Chatur Vhya 5 books and stories free download online pdf in Marathi

चतुर व्हा 5

चतुर व्हा

© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as MatruBharti.

MatruBharti has exclusive digital publishing rights of this book.

Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.

MatruBharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

ओले हात

एकदा जपानच्या बादशहाने आपल्या राजसभागृहात, आपल्या राज्यातील सर्व लहान— मोठया अधिर्कायांची सभा घेतली. सभेला उद्देशून तो म्हणाला, मी लोकांच्या कल्याणासाठी, आपल्या राज्यातील नगरांप्रमाणेच खेडोपाड्यांसाठीही वर्षानुवर्षे एवढा पैसा खर्च करीत असताना, राज्याचा कायापालट का होत नाही ? बघावं, तर प्रजा त्याच दारिद्रयात, त्याच अज्ञानात व त्याच रोगराईत खितपत पडली आहे. हे असं का व्हावं ?

बादशहाच्या या प्रश्नाला उत्तर द्यायला कुणीच अधिकारी उभा राहिना. अखेर स्पष्टवक्तेपणा व निस्पृहता या गुणांविषयी प्रसिध्द असलेल्या विंगचॅंग या आधिर्कायाकडे बादशहानं आपली प्रश्नार्थक नजर वळविली. तेव्हा विंगचॅंग याने प्रथम सेवकाकरवी बर्फाचा एक नारळाएवढा मोठा गोळा मागवून घेतला व तो बादशहाच्या हाती देऊन तो त्याला म्हणाला, श्महाराज ! हा बर्फाचा गोळा केवढा मोठा आहे, पाहिलंत ना ? आता मी एक सामान्य खेडूत म्हणून या सभागृहाच्या आपल्या विरुध्द बाजूच्या अगदी टोकाला जाऊन उभा राहातो. आपण हा बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या अधिर्कायाकडून मागल्या रांगेतल्या अधिर्कायाकडे, त्याच्याकडून त्याच्या मागल्या रांगेतल्या अधिर्कायाकडे याप्रमाणे एकदम मागल्या रांगेत उभ्या असलेल्या माझ्याकडे पाठवा, मग मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो. बादशहाने त्याप्रमाणे केले.

त्याने तो बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या मंर्त्याच्या हाती दिला. मंर्त्याने तो गोळा मागल्या रांगेत बसलेल्या आपल्या वैयक्तिक कारर्भायाच्या हाती दिला. त्याने तो मागल्या रांगेतील जिल्हाधिर्कायाकडे, त्याने त्याच्या मागल्या रांगेतील उपजिल्हाधीर्कायाकडे, त्याने त्याच्याही मागल्या रांगेतील मामलेदाराकडे, असं होता होता, जेव्हा गोळा प्रत्येक रांगेतल्या अधिर्कायाचे हात ओले करीत करीत, सवार्ंत मागल्या रांगेत उभ्या असलेल्या विंगचॅंगच्या हाती गेला, तेव्हा त्याचा आकार सुपारीएवढा होऊन गेला होता !

तो सुपारीएवढा खडा हाती येताच, तो स्पष्टवक्तेपणा व सचोटी याविषयी प्रसिध्द असलेला विंगचॅंग बादशहाकडे धावत गेला व तो खडा त्याला दाखवून म्हणाला, महाराज, आपण मंर्त्याच्या हाती देताना हा बर्फाचा गोळा केवढा मोठा होता, आणि माझ्या हाती पडताना तो किती लहान झाला, हे प्रत्यक्ष पाहिलंच ना? तशीच गत आपल्या सर्व कल्याणकारी योजनांची झाली आहे. राज्याच्या प्रत्येक विभागातील लोक कल्याणकारी योजनांसाठी आपण मोठमोठया रकमा मंजूर करता, आणि इथून पाठवूनही देता. पण ती रक्कम त्या भागात पोहोचती होईपयर्ंत प्रत्येक अधिकारी आपले हात ओले करुन घेतो आणि प्रत्यक्षात राज्याच्या त्या त्या विभागाच्या विकासासाठी नाममात्र रक्कम खर्च केली जात असल्याने त्या विभागाचा विकास तसाच मागे रहतो. मग राज्याचा कायापालट व्हावा कसा? आणि गरीब माणूस तरी सुखी व्हावा कसा?

समस्या—पूर्ती

माळव्याचा राजा भोज अज धारानगरी या आपल्या राज्याच्या राजधानीत रहात होता. राजा असा प्रजाहितदक्ष व विद्वान होता, तसाच रसिक होता. त्यामुळे त्याच्या पदरी कालीदासासारखे कवी व महापंडित होते.

एकदा भोजराजाच्या राजवाड्यात पहिल्या मजल्यावरील आपल्या शयनमंदिरात राणीची वाट पहात बसला होता. त्याच वेळी राणी तळमजल्यावरून शयनमंदिराकडे जाण्यासाठी जिन्याच्या पार्यया चढू लागली. पार्यया चढत असता, पतीबद्दलच्या विचारांच्या तंद्रीत तिचं एक पाऊल चुकीचं पडून, तिचा तोल गेला, आणि तिच्या हातातील—चंदनलेप असलेली सोन्याची वाटी पडून तो ठण ठण ठण ठण असा आवाज करीत गडगडत जिन्याच्या तळापयर्ंत गेली.

भोजराजानं ही घटना लक्षात घेऊन दुर्सया दिवशी ‘नवरत्नांनी' म्हणजे नऊ कवी—पंडितांनी भरलेल्या आपल्या दरबारात एक श्समस्याश् पूर्ण करण्यासाठी मांडली. तो म्हणाला, असा एक अर्थपूर्ण श्लोक बनवा की ज्यात ‘ठाठं ठठं ठं, ठठठं ठठं ठम' ही ध्वनीवाचक अक्षरांची ओळ चपलखपणे बसेल.

इतर सवार्ंनी मेंदू शिणवले, पण कुणालाच ती समस्या पूर्ण करणे जमेना, तेव्हा महान प्रतिभासंपन्न कवी कालिदास उभा राहिला व म्हणाला —

लोकभोजस्य भार्या मदविव्हला या कराच्च्युतं चंदनहेमपात्रम। सोपानमार्गे प्रकरोति शब्दम।

ठाठं ठठं ठं ठठठं ठठं ठम

अभिप्रेत अर्थ — कामविव्हल झालेली भोजराजाची पत्नी चंदनलेपाने भरलेले भांडे घेऊन जिन्याच्या मार्गाने जात असता, तिच्या हातातील भांडे पडले व जिन्यातून गडगडत खाली जाताना त्यानी श्ठाठं ठठं ठं ठठठं ठठं ठमश् असा आवाज केला. कालिदासाने केलेल्या समस्यापूर्तीमुळे राजसभे प्रमाणेच भोजराजाही थक्क झाला आणि त्याने त्याला एक हजार सुवर्ण मोहरा देऊन त्याचा गौरव केला.

डोकेबाज यमदूत

एक मुर्तीकार मुर्ती व पुतळे अगदी हुबेहुब बनवी ज्याची मुर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई.त्याने खुर्चीवर बसलेल्या व हातात काठी घ् ोतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता, त्या पुतळ्‌याला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घ् ाराच्या पुढल्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहुब होता की खराखुराच रखवालदार पर्हायावर बसला असल्याचा चोर दरोडेखोरांचा समज होऊन, ते त्या मुर्तीकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत.

नामवंत कलावंत म्हणून, त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले. आता आपली शंभरी निमित्त जंगी सत्कार व्हावा एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होतीय म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदुताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वतरूचे नऊ पुतळे तयार केले होते. अगदी सही सही स्वतरूसारखे.

एकदा त्याला, आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळ्‌यात दहावा पुतळा म्हणून निश्चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात तो तिथे एकासारखे एक, असे दहा मुर्तीकार! काही म्हणजे काही फरक नाही ! श्यातल्या कुणाला घेऊन जावं? हा त्यांच्यापुढे पेच पडला.

तेवढ्यात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहर्कायांना मुद्दाम म्हणाला, बाबांनो ! असं गोंधळून जाण्यासारखं काय आहे? कारण र्खया मुर्तीकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळ्‌यात दाखवायचं राहून गेलं आहे.त्या बुद्धीवान यमदूताच्या या विधानानं अपमानित झालेला त मुर्तीकार पटकन उठून म्हणाला, श्उगाच जीभ आहे, म्हणून काहीतरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष, मी या पुतळ्‌यात दाखविलेला नाही?

यावर तो चतूर यमदूत म्हणाला, हे चित्रकारा ! तुझ्यात आणि तुझ्या या पुतळ्‌यात काहीएक फरक नाही. पण श्तुझ्याप्रमाणे हे तुझे पुतळे नाहीतश् असे म्हटले की, अपमान होऊन तू काहीतरी बोलू लागशील, असे मला वाटत होते. माझ्या अंदाजाप्रमाणे तू बोललास आणि या चित्रशाळेतील दहा पुतळ्‌यात मिसळून गेलेला खरा चित्रकार कोणता, हा आम्हांला पडलेला पेच तू स्वतरूच सोडविलास. चल आता आमच्या संगे.

खरी नक्कल

भोजराकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला. त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.

भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखाने आला, तशाच र्तहेने निघून जाऊ लागला. दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही.

त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला. त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसचय पण मला मुजरा करण्याचं साधे सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.

बहुरुपी म्हणाला, महाराज! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांच घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो. बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन—तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याला तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.

हेही गेले, तेही गेले !

एक म्हातारी होती. एकटीच असली, तरी सुखवस्तू होती. ती काशीयात्रेला जायला निघाली. यात्रेला निघण्यापूर्वी ती आपलं दागिन्यांचं डबोलं घेऊन, गावाबाहेर कुटीत रहार्णाया एका गोसाव्याकडे गेली आणि त्याला म्हणाला, श्गोसावीबुवा ! मी काशीहून घरी परत येईपयर्ंत हे दागिन्यांच गाठोडं तेवढं सांभाळून ठेवा. श्गोसावी तिला म्हणाला, आजीबाई ! मी दुर्सयाच्या घनदैलतीला स्पर्श करीत नसतो. तू या माझ्या कुटीसमोर एक खोल खड्डा खण आणि त्यात ते दागिन्यांच गाठोडं पुरुन, तो खड्डा बुजवून टाक. गोसाव्याच्या त्या निरिच्छपणावर भुलून त्या म्हातारीनं त्याच्या समक्षच त्या कुटीसमोर एक खड्डा खणला व त्यात आपले दागिने पुरले.

तीनएक महिन्यानंतर जेव्हा ती म्हातारी घरी परतली व त्या कुटीसमोरील खड्डा उकरुन पाहू लागली, तेव्हा तिला ते दागिने नाहीसे झाले असल्याचं आढळून आलं. तिने प्रथम त्या गोसाव्याची मनधरणी केली, आणि नंतर बरीच कान उघाडणीही केली, पण तो गोसावी मख्खपणे तिला एकच उत्तर देई. श्मी तुझ्या दागिन्यांना स्पर्शही केला नाही. नाइलाज होऊन ती म्हातारी चरफडत घरी गेली व दुरूख करु लागली, तिच्या दुरूखाचे कारण कळताच, शेजारी तिला धीर देऊन म्हणाला, आजी ! तुम्ही या गोष्टीची कुठेही वाच्यता करु नका. तुमचे दागिने मी तुम्हाला परत मिळवून देतो.

अशा स्थितीत एक आठवडा निघून गेला, आणि तो शेजारी दागिन्यांनी भरलेले दोन डाबे घेऊन

याच गोसाव्याकडे गेला. ते दोन्ही डबे त्या गोसाव्याच्या समोर उघडून, तो त्याला म्हणाला, साधूमहाराज! दिल्लीला असलेला माझा धाकटा भाऊ एकाएकी अतिशय आजारी असल्याचं पत्र आलयं, तेव्हा घर बंद करुन, सर्व कुटुंबासह मी आज संध्याकाळी दिल्लीला चाललो आहे. म्हणून माझी आपल्याला एकच विनंती, की आपण हे सर्व दागिने आपल्याजवळ जपून ठेवावे.

जवळजवळ शंभर सव्वाशे तोळ्‌यांचे ते दागिने पाहून, त्या गोसाव्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने मनाशी ठरवूनही टाकलं की, हे दागिने आपल्या ताब्यात देऊन हा माणूस गाव सोडून दिल्लीला गेला रे गेला, की हे दागिने व भरीस त्या म्हातारीचे दागिने घेऊन आपण कुठे तरी दूर पळून जायचं.

याप्रमाणे विचार करुन तो भोंदू बैरागी त्या गृहस्थाला म्हणाला, मी बोलून चालून संन्यासी. मी तुमच्या दागिन्यांना कसा स्पर्श करु? तुम्हीच या माझ्या कुटीसमोर खोल खड्डा खणा, आणि त्यात तुमचे हे दागिन्यांचे दोन डाबे पुरुन टाका. त्या बैराग्याच्या म्हणण्याप्रमाणे तो गृहस्थ हळूहळू खड्डा खणू लागला. तेवढ्यात त्या गृहस्थानं अगोदरच सांगून ठेवल्याप्रमाणे कुठेतरी झाडाआड दडून राहिलेली म्हातारी तिथे आली.

‘आता या म्हातारीनं जर तिचे दागिने आपण बळकावल्याची माहिती याला सांगितली, तर हा गृहस्थ बिथरेल व शेसव्वाशे तोळे वजनाचे दागिने घेऊन परत जाईल. तेव्हा आता या म्हातारीच्या वीस—पंचवीस तोळे वजनाच्या दागिन्यांवर पाणी सोडणेच शहाणपणाचे आहे,' असा विचार करुन तो लुच्चा बैरागी त्या म्हातारीला म्हणाला, अगं आजीबाई! मला वाटतं तू दागिने पुरलेस एका ठिकाणी, आणि ते परत काढून घेण्यासाठी जमीन खोदलीस भलत्याच ठिकाणी. तू त्या ठिकाणी खड्डा खणून बघ पाहू? म्हातारीला त्या गोसाव्याची ही लबाडी कळून आली, पण काही एक न बोलता तिने त्या जागी जमिन खोदताच, तिला तिथे पुरलेले तिचे दागिने मिळाले.

हा सर्व प्रकार त्या म्हातारीच्या—आता आपल्या दागिन्यांचे दोन डबे पुरण्यासाठी खड्डा खोदत असलेल्या—शेर्जायाचा दहा बारा—वर्षाचा मुलगा एका झुडपाआडून बघत होता. आजीबाईचे दागिने तिला परत मिळाल्याचे पाहून, तो बापाच्या पूर्वसुचनेनुसार तिथे आला हळूहळू खड्डा असलेल्या आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा! दिल्लीच्या काकांच पत्र आत्ताच डाकवाल्यानं आणून दिलयं. त्या पत्रात काकांनी लिहिलयं,

माझी प्रकृती आता चांगली सुधारणा असल्यानं, तुम्ही सवार्ंनी दिल्लीस येण्याची आवश्यकता नाही.श्मुलानं

याप्रमाणे सांगताच, त्या गृहस्थानं खणलेला खड्डा बुजवला आणि आपल्या दागिन्यांच्या डब्यासंह त्याने घ् ारचा रस्ता सुधारला.

त्याच्या पाठोपाठ आपल्या दागिन्यांच्या गाठोड्यासह जाता जाता ती म्हातारी त्या नाराज झालेल्या लुच्च्या बैरग्याला उद्देशून म्हणाली, अरे, बोकेसंन्याशा ! ध्यानधारणेचा आणि बैराग्याचा आव आणून, दुर्सयांना लुबाडू पाहातोस काय? चार दोन दिवसात तू हे गाव सोडून इथून कायमचा नाहीसा होय नाहीतर तुला हाकलवून देण्याचे काम मला गावातल्या तडफदार तरुणांच्यावर सोपवावे लागेल.