A cup without love tea and that - 03 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०३

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०३


तर आता मंडळी बघूच आपण जसं मामांनी बोलले की, सुकन्या गुणी आहे..... जिच्यामुळे तिचं नाव त्यांनी सुकन्या ठेवलं तर, ते कशा प्रकारे घडतं हे कथेच्या समोरच्या प्रवासातून समजेलच.......☺️

आजी : "अरे माझ्या पिल्लू...... किती मस्ती हा मालिश नाही करायची का...... स्ट्रोंग बनायचं ना मोठं होऊन..... कुणी त्रास दिला की सोडायचं नाही हा....😅"

आजी तिला रोज मालिश करून देत होत्या...... ती सुद्धा आजीच्या लाडाची लेकरू ना......😘🥰😍🤩हसत खेळत त्यांची फॅमिली राहायची...... कुणालाच कुणाकडून वैर नव्हते......

जया : "आई मला काय वाटतं.... आपण ना हिला कुठलीही लिमिटेशन न घालता, तिला जे वाटेल ते करू द्यायचं.... आणि ते टिपिकल वाक्य तर वापरायचीच नाहीत...... मुली ह्या परक्याच असतात, त्यांना दुसऱ्यांच्या घरी जावचं लागतं.... वगैरे - वगैरे अशा गोष्टींमुळे ना तिच्या मनावर वेगळाच परिणाम होऊ शकतो.....😕"

आजी : "मला माहित आहे तुला काय बोलायचं आहे ते..... मुलींना जर नेहमीच आपण अस बोललो ना की, त्या परक्या आहेत..... त्यांना दुसऱ्यांच्या घरी जावच लागतं तर, त्या वाईट कधी मानून, कुठलं पाऊल उचलतील काही सांगता येत नाही.... (सकारात्मक अर्थ, लेखिकेला अपेक्षित आहे) त्यांचं मन कोवळ असतं.... म्हणून आपण असे संस्कार करू की, आपली पिल्लू सकारात्मक विचारच करेल....☺️"

जया : "हो ना आणि आपण आपल्या घरी वातावरण असं ठेऊयात ना की, ती सक्षम होईल..... एकटं राहावं लागलं तरीही मागे न हटता, ती त्या परिस्थितीला तोंड देऊ शकेल.....😚"

तेवढ्यात तिथं संजय येतात.....

संजय : "काय चाललंय सासवा - सूनांच...??😁"

जया : "अहो आम्ही सहज सुकन्या बद्दल विचार करत होतो... तिला कधीच आपण कमजोर असल्याचा भाव मनात येऊच द्यायचा नाही अस आम्ही बोलत होतो....🙂"

संजय : "अग जया आपण घरीच अस वागू ना की, ती सर्व बघून शिकेल..... मग ती वागणूक आपसूकच तिच्यात येईल..... मी तर म्हणेन चांगले संस्कार होतील तिच्यावर.... आणि तसही लहान मुलांवर मोठ्यांच्या वागणुकीचा जास्तच प्रभाव असतो ना.... मोठे घरी कसे वागतात त्यावर लहान स्वतःची वागणूक दाखवून देतात...... आता हेच बघ ना माझ्या मित्राची दोन मुलं, काल मी गेलो असता.... आई - बाबाची अक्टिंग करून दाखवत होते..... त्याची मुलगी बोलली की, मी आई सारखं जेवण बनवणार आणि घरातील सगळी कामं करणार..... तर मुलाने काय बोलावं.....!!"

जया, आजी : "काय.....🙄🙄🧐"

संजय : "तो बोलला की, मी ऑफिस मधून येऊन हिला मारणार......🤷🤦"

जया, आजी : "....काय....😲😲😬"

संजय : "हो ना.....😣😣 मी खूप डीसअपॉइंट झालो.... मित्राला बोललो तर तो बोलतो की, काय झालं तुला इतकं रिएक्ट करायला.....🙁 बोलण्यात काहीही अर्थ नाही म्हणून, मग मी निघून आलो तिकडून...."

जया : "अरे पण ते घरी असेच वागत असतील म्हणून त्या दोघांना वाटलं असेल कदाचित तसं होतं असावं.... लहान मुलं हे कोवळ्या मनाचे असतात..... जे त्यांना मोठे शिकवतात ते लगेच आत्मसात होतं...... म्हणून म्हणते आपल्या सुकन्या समोर कुणीही कधीच मोठ्या आवाजाने बोलणार नाही किंवा भांडणार नाही.... ओके...🤗"

आजी : "हो ना तसही आपण भांडखोर कुठ आहोत.... कधी - कधी होतं..... पण, आता मी ही समजून घेईल....☺️"

संजय : "खरच कुणी बघितल तर वाटेल मीच या घरचा जावई आहे की काय??....😂😂"

दोघी : "....🤣🤣😂😅"

तेवढ्यात सुकन्या रडायला लागते.....जया : "अरे बाबारे..... बघा कस ओरडून सांगते तुमची लेक.... भूक लागली तिला....😅"

संजय : "तिचा हक्कच आहे त्यावर....😁"

आजी : "तशीच असेल ती हक्क ओरडून सांगणारी......😄"

सगळे : "....😅"

सगळे आता विश्रांती घ्यायला आत निघून जातात...... सायंकाळी सगळे हॉलमध्ये बसले असता, शेजारच्या शेवंता घरी येतात......

शेवंता : "आहात का पाटलिन बाई घरी... येऊ का....?🧐🧐"

जया : "या की...... आहोत आम्ही.... चहा घेणार का...??"

शेवंता : "...😁😁थोडा....."

आजी : "काय शेवंता..... कशी आहेस..... काय निमित्त आज इकडे येण्याचं.....??🙄"

शेवंता : "ते आपलं असच.....😁"

आजी : "बर मग चहा बणलाच आहे तू सांगायला तयार रहा....😅"

शेवंता : "..🙄🙄"

सगळे : "...🤣🤣😂"

चहा घेऊन, जया बाहेर सगळ्यामधे येऊन बसते......

आजी : "शेवंता सांगते आता की, मुहूर्त काढू....😁"

शेवंता : "काय आजी....😛 बरं, आज्जी अग तुला काही समजलं का?"

आजी : "काय ग...🙄🙄?"

शेवंता : "अग ती भोपळेंची सुनीता, पळून गेली म्हणे एका मुलासोबत.... काय बाई आजचा जमाना...... आमच्या मुली तर कधी वर तोंड करून बोलत सुद्धा नाहीत.... ह्या बघा...😑😑"

सगळे शेवंताकडे गंभीर नजर टाकून असतात..... शेवंता जे काही बोलते त्यावर आजी आता खूप जास्त रागात आलेली असते.... ती खुणेनेच जयाला, सुकन्याला आत झोपवून ये अस सांगते आणि राग न दाखवता बोलायला सुरुवात करते....

आजी : "बरं मग तुला कसं कळालं....🤨🤨"

शेवंता : "हो त्या अर्चना ताई सांगत होत्या.....🧐"

आजी : "ती पळून गेली तर तुमचं काय बिघडलं त्यात?"

शेवंता : "काही बिघडवल नाही..... पण, बघा ना..... आजकालच्या पोरी...... संस्कार विकून खाल्लेत.....🤷🤷"

आजी : "आणि हे तू आमच्या सुकन्याकडे बघून का बोलत आहेस?🤨🤨"

शेवंता : "आज नाही उद्या ती ही मोठी होणारच ना....🤷 मग ती अशीच प........🙄"

शेवंता पुढे काही बोलेल तेच आजीने खाड्कन👊👋🤘 तिच्या कानाखाली वाजवली......😬😬😬😬 (उत्साही लोकांसाठीची अपेक्षित भाषा)

शेवंता : "....😟😟😓"

सगळे : "....😠😠😠😠😠"

आजी : "आम्ही तुला काहीच बोलत नाही म्हणून, तू सरकारी जागा समजून इथ घुसखोरी करायची आणि आपलं तोंड चालवायचं..... राहिली गोष्ट त्या मुलीची तर ती आता अठरा वर्षा पेक्षा जास्त वयाची असेल..... स्वतःचे निर्णय घेऊ शकते.... घरच्यांनी नकार दिला तर आणि तरच, मुली ही पाऊलं उचलतात.... नाहीतर, त्यांना काही शौक नसतो घरच्यांची बदनामी करायचा..... तसही मुली मुलांपेक्षा जास्त पुढे असतात घरच्यांची अभ्रू राखण्यात आपणच त्यांना दोष देत बसतो...... असो....😓😓 तू काय बोललीस तुझी मुलगी वर तोंड करूनही बघत नाही......😏😏😏 तुझ्या महीतिस्तव ऐक, त्या अर्चानाच्या शिवम सोबत फिरते ती..... आवर तिला आधी.....😏😏 आणि आमच्या पिल्लू बद्दल यानंतर काही बोललीस तर स्वतःची जीभ गमावून बसशील.... निघ आता......😡"

शेवंता : "मी इतकं कुठे वाईट बोलले....🤷🤷🙄"

आजी : "शांताराम या बाईंना आदरपूर्वक हाकलून लावा..... कारण, जर ही इथ जास्त वेळ अशीच थांबली की, माझ्या हातून आज अनर्थ घडलाच म्हणून समजा.......😡"

जया : "काय ताई तुम्हाला आम्ही मान दिलेला पचला नव्हता का.... आमच्याच मुलीविषयी तुम्ही अस बोलता....😠 लाज वाटते तुम्हीही एक बाई असण्याची....."

संजय : "अग काय ह्यांच्या नादी लागून उपयोग..... यांचे विचार बदलणाऱ्यातले नाहीच...😤😤😠"

शेवंता : ".....😤😤😤 चांगलं सांगावं तर आम्हालाच बोलणार.... काय अर्थ ह्याला.....😏"

आजी : "इतकही चांगलं बोलू नये माणसाने की, लोकांना ते पचण्यास जड जाईल आणि तो अजीर्ण आपणच असुत.... मूर्ख....😏😏😠😠"

शेवंता : "ह्म्म्म्म्म.......😤😤"

ती पाय आपटतच निघून जाते...... इकडे आजीही कुणाशी न बोलता आपल्या रूममध्ये निघून जाते...... जया, कमला ताईंना स्वयंपाकात मदत करायला...... तर, संजय बाहेर इन डोअर गार्डनमध्ये निघून जातो......

आपण ही निघुया माहोल गरम आहे......😁🌡️🔥🔥🌡️😁 (वेगळं सांगायला नको 🤫🤫🤫)भेटू नंतरच्या भागात लगेच......😉


@खुशी ढोके..🌹


Rate & Review

Dilip Naikwadi

Dilip Naikwadi 1 year ago