Nishant - 3 in Marathi Social Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | निशांत - 3

निशांत - 3

निशांत

(3)

हलके हलके सोनालीने अन्वयाला शांत केले.
तिला अन्वयाचा कायमचेच मुंबईला जायचा निर्णय पटला.
आता ती तिच्या माहेरीच “सुरक्षित” राहणार होती
आणि मग या “विश्वासघातकी” दिराचा चांगला समाचार घ्यायचा.
अन्वया घरी आल्याने सुमित जरा खुशीत होता.
वहिनीचा “विश्वास” होताच त्याच्यावर आता तर दादाची पण अडचण दूर झाली होती.
त्याला माहीत होते की हे घरचे पाहुणे गेले की अन्वया त्याचीच होती.
त्याला हवी तशी तो आता तिला वापरणार होता.
तिच्या सौंदर्याने त्याला आधीच “वेडे “केले होते.
आणि तिच्या शरीराचा एकदा उपभोग घेतल्यावर त्याची तहान आणखीन वाढली होती.
खरेच कमालीची “चीज” होती अन्वया..
अजुन पण त्या दिवशी पाहिलेले तिचे “उन्मादक” आणि “वेलांटीदार” नग्न शरीर त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हते.
ती प्रतिकार करीत असताना त्या सुखाची “मजा” आणखीन वाढली होती.
दोन तीन वेळा कोणी नसताना त्याने तिला जवळ खेचली होती.
पण आता घरचे पाहुणे गेल्यावरच “निवांतपणा” भेटणार होता.
दुसर्या दिवशी सोनालीचा भाऊ मुंबईला जायला निघाला.
सोनाली म्हणाली ,”संतोष तु जाताना थोडे दिवस अन्वयाला मुंबईला घेऊन जा तीचा रिझल्ट लागला की पाहू काय करायचे ते..
आई बाबा तुम्ही पण सोबत गेलात तरी चालेल..
आम्हाला आता आमचे आयुष्य जगायला लागले पाहिजे
तुमचा आधार कीती दिवस घेणार आम्ही ?”
तिच्या या बोलण्यावर आई बाबा पण नाराजीनेच परत जायला निघाले.
लेकीचे दुखः मोठे होते पण आता तिचे तिलाच पाहायला हवे होते ,तरी बरे तिची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने बाकी काही काळजी नव्हती.
दुसर्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर सगळे सामान आवरून गाडीतून निघाले. अनया पण सुटीच असल्याने त्यांच्यासोबत जाणार होती.
अचानक अन्वया त्यांच्यासोबत निघाल्यावर सुमित थोडा चकित झाला.
ठीक आहे जाउदे..
जाऊन जाऊन किती दिवस जाईल?
थोडे दिवसांनी तर इकडे यायलाच लागेल तिला असा विचार करून सुमितने सर्वाना निरोप दिला.
वहीनीचे आई बाबा आणि भाऊ म्हणले “सुमित आता तुलाच घरची सारी जबाबदारी घ्यायची आहे..काळजी घे सर्वांची..
“हो आजी तुम्ही नका काळजी करू आता वहीनीची आणि मुलींची मी सर्व काळजी घेईन..
दुसर्या दिवशी सकाळी चहा नाश्त्याच्या वेळेस टेबलवर सुमितला त्याच्या कृत्याचा जाब विचारायचा असे सोनालीने ठरवले होते.
आता घरात दोघेच होते त्यामुळे विषय तडीला लावता येणार होता.
पोहे खाताना सुमितला छेडले तिने..
“सुमित काय चाललेय तुझे ?असा का वागलास अन्वयाशी ?
अरे तुझी पुतणी आहे ती शोभते का तुला हे ?
सुमितला समजले की ही गोष्ट वहीनीच्या कानावर गेली आहे..
तो जोरजोरात हसु लागला
“वहीनी मला ती आवडते आणि एवढ काय वाईट केले मी ?
फक्त एकदाच तर मी वापरली तिला..”
“काय बोलतोस हे तुझ तुला तरी समजतेय का ?निर्लज्ज..
सुमितचे हे अर्वाच्य बोलणे ऐकुन सोनाली चमकली
“काय चुकीचे बोललो मी..आवडली तर आवडली..आणि पुतणी काय ?
कोणत्या जगात वावरतेस तु वहीनी..?”
अग ती फक्त एक सुंदर मुलगी आहे आणि मला ती खुप आवडते “
“अरे थोडी तरी लाज बाळग
एका चांगल्या कुटुंबातला मुलगा तु आपल्या वहीनीशी असे बोलतोस ?..
“ती खरोखर मस्त आहे ग..काय मजा आली तिच्यासोबत..”
अगदी तुझ्यासारखीच सेक्सी आहे बघ तुझी मुलगी पण...”
हे ऐकताच सोनालीने त्याच्या कानशिलात मारायसाठी हात उचलला..
पण सुमितने तो वरच्यावर बाजूला केला..
आणि आपल्या खोलीकडे निघून गेला.

सोनाली अगदी “कानकोंडी” होऊन गेली ,
हे असले काही अमित कधीपासुन वागायला लागला ?
आणि असे “शिवराळ” बोलणे कसे काय तो बोलु शकतो हेच तिला समजेना.
सासुबाईच्या माघारी मुलासारख्या वाढवलेल्या दिराच्या मनात असा सैतान कुठून घुसला याचे तिला आकलन होईना .
त्याच्यात हे इतके चमत्कारिक परिवर्तन कधी आणि कसे घडले ?
आपण या गोष्टीकडे का नाही लक्ष दिले ?
कुठे कमी पडलो आपण याला समजून घेताना ?
का आपण आपल्याच संसारात इतके गुंतलो की याच्या मनात इतके काही चालले आहे हे समजलेच नाही.
या आणि अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात “थैमान” घातले.
सुमितने आधीच जाऊन धाडकन खोलीचा दरवाजा बंद केला होता.
आता त्याला समजावण्याचे सर्व मार्ग पूर्ण बंद झाले होते.
ती निराश मनाने आपल्या खोलीत गेली आणि तिने दार बंद करून स्वतःला बेडवर लोटून दिले.
तिला जाग आली तेव्हा दुपार टळून गेली होती.
इतका वेळ झोपून सुद्धा तिचे डोके जड जड होते.
तशीच ती उठून बाहेर आली.
बाहेर सामसुम होती.
स्वयंपाकघरात बराच पसारा पडला होता.सुमित बहुधा जेऊन बाहेर निघून गेलेला दिसत होता.
कारण जेवलेले ताट तसेच उष्टे टेबलवर पडले होते.
अन्नाची भांडी तशीच उघडी पडली होती.
पुर्वी तर सुमित अतिशय व्यवस्थित होता.त्याचे जेवलेले ताट अगदी स्वच्छ असे
तसेच जेवण झाल्यावर तो स्वतः ताट उचलून सिंकमध्ये ठेवत असे.
सर्वच बाबतीत तो अतिशय “व्यवस्थित” आणि “टापटीप” असे.
तिच्या सासुबाईंच्या कडून हा वारसा दोघा भावांकडे आला होता.
मग हे आज हे काय चित्र दिसत होते ?
त्याची खोली सुद्धा सताड उघडी होती.
बेडवर पण इकडे तिकडे काढलेले कपडे आणि वस्तु फेकून दिल्या होत्या.
हॉल मध्ये पण भरपूर पसारा दिसत होता.
कोणीतरी आले होते असे वाटत होते ,
उष्टे चहाचे कप, पाण्याचे पेले पण दिसत होते.
सर्व पाहून सोनाली चकित झाली
एकंदर पूर्ण असहकार करायचा असे सुमितने ठरवल्याचे दिसत होते.
सोनालीने संथपणे सर्व साफसूफ केले.
जेवायची तर इच्छा मेलीच होती ,पण एक कपभर दुध मात्र तिने गरम करून घेतले आणि डोकेदुखी साठी एक गोळी सोबत घेतली.
बाहेर येऊन टीवी समोर बसून राहिली ,
टीवी वर काय चाललेय तिच्या डोक्यात काहीही शिरत नव्हते फक्त चित्रे पुढे सरकत होती.
रात्री उशिरा पर्यंत सुमितचा काहीच पत्ता नव्हता.
स्वयंपाक करून ठेऊन थोडेसे खाऊन ती झोपून गेली.
यानंतर आठ पंधरा दिवस हेच चालले होते.सुमितने तिच्याशी बोलणे पूर्ण बंद केले होते.जेवायला तिच्या अपरोक्ष येत होता.
शक्य होईल तेव्हा घरभर पसारा करणे अवेळी जाणे येणे हेच चालू होते.
आता सकाळी सकाळी घरात दारू आणि सिगारेटचा वास येऊ लागला होता.
एके दिवशी मात्र तिच्या समोर तो आला आणि म्हणाला ,
“गावाला गेलेली घरची माणसे केव्हा येणार आहेत परत ?
सोनाली म्हणाली ,”अनया येईल पुढच्या आठवड्यात “
“आणि अन्वया ?”
“तिच्याविषयी तु काहीही विचारू नकोस”
“का विचारू नको ? तिला लवकर बोलावून घे..”
“नाही ती आता इकडे येणार नाही.तुझ्यासारखा “सैतान” घरात असताना तिची इकडे यायची इच्छा नाहीये “
“तिच्या इच्छेचा काहीही संबंध नाहीये ,मला लवकरात लवकर ती इकडे हवीय.”
“अजिबात नाही, तिच्या बाबतीत कोणतीच रिस्क आता मला घ्यायची नाहीये” ,तिच्या वडिलांच्या माघारी आम्हाला आधार वाटण्याऐवजी तुझी घृणा वाटतीय “
“तुम्हाला काय वाटते याच्याशी मला काय करायचेय ?
दोन तीन दिवसात ती इकडे यायला हवी
नाहीतर परिणाम वाईट होतील..
असे म्हणून पुढे काही ऐकायच्या आत दार जोरात धडकून सुमित बाहेर निघून गेला.

क्रमशः

Rate & Review

Bajirao memane

Bajirao memane 9 months ago

Sakshi Kulkarni

Sakshi Kulkarni 10 months ago

Prajakta Waykar

Prajakta Waykar 11 months ago

manasi

manasi 1 year ago

Shashikant  Kulkarni

Very good story.