Bhagy Dile tu Mala - 59 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ५९

किसीं को आसान लगता है
तो किसीं को मुश्किल
ये हमसफा है प्यार का
प्यार उसिको मिलता है जो जितता है दिलं..

एक वेळ अशी होती की स्वराच्या आयुष्यात प्रेम नक्की लिहिलं आहे की नाही अस वाटत होतं आणि आता स्वरा अशा वळणावर येऊन थांबली होती जिथे तिला एकच वाट निवडायची होती. पण प्रश्न एकच पडतो? आजच्या काळात टाइमापास प्रेम तर हजार होतील पण जेव्हा आपल्याला माहीत होत की आपल्यावर प्रेम करणारे दोन व्यक्ती आपल्यापेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम करतात तेव्हा नक्की काय करायचं? स्वता स्वार्थी होऊन स्वतःच प्रेम निवडायचं की दुसऱ्याच निस्वार्थ प्रेम समजून घेऊन त्याला पूर्णता सोपवायच. एक साधारण स्टेबल व्यक्तीही ह्या प्रश्नांच उत्तर सहजासहजी देऊ शकणार नाही मग स्वरा नक्की कस ह्याच उत्तर शोधू शकणार होती. तिच्या मनात कायम एकच प्रश्न घर करून राहू लागला " प्रेम त्याच की माझं??"

स्वरा दिल्लीवरून आली तेव्हापासून पुन्हा एकदा शांत झाली होती. त्याआधीचे काही दिवस तिच्या आजूबाजूला लोक असल्याने तिला ह्या प्रश्नांनी त्रास दिला नव्हता पण आता स्वराला हेच प्रश्न हैराण करू लागले. दिवस असो की रात्र मग त्याला वेळ नव्हती. एकदा की ती निवांत असली की तिला हे प्रश्न भरपूर त्रास देऊ लागले होते. हे दोन-तीन दिवस असेच विचार करण्यात गेले. स्वराला विचार करून-करून नीट झोप येत नव्हती आणि हळूहळू कामाच ओझं वाढू लागल होत. तिला नक्की काय करू काहीच सुचत नव्हतं.

अशातच एक दिवस निघाला.स्वरा- माधुरी नेहमीप्रमाणे ट्रेन मध्ये जात होत्या. अलीकडे फक्त स्वराच टेन्शन वाढलं नव्हतं तर माधुरीचा स्वभावदेखील बदलला होता. स्वराला तिच्या बडबड करण्याची सवय झाली होती पण माधुरी अलीकडे शांतच बसत असे. स्वरा जेवढ्या वेळ तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे तेवढ्याच वेळ ती तिच्याशी बोलत असे. बाकी पूर्ण वेळ त्यांचा शांततेत जायचा. स्वराला कदाचित माधुरीच्या अशा वागण्याच कारण माहिती होत पण तिला आता काही विचारून स्वराला स्वतःच टेन्शन वाढवून घ्यायच नव्हतं म्हणून तीही शांतच राहू लागली. त्यांचा शांत-शांततेतला प्रवास संपला आणि स्वरा ऑफिसला पोहोचली.

स्वराने ऑफिसला पोहोचताच कामाला सुरुवात केली. तिला पुण्याच्या एका प्रोजेक्टची फाइल तयार करायची असल्याने ती ऑफिसला आली की सतत कामात राहत असे. मग त्यासमोर तिला कशाचच भान राहत नसे. तशी ही एकच वेळ होती जेव्हा तिच्या डोक्यात प्रश्न येत नसत. स्वरा कामातच होती की तिला आवाज आला"अन्वय". अन्वयच नाव ऐकताच स्वराच सर्व लक्ष समोर गेलं. तिची ती बारीक नजर सर्विकडे त्याला शोधू लागली पण तो समोर कुठेच नव्हता. तिला अन्वय नावाचा भास झाला असेल म्हणून ती पुन्हा उदास होऊन कामाला लागली. काहीच क्षण गेले. पुन्हा एकदा आवाज आला " बाय बाय अन्वय सर!!"

ह्यावेळी तीच्या कानांनी बरोबर आवाज पकडला. तिला जाणवलं की दीपिका अन्वयशी बोलत आहे म्हणून हळूच ती दीपिकाच्या बाजूने वळाली. आज कार्तिक सर ऑफिसला नव्हते म्हणून गप्पा मारायला देखील काहीच प्रॉब्लेम होणार नव्हता. स्वरा दीपिकाकडे वळाली आणि हळूच चेहऱ्यावर हसू आणत तिने विचारले," अन्वय सरांशी बोलत होतीस?"

स्वराच्या आवाजाने दीपिकाच तिच्याकडे लक्ष गेलं आणि दीपिका हळूच हसत म्हणाली," हो. एक गुड न्यूज आहे. सरांना सुंदरशी भाची झाली आहे. काल मी त्यांना कॉल केला होता पण ते कामात व्यस्त असल्याने त्यांनी कॉल स्वीकारला नाही पण आज जेव्हा फ्री झाले तेव्हा त्यांनी कॉल केला. मला म्हणत होते नामकरणाला ये."

स्वरा हसतच उत्तरली," मग तू जाणार आहेस??"

दीपिका क्षणभर हसतच उत्तरली," हो स्वरा! सरांच्या फॅमिलीला जवळून बघता येईल आणि समजा त्यांना मी आवडलेच तर कदाचित नशिबाने मी कायमस्वरूपी तिथेच सेट होऊन जाईल."

दीपिका ते सर्व गमतीत म्हणाली होती पण स्वराला ते अजिबात आवडल नाही तरीही ती चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली," ताई, तुला माहिती आहे ना की त्यांना एक मुलगी आवडते. तरीही तू त्यांचे स्वप्न बघत आहेस??"

दीपिका आता क्षणभर शांत झाली होती आणि नकळत बोलून गेली," वेडाबाई मी गंमत करत आहे. तू का इतकी हायपर होत आहेस?? मला माहित आहे की ते मिळणार नाही मला पण प्रेम करणं, त्यांची स्वप्न बघन हा अधिकार तर माझ्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही ना?"

स्वरा किंचित हसली आणि तिला समोर बोलायला काहीच उरल नाही. हेच काहीतरी प्रश्न होते जे स्वराला प्रत्येक क्षणी त्रास देत होते त्यामुळे तिला उत्तर देणे आता स्वराच्या आवाक्यात नव्हते. त्यांच्या गप्पा बऱ्याच वेळ चालल्या पण पुन्हा एकदा तिच्या डोक्यात ते दीपिकाचे शब्द घर करून गेले.

आज स्वरा दिवसभर काम करत होती पण राहून- राहून तिची ती गोष्ट तिला त्रास देत होती. कधी कधी लोक हेतुपरस्पर बोलत नाहीत पण त्यांचे ते शब्द असे जिव्हारी लागतात की त्यांना मनातून काढून टाकने सहज शक्य होत नाही. स्वरा आज काम तर करत होती पण तीच पूर्ण मन कामात नव्हतं. ती अधून-मधून दीपिकाकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर तेज होत. अस तेज जे स्वराच्या चेहऱ्यावरही नव्हतं. अन्वय मिळू शकत नाही हे माहिती असतानाही तिच्या चेहऱ्यावर तेज कमी झालं नव्हतं तर दुसरीकडे स्वरा होती जिला अन्वयने आपलं सर्व आयुष्य सोपवलं होत तरीही स्वरा त्याला स्वीकारू शकत नव्हती. पण ह्या सर्वात एकच प्रश्न जास्त महत्त्वाचा होता. चूक नक्की कुणाची होती. स्वयमची ज्याने आपल्या वडिलांच ऐकलं की अन्वयची ज्याला ती आपली होणार नाही हे माहिती असतानाही तिच्यावर निस्वार्थ प्रेम केलं आणि सर्वात महत्त्वाचं चूक स्वराची की ती फक्त कुणाला एकालाच निवडू शकणार होती. ती नक्की कुणाला निवडणार होती??

रात्रीची वेळ होती. आज स्वरा आपल्याच विचारात हरवली होती. गेले काही महिने तिचा स्वतःशीच गोंधळ सुरू होता पण मागील दोन तीन दिवसात तिला ते सर्व विचार असह्य झाले होते म्हणून आज ती खूप बेचैन झाली होती. तिला संपूर्ण जगाशी संघर्ष करणे सोपे होते पण आज स्वतःशीच संघर्ष करायला ती कमजोर पडत चालली होती. जिथे नाती हा शब्द येतो तिथे विचार करताना लोक आपोआपच कमजोर पडतात. स्वराच्या आयुष्यात जर सर्व प्रॉब्लेम सोडवून कुणी गेला असेल तर तो अन्वय होता त्यामुळे तिला माहीत होतं की हादेखील प्रॉब्लेम तोच सोडवू शकतो पण प्रश्न असा होता की त्याच्याच बाबतीत त्याला नक्की कस विचारायचं. आज स्वरा विचित्र पेचात पडली होती. आज तिला जर तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसत तर कदाचित तिला वेड लागलं असत म्हणून आज कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता तिने आपल्या लकी चार्मला उत्तर मागायच ठरवलं. फोन लावताना देखील तिचे हात थरथरत होते तरीही हिम्मत करून तिने फोन लावला आणि फोन उचलण्याची वाट पाहू लागली. काही सेकंदच गेले असतील आणि समोरून आवाज आला," बोला मिस टॉपर! आज काय प्रश्न घेऊन आला आहात?? उलट अस म्हणेन किती गंभीर प्रश्न घेऊन आला आहात?"

अन्वयचा आवाज कितीतरी दिवसांनी तिने ऐकला आणि त्याच हसू ऐकून काही क्षण ती त्याच्या हसण्यातच हरवली. तिला भानच नव्हतं की तो काहीतरी बोलतोय. तो पुन्हा बोलायला लागला आणि तीही ओठांवर हसू आणत म्हणाली," तुम्हाला कस माहिती की मी प्रश्न घेऊन आलेय तुमच्याकडे? काही सिक्रेट आहे का को कॅमेरा लावून ठेवला आहे?"

अन्वयचा हसण्याचा आवाज आता जरा मोठा झाला होता आणि तो हसता- हसताच म्हणाला," खर सांगू की खोट??"

अन्वयच खोट पण खर्यापेक्षा आनंददायी असायचं त्यामुळे ती हसतच उत्तरली," अफकोर्स खोट आवडेल. तुमच्या खर्यात जी मज्जा नाही ती खोट्यात आहे."

तिचा आवाज ऐकताच अन्वय हळुवार आवाजात उत्तरला," तर मॅडम अस आहे की मी तुम्हाला तुमच्यापेक्षाही जास्त ओळखतो. तुमच्या डोक्यात काय सुरू असत हे सोबत नसतानाही मी ओळखू शकतो अगदी शांत असण्यावरून आणि बोलल्यावर शब्दावरून.."

त्याच उत्तर ऐकून स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल होत. ती आज पुन्हा एकदा खळखळून हसत होती. ती अन्वयची जादू होती की तो बोलायला लागल्यावर आपोआप तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं. ती हसतच होती की अन्वय उत्तरला," माझ्या खोट्यावर विश्वास ठेवून लोक इथेच फ्लॅट होतात बघ! आता खर उत्तर सांगतो. तू इतके दिवस स्वतःला रोखून कॉल केला नाहीस, दिल्ली येऊन भेटली नाहीस आणि आज अचानक ह्यावेळी कॉल करत आहेस म्हणजे नक्कीच काही प्रश्नांनी तुला त्रास दिला असणार. तुझा गोंधळ उडाला आणि तुला आठवल ते माझं नाव कारण तुलाही माहीत आहे, तुझ्या प्रश्नांची उत्तरे फक्त मीच देऊ शकतो. असो.. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. बघू तरी स्वरा मॅडमला कोणत्या प्रश्नाने हैराण करून सोडलय??"

स्वराला आतापर्यंत त्याला केव्हा प्रश्न विचारते अस झाल होत पण त्याला हसताना बघून त्याच हसू हिरावून घेण्यासाठी तीच मन तयार नव्हत त्यामुळे ती काही क्षण शांतच झाली तर अन्वय पुन्हा म्हणाला," तुमच्या शांततेंमागचं कारण समजतंय मला. मिस टॉपर! दुसऱ्यांचा भावनांचा जास्त विचार करू नये. आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. समोरचा आपल्या प्रॉब्लेमशी कसा डील करायचं तो ठरवेल. मी माझे प्रॉब्लेम सोडवू शकतो. सध्या तुमचा गोंधळ दूर होणे आवश्यक आहे. तसही मला वाटत की कधीकधी स्वार्थी झाल्याशिवाय आयुष्यात आनंद मिळत नाही. सो प्लिज गो अहेड!!"

स्वराने आता थोडीशी हिम्मत केली आणि हळुवार शब्दात उत्तरली," अन्वय सर, आयुष्यात जर भूतकाळात एखादा व्यक्ती आपल्याला सोडून गेला आणि तो आता परत येत असेल तर त्याला माफ करून स्वीकारणं कितपत योग्य आहे?त्याला पूर्ण आयुष्य बनविणे कितपत योग्य आहे?"

तिचा प्रश्न ऐकताच बडबड करणारा अन्वय पूर्णता शांत झाला. त्याचा आवाज येत नव्हता आणि स्वरा इकडे उत्तरासाठी आसुसली होती. तिने काही क्षण त्याच्या उत्तराची वाट बघितली आणि घाबरतच बोलून गेली," सर काय झालं तुम्हाला पण येत नाहीये का उत्तर?? किती त्रास देतोय मला हा प्रश्न? मला वाटलं की ह्या प्रश्नाचं तुम्ही तरी देणार पण..?"

अन्वय जरा हळुवार आवाजात उत्तरला," मॅडम उत्तर तर तेव्हा देईन जेव्हा मला तुम्ही पार्श्वभूमी सांगणार. अस तर म्हणूच नका की ही माझ्या मैत्रिणीची कथा आहे. ही तुझीच गोष्ट आहे मला अंदाज आहे आणि तू कुठल्यातरी मुलाबद्दल बोलत आहेस हेही माहीत आहे मला. सो चल सांग काय झालं ते. अन्यथा मी योग्य सल्ला देऊ शकणार नाही. सल्ला हवा असेल तर सर्व गोष्टी माहिती असाव्या तेव्हाच निष्पक्ष सल्ला देऊ शकतो."

स्वराला अजिबातच अंदाज नव्हता की तो तिच्या दुखत्या नसेवर बोट ठेवणार. स्वयमचा विषय निघाला असता तर त्याचा सरळ अन्वयशी संबंध आला असता म्हणून स्वरा घाबरली होती तर आता अन्वय उत्तराची आतुरतेने वाट बघत होता. स्वराला आता फोन जसाच्या तसा ठेवून द्यावासा वाटत होता पण ती देखील करू शकत नव्हती. ती मनातून खूप घाबरली होती आणि अन्वय हळूच उत्तरला," स्वरा मला माहित आहे तू का शांत बसली आहेस. तुझ्या जागी मीही असतो तर शांतच बसलो असतो पण सिरीयसली सांगू ना तुला त्रास देणाऱ्या प्रश्नांपेक्षा माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही सो मला त्रास वगैरे होणार नाही. बाकी तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तू फोन ठेवू शकतेस. तुझ्या मनात तेच तर सुरू आहे की फोन ठेवून सुटका करून घ्यावी तस असेल तर मीच ठेवतो फोन."

स्वरा जेवढ्या वेळ अन्वयला समजून घेत होती तेवढ्या वेळ ती त्याच्या स्वभावात हरवून जात होती. इतका निस्वार्थ व्यक्ती तिच्या आयुष्यात कुणीच नव्हता म्हणून ती हळूच म्हणाली," सर त्याच नाव स्वयम!! कॉलेजला सोबत होतो आम्ही. आमचं प्रेम होतं एकमेकांवर पण नियतीने वेगळं केलं. राजबद्दल स्वयमच्या बाबांना माहिती होतं. राजने स्वयमला माझ्यापासून दूर राहा म्हणून धमकावल तेव्हा त्याचे बाबाही तिथेच होते आणि त्याच्या बाबांनी त्याच्याकडून वचन घेतलं की तू स्वराला पुन्हा कधीच भेटणार नाहीस. दोन प्रेम करणार्या लोकांना काही कारणास्तव वेगळं व्हावं लागलं. जेव्हा माझ्यासोबत इतका मोठा अपघात झाला तेव्हाही तो माझ्यासोबत नव्हता. मला राग राजचा नव्हताच, मला राग होता तो स्वयमच्या वागण्याचा. तो मला एकदाही का भेटायला आला नाही म्हणून रागावले होते. मी जगाला ह्या८ वर्षात खोट सांगत होते की मी त्याला विसरले आहे पण त्याला नाही विसरू शकले. त्याने अस का केलं असावं हा प्रश्न मला कायम सतावत होता. त्याचा विचार करता- करता ८ वर्ष गेले आणि त्याचा एक दिवस फोन आला. त्याने मला सत्य स्थिती सांगितली आणि मी भारावून गेले."

अन्वयने तिला मधातच अडवत गंभीर स्वभावात विचारले," कसली सत्यस्थिती?"

स्वरा बोलता- बोलता जरा भावनिक झाली होती आणि उत्तरली," त्याने अपघात झाला ही बातमी ऐकली आणि माझ्याकडे धावत येऊ लागला पण त्याच्या बाबाने त्याला वचन मागितले की तो मला भेटायला येणार नाही. स्वयमने तरीही ऐकलं नाही आणि तो माझ्याकडे येऊ लागला तेव्हाच त्यांना अस्थमाचा अटॅक आला. ते हॉस्पिटलमध्ये गेले पण घरी एकाच अटीवर परतले की स्वयम आता कधीच स्वराशी भेटणार नाही. त्याने फक्त वडिलांच्या जीवनासाठी ती अट स्वीकारली आणि स्वता विरह यातना सहन करत जीवन जगू लागला. अलीकडे त्यांचे बाबा वारले आणि त्याने मला हकीकत सांगितली. आता तो माझ्या आयुष्याचा कायमस्वरूपी भाग होऊ पाहतोय. समजत नाहींये काय करू? ह्या एका प्रश्नाने खूप गोंधळ उडाला आहे माझा. करा ना सर मला मुक्त ह्यातून!!"

तीच बोलणं झाल्यावरही अन्वय बराच वेळ शांत होता. तीही उत्तर ऐकून घेण्यास आतुर होती. तेव्हाच तो हसत उत्तरला," मेन प्रोब्लेम हा नाहीच, खरा प्रॉब्लेम तू सांगितला नाहीस मला. तू ज्याचा ८ वर्ष विचार करत होतीस, तो तुझ्या आयुष्याचा भाग होतोय हे बघून तुला आनंदी व्हायला हवं होतं पण तस काहिच नाही म्हणजे प्रॉब्लेम हा नाही. प्रॉब्लेम नक्की काय आहे ते मला कळेल का?"

अन्वय हुशार होता हे तिला आधीच माहिती होत पण तिच्या मनातल्या प्रत्येक भावना तो इतक्या सहजासहजी शोधून काढेल अस तिला स्वप्नांत सुद्धा वाटलं नव्हतं. ती ह्याच प्रश्नापासून पडत होती पण नेमका तोच प्रश्न तिच्यासमोर येऊन उभा होता. तिची बोलती बंद झाली होती. हृदयाचे ठोके कितीतरी पटीने वाढले होते. तिला नेमकं काय बोलू सुचत नव्हतं आणि तो हसत उत्तरला," ओ आय सी! इथे प्रॉब्लेम मीच आहे. तरीच मला फेस करायला घाबरत होतीस? नाही तर दिल्लीला येऊन मला भेटणार नाहीस हे शक्य नव्हतंच. असो ह्यावर आपण नंतर बोलू आधी मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो."

स्वरा शांत होती. तो काय बोलतो ह्याकडे तीच पूर्ण लक्ष होत आणि तो म्हणाला," स्वरा आयुष्यात चूक महत्त्वाची की माणूस हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. चूक महत्त्वाची असेल तर माणसाला सोडायला हवं आणि माणूस महत्त्वाचा असेल तर चूक दुर्लक्षित करायला हवी मग ती कितीही मोठी असो!! मला वाटत की जर आपल्या आयुष्यात एखादा व्यक्ती खूप जास्त महत्त्वाचा असेल तर त्या चुकीला तेवढं महत्त्व देऊ नये. तो व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात इतका महत्त्वाचा असेल तर तो पुढेही तुमचं आयुष्य सुंदर बनवू शकतो हा विचार नक्कीच एकदा यायला हवा. एका चुकीमुळे त्याला आयुष्यातून बाहेर काढणे योग्य होणार नाही. चुका सर्वच करतात स्वरा पण त्याला शिक्षा करून आपण स्वतःलाच शिक्षा करतोय हे विसरून जातो. त्याला सोडल्यावर आपण तरी खुश असतो का? उलट मला वाटत त्याला चुकीच्या शिक्षेतून मुक्त करावं म्हणजे तो आपली चूक सुधारू शकेल. जर तो खरच प्रामाणिक असेल तर ती चूक सुधारायला आधीपेक्षा जास्त मेहनत घेईल आणि पुन्हा तुमच्या आयुष्यातया आनंद येईल कारण त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात आनंद शक्यच नाही. एखाद्याला मुक्त करणे तुझ्यापेक्षा कुणाला चांगलं कळेल? आता एक प्रश्न पडतो त्याने पुन्हा दुखावलं तर?? मी म्हणेन आधी त्याने जेवढा त्रास दिला त्यापेक्षा तो जास्त असणार नाही आणि आपल्याला आनंद ह्याचा असेल की आपण त्याला संधी दिली सो मी म्हणेन की ती संधी तू त्याला द्यावी."

स्वरा घाबरलेल्या स्वरात उत्तरली," आणि दुसर उत्तर??"

अन्वय क्षणभर हसतच उत्तरला," सोपं आहे स्वरा! मी तुला मिळवाव म्हणून काहीच केलं नाही. सो तू दुसर्याची होण्याचा त्रास होणे शक्यच नाही. मला जास्त त्रास केव्हा झाला होता माहिती आहे जेव्हा तू म्हटलं की आई-बाबासाठी जीवन आहे. ते गेल्यावर माझी काही स्वप्न नाहीत. खर सांगू ह्याक्षणी मला खूप आनंद होतोय. आता तुझ्या आयुष्यात कुणीतरी असेल जो तुला स्वप्न दाखवेल, स्वप्न पूर्ण करायला मदत करेल त्यातच सर्व आलं. मीही मुंबई सोडताना बाप्पाला हीच प्रार्थना केली होती की तुझ्या आयुष्यात कुणीतरी असावा जो तुला आनंदी ठेवेल. ही प्रार्थना नव्हती केली की तो मीच असावा. हेच माझ्यासाठी प्रेम आहे. तुम्ही एकमेकांवर प्रेम करता ह्यापेक्षा मला काहीच नकोय. खूप आनंद होईल मला तुम्ही एक झाला तर."

अन्वय हसत होता तर स्वरा विचारात पडली होती. अन्वय तिची शांतता जाणून होता म्हणून पुन्हा म्हणाला," बोला मॅडम आणखी काय उरल आहे? म्हटलं ना तुझ्या शांततेमागचं कारणही कळत! सो बोला!!"

स्वरा क्षणभर विचार करत उत्तरली," सर मला एक प्रश्न पडतो की जर स्वयमचे बाबा आज जिवंत असते तरीही त्याने मला लग्नासाठी विचारलं असत का? मान्य आहे की त्याची आई मला मुलीप्रमाणे ट्रीट करते पण बाबांच्या विरोधात जाऊन त्याने ते केलं असत का? आणि सर्वात महत्त्वाचं मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही त्याच्या जागी असतात तर काय केलं असत??"

अन्वय आता जरा सिरीयस होत म्हणाला," ह्याबाबतीत त्याच जरा चुकलंच. ह्या ८ वर्षात त्याने बाबांना मनवायला प्रयत्न करायला हवे होते. स्वरा प्रेम म्हणशील तर कधी लोक चुकतात तर कधी परिस्थिती हातात नसते म्हणून प्रेम चुकीच आहे म्हणणं योग्य नाही. कधीकधी आपण आपल्याच लोकांच्या विरोधात जायला घाबरतो त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला स्वीकारणं कठीण होत जातं. आयुष्यात दोन लोक महत्त्वाचे असताना फक्त एकाला निवडण सोपं नसतंच. मग परिस्थिती काय असते त्यानुसार निर्णय घेतल्या हातात. बहुदा त्यानेही असच केलं. आता राहील माझं. मी त्याच्या जागी असतो तर घरच्यांशी भांडून तुझ्याशी लग्न केलं असत. पण त्यांना सोडलं नसत. मी त्यांना मनव्हायला सतत प्रयत्न केले असते. खर सांगू तर माझ्या आईला देखील सुंदर मुलगीच हवी आहे, तेव्हाच तिने मला आलेले स्थळ नाकारले सो मला वाटत आपल्या बाबतीत तो प्रॉब्लेम झालाच असता पण मी दोघांच्या मध्ये भिंत बनून कायम तुला सपोर्ट केला असता. असो ते बर झालं की तुला आता ह्या सर्व समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तुला समजून घेणारा, तुझा जिवलग व्यक्ती मिळतोय ह्यातच मला आनंद आहे. स्वरा जा आता तुला आकाशाला स्पर्श करायलाही कुणीच अडवणार नाही. स्वप्न बघ त्याच्यासोबत आणि पूर्णही कर. बाकी कुणाचाच विचार करू नकोस. मग त्यासाठी स्वार्थी बनाव लागलं तरी हरकत नाही. नवीन आयुष्यास सुरुवात कर कदाचित हेच माझं स्वप्न होत अस समज."

अन्वय बोलतच होता की स्वराला मुलीचा रडण्याचा आवाज आला आणि ती उत्तरली," तुम्हाला भाची झालीय ना!! खूप खूप अभिनंदन!!"

अन्वय हसत उत्तरला," धन्यवाद मॅडम! आता तुम्ही असे सुंदर स्वप्न सजवा आणि जगाला प्रेमाचा अर्थ द्या. मला लग्नाला बोलवायला नक्की विसरू नका. बर मॅडम मी माझ्या भाचीला घेतो ती रडत आहे. आपण बोलू नंतर बाय."

त्याने बाय म्हणत फोन ठेवला आणि स्वराच्या चेहऱ्यावर हसू आलं. एक फोन, एक आवाज आणि क्षणात बेचैनी नाहीशी. काय होता अन्वय?? एक मूर्ख व्यक्ती जो आपल्याच आवडत्या व्यक्तीला दुसर्याला सोपवू पाहत होता की निस्वार्थ प्रेम करणारा? ज्याला मिळवायच नव्हतं फक्त तिच्यावर प्रेम करायचं होतं.

स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतल. ते हसू कोणत्या दिशेने इशारा करत होत? स्वराच्या हसण्याचा अंदाज जवळपास सोपाच आहे. अन्वयच एक उत्तर आणि सर्व काही सोपं. काय होत तिच्या हसण्या मागचं उत्तर...

जिंदगी के सफर मे
अक्सर ऐसा होता है
मुश्किल फैसला ही
हमेशा बेहतर होता है

क्रमशा....