Mitranche Anathashram - 5 books and stories free download online pdf in Marathi

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ५

कॉलेज संपल्यावर आम्ही दोघे आश्रमात गेलो त्यानंतर आम्या ने ती पिशवी उघडली. त्यात दोन कॅडबरी आणि एक चिठ्ठी होती. आम्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली.
"माझ्या गाडीत काहीतरी खराबी होती म्हणुन मी दोन वेळा तुमच्या गाडीला येऊन धडकले म्हणुन माफी मागते. तरी तुम्ही माझी मदत केली म्हणुन खुप खुप धन्यवाद - संध्या सावंत"
मी, "अच्छा ही सायन्स ब्रांच ची आहे"
आम्या, "तुला कसं काय समजलं"
मी, "ते बघ ना चिठ्ठी प्रॅक्टिकल च्या पेपर वर लिहिली आहे."
आम्या, "हुशार आहे तु"
मी, "संगतीचा प्रभाव"
दोघंही हसायला लागलो. मागुन सुरेश काका धावत आले, "बंटी ने एक रुपयाचं नाण गिळून घेतलं, चल त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. बोलता पण येत नाही त्याला"
मी, "हा बंटी कोण आहे ?"
आम्या,"अरे आपण आलो की खाऊ मागतो तो."
मी, "मग तु आणि काका लवकर घेऊन जा त्याला, जवळच डॉक्टर आहे, मी थांबतो इथे"
आम्या, काका आणि बंटी तिघे हॉस्पिटल ला गेले मी वाट बघत आश्रमातच होतो. काम करणारे सहकारी होते पण त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणी नाही म्हणून मला कुठे जाता येत नव्हतं. २-३ तासांनी काका आणि बंटी आले.
मी, "काय झालं."
काका, "काढलं, आता बरा आहे. अमर औषध घेऊन येतो आहे त्याने तुला जायला सांगितले तुला उशीर होत असणार ना?"
मी, "ठीक आहे, त्याची काळजी घ्या मी येतो."
घरी जातांना मी ती पिशवी सोबत घेतली. रात्री ती चिठ्ठी वाचत वाचत मला झोप आली. सकाळी उठून तयारी केली आणि कॉलेजला निघालो. अजुनही डोक्यात तिचेच विचार, तीच चिठ्ठी डोळ्यासमोर फिरत होती. रस्त्याच्या कडेला चालायचं सोडून एक मुलगा मधोमध चालत होता, त्याला जाऊन गाडी ठोकली. आम्ही दोघंही रागात एकमेकांकडे पाहिले पण काय माहिती का पण नंतर राग आपोआप गेला.
मी, "सॉरी, लक्ष नव्हतं माझं"
तो, "नाही चुक माझीच होती, मी मधोमध चालत होतो."
त्याच्या गळ्यात माझ्याच कॉलेज च कार्ड होत, म्हणुन मी त्याला म्हणालो, "सिटी कॉलेज, चला मी पण तिथेच जातो आहे."
तो, "हो, सिटी कॉलेज, तुम्ही पण ?"
मी, "अरे देवा, काय फॉर्मलिटी मित्रा, तु म्हण की"
तो गाडीवर बसला, "तुझं नाव काय कोणत्या ब्रांच ला आहे तु ?"
मी, "मी संजय पाटील, आर्ट्स आणि तु ?"

आणि आम्याचे बाबा म्हणजे सुरेश काकांनी दरवाजा उघडला. आत्तापर्यंत सकाळ झाली होती, रात्रभर मी आणि विवेक संजय सांगत असलेल्या गोष्टीला मन लावून ऐकत होतो. आम्या अजुनही शुध्दीवर नव्हता.
काका, "आता कशी आहे तब्येत ?"
संजय, "डॉक्टर म्हणाले आता स्थिर आहे तब्येत तरी सुध्दा एक ऑपरेशन करावं लागेल, त्यानंतर अमर आधीसारखा"
काका, "ठीक आहे, आणि हे कोण आहेत?"
संजय माझ्याकडे पाहून, "हा समीर, विवेक चा मित्र"
काका, "तुम्ही जाऊन या आता घरी, रात्रभर झोप नसेल आली"
विवेक, "मग आश्रमात कोण आहे ?, मी जाऊ का ?"
काका, "तिथे संध्या आणि रजनी आहेत, तुम्ही आराम करा जा"
त्यानंतर आम्ही बाहेर पडलो, अलविदा घेऊन आपापल्या रस्त्याला लागलो. संजय त्याच्या गाडीवर बसून निघून गेला, मी आणि विवेक सोबत होतो. माझ्या डोक्यात खुप प्रश्न होते म्हणून मी विवेकला विचारले, "तु या सर्वांना कसा भेटला?"
विवेक, "संजय ने त्या दिवशी रस्त्यावर ज्याला गाडी ठोकली तो मीच होतो, विवेक नेरकर"
पुढे काही विचारायची हिम्मत नाही झाली. घरी पोहचल्यावर मी आधी अंघोळ केली नंतर नाश्ता केला. रात्रभर झोपलो नाही म्हणून लगेच अंथरुणावर पडल्या पडल्या मला झोप आली.
सायंकाळी मी आणि विवेक हॉस्पिटलला गेलो. ऑपरेशन सकाळी लवकरच आटोपले होते. आम्या ची तब्येत फार नाही पण आता सुधारत होती. डॉक्टर बोलले की अजून काही सांगता येत नाही पण काळजी घ्यावी लागेल.
विवेक सुरेश काकांना, "तुम्ही आता जा, रजनीला घरी आणि संध्याला हॉस्टेलला पाठवा उशीर होईल."
संजय, "हो काका तुम्ही खरंच जा आता आराम करा, आम्ही आहोत इथे आता आणि काही जास्त गरज पडली तर तुम्हाला कळवतो आम्ही."
काका, "जेवण तुमचं ?"
संजय, "आई आणि काकू डबा घेऊन येणार आहेत."
काकांनी आम्याच्या डोक्यावर हाथ फिरवून गेले. पुन्हा त्या रूममध्ये आम्ही चार जण होतो. मी, संजय, विवेक आणि आम्या.
मी संजयकडे पाहून, "पुढे काय झालं?"
संजय ने पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.

क्रमशः
Share

NEW REALESED