाचीच कृपा आता वहिनी साहेब असत्या तर त्यांनी पण हेच केले असते. विकी असु दे तुच म्हणतो ना कि कोणाच्या भावना दुखवू नयेत. संदीप म्हणाला. मग विक्रांत ने औक्षण करून घेतले. गीतु ची ख़ुप आठवण झाली त्याला. तो रूम मध्ये आला .सगळीकडे संयोगीता च्या आठवणी होत्या.संयोगीता त्याच्या आयुष्यात आली आणि त्याच जगच बदलून गेलं होतं. त्याच्या आयुष्यात प्रेमाची असणारी कमतरता संयोगीता च्या प्रेमाने भरून निघाली होती. विकी जास्त विचार नको करू आराम कर . संदीप त्याच्या रूम मध्ये येत म्हणाला. नाही सँडी पण गितु चा विचार मनातून जात नाही तिला काहीच आठवले नाही तर मी कसा जगू तिच्या शिवाय? आणि पुन्हा ती मल्हार च्या प्रेमात पडली तर? विकी असा निगेटिव्ह विचार तू कधी पासून करायला लागलास. सगळं नीट होईल तू असाच विचार करत बसणार असशील तर मी इथेच थांबतो तुझ्या जवळ. तू काही स्वतः ची काळजी घेणार नाहीस. अस काही नाही सँडी पण जे खर आहे त्या पासून दूर तरी कसा जाऊ. विकी आपण प्रयत्न करू संयोगीता ला सगळं आठवेल तुझा तुज्या प्रेमा वर विश्वास नाही का? पण सँडी गितु ने माझ्या सोबत वेळ घालवायला हवा तरच काही तरी होप आपण ठेवू शकू. हो विकी संयोगीता राहील तुझ्या सोबत तिच्या आई ने पण सांगितले ना तिला की तुमचे लग्न झाले आहे तेव्हा तिला ही हे जाणून घ्यावेसे वाटणार की नाही. मल्हार सोबत राहून तिला घडून गेलल्या गोष्टी आठवतील सुद्धा मग तर तुला ओळखेल की नाही?अस झाले तर बरेच होईल सँडी. विकी आता तू आराम कर आपण संध्याकाळी हॉस्पिटल ला जाऊ संदीप म्हणाला. शाम ला विक्रांत ला वेळेवर जेवण आणि मेडिसिन द्यायला सांगून संदीप त्याच्या घरी आला. विक्रांत ने जेवण केले. औषधे घेतली आणि बेडवर पडला डोळे बंद केले तसा संयोगीता चा चेहरा नजरे समोर येऊ लागला. आता गितु सोबत मल्हार असेल का? मल्हार तिच्याशी कसा वागेल? गितु शी मिस बीहेव्ह तर नाही ना करणार? मी त्याला मागे खूप बोललो होतो एव्हन त्याला मारायला ही गेलो होतो त्याचा आता तो बदला तर नाही ना घेणार? आयती संधी त्याला मिळाली आहे आणि गितु ही त्याला ओळखते अस कस नियती आपली परीक्षा घेत आहे असे बरेच विचार विक्रांत च्या मनात येत राहिले. त्यातच कधी तरी त्याला औषधा मुळे झोप लागून गेली. संध्याकाळी तो उठला शाम त्याने शाम ला आवाज दिला. तसा शाम त्याच्या कडे आला. काय साहेब ? मावशी ना सांग मला स्ट्रॉंग चहा ठेवायला आणि तू गाडी काढ आपण हॉस्पिटल ला जाणार आहोत. हो साहेब म्हणत शाम गेला. विक्रांत फ्रेश होऊन चहा घ्यायला आला. चहा बघून त्याला संयोगीता ची आठवण आली विक इतका स्ट्रॉंग चहा नको घेऊ चांगला नसतो अस ती दरवेळी सांगत असे पण याला असाच चहा लागायचा तिला मात्र कॉफी जास्त आवडायची. तो शान्त बसलेला बघून मावशी म्हणाल्या,साहेब वहिनी साहेबांची आठवण येते का? हो मावशी तिच्या शिवाय हे घर सूनसून वाटत आहे. सगळं घर तिच्या मना सारखे सजवले होते तिने. गेली दोन वर्षे या घराला ही तिची सवय झाली आहे. नका काळजी करू साहेब वहिनी साहेब बऱ्या होतील . देव आहे या जगात विश्वास ठेवा तुम्ही. मावशी देव असता तर असा इतका निष्ठुर वागला नसता माझ्या सोबत आणि गितु तर खूप विश्वास ठेवायची ना देवावर मग तरी तिच्या बाबतीत अस का घडलं? साहेब काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती नसतात पण त्याची उत्तरे त्या भगवंताला आधीच माहिती असतात. फक्त आपली ती वेळ आली की मग आपल्या समोर येतात. मावशी दहावी पर्यंत शिकलेल्या पण खूप समंजस,कष्टाळू विक्रांत कडे गेली दहा वर्षे काम करत होत्या जणू त्या घरातील एक सदस्य झाल्या होत्या. विक्रांत ची काळजी स्वतःच्या मुला सारखे घेत होत्या त्यांना ही हक्काचे अस कोणी नवहते. विक्रांत ज्या अनाथाश्रमात होता तिथेच सुरेखा मावशी काम करत होत्या. जेव्हा विक्रांत सेटल झाला तेव्हा त्यानेच मावशी ना आपल्या घरी घेऊन जाणार असे सांगितले होते. तो ही त्यांना आई सारखा रिस्पेकट देत असे. विक्रांत त्यांना म्हणत असे की मला साहेब नका म्हणू पण त्या ऐकत नवहत्या .पण विक्रांत वर खूप जीव होता त्यांचा. विक्रांत च्या अपघाताची बातमी समजली तेव्हा त्या देव पाण्यात ठेवून बसल्या होत्या. अखंड जप त्यांनी केला होता.देवाने त्यांचे गाऱ्हाणे ऐकले होते आणि विक्रांत आणि संयोगीता मृत्यूच्या तावडीतून सही सलामत बाहेर आले होते. संयोगीता वर ही मावशी चा जीव होता. लग्ना आधी संयोगीता विक्रांत कडे यायची तेव्हाच मावशीना ती खूप आवडली होती. संयु म्हणाली होती मावशी आमचे लग्न झाले तरी सुद्धा तुम्ही कायम आमच्या सोबत राहणार आहात. आम्हाला सोडून कुठे जायचे नाही तेव्हा मावशी बोलल्या होत्या मी जायचे म्हणाले तरी साहेब मला जाऊ देणार नाहीत. हो मावशी तुम्ही हव्या आहात आम्हाला. आता ही मावशींना संयोगीताचे बोलणे आठवत होते. विक्रांत आणि संयोगीता च्या चांगल्या संसाराला कोणाची नजर लागली देव जाणे. सगळं सुरळीत सुरू असताना हे अचानक काय होऊन बसले. वहिनी साहेबां शिवाय साहेब कसे राहतील आणि कोण तो मल्हार का यांच्या आयुष्यात आला असा मावशी ही विचारात मग्न होत्या.मावशी मला सुद्धा चहा हवा म्हणत संदीप घरात आला होता. हो बसा देते म्हणत मावशी चहा आणायला किचन कडे गेल्या. विकी कसे वाटते आता त्याने विचारले. आय एम फाईन. तू चहा घे मग आपण हॉस्पिटल कडे जाऊ विक्रांत म्हणाला.

क्रमश कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंट करा.


Rate & Review

Dr Archana Singh
Share