Mitranche Anathashram - 4 books and stories free download online pdf in Marathi

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ४

मी आम्याला बोललो, "शांतता घे आम्या, आपल्याला उशीर होतो आहे, कार्यक्रम आहे ना ?"
ती मुलगी आजसुध्दा सॉरी नाही म्हणाली, मीच बोललो आणि पुढे गेलो. आश्रमात आम्याने माझी त्याच्या बाबांबरोबर म्हणजे सुरेश सरपोतदार यांच्या बरोबर ओळख करून दिली. त्यांचं वय खुप होत, त्यांनी सांगितले तेव्हाच समजले की आम्याला आई नव्हती.
त्या दिवशी मी खुप मजा केली, मुलांबरोबर खुप खेळलो. रात्री घरी जायला जरा उशिराच झाला होता. मी जात असतांना मला रस्त्यात एक मुलगी तिच्या गाडीच्या बाजूला उभी राहून फोन वर बोलत असताना दिसली. आधी मला काहीतरी गडबड असल्याचा भास झाला पण नंतर गाडी ओळखीची वाटली म्हणुन मी थांबलो तर ती मला धडकणारी मुलगी तिचीच गाडी होती. तिने स्कार्फ तसाच बांधला होता, पण तिने गॉगल घातला नसल्याने तिच्या डोळ्यातले पाणी लगेच मला दिसले. मी गाडी लावुन तिच्याकडे गेलो तर तिने तिच्या हातातला फोन माझ्याकडे दिला. कोणीतरी पुरुष बोलत होता.
मी, "हॅलो"
फोनवरून, "आपण कोण ?"
मी, "संजय पाटील"
फोनवरून, "काय झालं आहे तिला ?"
मी, "गाडी बिघडली आहे वाटतं"
फोनवरून, "तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही तिला सिटी कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेल ला पोहचवाल का ?"
मी, "खुप लांब आहे ते बिघडलेली गाडी नाही घेऊन जाऊ शकत, एक काम करतो माझ्या मित्राचं घर जवळ आहे. गाडी तिथे सोडतो आणि नंतर तिला हॉस्टेल ला घेऊन जातो"
फोनवरून, "तुमचे खुप उपकार होतील, धन्यवाद"
आणि फोन कट झाला. मी त्या मुलीला, "माझ्या मित्राकडे गाडी लावू मग जाऊ, चालेल ना ?"
तिने तिची मान हलवून होकार दाखवला. तिने तिची गाडी लोटत लोटत माझ्याबरोबर घेतली. लवकरच दोघेही आश्रमासमोर पोहचलो. मी बाहेरूनच आम्याला आवाज दिला, पहिल्याच हाकेत तो बाहेर आला.
तिची गाडी पाहून तो, "पुन्हा गाडी ठोकली का ?"
मी त्याला पूर्ण आपबिती सांगितली,
आम्या, "ठेवून जा मग गाडी, काही काळजी नको करू ताई, मी उद्या कॉलेजात घेऊन येईल"
मी, "जरा पाणी घेऊन ये, खुप घाबरली आहे"
मी गाडी आश्रमात घेऊन आलो, ती बसली होती पायरीवर, आम्या पाणी घेऊन आला. पाणी पिण्यासाठी म्हणून तिने स्कार्फ सोडला. आयुष्यात मी इतकी सुंदर मुलगी कधी पहिली नव्हती. निरागस चेहरा, पाण्यातील मोत्यासारखे डोळे म्हणजे तिचे डोळे पाण्याने भरलेले होते म्हणून मोत्यासारखे चमकत होते. मोकळ्या रस्त्यावर मदतीला कुणी नव्हतं म्हणून रडायला येत असेल, पण माझ्या रुपात ओळखीचा चेहरा पाहून ते पाणी बाहेरच नाही आले. सावळा रंग पण गोऱ्यांना ही लाजवेल इतकी सुंदर, खरंतर गोरं म्हणजे सुंदर असं काही नसतं ही भावना त्या मुलीला पाहून पक्की झाली. मी तिच्या सौंदर्याला विविध उपमा देत असताना तिने स्कार्फ पुन्हा बांधला होता.
आम्या, "अजिबात काळजी करू नको उद्या मी कॉलेज ला गाडी घेऊन येईल"
तोपर्यंत मी माझी गाडी घेऊन गेट वर उभा होतो. मी पाहिले तेव्हा कधी नाही ते तिने दोन्ही हाथ जोडून आम्याला धन्यवाद वजा अलविदा केला. आम्ही दोघे निघालो तिच्या हॉस्टेल च्या दिशेने, तसाही मी आता हळू गाडी चालवत होतो म्हणुन उशीर झाला तिला सोडायला. तिच्या हॉस्टेल समोर गेल्यावर तिची एक मैत्रीण वाट पाहत बाहेर उभी होती. तिला पाहिल्यावर धावत जाऊन मिठी मारली आणि आतापर्यंत शांत असणारी, रडायला लागली. बाकी मैत्रिणी तिला रडतांना पाहून बाहेर आल्या आणि तिला आत घेऊन गेल्या. एक माझ्याजवळ येऊन, "धन्यवाद, आज तुम्ही होते म्हणुन ही वेळेवर आली नाहीतर कोन कुणाची मदत करतं"
तिच्या मैत्रिणीच्या आभारच स्वागत करत मी हात जोडले आणि निरोप घेतला. घरी जात असताना मनात तिचेच विचार येत होते. असं वाटतं होत जसं मी तिच्या प्रेमात पडलो आहे, माहिती नाही नक्की ते प्रेम होत की आकर्षण पण ती मला आवडायला लागली होती. घरी आल्यावर सुध्दा तिचेच विचार येत होते पण दिवसभराच्या थकव्याने झोपलो.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर मी गाडी पार्क करायला पार्किंग ला गेलो तर तिची गाडी उभी होती म्हणजे आम्या कॉलेज ला आला आहे. मी आत गेल्यावर पाहिले तर आम्या रोजच्या जागेवर नोटिसबोर्ड समोर उभा होता, त्याच्या हातात एक पिशवी होती. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारले, "काय रे आज लवकर आला ?"
आम्या, "हो, अरे ती गाडी घेऊन आलो ना"
मी, "ही पिशवी कशाची"
आम्या, "रात्रीची मुलगी भेटली आल्या आल्या, गाडीची चावी देऊन गेली आणि ही पिशवी दिली"
मी, "मजा आहे तुझी तर, काय आहे यात"
आम्या, "तुला सोडून कसं काय पाहणार"
मी, "बस बस आता रडायला येईल मला, बघ त्यात काय आहे."
तितक्यात बेल वाजली.
मी, "अर्रर, लेक्चर ला उशीर होतो आहे, हे तु घेऊन जा, कॉलेज संपल्यावर भेटून बघू, बाय"
आणि आम्या त्याच्या आणि मी माझ्या वर्गाच्या दिशेने गेलो.

क्रमशः