Adrushya - 5 books and stories free download online pdf in Marathi

अदृश्य - 5

अदृश्य भाग ५
इथे विभा आणि सायली आनंदात होते पण जेहेन अरोरा ची त्यांने चांगलीच वाट लावली होती.जेहेन ने त्या रात्री ज्या मुलीचा खून केला होता ती अजून कोणी नाही विभा ची मैत्रीण सेहेम मलिक होती. आता प्रश्न हा होता की विभा ला जर जेहेन ला फसवायच होत तर तिने तिची केस का घेतली आणि घेतली तर विचारपूस का केली.कारण तिला तर सगळं काही आधीपासून माहित होत.सेहेम चा झालेलं मृत्यू आणि विभूर देव नेच मारलंय हे सुद्धा.
कोण होता विभूर देव,सेहेम चा मित्र होता,कि विभा चा,हेच प्रश्न तुम्हला हि पडलेत ना मला ही चला आता पुढे पाहूया.आज सायली जेहेन अरोरा ला भेटायला गेली,तिथे नायब सुद्धा आला होता.सायली ला तर काही समजलच नाही.खूप वेळ तो जेहेन शी बोलत होता,सायली ला तर भीती हि वाटायला लागली की नायब ला काही समजलं तर नाही ना. सायली मनातल्या मनात म्हणाली,"हा माणूस इथे काय करायला आलाय".
नंतर जे तिने पहिला त्याने ते अचंबित झाली होती.नायब अगदी आनंदात बाहेर पडला होता,सायली ला वाटलं की विभा ला हि गोष्ट सांगायला हवी,तिने लगेच विभा ला फोन लावला आणि सगळं काही सांगितलं.विभा हे ऐकून खुश होती,सायली ने विचारलं" अंग तू हसतेस का?!", त्यावर विभा म्हणाली तू टेन्शन नको घेउ घरी ये मग समोरसमोरच मी तुला सांगते". सायली ने फोन ठेवला आणि ती जेहेन ला भेटायला गेली.ती जेहेन ला म्हणाली" जेहेन,मी सायली,आधी आपण तुझं जे काही वाईट सवयी आहे ते बंद करू त्या साठी शॉक ट्रीटमेंट आहे".जेहेन गप्प होती,ती फक्त डोळे वटारून इथे तिथे पाहत होती.आणि जेव्हा सायली जाईल निघाली तेव्हा जेहेन म्हणाली" असं समज मी अदृश्य आहे,असं समज मी अदृश्य आहे,फक्त हेच म्हणत बसली होती.सायली ला समजलं की अर्थातच तिच्या वर खूप परिणाम झालाय.
सायली विभा च्या घरी गेली तर विभा एक्दम खुश होती,नक्की काय चालेल तिच्या डोक्यात देव जानो.विभा म्हणाली" ये ये सायली,अंग तो नायब होता ना त्याने जेहेन अरोरा च्या नावावर असलेली सगळी जमीन पैसे सगळंच त्याच्या नावावर करून घेतलं,आणि हे मी घडवलंय".सायली ने विचारलं"पण,का".विभा-"अरे , कारण जर त्या जेहेन नंतर थोडं देखील डोकं चालवलं ना आणि कोणाची मदत घेतली तर आपण फसू म्हणून जर तिच्या कडे दमडीच उरणार नाही तर काय".सायली-"अरे वाह वाह खरंच तुझं डोकं काय चालत शेवटी वकील ना".विभा-पुरे पुरे,चल बोल काय घेशील चहा कि कॉफी?".
दोघांचेही जोरात गप्पा गोष्टी सुरु होते,तेव्हा केणी च फोन आला आणि तो म्हणाला विभा मॅडम मला तो माणूस सापडलाय.विभा आणि सायली घाबरले,आणि त्वरित निघाले,केणी च्या घरी.केणी ने दरवाजा उघडला,या या विभा मॅडम,मला सापडलाय तो माणूस.विभा-"अरे कोण सापडला तुला?".केणी-" अरे,विभूर देव.विभा-काय?.कुठे आहे तो?". विभा ला समजलं होत की केणी च्या पैसे हवेत म्हणून तो हे नाटकं करतोय.केणी ने एका माणसाला बोलावलं,तो माणूस,उंच,कोट घातलेला,आला.तो माणूस म्हणाला" विभा मॅडम मीच आहे विभूर". विभा -"पण तुला जेल मध्ये का जायचंय".तो म्हणाला"मला खूप वाईट वाटतंय जे हि मी केलाय आणि आता मला शिक्षा हाविये".विभा-"पण जेहेन ती तुला ओळखेल ना?". केणी म्हणाला-"वाह,तिची सुटका होईल ,आता काय तिला नकोय तिची सुटला".सायली-"बरोबर आहे.
विभा आणि सायली जोरजोरात हसायला लागले.विभा म्हणाली "केणी तुझी थेरं बस कर मी विभूर ला पाहिलंय आणि हा विभूर नाहीये.तू सगळं पैसे मिळवायला करतोय हे मला माहित आहे".केणी ला घामच फुटला.आणि विभा आणि सायली तिथून निघून गेले.सायली" म्हणाली किती छान गम्मत आहे यार विभा चल ना विभूर ला स्वतः सांगूया आपण".विभा-" अगदी माझ्या मनातलं बोलीस ग".ते दोघेही निघाले आणि सायलीच्या घरी पोहचले.सायली ने दरवाजा उघडला आणि दोघेही घरात गेलेत.थोड्या वेळाने सायली फ्रेश होऊन बसली,आणि समोर विभूर होता.
सायली आनंदाने गेली आणि विभूर ला मिठी मारली.दोघेही बसले आणि त्यांना ती रात्र आठवली.सायलीच्या घरी पार्टी होती आणि पार्टी थिम होती आपल्या आवडतीचे अभिनय पात्र.सेहेम,विभा, हि त्या दिवशी पार्टीला यायला निघाले होते.सेहेम घरून निघाली आणि हे सगळं घडलं.पण विभा मात्र सायली च्या घरी पोहचली.सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं कि सेहेम कुठे फसली असेल का ती पोटोशी हि होती.विभा तिला शोदायला निघाली.तो माणूस अजून कोण नाही विभाच होती,विभा ने जेम्स बॉण्ड च्या पात्राचा वेष धरला होता.सेहेम च्या मृत्य ला खूप काळ उलटून गेला आणि अखेर ती तिचा मोबाईल चाळत असताना तिला ती सेल्फी दिसली जी जेहेन ने काढली होती त्यात तिला त्या कार चा नंबर देखील दिसला आणि ती सायली बरोबर गेली सुद्धा होती पण त्यांची केस नोंदवलीच नाही.
तेव्हाच तिने हा अदृश्याचा खेळ रचला.वकील बनली आणि एवढे वर्ष थांबून जेहेन वर नजर ठेवून तिने आणि विभा ने हा खेळ खेळला. म्हणून तर तेव्हा सायली म्हणाली होती की विभा च्या डोक्यात काय चालतं हे देव जाणे अर्थात विभूर देव.कधी कधी सगळं समोर असत पण दिसत नाही.आता प्रश्न हा कि जेहेन ला कसं समजलं की विभूर हाच विभा आहे,तर जेव्हा हि विभूर तिला भेटायला जायचा तर तिने पाहिलं होतं की त्याची सवय होती,तो एक धून गुंगुणायचा आणि त्याच्या डाव्या हाताचे २ बोट हलवत राहायचा बोलताना.
त्या दिवशी सुनावणीच्या दिवशी जेहेन ने अगदी तेच पाहिलं विभा मध्ये , बोलताना तेच बोट तशेच हलताना आणि ती धून जी विभा ने मुद्दाम जेहेन कडे जाऊन गुंगुणावली होती,कि तिला समजो आणि ती ओरडायला लागो आणि तेच घडलं.विभा ला जेहेन ला मारायचं होत पण सहज नाही त्रास देऊन देऊन.
तर मी म्हंटल होत ना कधी कधी आपण खूप गोष्टींकडे दुर्लक्ष करतो,त्याच परिणाम म्हणजे हे अदृश्य,जेहेन च्या एका वाक्या मुळे तिला त्याची मोठी शिक्षा मिळाली होती.जर तिने तेव्हा हे वाक्य न म्हणता विभा ला मदत केली असती तर जरी विभा ला समजलं असत कि हे जेहेन ने केलय तरी तिला माफ केलं असतं आणि सेहेम हि वाचली असती.