Rutu Badalat jaati - 8 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..8




ऋतू बदलत जाती...८


राजकुमार राघवेंद्र नुकतेच एक लढाई जिंकून परत आले होते. सकाळी त्यांचे जंगी स्वागत झाल्यावर ,संध्याकाळी होत असलेल्या पारिवारिक वार्तालापात त्यांच्या पिताश्रींनी त्यांना ठणकावून सांगितले...


"आम्हाला विचार करण्यास थोडासा वेळ द्यावा..."राघवेंद्र.


"तुमच्याकडे एक मास आहे... विचार करून कळवा..."महाराज.


***


आता पुढे...


असाच आठवडा निघून गेला ,अजूनही राघवेंद्र ने काही निर्णय घेतला नव्हता, ना त्या राजकुमारींचे चित्र बघितले होते, ज्यांची स्थळे त्यांना आली होती.


तेव्हाच एक शिपाई त्यांच्या कक्षात वर्दी देऊन गेला.


"युवराज तुमच्यासाठी सोमगडचा एक हेर एक संदेश घेवून आला आहे ..."शिपाई.


"पाठवा त्याला आत... "राघवेंद्र ला वाटत होते, कदाचित जानकिचा काही संदेश असेल .तो घाईत कक्षामध्ये येरझाऱ्या घालत होता.


गुप्तहेर आला .त्याने वाकून युवराज समोर मुजरा केला.


" युवराज सोमगडच्या राजकुमारी वैदेही कडून तुमच्या साठी एक संदेश आहे.."हेर.


"राजकुमारी वैदेही..?हा बोला.."राघवेंद्र.


"त्या तुम्हाला भेटू इच्छितात ,प्रधान कन्या जानकी विषयी त्यांना तुमच्याशी काही बोलायचे आहे.. जर तुम्हाला मान्य असेल.. तर सोनगड आणि सोमगडच्या मध्ये जे महादेवाचे मंदिर आहे... तेथे उद्या सकाळी राजकुमारी तुम्हाला भेटू इच्छितात... तुमचा होकार किंवा नकार मी त्यांना कळवतो.. " हेर


राघवेंद्र ने थोडा वेळ विचार केला ."जानकी विषय काय बोलायचे असेल त्यांना... कदाचित जानकीने त्यांना सर्व सांगितले असेल".


"ठीक आहे ..मी भेटायला तयार आहे.. "राघवेंद्र.


तो हेर संदेश देऊन राजमहाला बाहेर पडला, आणि त्याने वैदेहीला युवराजांचा संदेश कळवला.


ठरल्याप्रमाणे वैदेही आणि राघवेंद्र अगदी पहाटे त्या टेकडीवरच्या महादेवाच्या मंदिरात भेटले. त्यांच्या सोबत कुणीही नव्हते.


दोघांनी आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले ,आणि मग बाहेर येऊन एका झाडाखाली बसले.


"हा बोला राजकुमारी वैदेही ..तुम्हाला आमच्याशी काय बोलायचे होते...?"राघवेंद्र.


"आम्हाला ठाऊक आहे. तुमचे आणि जानकिचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते ...पण जांनकी राजकन्या नसल्याने विवाह होण्यास अडचणी येतील.. हेही मला ठाऊक आहे. जानकी माझी बालमैत्रीण, सखी ,बहीण सर्वच आहे.... तिचा आनंद माझ्यासाठी सर्वकाही आहे... " ती थोडी थांबली.


"मी तुम्हाला अंधारात ठेवू इच्छित नाही पण माझेही तुमच्या वर प्रेम आहे...!"वैदेही.


हे ऐकूनन राघवेंद्र ला थोडे आश्चर्य वाटले, पण तो शांत राहीला ती पुढे काय बोलते हे त्याला ऐकायचे होते.


"हो आणि हे जानकीला मात्र माहित नाही.."वैदेही.


"......"राघवेंद्र.


"मी तुमच्या आणि जानकीच्या प्रश्नावर एक उपाय शोधला आहे .तोच मला तुम्हाला सांगायचा होता.."वैदेही.


"हं कोणता उपाय आहे तुमच्याकडे...?तो रूक्षपणे बोलला.


तुम्ही प्रथम विवाह माझ्याशी करा ..."वैदेही.


"काय..!"तो उठून चालायला लागला.


"हे बघा युवराज...आमचे बोलणे पुर्ण ऐकून घ्या ...अंतिम निर्णय तुमचाच राहील..."तीने हाताला पकडून त्याला थांबवले. तीने त्याचा हात पकडलेला बघून, त्याच्या भुवया आकसल्या.


"आम्हाला क्षमा करा...चुकून झाले..."तीने लगेच हात सोडला. तो परत त्याच जागेवर जावून बसला.


"..हे बघा मी राजकुमारी आहे ....त्यामुळे तुमच्या सम्राट बणण्याच्या मार्गात अडथळा येणार नाही... तसेच तुम्ही द्वितीय विवाह जानकी शी करा ...असंही सम्राटांना अनेक पत्न्या असतात.. त्यात तुमचे हे दोन विवाह वावगे ठरणार नाही...."वैदेही.


राघवेंद्रला तिच्या बोलण्याचा राग आला,


"तुम्हाला असं का वाटते की आम्हीही इतरांसारखे अनेक लग्न करू....आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता नाही...आम्ही फक्त जानकीशी विवाह करू...आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीही त्याग करायला तयार आहोत..."राघवेंद्र.


"क्षमा करा...मी तुमचे आणि जानकीचे वनातले संभाषण ऐकले आहे...त्यामुळे आम्हाला हेही ठाऊक आहे...",वैदेही.


"जानकीला माहीत आहे हे...?"राघवेंद्र.


"जांनकी ला याबाबत काहीही माहिती नाही ...बघा मी उपाय सुचवला आहे... तुम्हाला मान्य असेल तर.. तुम्हाला माझ्याशी लग्न करायचा हट्ट करावा लागेल ...आणि मग मी जानकी शिवाय हे लग्न करणार नाही हा हट्ट करेल... त्यामुळे एकाच मंडपात प्रथम माझ्याशी तुमचा विवाह होईल आणि नंतर जानकी शी.."वैदेही.


राघवेंद्रला आत्ता तिच्या ह्या बालिश बोलण्यावर थोडेसे हसू आले. पण तो परत गंभीर झाला.


"बरं ठीक आहे ..मी मान्य केले तुमचे बोलणे ..पण नंतर तुमचे काय...? माझे जानकी वर प्रेम आहे.. पण तुमचे काय ..??तुमचे आयुष्य तर उध्वस्त होईल ना...?"राघवेंद्र.


"नाही ..नाही होणार आमचे आयुष्य उध्वस्त.. जर मी तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाशी विवाह केला.. तर माझे आणि त्यांचेही आयुष्य उध्वस्त होईल... मी तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणाशीच विवाह करणार नाही...!"वैदेही ठामपणे बोलली.


"मग तर तुम्हाला आयुष्यभर अविवाहित रहावे लागेल.."राघवेंद्र.


"मला मान्य आहे ते.."वैदेही.


"बघा राजकुमारी तुमच्या या उपायामुळे कदाचित तुमच्या मैत्रीमध्ये फूट पडू शकते.."राघवेंद्र.


"त्याची चिंता तुम्ही नका करू ..आमची मैत्री अतूट आहे ...आणि हे मी तुम्हाला समजून सांगण्याची मला गरज वाटत नाही .."वैदेही राजकुमारीच्या थाटात बोलली.


"बघा कदाचित आमच्यातले प्रेम, जवळीक बघून तुमच्या मनात इर्षा ,मत्सर उचंबळू शकतो...."राघवेंद्र.


.


"याची काळजी तुम्ही करू नका.. जसं मला तिच्या आनंदाची चिंता आहे ..तशी तिलाही आमच्या आनंदाची चिंता नक्कीच असेल..." वैदेही गालातल्या गालात हसली.


"तुम्ही बरोबर आहात वैदेही.. कारण कालच जानकी चे पत्र मला मिळाले...."राघवेंद्र.


ते पत्र त्याने वैदेही कडे वाचण्यास दिले.


"प्रिय युवराज ...यापुढे मला तुम्हाला प्रिय म्हणण्याचा अधिकार राहील की नाही माहित नाही.... पण आज मी तुम्हाला पत्र काही विशेष कारणासाठी पाठवले आहे.


माझी प्रिय सखी वैदेही कदाचित तीही तुमच्या प्रेमात आहे. आणि ती एक राजकुमारी ही आहे. आपल्याला ज्ञात आहेच कि, आपल्याला सम्राट पदासाठी राजकुमारीशीच विवाह करावा लागेल. तर माझी इच्छा आहे की, ती राजकुमारी वैदेही असावी. ती तुमच्यासाठी सर्वतोपरीने योग्य आहे. विद्या अभ्यास शस्त्रास्त्र सर्व कलांत निपुण आहे. तसेच ... ती अप्रतिम सुंदरही आहे .तुम्ही एकमेकांनसाठी अगदी पुरक आहात.. आणि मला खात्री आहे ,राजकुमारी तुमची पत्नी बनून सर्व कर्तव्य नीट सांभाळेल. तसेच तुम्हाला भरभरून प्रेमही देईल... बस अजून काही सांगू शकत नाही. तुमच्या दोघांच्या सुखात माझे सुख आहे, एवढीच आशा करते, माझी ही इच्छा तुम्ही नक्की पूर्ण कराल.. "


वैदेहीने ते पत्र वाचले , तिचे डोळे भरून आले. न सांगताना सुद्धा जानकीला तिच्या मनातले कळले होते तिने ते पत्र राघवेंद्र ला परत केले.


"आम्ही तुमच्या निर्णयाची वाट बघू युवराज..". अस म्हणुन ती निघुन गेली, भरलेल्या डोळ्यांनीच.


काही दिवसानंतर सोनगड कडून राजकुमारी वैदेहीला राघवेंद्रसाठी लग्नाची मागणी आली. बरोबर भरपूर उपहार आणि मौल्यवान दागिने होते. वैदेहीच्या पिताश्रींनी सन्मानपूर्वक सर्वांचा स्वीकार केला, आणि या विवाहास मान्यताही दिली.


जानकी खुशी होती की वैदेही चा विवाह राघवेंद्र सोबत होत आहे ते.. राघवेंद्रने तिची इच्छा पूर्ण केली असे तिला वाटत होते.


पण कितीही केलं तरी स्वतःसाठी ती थोडी दुखी होती .कोण सहन करेल, आपल्या प्रियकराला दुसऱ्या कोणासोबत विवाह बंधनात अडकतांना, तिलाही त्रास होतच होता .पण वैदेहीसाठी ती खुश होती .सर्वांसमक्ष ती खुश असल्याचे दाखवत तरी होती..


******


आज विवाह संपन्न होणार होता,पण पहाटेच वैदेहीने काही तरी गोंधळ घातला .जानकी तिथेच होती.


"वैदेही तुम्हाला समजते का तुम्ही काय हट्ट करत आहात ते.."राणी.


"हो आई... आम्हाला माहीत आहे आम्ही काय हट्ट करत आहोत ते.."वैदेही.


"महाराज ..तुम्ही तरी समजवा तिला बालमैत्रीण..... सखी.. लग्नाच्या आधी ठीक होतं.. लग्न झाल्यावर ती तिची..सवत होईल..


आणि राघवेंद्र युवराज तरी याला तयार होतील का.."राणी.


"पिताश्री ...राघवेंद्र आणि जानकी दोघे एकमेकांवर प्रेम करतात ..युवराज राघवेंद्रांना हे लग्न त्याचमुळे मान्य आहे ....."वैदेही.


"वैदेही ...तुम्ही तुमचे आयुष्य पणाला लावत आहात... जर युवराजांनी तुम्हाला पुढे पत्नीचे अधिकार नाही दिले तर..???"राणी.


"तरीही मला मान्य आहे.. आम्ही युवराज राघवेंद्र शिवाय इतर कुणाशी विवाह करणार नाही ..आमचं प्रेम आहे त्यांच्यावर..."वैदेही.


"वैदेही राणी साहेब ठीक बोलत आहेत... तुमची मैत्री संबंध पुढे नाही टिकून राहणार..


सोनगड चे सम्राट आणि महाराणी ह्या गोष्टीला मान्यता नाही देणार.."महाराज.


जानकी एका कोपऱ्यात बसून रडत होती बर्‍याच वेळापासून ती तिला तेच समजावत होती.. पण वैदेही हट्टाला पेटलेली.


*********


"राघवेंद्र तुम्ही मूर्ख आहात का..? प्रधान कन्येशी विवाह कसं शक्य आहे..? राजकुमारी काहीही हट्ट करत आहेत... आम्ही हे मान्य नाही करत.."सम्राट.


"आम्हालाही हे मान्य नाही..."महाराणी .


"पिताश्री ..आम्ही असत्य वचन करणार नाही ..पण खरं हेच आहे की आमचे जानकी वरच प्रेम आहे.... आणि हे सम्राट बनण्याच्या नियमानुसार आम्ही वैदेहीशी विवाह तर करणारच आहोत ना.."राघवेंद्र.


"तुम्ही असंत्य वचन नाही केले... पण तुम्ही आधी सत्य ही आम्हाला नाही सांगितले युवराज.."सम्राट.


"लग्न घटिका समीप आली आहे ..मुहूर्त टळून जाईल... ऐका आमचे... आम्ही जानकीशी तुम्हाला विवाह करू देणार नाही.."महाराणी.


"आमचाही हट्ट आहे.. तर ..आम्ही वैदेहीसोबत जानकीशी ही विवाह करू... नाहीतर आम्हाला हे सम्राट पदही नको.."राघवेंद्र.


महाराज जाणून होते की सम्राट पदासाठी राघवेंद्र योग्य आहे .त्यामुळे त्यांनी हो-नाही करत या दोघा विवाहाला मान्यता दिली.


त्यांच्याकडून मान्यता भेटल्यावर तिकडे जांनकीलाही तयार करण्यात आले, जानकीची अजूनही मनातून इच्छा नव्हती. पण तिने मनात काहीतरी निर्धार केला आणि ती तयार झाली.


राघवेंद्र चा प्रथम विवाह वैदेहीशी झाला, त्यानंतर त्याच मंडपात जानकीशी ही त्याचा द्वितीय विवाह झाला .तिघेही बघितले तर खुश होते पण पुढे काय होईल याची कुणालाही काही कल्पना नव्हती.


त्यानंतर सोनगड ला जाऊन युवराजांचा राज्यभिषेकही झाला. सर्व काही गोष्टी निर्विघ्नपणे पार पडल्या.


या सर्व गोष्टीत तीन दिवस निघून गेले.तीनही दिवस ते तिघे जण वेगवेगळ्या कक्षात होते.


पण आज सकाळची पूजा संपन्न झाल्यावर राजाला त्यांच्या प्रथम पत्नीकडे जायचे होते. रात्र झाली, राघवेंद्र ला वैदेहीच्या कक्षात जायला सांगण्यात आले पण राघवेंद्र ची इच्छा नव्हती. त्याचे पाय तिकडे वळलेच नाही ,तो सरळ चालत जानकिच्या कक्षात आला.


राघवेंद्र जानकी कक्षात येताच सर्व दास-दासी बाहेर निघून गेल्या.


"राजे आज तुम्ही आमच्या कक्षात काय करत आहात..? वैदही तुमची वाट बघत असेल..."जानकी.


"क्षमा करा जानकी.. पण मला ते शक्य नाही..."राघवेंद्र.


"तुम्ही चुकत आहात राजे.. आज तुमच्या प्रथम पत्नीचा मान आहे...."जानकी.


"जानकी ..आम्हाला एवढे व्यवहारिक वागणे जमत नाही.... आमचं मन मानत नाही.. हे मन तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही स्पर्श करू इच्छित नाही ...आम्हाला क्षमा करा....."राघवेंद्र.


"राजे त्या तुमच्या प्रथम पत्नी आहेत...आणि तुमचे तिच्याविषयी कर्तव्य तुम्ही विसरू शकत नाही ...हो मान्य आहे आम्हाला ..वेळ लागेल.. पण आम्हाला खात्री आहे की... वैदेही तुमच्या हृदयात स्थान नक्की मिळवेल... फक्त तुम्ही त्यांना टाळू नका. त्यांनाही संधी द्या महाराज.... तुमच्या प्रेमात आम्ही त्यांना आनंदाने वाटेकरी करायला तयार आहोत...."जानकी.


"तुम्ही आमच्या भावनांशी खेळत आहात जानकी.... तुमच्याशी विवाह करण्यासाठी आम्ही बरंच काही नको ते केलं आहे ...आता हे नका करायला सांगू...."राघवेंद्र.


"तुम्हाला आमची शपथ आहे महाराज... वैदेहीला तुम्ही ती संधी द्याल.."जानकी.


"तुम्ही शपतेत नको गुंतवायला पाहिजे होतं...पण असो.. जशी तुमची इच्छा ..आम्ही कधीच तुमची ईच्छा मोडू शकत नाही... तुमच्या इच्छेखातरच आम्ही वैदेहींशी विवाह केला.....आम्ही त्यांना संधी देऊ... आम्ही आमचं कर्तव्य नक्की त्यांच्याप्रती सांभाळू ....पण पण त्या गोष्टीला काही काळ जावा लागेल......" एवढं बोलून तो तेथून निघून वैदेहीच्या कक्षात गेला.


तो येईल ही खात्री नसतांना सुद्धा ती त्याची वाट बघत होती. तिला वाटले नव्हते की तो येईल पण तो आला.


"मला खात्री आहे महाराज... की जानेकीनेच तुम्हाला इकडे पाठवलं असेल ...पण काळजी नसावी...मी तुमच्या दोघांच्या नात्यात मुळीच येणार नाही.. की तुम्हाला तुमचे माझ्या प्रतीचे कर्तव्य अधिकार मुळीच मागणार नाही...


हो पण तुमचं प्रेम मिळवायचा मी प्रयत्न नक्की करेल.. आणि मी वाट बघेल तुमच्या प्रेमाची.."


वैदेहीचे बोलने एकून राघवेंद्र थोडा समाधानी पावला .खरंच दोघी मैत्रिणींचा एकमेकींमध्ये खूप जीव आहे तसेच माझ्यातही.."तो मनात बोलला.


"ठीक आहे वैदेही.. आज मी इथे झोपणार आहे..."राघवेंद्र.


वैदेही खुश झाली.


असेच दिवस महिने सरत गेले जितके दिवस तो राजवाड्यावर राहायचा इतके दिवस दोघींनी वाटून घेतले होते .त्यामुळे राघवेंद्र ला जास्त प्रश्न येत नव्हता .दोघीही राघवेंद्र च्या गोष्टी एकमेकींसोबत बोलत नव्हत्या . दोघी जेव्हा सोबत असतील तेव्हा फक्त त्यांच्या मैत्रीचे विषय त्यांच्यामध्ये राहायचे... जवळपास सहा महिन्यातच वैदेहीने सुद्धा राघवेंद्रच्या मनात जागा निर्माण केली होती. आता त्याने वैदेहीलासुद्धा पत्नीचे सर्व अधिकार दिले होते दोघीही एकाच वेळी गर्भार राहिल्या. जानकी वैदेहीसाठी खुश होती .जानकीला तिचे प्रेम मिळवून देण्यासाठी वैदेहीने फार मोठे पाऊल उचलले होते .आता राघवेंद्र ने सुद्धा तिला पत्नी म्हणून स्वीकारले, त्यामुळे जानेकी खूप खुश होती.


त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य नीट सुखात घालवले. राजाला राजकारणात बऱ्याच वेळा एकापेक्षा जास्त विवाह करावे लागतात. हे जानकी आणि वैदेही जाणून होत्या .वैदेहीच्या वडिलांनी सुद्धा तीन विवाह केले होते .त्यामुळे वैदेही आणि जानकीला एकमेकांसोबत राहायला जास्त त्रास झाला नाही. सर्वांनी सुखी आयुष्य घालवले. पण ते तिघे परत परत जन्म घेऊन ह्या पृथ्वीवर वर येत होते..


पण काळ बदलला, वेळ बदलला, तर त्यांना तिघांना सोबत राहता येत नव्हते. म्हणून मागच्या जन्मी जानकी उर्फ आताची महेशी हिचा विवाहानंतर दोन वर्षांनी मृत्यू झाला होता .त्यानंतर अनिकेत उर्फ राघवेंद्र यांनी दुसरा विवाह वैदेही म्हणजे आताची शांभवी शी केला .आणि मात्र ह्या जन्मामध्ये अनिकेतचा विवाह तुझ्याशी ...म्हणजे शांभवीशी झाला ,दोन वर्षानंतर तुला मृत्यू आला. पण महेशी सोबत याचा विवाह निश्चित होण्यासाठी तुझी मदत लागणार होती म्हणून तुला या योनीतुन मुक्ती भेटली नाही जेव्हा अनिकेत आणि महेशीचा विवाह होईल तेव्हा तुला या योनीतून मुक्ती भेटेल...असे ते साधु शांभवीला बोलले होते...आणि अजून ते म्हणत होते कि सतत काही जन्मांपासुन तुम्हाला ह्या प्रेम..विरह..म्रुत्यु....विरह...प्रेम..दुःखातून जावे लागत आहे...पण तुमच्या शिवभक्तीमुळे...ह्या जन्मानंतर..तुम्हाला मुक्ती मिळणार आहे...प्रभुचरणी तुम्हाला जागा मिळणार आहे...."क्रिश.


क्रिश च्या तोंडून साधुनी सांगितलेली ही कथा ऐकून महेशी अदीती स्तंभित झाल्या.


महेशीने परत आपल्या खांद्यावर थोपटले ,जणू बाजूने शांभवी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली असेल या आशेने..


"शांभवी तु वैदेही असशील आणि मी जानकी असेल तर तुझे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही.. धन्य आहेस वैदेही.. धन्य आहेस तू शांभवी.."महेशी.


"खरंतर धन्यवाद मी तुझेच मानले पाहिजे होते... कोण आपल्या प्रेमात दुसऱ्याला वाटेकरी करून घेते.. पण तू केलस.. मला माझे प्रेम मिळवून दिले जानकी... माझी महेशी.."शांभवी.


ऋतू बदलत जाती....


फिरुनी फिरूनी परत येती...


जन्मो जन्मीचे ऋणानुबंध...


सांगून जाती..............


ऋतू बदलत जाती.........


क्रमक्षः...


भेटूया पुढच्या भागात....


©® शुभा.