Nishant - 2 books and stories free download online pdf in Marathi

निशांत - 2

निशांत

(2)

अन्वया गेल्यावर खरेतर सोनालीला चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले.
कारण गेले महिनाभर त्या दोघी सतत एकमेकासोबत होत्या.
परीक्षा संपल्या संपल्या मैत्रिणींच्या सेंडऑफ पार्टी ठरल्या होत्या त्यासाठी पण अन्वया नाही थांबली.तिला मुंबईला जायची फार गडबड झाली होती.
याआधी अन्वयाने आणि सोनालीने ठरवले होते परीक्षेनंतर अन्वयाच्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या घरी पण एक मोठी पार्टी द्यायची, काय माहिती निकालानंतर सर्वांचे मार्ग वेगळे झाल्यावर कधी परत भेटी होतील या सर्वांच्या.
पण आधी बेत ठरलेला होता तरी अन्वयाने तो रद्द केला..
म्हणाली ,”नको ग मम्मा आत्ता रिझल्ट आल्यावर पाहूया.
आत्ता आधी मामाकडे जाते मी चिंकी आणि मुन्ना तिकडे कधीची माझी वाट पाहतायत ना...!!
मामाच्या मुलांची आणि तिची चांगली गट्टी होती हे खरे पण ती दोघे इतकी लहान होती की अन्वयाताईची वाट पाहणे हि गोष्ट त्याना कळत पण नव्हती.
हे सगळे..”पण” आणि “परंतु” तिच्या मनातच राहिले आणि अन्वया मामाकडे गेली सुध्दा..
याच दरम्यान अनयाची परीक्षा जवळ आली होती, ती खुप अवखळ असल्याने तिच्याकडे पुरे लक्ष दिल्याखेरीज ती अभ्यास करीत नसे.
या दिवसात सुमितचे वागणे पण कमालीचे बदलले होते.
अभ्यासाविषयी काही विचारले तर खुप चिडत होता.
घरी यायला तर काही ताळतंत्रच राहिला नव्हता
एक दोन वेळेस तर तो दारू पिऊन पण आला होता अशी तिला शंका आली.
आता याविषयी अमितशी बोलायलाच लागणार होते.
अनयाची परीक्षा पार पडली आणि आता मात्र सोनाली पुर्ण मोकळी झाली. अमित पण कामाचे प्रेशर सध्या कमी असल्याने थोडा निवांत होता.
आता थोडे दिवस सर्वजण टूर वर जायचे असे ठरवत होते.
आज संध्याकाळी आल्यावर याविषयी चर्चा व्हायची होती
तेव्हाच वेळ काल पाहुन सुमितचा विषय बोलायचा असे सोनालीने पक्के केले.
संध्याकाळी सात वाजले कांदाभजी ,शिरा असा बेत तयार ठेवून सोनाली आणि अनया अमितची वाट पहात टीवी समोर बसल्या होत्या ,इतक्यात फोन वाजला..
यायला उशीर होईल म्हणून अमितचा फोन आहे की काय असा विचार करून सोनालीने फोन उचलला..
हेलो..आपण सोनाली बोलताय का ?
होय..आपण कोण बोलताय ?काय काम आहे ?
“मी सहयोग हॉस्पिटल मधून बोलतोय आपल्या पतींच्या गाडीला अपघात झाला आहे, आमच्या हॉस्पिटल मध्ये त्याना आणलेय..
त्यांची परिस्थिती गंभीर आहे आपण ताबडतोब हॉस्पिटल मध्ये या.

अपघाता नंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना ओळखले व त्यांना इथे आणले.
त्यांच्याकडून तुमचा नंबर घेतला होता.प्लीज लवकर या..”
हे ऐकून सोनालीच्या छातीत “धस्स” झाले.
ती धप्पकन सोफ्यात बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
नक्की काय झालेय तिकडे गेल्यावरच कळणार होते..
अनया पण आईची अवस्था पाहून घाबरून गेली..
कसेतरी स्वतःला सावरून सोनालीने सुमितला फोन करून हॉस्पिटलला यायला सांगितले आणि ताबडतोब घर बंद करून दोघीजणी रिक्षाने निघाल्या.
हॉस्पिटलमध्ये सुमित पण नुकताच पोचला होता.
अमितचे मोठे ऑपेरेशन आत चालू होते.
सुमितला बघतच अनया त्याला बिलगली..
“काका काय झाले रे बाबाला “?असे म्हणून रडू लागली.
सोनालीचे पण डोळे पाण्याने वहात होते
सुमितने दोघींना जवळ घेतले..आणि त्यांचे सांत्वन करू लागला.
“वहीनी एका सायकलस्वाराला वाचवायला गेलेल्या दादाची गाडी जोरात दुभाजकावर धडकली आणि हा अपघात झालाय.दादाला भरपूर लागलेय ,
शिवाय डोक्याला मोठ्या जखमा झाल्याने आता आतमध्ये ऑपेरेशन चाललेय.
बराच वेळ लागेल असे डॉक्टर म्हणलेत.”
“ काय रे असे विपरीत झाले..असे म्हणताना सोनालीचा बांधफुटला आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली तिचे पाहून अनया पण कावरी बावरी झाली
“वहीनी शांत हो ग..बघूया काय होते होईल सगळे ठीक.प्रयत्न चाललेत न डॉक्टरांचे.”
तुम्ही दोघी बसा बरे इथे..
मग सुमितने त्या दोघीना उपहारगृहातून कॉफी आणि बिस्किटे आणून खायला घातली.
“वहीनी तुम्ही दोघी इथेच थांबा आता आपल्या नातेवाईकांना कळवायला लागेल मला.”
काही वेळात गावातले त्यांचे काही जवळचे नातेवाईक एक एक करून गोळा झाले आणि सर्व मिळून ऑपेरेशन थीएटरच्या बाहेर वाट पहात बसुन राहीले.
यादरम्यान सुमितने मुंबईला सोनालीच्या भावाला फोन लावून अन्वयाला घेऊन यायला सांगितले तोही ताबडतोब निघाला..तीन चार तासात यायचा होता तो मुंबईहुन.
विचार करता करता सोनालीचे डोके दुखून आले ,हे काय झाले ,आता काय होणार ,..याविषयी काही समजत नव्हते.
आता फक्त देवावर भरोसा होता.
दोन तीन तासानंतर डॉक्टर बाहेर आले..
बाहेरच्या लोकांकडे पाहून..”we are helpless....असे बोलून आपल्या केबिन कडे निघुन गेले.
हे ऐकून सोनाली एखाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध झाली..आजुबाजुचे सर्व जणु काही गर गर फिरतेय असे तिला वाटले..
आणि एका क्षणी तिने हंबरडा फोडला...
आजुबाजुच्या बायकांनी तिला सावरून धरले ,आणि सर्व नातेवाईक तिला घेऊन घरी घरी निघाले.
सगळे सोपस्कार पार पडल्यावर डेड बॉडी अम्बुलंस मधुन सुमित घेऊन यायचा होता.
सुमितने सगळ्या गोष्टी स्वतः पुढे होऊन बघितल्या होत्या ,त्याने पैशाची काय व्यवस्था केली वगैरे काहीही गोष्टी सोनालीपर्यंत पोचल्या नाहीत.
या अनपेक्षित घटने मुळे तिच्यापुढे सध्या तरी पूर्ण अंधार होता.

सुटीला मामाकडे गेलेल्या अन्वयासाठी पण हा फार मोठा धक्का होता.
आता तिघी मायलेकींच्या शोकाला पारावार नव्हता.
त्यानंतरचे दिवस कसे जात होते हे सोनालीला समजतच नव्हते.
सोनालीची आई, वडील, भाऊ, वहिनी, अमितचे दोन तीन काका काकु ,त्यांचे कुटुंब असे आणखी बरेच पाहुणे आले होते.
भेटायला येणारे लोक, असंख्य फोन ,चौकश्या या सर्वाना सामोरे जाता जाता सोनालीचा जीव थकुन गेला.
अमितचा चौदावा दिवस पार पडला आणि घर शांत झाले
आता फक्त सोनालीचा भाऊ ,आई ,वडील सोबत राहिले होते.
अचानक त्या संध्याकाळी अन्वया आईच्या रूम मध्ये आली
आत येताच तिने दाराला कडी लावली.. आणि म्हणाली ,
“मम्मा मी आज मामा सोबत मुंबईला जातेय..”
‘काय बोलते आहेस अन्वया ?

आता तर बाबाच्या निधनाच्या दुक्खातून आपण बाहेर पडतोय
आणि आता तिकडे काय काम आहे तुझे..?’
“नाही मम्मा मला जायलाच लागेल ,इथे रहाणे अशक्य आहे आता माझ्यासाठी आता मी कायमसाठी मुंबईला जातेय “..
“म्हणजे ? आपल्याच घरात रहाणे तुला अशक्य का झालेय ?”
सोनालीचा प्रश्न ऐकताच अन्वया तिला बिलगुन ओक्साबोक्शी रडू लागली
“मला खुप भीती वाटतेय ग मम्मा
“कसली आणि कुणाची भीती आहे तुला अन्वया..?”
“कसे सांगू मम्मा तुला..इतके दिवस नाही सांगितले पण आता मात्र सांगावे लागेल..”
“अग सांग ना एवढी कसली भीती आहे तुला..काय झालेय एवढ ?”
“मम्मा मला काकाची खुप भीती वाटतेय ग..
“काय ?...अग काय बोलतेस तु ?..काय केले त्याने..?
त्यानंतर मात्र जे काही अन्वयाने सांगितले ते ऐकुन सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली..
गेले काही महिने सुमित सतत अन्वयाच्या मागे मागे होता.
सारखे अंगचटीला जाणे ,उठसुट तिचे पापे घेणे असे चालले होते.
सख्खा काका असल्याने तिने आधी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते
पण एकदा मात्र कहर झाला..
घारात कोणीच नसताना तो तिच्या खोलीत आला आणि त्याने तिला मिठीत घेऊन किसिंग सुरु केले तिने खुप विरोध केला..
पण अखेर त्याने तिचे कपडे उतरवलेच.
ती म्हणत होती अरे काका हे काय करतो आहेस..सोड मला..
पण त्याचावर “सैतान” स्वार झाला होता..
त्या दिवशी काही गैरप्रकार घडणार होताच पण अचानक दाराची बेल वाजली आणि त्या प्रसंगातून तिची सुटका झाली.
यानंतर तिने काळजी घ्यायला सुरवात केली होती
स्वतःच्या खोलीत दाराला कडी लाऊन बसत असे.
ही गोष्ट आईला सांगायचे तिने ठरवले होते
तोपर्यंत दुसर्याच रात्री आई बाबा एका कार्यक्रमासाठी त्या दोघींना सुमित सोबत सोडून बाहेर गेले.
काही गैरप्रकार होऊ नये म्हणून ती बाहेरच अभ्यास करीत बसली होती.
तेव्हाच सुमितने अनया झोपली होती त्या खोलीला कडी लाऊन घेतली.
आणि अन्वयाला ओढत त्याच्या बेडरूम कडे घेऊन गेला..
इतक्या रात्री आरडा ओरडा करून पण फायदा नव्हता..
आणि मग त्या रात्री सुमितने तिच्यावर बलात्कार केला
आणि आता बोलवेन तेव्हा गुपचुप रूम मध्ये यायचे अशी ताकीद पण दिली.
आई बाबा बर्याच वेळा त्याच्यावर घर सोडून जात असल्याने त्याला संधी मिळणारच होती..
शिवाय आईचा त्याच्यावर खुप “विश्वास” पण होता.
या प्रसंगातून मार्ग कसा काढावा तिला समजेना ,पण आता मात्र तिने आई बाबांना एकत्र बाहेर जायला मनाई केली आणि सतत आईसोबत राहू लागली सुमितच्या ते लक्षात आले होते पण तेव्हा तो काहीच करू शकला नाही.
मग मात्र परीक्षा झालयावर ती लगेच मुंबईला मामाकडे निघुन गेली.
तिथे ती “सुरक्षित” होती...
सोनालीने अन्वयाला घट्ट मिठीत घेतले आणि मुसमुसत असलेल्या तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवू लागली..
मनातून ती खुप भडकली होती.
त्या क्षणी जाऊन सुमितला झोडपून काढावे असे तिला वाटले
पण अजुन घरी इतर बरीच माणसे असल्याने ती शांत राहिली.

क्रमशः