Chatur Vhya 4 books and stories free download online pdf in Marathi

चतुर व्हा 4

चतुर व्हा

© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as MatruBharti.

MatruBharti has exclusive digital publishing rights of this book.

Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.

MatruBharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

चतुर सुना

जपानमधील एका गावात राहणार्‌या फांग फू नावाच्या शेतर्कयाला दोन मुलगे होते. दोघांचीही लग्न झाली होती. एकदा त्याच्या दोन्ही सुना माहेरी जायला निघाल्या असता, त्यांनी त्याला विचारलं, श्मामंजे ! आम्ही तुमच्यासाठी काय आणू? तो शेतकरी मोठया सुनेला म्हणाला, तु कागदातून अग्नी आण. तिन होकार देताच तो धाकट्या सुनेकडे वळून म्हणाला, तु कागदातून वारा आण. धाकटया सुनेनंही त्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले.

त्या दोन्ही सुना माहेरी गेल्या. पंधराएक दिवस माहेरी राहून त्या घरी आल्यावर शेतर्कयाने मोठया सुनेला विचारलं, श्चिंगची ! आणलास का तू कागदातून अग्नी? यावर ती सून आतल्या खोलीत गेली, आणि थोड्याच वेळात, आतून पणती लावलेला कागदाचा कंदील घेऊन बाहेर आली. मोठया सुनेनं मोठया

युक्तीनं आश्वासन पुर्ण केल्याचा त्याला आनंद झाला.

त्यानंतर त्या शेतर्कयानं धाकटया सुनेला विचारलं, मिंगजी ! कागदातून वारा आणलास का? कोनाडयात ठेवलेला कागदाचा पंखा बाहेर काढून व तो सार्सयाच्या हाती देऊन ती, त्याला म्हणाली, मांमजी ! हा पंखा हाती घेऊन हलवीत रहा. मी त्याच्याबरोबर वाराही आणला आहे या गोष्टीची तुम्हाला प्रचीती येईल. दिलेलं आश्वासन धाकटया सुनेनही अशा र्तहेनं पूर्ण केल्याचे पाहून तो शेतकरी अंतरी संतुष्ट झाला आणि आपल्या दोन्ही सुना चतुर असल्याचा त्याला अभिमान वाटला.

घर लहानच बरे

सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, ष्काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहेय मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत?

सॉक्रेटीस म्हणाला, बाबा रे! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं ! पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, श्अरे वा ! तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !

देवा, तुमचं कसं व्हायचं ?

एक लाकूडतोडया लाकूड तोडण्यासाठी नदीकाठच्या झाडावर चढला असता, त्याची लोखंडाची र्कुहाड खाली असलेल्या खोल डोहात पडली. त्याला पोहता येत नसल्याने, डोहात उडी मारुन र्कुहाड काढता येईना. साहजिकच तो नदीच्या काठी बसून रडू लागला.

त्याला रडताना पाहून देव तिथे प्रकट झाला व त्याने एकामागून एक सोन्याची—चांदीची—तांब्याची—पितळेची व शेवटी लोखंडाची अशा पाच र्कुहाडी त्या डोहातून काढून त्याला दाखविल्या. परंतू त्यापैकी लोखंडाची र्कुहाड हीच आपली असे त्याने सांगितल्यामुळे देवाने त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन, त्याला पाचही र्कुहाडी इनाम म्हणून दिल्या.

तिथून देवलोकी गेल्यावर देवाने ही गोष्ट आपल्या देवी ला सांगितली. ती कून देवी म्हणाली, सध्याच्या काळी एवढा प्रामाणिक माणूस मिळणं कठीण. मला तरी दाखवा तो माणूस. देवीच्या आग्रहाखातर, देव तिला घेऊन भूलोकी लाकूडतोडयाच्या गावाबाहेर आला आणि लाकूडतोडयाच्या प्रामाणिकपणाची थोडीशी झलक देवीला दाखविण्यासाठी त्याने एक युक्ती योजली.

त्या लाकूडतोडयाची बायको गावाबाहेरच्या शेतावर गेली असता, देवाने मायेच्या योगाने तिला नाहीशी केली व देवीसह तो एका झुडपाआड दडून बसला. बराच वेळ झाला तरी शेतावर गेलेली बायको

घरी परतली नाही म्हणून तो लाकूडतोडया शेतावर गेला व तिचा शोध घेऊ लागला. बराच वेळ शोध घ् ोऊनही जेव्हा ती सापडेना, तेव्हा त्यानं ढसढसा रडत तिला हाका मारायला सुरुवात केली.

त्याला रडताना पाहून देव देवीला म्हणाला, देवी ! हाच बरं का तो प्रामाणिक लाकूडतोडया. आता मी तुला त्याच्या प्रामाणिकपणाचा नमुना दाखवतो.श्याप्रमाणे बोलून देव देवीसह त्या लाकूडतोडयाजवळ गेला व त्याने त्याला विचारले, बा लाकूडतोडया! तू का बरं रडतोस ? माझी शेतावर आलेली बायको नाहीशी झाली म्हणूनश्, लाकूडतोडयानं उत्तर दिलं. यावर देव म्हणाला, थांब रडू नकोस. मी तुला

एकामागून एक पाच बायका दाखवतो त्यातील तुझी कोणती ते खरं सांग, म्हणजे मी तिला तुझ्या स्वाधीन करीन.

याप्रमाणे बोलून देवानं तोंडानं कसलातरी मंत्र पुटपुटुन तिथे एक अप्सरेसारखी सुंदर व तरुण स्त्री निर्माण केली आणि तिच्याकडे बोट दाखवून त्यानं लाकूडतोड्याला विचारल, हिच का तुझी बायको? त्या स्त्रिचं रंगरुप पाहून मोहित झालेला तो लाकूडतोडया बेधडक म्हणाला, होय देवा ! हीच ती माझी हरवलेली माघारीण!श्त्याची ती लबाडी पाहून देवीनं आपल्या पतीकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं.

त्याबरोबर देव भडकून त्या लाकूडतोडयाला म्हणाला, मी तुला प्रामाणिक समजत होतो, पण तु लुच्चा आहेस. ही तुझी बायको आहे काय? श्यावर तो लाकूडतोडया स्वतरूची बाजू सावरण्यासाठी म्हणाला, देवा, तुमचा गैरसमज होतोयं. मागच्यावेळी पाच र्कुहाडी दाखवून, अखेर माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तुम्ही त्या पाचही र्कुहाडी मला बक्षीस दिल्यात. मग आताही पाच बाया दाखवून माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्या पाचही जणींना तुम्ही मला बक्षीस दिल्यात, तर त्यांच मी पोषण कसं करु? म्हणून मी ही पहिलीच बाई माझी बायको असल्याचे तुम्हाला सांगितले.

तुझं म्हणणं बरोबर आहे असं म्हणून देवानं ती स्त्री त्याच्या स्वाधीन केली आणि देवीसह तो देवलोकी जाऊ लागला. वाटेने जाताना देवी त्याला म्हणाली, देवा! बारीकसारीक गोष्टीत प्रामाणिकपणा दाखवर्णाया माणसाचा तो प्रामाणिकपणा मोठया आणि महत्त्वाच्या गोष्टीत टिकत नाही. त्या लाकूडतोड्यानं चातूर्याच्या जोरावर तुम्हाला चक्क फसवलं देवा, तुमचं कसं व्हायचं?

पांडित्य सत्कारणी लावा

पांड्य राजाच्या पदरी असलेल्या पंडीत कोलाहल याची बुध्दी असामान्य होती. त्याच्याकडे येर्णाया पंडिताने एखादे असत्यच नव्हे, तर सत्य विधान जरी केले, तरी पंडीत कोलाहल हा आपल्या तरल कल्पकतेच्या जोरावर ते विधान असत्य असल्याचे सिध्द करी. आपल्या पदरी असलेल्या या पंडिताचा पांड्य राजाला मोठा अभिमान वाटत होता, म्हणून त्याने एक पण जाहीर केला, जो कोणी माझ्या समक्ष

या माझ्या पंडीत कोलाहलांचा बोलण्यात पराभव करील, त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा तर देण्यात

येतीलच, पण त्याशिवाय त्याची दरबारात, पंडीत कोलाहल शास्त्यार्ंच्या जागी नेमणूक केली जाईल.

राजाने केलेला हा पण सर्वत्र जाहीर झाल्याने, देशोदेशीचे गाढे विद्वान त्याच्या दरबारी आले, पण पंडीत कोलाहल यांच्याकडून ते पराभूत झाल्याने, शरणागती लिहून देऊन परत गेले !एकदा भाष्याचार्य नावाचे पंडित आपला पट्टशिष्य यमुनाचार्य याच्यासह पांड्य राजाच्या दरबारी आले. भाष्याचार्य आपला पराभव करण्यासाठीच आले असल्याचे समजताच पंडीत कोलाहल पुढं आला आणि म्हणाला, भाष्याचार्य ! तुम्ही कोणतंही विधान कराय मी ते खोटं असल्याचं सिध्द करुन दाखवीन.श्श्खरं असलं, तरीही ते खोटं असल्याचं तुम्ही सिध्द कराल का? भाष्याचायार्ंनी प्रश्न केला.

पंडीत कोलाहल म्हणाला, अर्थात ! ते तर माझ्या अचाट बुध्दीचं वैशिष्ट्य आहे.श् भाष्याचायार्ंनी आव्हान दिलं, श्मग बाप हा अगोदर आणि नंतर मुलगा हे माझं विधान खोटं असल्याचं सिध्द करा पाहू?

यावर पंडीत कोलाहल म्हणाला, तुमचं म्हणणं साफ चुकीचं आहे. श्मुलगा हा अगोदर आणि नंतर बापश् ही वस्तुस्थिती आहे. जोवर मुलगा झालेला नसतो, तोवर त्या माणसाला कुणी बाप म्हणत नाही. एखाद्याला मुलगा झाल्यानंतरच त्याला बाप म्हटल जातं म्हणजे अगोदर मुलगा आणि नंतर बाप. तेव्हा भाष्याचार्यजी

! तुम्ही मला निमूटपणे शरणागती लिहून द्या आणि इथून निघून जा.

आपल्या गुरुचा शरणागती लिहून देण्याकडे कल झुकला असल्याचे पाहून शिष्य यमुनाचार्य पुढे सरसावून म्हणाला, श्पंडीत कोलाहल शास्त्रे ! बुध्दीच्या जोरावर ही तुम्ही केवळ शाब्दिक कसरत चालविली आहे. तरीही मी तीन विधाने करतो, ती खोट असल्याचं जर तुम्ही सिध्द केलतं, तर मी तुम्हाला नुसतीच शरणागती लिहून देणार नाही, तर मी तुमचा अजन्म सेवक होईन. मात्र तुम्ही माझे विधाने खोडू शकला नाहीत, तर राज दरबारातील ही वैभवशाली नोकरी सोडून आपलं पुढलं उर्वरीत आयुष्य तुम्ही अशिक्षीतांना व गोरगरिबांना शिक्षण देण्यात घालवाल का?

पंडीत कोलाहलांनी होकार देताच, पंडित यमुनाचार्य म्हणाला, माझं पहिलं विधान असं आहे की, तुम्ही ज्यांच्या आश्रयाला आहात ते पांड्य महाराज भरतखंडाचे भूषण आहेत,माझं दुसरं विधानं असं आहे की, पांड्य महाराजांची राणी सुनीतीदेवी ही थोर पतिव्रता आहे, आणि माझं तिसरं विधानं असं आहे की, पांड्य महाराज व राणी सुनीतीदेवी यांना देवानं शतायुषी करावं, अशी तुमची, माझीच नव्हे, तर सर्व प्रजेची मनोमन इच्छा आहे. यमुनाचार्य ही जी तीन विधाने केली, पांड्य महाराजांच्या समोर खोडून काढणं म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे. हे हेरुन पंडीत कोलाहलाने ती विधाने मान्य केलीय तरुण यमुनाचार्याला शरणागती लिहून दिली आणि राजदरबारातील नोकरी सोडून, तो अशिक्षित व गरीब लोकांना सुशिक्षित करण्यासाठी उरलेलं आयुष्य खर्च करण्यासाठी निघून गेला.

भुताला कामगिरी

एका मनुष्यानं देवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी कुठल्याशा मंत्राचा जप सुरु केला, पण त्या मंत्राचा जप करताना शब्दांचे उच्चार चुकीचे केल्यामुळे, त्याच्यावर देवा वजी भूत प्रसन्न झाले व ते त्याच्यासमोर प्रकट झाले.

ते भूत त्याला म्हणाला, श्तू मागशील ते मी तुला देईन आणि तू सांगशील ते मी करीन, पण जर का तू मजकडे काही मागायचा अथवा मला काम सांगायचा थांबलास, तर मात्र मी तुला खाऊन टाकीन. त्या माणसानं आंबे मागितले, भुतानं आंब्याचा हंगाम नसतानाही टोपलीभर आंबे त्याला आणून दिले! त्यानं

घराची झाडलोट करायला सांगितली, भुतानं दोन बायांची ती कामगिरी चार पाच मिनिटात उरकून टाकली ! त्यानं सुंदरपैकी स्वयंपाक करायला सांगितला, भुतानं पंचपक्वान्नांसहित असा स्वयंपाक हातोहात तयार करुन ठेवला ! दहा हजार रुपयांची मागणीही त्या भुतानं अशीच बघता बघता पूर्ण केली

!

श्मागून मागून आता एकसारखं मागायच तरी काय ? या विचारात तो मनुष्य पडला असता, ते भूत त्याला म्हणालं, श्मला सांगण्यासारखं काहीच काम नाही ना तुझ्या जवळ? मग मी आता तुला खाऊन टाकतो. भुताची एक धमकी कून त्या माणसाला एक युक्ती सुचली. तो त्या भुताला म्हणाला, श्एक मल्लखांब तयार करुन तो मागल्या अंगणात पूर पाहू ?श्मल्लखांब तयार करुन, तो पुरलादेखील, भूत म्हणालं. तो गृहस्थ त्या भुताला म्हणाला, श्बस्स ! आता त्या मल्लखांबावर अखंड चढणं उतरणं हेच तुझं मुख्य काम. फक्त मी बोलावीन तेव्हा माझ्याकडे यायचं, आणि माझं काम झालं रे झालं, की या मल्लखांबाकडे जाऊन, त्याच्यावर चढत उतरत राहायचं.

अशा र्तहेने त्या मनुष्यानं त्या भुताकडून आयुष्यभर आपली कामे तर करुन घेतलीच, पण उरलेल्या वेळेत त्या भुतामागे त्या मल्लखांबावर चढण्या—उतरण्याची कामगिरी लावून त्याच्याकडून कुठल्याही काम नसलेल्या वेळी येर्णाया मृत्युची भीतीही टाळली.