Bhayratra.. satya ghatnevar aadharit. books and stories free download online pdf in Marathi

भयरात्र… सत्य घटनेवर आधारित..?

भयरात्र....

सत्य घटनेवर आधारित.....?

              दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचा प्रतापगड ला मशाल महोस्तव पाहायला जायचं ठरलं होत, आणि ठरल्याप्रमाणे मित्रांचे फोन सकाळी येऊ लागले. आवरून ठेवा दुपारी आपल्याला सातारहून निघावं लागेल. तस पहिला तर सातारा ते प्रतापगड ७० किमी चा प्रवास आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रम पाहायला मिळावा म्हणून आम्ही दुपारीच जायचं ठरवल.घरातील लोकांनी नेहमीप्रमाणे सांगितले होते घाटवळणाचा रस्ता आहे.गाडी सावकाश चालवा, आडवळणाला गाड्या थांबवू नका. आणि रात्री उशीर झाला तर तिथच मुक्काम करा, रात्रीचा घाटातून प्रवास करू नका.मी नेहमी कुठे बाहेर जायच असेल तर हे नेहमीचे वाक्य असतात.आणि नेहमीप्रमाने मी फक्त होकारार्थी मान हलवली.आणि माझ आवरायला सुरुवात केली.

              सर्व मित्र साताऱ्यामध्ये येऊन थांबले होते. मला फोन वर फोन येऊ लागले.आम्ही सर्वांनी बाईक वरून पुढचा प्रवास चालू केला. आम्ही १० लोक होतो. काही लोक माझ्या गावावरून साताऱ्यात आलेले आणि आम्ही ४ लोक सातारामधून असा आम्ही प्रवास करायला सुरुवात केली. दुपारी निघायच म्हणता म्हणता ३ वाजून गेलेले समजलच नाही. पाऊस पूर्णपणे थांबला होता. पण पुढे महाबळेश्वर ला पाऊस असणार याचा मला अंदाज आला होता. नेहमीप्रमाणे मजा मस्ती करत आम्ही प्रतापगड च्या दिशेने चाललो होतो. आम्ही केळघर घाटातून महाबळेश्वर च्या दिशेने पुढे निघालो. जाताना वाटेत दिसणारे धबधबे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे आणि घाटवळणाचा रस्ता याचा अनुभव घेत आम्ही कधी महाबळेश्वर ला पोहचलो कळलाच नाही.

              साताऱ्यात असताना प्रखर दिसत असलेला सूर्य मात्र महाबळेश्वर मध्ये पोहोचताच काळ्या-कुट्ट ढगामागे नाहीसा झाला होता. क्षणात सर्वकाही वातावरण बदलला होत. चहूकडे पांढरे धुके आणि अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली. आम्ही आमच्या गाड्या एका हॉटेल च्या बाजूला लावून धुके आणि पाऊस पाहत उभे राहिलो. बराच वेळ झाल पाऊस थांबायच नाव घेत नव्हता. आता ६ वाजून गेले होते. अंधार पडत चालेला. त्यामुळे तसच भिजत पुढे जायचा निर्णय घेतला. महाबळेश्वर ते प्रतापगड हे २० किमी चा अंतर पण पाऊस,धुके आणि घाटवळणाचा रस्ता यामुळे पोहचायला साधारण १ तास लागणार होता. दुतर्फा असलेली झाडे,पाऊस आणि धुके यातून गाडी चालवायला प्रचंड कसरत करावी लागत होती. आम्ही सर्वच पूर्णपणे भिजलो होतो. आणि गाडी चालवून प्रचंड कंटाळा आला होता. इतक्यात आम्हाला एक हॉटेल दिसलं आम्ही सर्वांनी हॉटेल मध्ये नाश्ता करून प्रतापगडच्या दिशेने प्रस्तान केले.

               आम्ही खूप उत्साहाने प्रतापगडावर चाललो होतो. मशाल महोस्तवाला वेगळीच मजा असते. गडावर पोहचायला आम्हाला ७ वाजले. सर्व आम्ही खूप आनंदात होतो, पुढे आमच्यासोबत काय होणारे याची कोणालाच काहीही कल्पना पण नव्हती. यंदा प्रतापगडावर खूप गर्दी पण झालेली. मशाल महोस्तव चा कार्यक्रम जोशात पार पडला. गडावरच सर्व मावळ्यांची जेवणाची सोय केली होती. मस्त  जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही सर्व फोटो काढण्यात व्यस्त झालो. आता रात्रीचे १२ वाजून गेलेले. गडावरील गर्दी आता कमी होऊ लागली. पाऊस पण पूर्णपणे थांबला होता. त्यामुळे सातारला आताच रात्रीचा परत जायचा प्लानिंग ठरलं. घरच्यांचे शब्द आठवले, रात्रीचा प्रवास करू नका...! पण सर्व मित्र बोलले, पाऊस थांबलाय त्यामुळे आताच जाऊयात. हो..! नाही...! करत आम्ही रात्री १२ वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

                माझ्या गावाकडचे मित्र खूप धाडसी असल्याने आमच्यात रात्रीचा परतीचा प्रवास करायची हिम्मत झालेली. बाईक वर गप्पा मारत निवांत असा आमचा प्रवास चालला होता. रात्र खूप झाली असल्याने सर्व च आम्ही एका मागे एक गाडी चालवत होतो. पाऊस पूर्णपणे थांबला जरी असला तरी त्याची जागा आता धुक्याने घेतली होती. समोरचा जास्त काही दिसत नसल्याने आम्ही तस हळूच गाड्या चालवत होतो. आम्हाला अजून ४० किमी चा घाट पार करायचा होता, काही बाईक वर गप्पा तर काही बाईक वर गाणी म्हणत आमचा प्रवास चालेला. माझ्या सोबत अजून एक बाईक आणि आमच्या समोर थोड्या अंतरावर २ बाईक आणि आमच्या मागे १ बाईक अस आम्ही सातारच्या दिशेने चाललो होतो.

               रात्रीच्या १ वाजताची वेळ, गड उतरून आम्हाला जवळपास एक तास झाला होता. अचानक माझ्या सोबत असणाऱ्या बाईक चा तोल जावू लागला. जे पहिला ते अंगाच थरकाप उडवणार दृश्य होता. अचानक एक काळपट आकृती त्यांच्या गाडीवर आली आणि त्यांच्या गाडीचा तोल गेला. हे सर्व आम्ही डोळ्याने पहिला होता. मित्रांचा तोल जाऊन गाडी रस्त्यावर आडवी झाली होती, हे सर्व काही क्षणात झाल होत. मी पटकन जाऊन गाडी चालू केली. आम्हाला कळून चुकल होता. त्या जागी थांबण पण चुकीचा होता. आम्ही पटकन त्या जागेवरून थोडा पुढे आलो. पावसाळा असल्याने घाटात छोटे धबधबे वाहत होते. थोडा पुढे आल्यावर तिथ थोडा पाणी घेऊन पायाला लागलेला चिखल काढला, आणि गाडीला काय झालय का ते पहिला. सर्वांच्या मनात भीतीचा वातावरण होता. मी विचारले, नक्की काय झाले, ज्यासोबत अस झाल होता. ते बोलू लागले. त्यांचा गाडीवर विषय चालला होता कि दैवी शक्ती म्हणजे काय? असते कि नसते? अतृप्त आत्मा असतील काय? याच घाटात अफजल खानच सैनिक मारलेले, त्यांचा आत्मा असतील च इथे. अस सर्व बोलण चालेला आणि अचानक अस झाल.

              फक्त नशीब बलवत्तर म्हणून आम्ही तिथून वाचलो होतो, पण मनात खूप भीती होती. आता आम्ही सर्व भरकटलो होतो. २ गाड्या पुढे निघून गेलेल्या आम्ही २ गाड्या एकत्र आणि आमच्या मागे १ बाईक होती. सर्वाना थांबायला लावू आणि एकत्र जाऊया म्हणून मी फोन काढला. माझ्या फोन ला काहीच नेटवर्किंग नव्हता. मित्राने फोन काढला तर कोणालाच काहीच रेंज नव्हती. आम्हाला कळून चुकल होता आम्ही रात्रीचा प्रवास करायलाच नको होता. देवाच नाव घेत आम्ही थोडा पुढे आलो. इतक्यात आम्हाला समोर २ बाईक रस्त्याच्या बाजूला उभ्या दिसल्या. ते आमचेच मित्र होते. आम्ही सर्व एकत्र थांबलो. त्यांना विचारल, का घाटात थांबले आहात? तर बोलले तुम्ही अजून कस नाही आलात...एकत्र च जाऊया म्हणून थांबलो. मी मनात म्हणालो नशीब हे इथे थांबलेत. अजूनही भीती कायम होती. एक बाईक अजून एवढ्या मागे कशी राहिलीय समजत नव्हते. फोन पण लागत नव्हता, जे घडलय ते सर्वाना सांगाव कि नको समजत नव्हते. सांगितला तर त्यांना पण भीती वाटेल. नाही सांगितलं तर बेजबाबदारपणे गाडी चालवतील..! कायच समजत नव्हता. रात्रीचे १.३० वाजून गेलेले. इतक्यात सर्वात मागे राहिलेली बाईक आली, आम्ही सर्वाना एकत्र घेऊन घडलेला प्रकार सांगितला. आता इथून पुढचा प्रवास सर्वांनी अगदी हळू आणि एकत्र करूया अस सांगितला.

                                    आता आम्ही सर्व च प्रचंड घाबरलो होतो. त्या अनोळखी जागी जास्त वेळ थांबण चुकीचा होता, आम्ही सर्वांनी एकत्र पुढचा प्रवास चालू केला. मनात वेगवेगळ्या शंका येत होत्या, गाडीवर आता फक्त देवाच नामस्मरण चालल होता. समोर दिसणारा रस्ता आणि धुके खूप भयानक वाटत होता, दुतर्फा असलेली झाडे, आणि धुक्यातून पलीकडे जाणारा गाडीचा प्रकाश खूप नको ते विचार मनात आणत होता. पण सर्व सोबत आहोत त्यामुळे एकमेकांना धीर देत आम्ही महाबळेश्वर मध्ये पोहचलो होतो. त्या घाटात आमच्या व्यतिरिक्त बाकी कोणत्याच गाड्या नव्हत्या. त्यामुळे जे पाहिलंय ते खुपच भीतीदायक होत. पुढे अजून काय होणारे का? आपल्यासोबत का झाल तस? अस खूप प्रश्न मनात घेराव करून बसले होते..! ती रात्रच भयरात्र होती.

                 अजूनही आम्हाला ५० किमी चा अंतर पार करायचं होत. महाबळेश्वर पार करून आता सातारच्या दिशेने चालेलो, सर्व सोबतच..! अचानक पुढे एक कब्रस्थान दिसले, बाजूला मंद प्रकाशात लाईट चालू होती, आणि समोरून एक बाईक आली आणि त्यांच्यासोबत पण अगदी तसच घडल जे काही वेळापूर्वी आमच्यासोबत झालेला... पण सर्व आमच्या नजरेसमोरच...! पुन्हा तीच काळपट आकृती...! त्यांच्या गाडीचा स्पीड एवढ होता कि त्या गाडीवरील सर्वाना खूप दुखापत झाली होती. मनात खूप भीती होती तरीपण आम्हाला तिथ थांबाव लागल, त्या तिघांना first aid करून आम्ही ambulance ला फोन केला. आणि अपघाताची माहिती दिली. त्या जागी जास्त वेळ न थांबता आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. ती रात्र एका मागून एक अस भयानक अनुभव देत होती.

                आता आम्ही घाट उतरायला सुरुवात केलेली, मी समर्थांचे नामस्मरण करत गाडी चालवत होतो. मनात खूप विचार चालू होते त्यामुळे अंगावर काटा यायचा. पुढे गेल्यावर माझ्या शेजारच्या बाईक वरील मित्रांना २ स्त्रिया दिसल्या...! रस्त्या च्या बाजूलाच उभ्या होत्या. ते खूप भिलेले होते पण कोणीच गाडी थांबवायची नाही हे आधीचा ठरवलं होता. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला अस २ स्त्रिया दिसल्या..! मला मात्र त्यांचा प्रचंड राग आला. एकतर सर्व भिलेले असताना अस चेष्टा करू नकोस. अस मी त्यांना सांगितलं. मी त्यांना म्हणालो जर रत्याच्या बाजूलाच होत्या तर मग आपण एकत्र असताना आम्हाला का नाहीत दिसल्या मग....! पुढच्याच क्षणी लहान बाळाचा आवाज मला ऐकू आला. एकदा नाही तर ३ वेळा... त्यामुळे भास तर नाहीये हे नक्की होता. मी न राहून माझ्या मागे बसलेल्या मित्राला विचारल तुला पण आवाज आला काय? त्याने पण भीतीच्या सुरात हो म्हणले.. मी लगेच बाजूच्या बाईक वरील मित्रांना लहान बाळाचा आवाजाबद्दल सांगितले.तर त्यांना तो आवाज आला नव्हता. त्यांना स्त्रिया दिसन...! आम्हाला आवाज ऐकू येण...! त्या रात्री जे घडत होता ते आधी कधीच घडल नव्हता.. आणि न घडायला रात्रीचा प्रवास पण कधी केला नव्हता.

                ती रात्र जस जस अंतर कापू तस भयानक अनुभव देत होती. देवाच नाव घेत आम्ही कसाबसा घाट पार केला होता. आता २० किमी सातारा राहिला होता. सातारच्या जवळ आल्याने थोडी का होईना भीती कमी झाली होती. जवळपास ३.३० वाजले होते. पावसाने भिजलेले कपडे भीतीमुळे अंगावर च वाळून गेलेत हे समजलच नाही. आता आम्ही सर्वजण सुखरूप साताऱ्यात पोहचलो होतो. सर्वांचा निरोप घेऊन मी घरी परतलो. पहाटे ४ वाजता फ्रेश होऊन झोपी गेलो ते दुसर्या दिवशी खूप उशिरा जाग आली. जे घडल त्याबद्दल कोणाला सांगू कि नको हेच समजत नव्हता. शेवटी न राहून मी दीदी सोबत सर्व अनुभव सांगून टाकला.

                  दुसर्याच दिवशी सकाळी दीदी मी चहा पीत असताना माझ्या जवळ आली आणि मला पेपर वाचायला दिला. ते वाचून मला खूप मोठा धक्का बसला. ज्या घाटातून आम्ही त्या रात्री प्रवास करत होतो तिथच खूप मोठी दरड कोसळली होती. आणि रस्ता पूर्ण रात्र बंद झालेला. मी नीट वाचून वेळ पहिली तर पहाटे ३ वाजता दरड कोसळली होती. म्हणजे आम्ही नुकताच घाट पार केलेला आणि दरड कोसळली होती. फक्त नशीब बलवत्तर आणि देवाच नामस्मरण यामुळेच आम्ही त्या संकटातून वाचलो होतो.....!