Maharashtra To Karnataka - 1 books and stories free download online pdf in Marathi

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग १

लोणावळा....,
३ जून २०१९,
वेळ : सकाळी ८:२१


"अजून लोणावळा किती लांब आहे ?" मी काजलच्या बाजूला सरकत म्हणालो,
"बस इथून ! एक तासांवर ....." सरोज म्हणाला,
आम्ही सहा जण पिकनिक करिता मुंबईहून लोणावळ्याचा प्रवास करीत होतो. दोन मैत्रिणी देव्यश्री आणि काजल, मी आणि माझे सवंगडी सरोज, तनोज, केशव. आमची गाडी खंडाळा घाटात होती. आजूबाजूची झाडे अति वेगाने मागे जात होती. घाटातून मला भरगच्च इमारती, बाजार, सर्व काही अगदी पाहण्यालायक होते.
"लेखक महाशय तुझे लेखन कसे सुरू आहे ?"ती मला म्हणाली,
"बस ! सगळं काही तुमच्या कृपेने व्यवस्थित सुरू आहे. तुझ्याबद्दल काही सांगा"
"मी सध्या आता लग्नाच्या बंधणात अडकणार आणि काय ?"
"म्हणजे तुझे लग्न का ?"
ती हताश झाली.
"मी तयार नाही, माझ्या घरचे स्थळ शोधत आहेत"
"चांगली बातमी आहे"
"चांगलं काय आहे ?लग्नासाठी मला जॉब सोडावा लागणार आहे"
मी विचारातच पडलो. लग्नाचा आणि कामाचा काय संबंध ? आधीच बेरोजगार वाऱ्यासारखा पेटलेला आहे आणि त्यात काम सोडावे म्हणजे वेडेपणा नाही का ?
"पण हे असं का ?"
"मला आता जे स्थळ आलंय ते इंजिनिअरिंग आहे आणि मी एक तर कॉल सेंटरमध्ये काम करते ते त्यांना मान्य नाही. म्हणत आहेत की मुलीला काम सोडावे लागेल"
"अरे बाप रे.....!"
"हे साला आमच्यावर अत्याचार आहेत" लेखक महाशय ह्यावर तुम्हाला काही लिहायला जमतंय का पाहा जेणेकरून आमच्यावर अत्याचार व्हायचे थांबतील"
"नक्की विचार करेन ह्यावर" मी वचनबद्ध म्हणालो,
आमची बकबक सुरू होती. बाकीचे सगळे डाराडूर झोपले होते फक्त 'सरोज' आमचे गाडी चालक जागे होते.
"लेखक महाशय... माझ्याकडे अशी एक कथा आहे ती मी तुला ऐकवू शकते. त्यावर तू विचार कर"
"सत्य घटना आहे का ?"
"हो अगदी सत्य घटना आहे. आजवर तू ज्या कथा लिहिल्या आहेस त्यापेक्षा ही कथा जास्त ट्रेंडला असेल"
अशी कोणती कथा आहे ? ऐकण्यात काही गैर नाही.
"बरं मला जरा ऐकवते का ?"
"माझ्याकडे जी कथा आहे ती माझ्या वर्ग मित्रांची आहे. एका मित्राला लेखक बनायचे होते व एका मित्राला गायक"
ही माझ्याबद्दल तर काही सांगत नाही ना ? मला भास झाला.
"मग काय झालं ? ते यशस्वी झाले का ?"
"अर्थातच !"
आम्ही खंडाळा घाट गाठून पुढे आलो. रस्ता परिचयाचा नव्हता. नागमोडी वळणात गाडी धक्के देत होती.
"पेट्रोल संपला तर नाही ना ?" मी सरोजला म्हणालो,
"नको टेन्शन घेऊ ! फुल आहे"
"अजून तरीही किती लांब आहे सरोज...." मी विचारले.
"बस.... !थोडा वेळ....."

थोडा वेळ थोडा वेळ करून आज बहुतेक दिवस जाणार वाटतं.
"काजल आपण आपल्या मुद्यावर येऊया मला ऐकव कथा"
"बरं ! दोघेही आपल्या करियरच्या गोलवर अगदी डोळे लावून होते. पण ज्याला गायक बनायचे होते त्याची परिस्थिती थोडी गंभीर होती"
गंभीर म्हटल्यावर माझाही श्वास थोडा धीमी झाला. माझ्या डोक्यावरून सगळं गेलं.
"काही कळलं नाही गंभीर म्हणजे ?"
"तो सोशल मीडियाद्वारे मुलींशी गप्पा मारे पसंत करी"
"अच्छा !"
मला सांगत असलेल्या कथेचा अर्थबोध होत होता. कथेत थोडे वेगळेपणा दिसत आहे. सोशल मीडियावर सगळेच चांगलं काम करतात का ?
"मग त्याच्या मित्राने त्याला ह्या गोष्टीतून कसेबसे बाहेर काढले आणि त्याच्या गायनाच्या रस्त्यावर आणून सोडले."
"व्वाव अमेझिंग ! ह्या माधवला मला भेटायचे आहे. कारण असे साथ देणारे मित्र फारच कमी आहे"
"नक्की भेटविन तुम्हाला"
ह्या माधवमध्ये आणि माझ्यात काहीच फरक वाटत नाही. आमचा स्वभाव एकच वाटत आहे. कारण मी स्वतःच्या स्वभावाला चांगलाच ओळखतो. पण आम्ही चेहऱ्याने तरी वेगळे आहोत का ?

ही कथा माधव आणि समन ह्या दोन मित्रांची आहे मुळात माधव हा अत्यंत शांत स्वभावाचा आहे. त्याच्या मित्राला नवनवीन तरुणी डेट करणे पसंत होते. परंतु ह्या गोष्टीचा माधवला तिटकारा होता. ह्यात समनला रस वाटे....
ह्या कथेत माधव म्हणजे 'मी ' या नावाचा उल्लेख केलेला आहे. कारण कथेत नेमके काय घडले ? हे माधवच सांगू शकतो बाकी कोणी नाही.

*********

दिनांक -: ३ जून २०१६
वेळ : सकाळ ८ :१५ मिनिटे.
मला हेल्थ सायकॉलॉजी च्या लेक्चरला बसायचे होते. परंतू वेळ खूप कमी आहे एवढ्या वेळेत मी पोहोचू शकणार नाही ? शुक्रवारचा दिवस होता. सकाळचे सात वाजले होते. ताजा तवाना होऊन कॉलेजला निघण्यासाठी कपडे घातले. रियाचा फोन आला. म्हणे मी गेटवर उभी आहे तुझं दर्शन कुठे झालं नाही अजून.'मी म्हटले मी महापुरुष नव्हे' ' नो जोक ! हॅरी अप'
लगबगीने मी कॉलेजच्या गेट वर पोहोचलो. तिचा चेहरा मेकअपमुळे इतका झाकला होता की रिया नावाची मुलगी दिसेना. मी शरमेने मान खाली घालुन म्हणालो, लेट्स गो'
" एवढा वेळ का ? ! लाज बाळग थोडी तरी, लेक्चर सुरू होऊन पाच मिनिटे झालीसुद्धा"
"सो नाईस"
आमच्या भोवताली असलेली कॉलेजच्या तरुण तरुणीची दृष्टी आमच्यावर फिरकू लागल्या होत्या.
"आज तुला कोणी पाहायला येणार आहे का ? तू इतका मेकअप करून आली आहेस ?"
"शट अप ! रेग्युलर आहे"
"लीपस्टिक सुद्धा !"
ती अबोल राहिली. पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर पोहोचलो. रुम नं १०६ वर्ग पूर्णपणे भरला होता. मॅडमच्या हातात जाडजूड पुस्तक होते. त्यांचे शिकवणे सुरू होते. जेमतेम तीस एकतीस वयाचे.
"मे आय कमिंग !" मी म्हणालो,
त्यांनी आमच्यावर नजर टाकत आपल्या हाताच्या घड्याळाकडे पाहिले.
"कम"
आत शिरलो. सगळे पाहत होते. मॅडमसुद्धा पाहून हसत होते. त्यांनी हसत आमच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवीत लेक्चरला सुरुवात केली.
"म्हणून तुला मी सांगते हरामखोरा शेवटी आलं की असं विचित्र फील होतं" ! उद्यापासून मी तुझी वाट पाहणार नाही" ती हळू स्वरात बोलून बाकावर बसली.
मी तिच्या बाजूला बसून एक सुटकेचा सुस्कारा सोडला.
आज प्रमुख विज्ञान शाखेतले 'सोया' मॅडम येणार होते. ते खाजगी लेक्चर घेणार आहेत ते अजून आले नव्हते. वेळ निघून जात होती. पण त्यांचे दर्शन मात्र होत नव्हते.
ती शांतपणे लेक्चरमध्ये मग्न झाली होती. मी इकडे तिकडे मान बगळ्यासारखी फिरवीत होतो. माझ्या मागे मुले बसली होती. मला इशाऱ्याने चिडवीत होती.
अकस्मात मॅडम माझ्याकडे एकटक पाहू लागले. कदाचित माझ्यामुळे त्यांना शिकवताना व्यत्यय आला असावा. माझे अब्रूचे धिंडवडे काढू नये असे मला वाटत होते. पण मी त्याक्षणी बचावलो. सोया मॅडम आत आल्या आणि आम्ही त्यांना पाहून आनंदी होऊन टाळ्यांचा कडकडाट केला. ह्याक्षणी मी जाग्यावर उभा राहून टाळ्या वाजवत होतो.
मी जागेवर उभा राहून त्यांचे स्वागत करताच त्यांनी दोन्ही हाताने आपले तोंड झाकून हसू आवरलं.
"थँक्स यु ! हाऊ आर यु माय बच्चे ? "
" आय एम फाईन !" सगळ्यांचा स्वर एकच होता.
त्यांनी फारसा वेळ न घालविता लेक्चरला प्रारंभ केला. त्यांचा आजचा 'ह्दय' हा विषय.
"व्वाव !"
लेक्चर सुरू होता. मी थट्टेने रियाची गंमत करत होतो. हनुवटी हातावर ठेवून किंचित स्माईल देत मी तिच्याकडे पाहून तिला चितवीत होतो.
सोया मॅडमची दृष्टी माझ्यावर पडली.
"व्वाव ! बेटा तेरी क्या स्माईल है !"
मी दचकलो. चेहऱ्यावरचे हास्य मावळले. बाकावर असलेल्यांच्या माना मागे वळल्या. कोणाची स्माईल एवढी छान आहे अशा अविर्भावात.
"क्या हुवा मॅडम !" मी म्हणालो,
"सच मैं क्या स्माईल थी तेरी !"
मान वळवली. त्या तिला पाहू लागल्या. तिने मान माझ्या दिशेने वळवत म्हणाली"त्या माझ्याकडे पाहत आहेत, तुझ्यामुळे"
"कदाचित मॅडमला वाटत असेल की 'यु आर माय गर्लफ्रेंड'
"नो नो"
मानवाचा शरीरात हदयाचे कार्य किती महत्वाचे आहे. हे ह्या लेक्चरमधून वर्गाला समजत होते. बेल वाजली. एक तासाचा लेक्चर अर्धवट राहिला होता, पण पुढच्या तासाला हा विषय पूर्ण करू अशी ग्वाही देत ते बाहेर जात मला पाहून हसल्या.
मी तिचा हात पकडून तळ मजल्यावर पोहोचलो. चालत्या पायऱ्यांच्या खांबाला माझी बॅग अडकली होती.
"अरे तू का थांबला आहेस यार !"
"अगं माझी बॅग अडकली आहे "
" अरे बेवकुफ ! " ती मला ओढत ताणत ग्रंथालयाच्या मार्गे घेऊन जात होती.
आम्ही ग्रंथालयाच्या आत शिरलो. मोठं मोठे रॅक होते. त्यात हजारोंच्या संख्येत पुस्तके होती. रॅक नंबर सहामध्ये पोहोचलो.
"पुस्तक कुठे आहे रे ?" ती ओठावर बोट ठेवून पुस्तकांवर दृष्टी टाकत विचार करत होती.
" अरे शोधावे लागेल ?" मी तिला बाजूला सरकवले.
"अरे आपण लायब्ररीत आहोत ! मस्करी नको ? मला पहिली नोव्हेल शोधून दे !"
मी तिला काहीही न बोलता मुक्यापणे कादंबरी शोधायला सहकार्य करू लागलो. रॅक नंबर सहा मध्ये खालून दुसऱ्या 'रो' वर होती.
"हे घे... ! 'नोटबुक '! आता तू वाचू शकतेस"
काउंटरवर पोहोचलो. तिने स्वतःच्या नावे पुस्तक नोंद केले. सामान्य वाचकाला हे पुस्तक वाचायला किमान सहा दिवस पुरुसे आहेत. पण अवाचकाला दोनदा पुस्तकाची नोंदणी करावी लागेल.