Library - 2 in Marathi Social Stories by Sweeti Mahale books and stories PDF | लायब्ररी - 2

लायब्ररी - 2

                                                                      भाग 2

                                                    
सलग दोन आठवडे उलटून गेले ,आता मात्र मलाच ते पुस्तक सारख उघडून पाहण्याचा कंटाळा यायला लागला..पण मानातली उत्सुकता काही जाईना.. अशी गम्मत करायला मला फार फार आवडते पण अजून कुणी काही बकरा सापडेना म्हणून मी जरा खट्टू झाले.पण तरी मी माझा नाद काही सोडला नाही रोज एकदा तरी येऊन मी पाहून जायची मात्र आता मलाच कंटाळा यायला लागल्याने हळूहळू एक दोन दिवसातून आणि नंतर नंतर तर आठवड्यातून एखादा दिवस सहज म्हणून चक्कर मारायची आज दोन आठवड्यांनी मी सहज आठवलं म्हणून त्या बाजूला वळले..आणि काय आश्चर्य चक्क त्या पत्राबरोबर आणखी एक पत्र ठेवलेलं मला दिसलं माझा आनंद गगनात मावेना.घाई घाईत मी ते उचलून वाचू लागले..क्षणात उत्सुकता आणि आनंद गायब झाला ते पत्र सवी ने माझी  गंमत उडवायला     म्हणून ठेवलं होतं…..मी ते तसच फाडून कचऱ्यात टाकलं..आता वाट पाहनही  जवळ जवळ संपत आल होत. सेमिस्टर एक्साम सुरू झाल्याने मी आता त्याविषयी विसरूनही गेले जवळ जवळ महिनाभर मी लायब्ररी मधे फिरकलेही नाही.
 त्या दिवशी सहज आठवण आली म्हणून मी त्या पुस्तकात शोधाशोध केली …तो माझाच लिहिलेला कागद मी स्वत्ताकडे घेऊन घरी जायला निघाले वाटेत पाऊस लागला आज काहीतरी वेगळाच आनंद होता त्या पावसात मुक्त वाहणारा वारा आणि चिंब करणारा तो पाऊस थंड वाऱ्याने हुडहुडी भरली भर पावसात मी स्कृटी वरून घरी चालले होते त्या हुडहुडीतही वेगळंलीच मजा जाणवत होती.गाडीचा वेग मात्र कमी होण्यापेक्षा अजूनच वाढला भिजलेल्या निसरड्या रस्त्यावर गाडी अचानक स्लीप झाली काही कळायच्या आत मी रस्त्यावर आदळून पडले नंतर डोळे उघडले तेव्हा आई बाबा माझ्या समोर उभे होते..मी हॉस्पिटलमध्ये होते बहुतेक,माझ्या हाता पायाला पट्ट्या बांधल्या होत्या . डॉक्टर अधून मधून तपासायला यायचे संपूर्ण अंग ठणकत होत. एक एक करून सगळे भेटून गेले मित्र ,मैत्रिणी, नातेवाईक सगळेच.
.दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बाबा माझ्याजवळ एक बुके ठेवला आणि तुझ्या मित्राने दिलाय अस म्हणाले..मित्र कोण? माझे सगळे मित्र तर येऊन गेले कालच मग हा कोण? मी आश्चर्याने विचारलं! काय माहीत नाही बाबा ही सहज म्हणाले..असेल कुणीतरी म्हणून मी जास्त चौकशी केली नाही..आधीच तो भयंकर त्रास मला सहन होईना खुपच लागलं होतं.३-४ दिवस हॉस्पिटल मध्ये घालवले तिथे तर मला जाम कंटाळा आला. 
Finally डॉक्टरांनी डिस्चार्ग दिल्यावर मला घरी आणल किमान एक महिना तरी मला सक्तीची विश्रांती घ्यायची होती, दहा बारा दिवसातच मी कंटाळले रोज मित्र मैत्रिन्नींना फोन करून तास तास गप्पा मारण्याचाही आता हळूहळू कंटाळा यायला लागला..तासभर मोबाईल चाळून झाल्यावर कंटाळून मी तो फोन चिडून फेकला अस ऐकट बसण्याचा मला आता कंटाळा आला होता,हळू हळू चालत नेहमीप्रमाणे मी खुर्ची ओढून माझ्या नेहमीच्या आवडत्या जागी म्हणजे खिडकी समोर बसले जिथून लांब लांब पर्यंत फक्त हिरवी झाडी दिसायची ना कुणाचा काललाट ना कसला गोंधळ घर तस फारच एकांतात जिथे फार रहदारीचा त्रास होणार नाही असंच…पावसाळ्यात तर जणू ते स्वर्गागतच भासे रात्री सुटणार थंड वरा मनाला भुरळ पडायचा बराच वेळ बाहेर पाहत बसल्यावर मी पुन्हा काहीतरी आटवून जवळच असलेल्या तो ड्रॉवर उचकला ..आत काय काय भरून ठेवलं होतं आईने माझ्या ब्यागेतल साहित्य माझ्या ड्रॉवर मधे तसच ठेवलं होतं..सहज काहीतरी आठवून मी ते ती वही समोर घेतली तो कित्येक महिन्यांपूर्वी लिहिलेला कागद त्या वहीत ठेवला होता पावसाने भिजून तो कडक पापडासारखा झाला होता त्यावरचा मजकूर मात्र काही पुसला नव्हता …
        मी मोडक्या तोडक्या बेचव ओळींत लिहिलेली कविता मात्र तशीच होती.. ती वाचून मला माझ्याच बालिश मनाचं हसू आलं काहीही वेडेपणा सुचतो मला मी स्वत्ताच्याच डोक्यात टपली मारली तो कागद मी दोन्ही हातात धरून फाडणार तसं त्या खिडकीतून येणाऱ्या उजेडात त्याच्या मागच्या बाजूने काहीतरी लिहिलेलं असल्यासारखं जाणवलं,ते उलटून पाहिलं तर ते मला कोर दिसलं ,दोन तीनदा मी ते खिडकीसमोर सूर्यप्रकाशात निरखून पाहिलं तेव्हा मला खात्री पटली यात नक्की काहीतरी लिहिलं आहे ..तस पाणी प्यायला ही जड वाटणार माझं अंग आज कुठली ताकद आली काय माहीत मी घाई घाईत ड्रॉवर मधून मेणबत्ती काढून पेटवली आणि तो कागद त्यावर धरला.. तशी त्यावरची अक्षर स्पष्ट झाली काही ओळी त्यावर लिहीलेल्या होत्या …

निकिता दामोदर परांजपे…आपलं नाव गाव पत्ता आणि अजूनही बऱ्याचश्या गोष्टी मला माहित आहेत , मी तुझ्याविषयी जाणून घ्यायचं ठरवलं तर खूप गोष्टी मला समजल्या त्यातलीच एक की तुला वाचन आवडते आणि मलाही तुला पहिल्यांदा पाहिलं ते लिब्ररीतच तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो  पण हे एकतर्फीच कारण  तू मला ओळखत नाहीस कदाचित तू मला पाहिलही असेल पण मी स्वताहून कधी तुझ्या समोर आलो नाही खर तर हिम्मत नाही झाली माझी..
         हे तुझं लिहिलेलं पान मला सापडलं आणि आज अप्रत्यक्षपणे का होईना बोलायची हिम्मत केली,आणि हो एवढा गुप्त संदेश का दिला याच उत्तर मात्र तु मला जेव्हा शोधशील तेव्हाच  देईन…
ते पत्र कितीतरी वेळ पाहत होते मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. कोण असेल बर हा?? मनात प्रश्नांचा भडिमार चालू होता ..कसा असेल आणि हा चक्क माझ्या प्रेमात पडला?? कसा?? मी पाहिलं असेल का याला मी कितीतरी कॉलेज मधले चेहरे आठवले पण हाच तो हे कसं कळणार?
बराच वेळ विचार केल्यावर  मी तो विचार झटकला नक्कीच कुणीतरी माझी गंमत करतय कारण सवी ने ही गोष्ट माहीत आहे तिने ग्रुप मधे सांगितलं असेल आणि सगळे मिळून माझी मस्करी करत असतील  बघतेच एक एकएकाकडे भेटुदे सगळयांना मी स्वाताशीच बडबडले त्यांनीच मस्करी केली असेल असच असणार थांब अजून दहा पंधरा दिवस मग बघतेच एकेकाकडे मी ते हातातल पत्र मात्र या वेळी फाडल नाही हळुवार पाने ड्रॉवर मध्ये ठेवलं… माझी चिडल्यावर कागद फाडण्याची सवय पण का कोण जाणे आज तर ठेवावं वाटलं…काही असो पण मानत एकदा तरी आलंच ही खरंच कुणाची भावना असेल तर??
काही दिवस मला आणखी मला पूर्ण पाने बरं होण्यासाठी लागले ..व्यवस्थित चालत फिरता यायला लागल्यावर मी  पुन्हा कॉलेज स्टार्ट केलं सगळ्यात आधी मला याचाच शोध लावायचा होता की हे महाशय कोण आहेत. पायाला फ्रँकचर असल्याने अजूनही चालताना थोडा त्रास जाणवत होता मात्र घरात बसून राहण्यापेक्षा तो त्रास मला सुसह्य वाटला.बरयाच दिवसाचे कॉम्प्लिशन्स अपूर्ण राहिले होते ते करता करता नाकी नऊ आले.. बरीच चौकशी करूनही कोण  अशी मस्करी करत असेन ते समजेना..
अधून मधून लायब्ररी मध्ये जाणे तर चालुच होते .. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनंतर  अवांतर वाचनाचं पुस्तक घेतलं.. सवयी प्रमाणे भरभर सगळी पाने उचकुन त्यात काही नसल्याची खात्री केली. रात्री निवांत वाचायला ते पुस्तक हातात घेतलं,तस त्यातूनही एक पान खाली पडलं …
 त्यावर लिहिलं होतं
                  प्रिय निकिता …
आता मात्र मला चक्कारच यायची राहिली होती हे काय नवीन?? घेताना तर मी पूर्ण पुस्तक चाळून घेतलं होतं मग यातून हे पत्र कस बाहेर पडलं? याला कस माहीत मी हेच पुस्तक घेणार आहे ते? मी घाईतच ते वाचायला घेतलं
     प्रिय निकिता बऱ्याच दिवसांनी आज लिब्ररीत आलीस तुला पाहून तुझ्याशी बोलावसं वाटलं म्हणू घाई घाईत हे पत्र लिहितोय , कशी आहेस तूझा अपघात झाला आणि इकडे मी बैचेन झालो रोज कसल्या ना कसल्या बहाण्याने तुला भेटायचो तेवढंच मनाला बर वाटायचं देवाचे खूप खूप आभार तू ठीक झालीस अशीच हसत राहा आणि यापुढे मात्र अस निष्काळजी पाने वागायचं नाही तू स्वत्ताबरोबर मझा ही जीव टांगणीला लावते….                                                                                                                     तुझाच                                                                                                   असून नसलेला..
आता नक्की हे काय समजावं मी मलाच कळेना…आहे कां हे नक्की??? मी पुस्तक घेतल्यावर पूर्ण चाळून पाहिलं होतं याचा अर्थ मी कार्ड देऊन ते स्वत्ताकडे घेत पर्यंत च्या दहा मिनिटांच्या कालावधीत हे झालं मी माझ्या आजू बाजूच्या व्यक्तींना आठवण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर मलाच माझ्या अतिसामान्य स्मरणशक्तीची कीव वाटली..
काहीच कस आठवत नाही मठ्ठ डोक्याची.. सवी पुन्हा माझ्यावर ओरडली ..
ऐक ना सवे नक्की कुणी मस्करी नाही करत ना?? मी तिला पुन्हा केविलवाण्या सुरात  विचारले
नाही ग बाई खर सांगायचं तर मी कुणाला सांगितले नाही याबद्दल मला नव्हतं वाटलं तुझं अस काही असेल ते तेव्हाच विसरून गेली असशील अस वाटलं!! तिने मला पटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही मला तीच खर वाटेना.
पण मी मात्र आता हट्टाला पेटले होते आता मात्र मी शोध लावणारच काही झालं तरी हे कोण करतय ते शोधूनच काडणार त्या शिवाय मला चैन पडणार नाही.. 
Lecture सोडून  आता त्याचा शोध इथेच लागेल अस काहीस पुटपुटत  हळू हळू दुखणारा पाय ओढत लायब्ररी च्या दिशेने चालू लागले…

Rate & Review

pranit mahajan

pranit mahajan 2 years ago

Tejas Muthal

Tejas Muthal 3 years ago

Surekha

Surekha 3 years ago

Shubham Davange

Shubham Davange 3 years ago