Tujhya vina ure na arth jivna - 6 books and stories free download online pdf in Marathi

तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 6

भाग - 6
मागच्या भागात आपण वाचले की अखेरीस मयंक आणि अनु ची मैत्री होते. अनु स्वतः मैत्री accept करते जेव्हा तिला कळतं की मयंक तिच्या वर सहानुभूती दाखवण्यासाठी मैत्री करत नाही आहे तर तो तिला एक फेमस आणि स्किलफुल आर्टिस्ट मानतो म्हणून मैत्री करू इच्छित आहे. आणि तिला हे पाहून खूप आश्चर्य वाटते की मयंक सारख्या मुलाला कलेची इतकी जाणीव आहे.

आता पुढे,
असेच काही दिवस जातात आता मयंक अनु आणि शालू चा बेस्ट फ्रेन्ड बनला होता. तो कॉलेज च्या प्रत्येक कामात त्यांची मदत करतो. अनु मुळे तर तो लेक्चर सुद्धा अटेंड करायला लागतो. हे पाहून फक्त टीचर नाही तर मयंक चे मित्र आणि बाकीचे स्टूडेंटना सुद्धा नवल वाटते. सोबत तो त्याच्या ओळखी मधून अनु ला आणखी पेंटिंग च्या ऑर्डर मिळवून देतो. दुसरी कडे अनु देखील शालू, आई आणि बाबाकडे मयंक च कौतुक करुन थकत नव्हती. मयंक असा मयंक ने आज हे केलं. त्या दोघांना कळलं नव्हतं पण दोघानाही एकदुसऱ्या चा सहवास आवडायला लागला होता.
आज कॉलेज मध्ये सहामाईची परीक्षा सुरू होणार होती. अनु अर्थातच खूप टेन्शन मधे होती कारण ती आज एक वर्षाने परीक्षेला बसणार होती. ती आणि शालू आज लवकरच कॉलेज मधे गेले. अर्थात शालू ला लवकर जायचा कंटाळा आला होता पण अनु मुळे तिलाही जावं लागलं.

शालू - अनु इतक्या लवकर का चाललोय आपण पूर्ण एक तास आधी? आपण काय स्कूल मधे थोडी आहोत.

अनु - अगं शालू पहिला पेपर आहे यार. आणि मी ऐकलं आहे की युद्ध असो वा एक्साम, रणांगणावर दिलेल्या वेळेच्या काही मिनिटा पूर्वी पोहोचायच असतं.

शालू - आता हे कोणी बोललं?

अनु - सोड तुझं इतिहास खूप weak आहे.

नेपोलियन बोनापार्ट ..... ( हे म्हणत मयंक त्यांच्या संभाषणात एन्ट्री करतो. त्याला पाहून अनु च्या चेहऱ्यावर कळी खुलते.)

मयंक - बरोबर ना अनु?...
अनु फक्त स्मितहास्य करून मान हलवते.
अनु - पण तू १० मिनिट लेट आहेस.
मयंक - अगं हो मी लवकरच निघालो होतो......
अनु - (त्याच्या बोलण्यावर लगेच माहिती असल्यासारखं )
हो... पण ट्रॅफिक किती आहे .... त्यामुळे उशीर झाला... Am I right?

मयंक - (थोडा खजील होऊन मान हलवतो) नेक्स्ट टाईम अगदी वेळेवर येईन.
आणि दोघेही एकमेकांना पाहत स्मितहास्य करू लागतात.

हे सगळं संभाषण शालू ऐकतच होती. तिला ही कळायला लागलं होतं की जरी त्यांच्या ओठांवर याबाबतीत चुप्पी असली तरी त्यांच्या मनात मात्र एकमेकांसाठी अप्रतिम प्रेम आहे.
शालू जवळच आहे हे दोघांच्या ही लक्षात येताच दोघेही विषय बदलण्याचा प्रयत्न करतात.

मयंक - काय शालू तुझं फेवरेट पेपर आहे आज. झाला का अभ्यास?

शालू - कसला काय रे.. इतिहास म्हटल की अंगावर काटा येतो माझ्या.. आता फक्त देवच वाचवू शकतो मला यातून..

तिघेही यावर हसतात आणि वर्गात निघून जातात. अनु च्या वर्गात मयंक होता आणि शालू चा नंबर दुसऱ्याच वर्गात लागला होता. अनु आणि मयंक च्या मधे तीन चार मुलं मुली होत्या. त्यात एक मुलगा होता त्याचं नाव सचिन. सचिन काळे. मारामारी करण्यात एकदम पटाईत. लेक्चर एकदाही अटेंड केलं नाही. फक्त exam ला उगवायचा. मेन गोष्ट म्हणजे त्याचा आणि मयंक चा ३६ चा आकडा. Actually आधी तो मयंक च्याचं ग्रुप मधे होता पण तो रॅगिंग करताना मुलींशी खूप गैरवर्तन करायचा. हे जेव्हा मयंक ला कळलं तेव्हा त्याने सचिन ला अपमानित करून ग्रूप मधून बाहेर काढले. तेव्हा पासून सचिन मयंक वर खार खाऊन होता. आणि त्यात अनु आणि मयंक च बहरत प्रेम पूर्ण कॉलेज मधल्यांना कळलं होतं. अर्थात सचिन ला देखील माहीतच होतं. आणि आज त्यात तो अनु च्या मागच्या बेंच वर बसला होता.

सचिन - (अनुला) हॅलो मिस...
अनु मागे वळून पाहते सचिन तिच्याच कडे पाहून बोलत होता. तिला अर्थातच त्याच्या बद्दल काही माहित नव्हतं.
अनु - काय?
सचिन - मला पेपर मध्ये मदत करशील का? माझं actually अभ्यास नाही झाला. प्लिज...
( असं बोलल्यावर अनु त्याला मान डोलावून च ओके म्हणते)
हे सर्व मागून मयंक पाहतच होता. त्याला सचिन चा खूप राग आला होता. तो उठून मधे बोलणारच तेवढ्यात सर आले आणि त्यांनी प्रश्न पत्रिका व उत्तरपत्रिका वाटल्या.
अर्धा तास झाल्यानंतर सचिन ने अनु ला काही प्रश्नांची उत्तरं विचारली. ती तिने इमानदारीने सांगीतली. पेपर सुटल्यानंतर वर्गातून बाहेर जाताना तो अनु ला थँक्यू म्हणाला आणि जाताना मयंक कडे पाहत smile करत निघुन गेला.

मयंक अनु जवळ येऊन - अनु तू त्याच्याशी काय बोलत होती?
अनु - अरे तो मला थँक्यु म्हणत होता मी त्याला काही प्रश्नांची उत्तरे सांगीतली ना म्हणून..
आणि बोलता बोलता ती बॅग घेऊन तिच्या चार पायांनी चालू लागली. पण मयंक तिथे च थांबला. तो तिथेच थांबलेला पाहून अनु मागे वळून पाहते.
मयंक - मला हे बिलकुल नाही आवडलं ... ( असं बोलून तो निघून गेला. त्याला अनु चा अर्थात राग आला होता)

हे पाहून अनु ला वाईट वाटले ती ही बाहेर आली तिथे त्याला शालू भेटली.

शालू - अरे मयंक कुठे गेला इतक्या रागात?

अनु - मला नाही माहित.. जाऊ दे कुठेही. चल आपलं घरी...
शालू ल काही कळाले नाही पण मग ती ही काही न बोलता घरी निघाली.

घरी आल्यावर,
अंजू - दी sssss , ( अनु ल मिठी मारत अंजू रडायला लागते).
अनु - अगं काय झालं तू रडत का आहेस?
अंजू - दी मला माफ कर मी खूप वाईट केलं आहेस. Please forgive me..

(आणि रडतच राहते.
घरात बाबा नसतात. फक्त आई असते.. आई कडे पाहत अनु तिला खुणेने काय झालं विचारते. आईला ही काही माहित नसतं)

अनु - अंजू तू मला नीट आणि खरं खरं सांग काय झालं ते..एक काम कर तू रूम मधे चल..
आणि ते दोघे बेडरूम मधे जातात.

अंजू - अनु दी, त्याने माझ्याशी ब्रेक् अप केलं. तू बरोबर बोलत होतीस. त्याने जे तुझ्यासोबत केलं तेच माझ्यासोबत देखील. दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडून दिलं. I am sorry.. आता मला कळलं तुला काय वाटलं असेल..

अनु -( रागात )इंद्रजी ss त.

क्रमशः