Library - 1 in Marathi Love Stories by Sweeti Mahale books and stories PDF | लायब्ररी - भाग 1

लायब्ररी - भाग 1

सलग तीन तास चाललेलं ते बोरिंग लेक्चर ऐकून कंटाळा आला होता. लागोपाठ दूसर लेक्चर चालू असताना मला झोप आवरण कठीण होत चाललं होत. बरेच प्रयत्न करूनही मला ते आवरण जमेना. नकळतपणे माझे डोळे केव्हा झाकले कळलच नाही. मग लगेचच सरांनी रीतसर मला क्लास च्या बाहेर काढलं. तसही मला तिथून बाहेर कधी पडतेय अस झालं होतं.मी आनंदातच बाहेर आहे. सरांनीही निर्लज्जम सदा सुखी म्हणतात ना तस काहीस पुटपुटलयाचा मला भास झाला.......पण असो... मी बाहेर जायला भेटल्यामुळे खुश होते.
आणि खर तर इथूनच आपली स्टोरी सुरू होते ना...तर मी सांगते तुम्ही एन्जॉय करा..
हम्मम जस की मी सांगितलं मला बाहेर काढल्यावर ऐकत कुठे फिरायचं म्हणून मी लायब्ररी कडे वळले. तस अधून मधून मी जात असते, पण आज काहीतरी वाचण्याचा मूड झाला.नोवेल section मध्ये मी बराच वेळ घालवला. बरीच पुस्तक चाळूनाही मला हवं तसं पुस्तक सापडेना. असच हात पुरवून मी वरच्या रँक वरच पुस्तक खाली घेतलं.उलतुंन पालटून पाहिलं तर ठीक वाटलं.त्याची पाने उलता उलटता उलटता. त्यातून एक कागद खाली पडला मी उत्सुकतेने तो कागद उचलला.. अरे हे काय??
हम्मम्म प्रेम कस असत ना हळुवार मोरपिसासारखं कधी भेबन वर होऊन जातं तर कधी धुंद पाऊस त्याचा तो गंध वेड लावतो.प्रियाचा तो क्षणिक सहवास जगातला सर्वात मोठा आनंद वाटतो. हे मला जाणवलं जेव्हा मी तुला पाहिलं. सगळं जागेवर थांबलेलं आणि फक्त तू बोलत होतीस..मी विसरून गेलेलो जगाला आणि स्वताला देखील.तुझ्यापर्यंत पोहचण्याची ऐपत नाही माझी. आणि कदाचित कधी होणार ही नाही. पण तो आनंद तसाच राहील...कायमचा....!! वाळवंटात हरवलेल्या तहानलेल्या मुसफिरला पाण्याचा घोट मिळावा तसा मी मी सुखावतो तुला पाहताना.माझी होशील अशी आशा मला नाही कधीच पण एक करशील?? माझ्यासाठी नेहमी हसत राहशील??????
मी दचकून इकडेतिकडे पाहिलं.....क्षणभर मी पाहतच राहिले. एवढ सुंदर लिखाण कुणासाठी आणि कुणी लिहिलं असेल?? काश माझ्यासाठी कुणी लिहिलं असत!! पण माझं नशीब कुठे एवढं!! मी स्वतःशीच हसले. घाई घाईत मी पुढचं वाचायला लागले.
तुझ्या वर्णनात लिहितोय खरा पण तुझ्यापर्यंत पोहचणार नाही जे ही नक्की...
अय्या म्हणजे काय याने तिला हे दिलंच नाही का कधी??? माझ्या डोक्यात हजार प्रश्न!! पुन्हा पुढे काय म्हणून मी त्यात डोकं घातलं..
एक सांगू माहीत नाही . तुला हे असं प्रेमपत्र देऊन तुझ्या मनात कसलाही विचार आणायचा माझा हेतू नाही म्हणून हे गुपितच राहील बहुतेक..तुझ्या..........
कुणीतरी माझ्या मागून येऊन उभ राहील तस मी तो कागद पुस्तकात ठेवत ते जोरात बंद केलं...अअअअ हम्मम काय अहे ग??? काय वाचतोय लपून लपून?? ओऊऊहहह सवे!!! काय करतोयस मी दचकले ना किती!! मी जोरात ओरडले.तसा माझा आवाज सगळ्या लायब्ररीत घुमला
. पुढची गोष्ट घडण्याच्या आत म्हणजे लिब्रेरियन ने आम्हाला बाहेर काढायच्या आत तिथून आम्ही पळ काढला.
ये सांग ना काय वाचत होती?? सविने चौथ्यांदा पुन्हा लाडात येऊन अगदी पहिल्यांदाच विचारतेय अशा अविर्भावात प्रश्न विचारला…मला मात्र आता तिची चीड आली..मी चिडून तिच्या हातात ते पुस्तक ठेवल का कोण जाणे मला ते तिला दाखववस वाटेना..कारण ती आशा प्रेम कवितांची कायमच थट्टा करायची…मला मात्र ते आवडायचं वर वर दाखवत नसले तरी प्रेम कविता आवडायच्या मात्र नक्की…
पण आज मात्र ती कविता ना निर्मळ प्रेमाच्या मोहक सुगंधाचा दरवळ म्हणून मनात राहिली…सवी ते पान हातात धरून वाचत होती,मला वाटलं आता ती नक्की हसेल झालं मात्र वेगळंच ती ते वाचून जरा देखील हसली नाही माझं ते पुस्तक माझ्या समोर ठेऊन ती निघून गेली..दोन तीनदा हाक मारूनही ती थांबली नाही..
कमाल आहे!!! मी स्वताशीच पुतपुटले..
जउदे मी पुन्हा आपला मोर्चा त्या पत्रकडे वळवला..कारण माझं ते अजून पूर्ण वाचून झालं नव्हतं..
कधी असतेस कधी नसतेस…तू जवळी माझ्या जराशी मी मोहरतो त्या सुखाने पण तुला ना तमा जराशी
पुढच्या ओळींवर पाणी सांडल्यासारखं दिसत होतं ते अस्पष्ट शब्द काही मला वाचता येईना..
चार पाच ओळी त्यात धूसर झाल्या असतील पुढचा मजकूर वाचता येण्या जोग होता..मी पुन्हा उत्सुकतेने ते वाचायला घेतलं..पण चार ओळींत ते संपलं देखील..
मला माहित आहे तू येशील नक्की पाहशील आणि मला उत्तरही देशील मला खात्री आहे म्हणूनच यात लिहितो आहे समोर येण्याची हिम्मत नाही आणि तुझ्याशी बोलन्याची धमकही नाही..वाटलंच उत्तर द्यावे तर नाक्की दे मी वाट पाहीन..
तुझंच असून नसलेला .
शिट्ट….यार नाव तरी लिहायचं .आता कस कळणार हा कोण ते…मी नकळत डोक्याला हात लावला..अच्छा म्हणजे नक्कीच त्या पुसल्या मजकुरात तीच नाव असावं ..मी बराच वेळ विचार केला सुरवात कुठून करावी??
Finally लिब्रेरीअन ला मस्का मारून रजिस्टर चाळायला घेतलं पण तो एवढा मोठा पसारा पाहुन दहा-पंधरा पनातच मला कंटाळा आला..तो हो नाद सोडून दिला कोण जाणे किती जुनि गोष्ट असावी आणि इथे किती रजिस्टर असे रद्दीत गेले असतील!! एवढ्या मोठ्या कॉलेज मध्ये हाजोरणमध्ये विध्यार्थी संख्या असलेल्या कॉलेजात मी कसा शोधणार होती त्याला शेवटी मी नाद सोडला..
मी कंटाळून नाद सोडला..पण का कोण जाणे त्यांनतर माझा बराचसा वेळ तिथे जाऊ लागला सकाळ संध्याकाळ मला जेव्हा वेळ मिळेल मी तिथेच असायची कधीतरी कुणीतरी मला दिसेल अशी आशा…मात्र काही दिवसात मी ते विसरून स्वताच पुस्तकात हरवून जायची..हातात पडलेलं पुस्तक वाचुन होईपर्यंत मला चैनच पडत नसे…
दोन एक महिने उलटले त्यांनतर अभ्यास आणि परीक्षा यांनी डोकं खाल्लं..त्यातून थोडा आराम मिळाला की मी हमखास लायब्ररी कडे धाव घ्यायची.आता मात्र मला वाचायचं छंदच जडला…रोज नवीन पुस्तक वाचत बसताना आजुबाजूच्या गोष्टी मात्र मी विसरून जायची..वाचता वाचता त्या दिवशी सहज त्या पत्राची आठवण आली
.मी त्या नोवेल section कडे जायला निघाले ते नेहमीच पुस्तक शोधत शोधत मी त्या रो मध्ये पोहोचलेच होते की एक मी दचकले कुणीतरी तेच पुस्तक हातात घेऊन ते पत्र वाचत होत .त्या मुलाला ते वाचून हसू आलं त्याने सहज हाताने पेपर चुरगळुन टाकावा तसा एक हाताच्या मुठीत त्याचा चाळा बोळा केला..ते पाहून मला एवढा भयंकर राग आला की क्षणभर मला वाटलं की याच्या कानाखाली ठेऊन द्यावी..पण मी माझ्या आवळलेल्या मुठी तशाच ठेवल्या..ही लोक समजतात काय स्वताला कुणाच्या भावनांना अस हसून कचऱ्यात टाकताना काहीच कस वाटत नाही..इथे मी ते सुंदर प्रेमभाव मनात आणून ती प्रेमकथा पूर्ण व्हावि याची वाट पाहत इथे रोज उभी राहते आणि हा..मला जोरात जाऊन त्याच्या तोंडावर एक ठोसा मारावा अस झालं होतं ..मी माझा राग आवरता घेतला या दरम्यान तो केव्हा निघून गेला मला कळलं देखील नाही..कोण होता कोण जाणे पण रागाच्या भरात चेहरा मात्र पाहायचा राहून गेला नाहीतर कॉलेज मध्ये पुन्हा भेटला असता तर सांगितलं असत त्याला..
त्या दिवशी माझं कशातच लक्ष लागेना आता पर्यंत कितीतरी विद्यार्थ्यांच्या हातात ते पान पडलं असेल आणि प्रत्येक जण माझ्यासारखाच विचार करत असेल का?? म्हणूनच ते पत्र अजून तिथे राहील असेल …
सवीची दिवसभराची बडबड मला शब्दानेही ऐकायला आली नाही..निके!..तू शुद्धीवर आहेस का !!! ती जोरात ओरडली तेव्हा कुठे मी भानावर आले ..अहह आहे ना बोल काय म्हणतेस आज अशी शांत का मी बळेच हसू आणत म्हणाले..!!! ति आपल्या डोक्यात हात मारून घेत म्हणाली गाढवापुढे वाचली गीता…!!!
ये ऐक ना सवे आठवतंय मी तुला ते लायब्ररी मधील पत्र वाचायला दिलेलं?? हो आठवतय पुढे??? ती प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होती..मी तिला झालेला प्रकार सगीतल्यावर तिने ही शांततेत जास्त विचार नको करू असे सांगितल..
माझं लायब्ररी मध्ये जाणे येन चालूच होत..कधी नव्हे माझ्या डोक्यात एक कल्पना आली..मी साविकडे उड्या मारतच आपली कल्पना सांगायला पोहोचले..
सावे ऐक ना आपण पण पत्र लिहिलं तर..द्यायचं का एखाद्या पुस्तकात टाकून बघू ना कुणाचं उत्तर येतंय?? तुला काय करायचं ते कर तिने शांततेत आपलं मत सांगितलं..आणि उत्तर येईलच अस काही नाही ते मागच्या वेळेसारखं कुणीतरी चुलगळुनही फेकुन पण देऊ शकत पण मला मात्र आता चैन पडेना ..
काय लिहावं बर??? बऱ्याच प्रयत्नाने मी एक 5-6 ओळींच एक पत्र लिहून एक पुस्तकात टाकलं…
हुश्श……..आता पाहुयात वाट!!! मी मस्त खुर्चीत स्वताला झोकून देत मोकळा श्वास घेत म्हणाले.

Rate & Review

Ram Rode

Ram Rode 7 months ago

pranit mahajan

pranit mahajan 2 years ago

Dnyaneshwar MAHALE
Tejas Muthal

Tejas Muthal 3 years ago

Surekha

Surekha 3 years ago