लग्नप्रवास - 9 in Marathi Love Stories by सागर भालेकर books and stories Free | लग्नप्रवास - 9

लग्नप्रवास - 9

लग्नप्रवास- ९

         आता त्याची गाडी प्रतापगडाच्या दिशने धाव घेत होती आणि प्रत्येकला जोराची भूक लागली होती. ड्रायव्हरने सांगितले एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये मी गाडी थांबवतो. सर्वजण तुम्ही जेवून घ्या. कारण प्रतापगढ बघायला खूप उशीर होईल. सर्वानी होकाराथी मान डोलावून गाडी बाहेर पडले. सर्व जण हॉटेल मध्ये खुर्ची पकडण्यास सरसावले. पुढे जाऊन प्रितीने खुर्ची पकडली आणि रोहनला हाथाने इशारा केला. आता जेवायला काय मागवायचे ह्या विचारात दोघांनीही मेनू कार्ड मध्ये डोके घातले होते. त्यांनी दोन जेवणाच्या थाळी मागवल्या. ऑर्डर येण्यास वेळ होता तेव्हा प्रीतीला तो न्यहाळात बसला तेव्हा त्याच्या मनात विचार सुरु झाला.

        हल्ली तुझं अस्तित्व माझ्यासाठी श्वासाइतकाच अनिर्वाय झालाय. तू काहीही समज पण. माझं आख्ख आयुष्यच व्यापून टाकलाय तू. तुझं असणं आणि नसणं हे माझ्यासाठी दखलपात्र कस? काही कळेनासे झालाय. माझ्या निरास, सपक आयुष्यात तू आलीस आणि माझं समग्र जीवनच बदलून गेलं. रखरखीत उन्हात श्रावणसरी बरसून जाव्या आणि चोहीकडे हिरवळ झाडाची अगदी तसेच काहीस झालंय. तुझी लाघवी बोलणं, मध्येच खळखळून हसणं, रुसणं. सार विलक्षणच.स्नेहबंध जुळले. आणि आता तू कायमची माझी झालीस. आपल्यात एक घट्ट नातं निर्माण झालं. या निनावी नात्याला कशाचीही गरज भासत नाही कि स्वार्थाचा लवलेशही नाही. सर्वकाही पवित्र, प्रेमळ, उत्तोरत्त वाढत जाणार.. आश्वासक दुःख सुखात देखील सोबत राहणार. आठवण तुझी आल्यावर मी होती वेडापिसा, निष्प्रभ लेखणी येते माझ्या मदतीस धावून. तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, हव्याहव्या आठवणींची शिदोरी आनंद देऊन जातात मला.

     रोहन त्याच्या विचारात मग्न झालेला तेव्हाच प्रितीने हाताची टिचकी वाजवून त्याला वर्तमान काळात यायला लावले. काय झाले, कुठे हरवलात? ही काय जेवणाची ऑर्डर आताच आली आहे. चला जेवूया तुम्हला भूक नाही लागली का? रोहन हसला आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली. दोघांनी जेवताना हास्य विनोद करून जेवण पुरे केले. जेवून आटोपल्यावर सर्व जण गाडीत बसले. आता गाडी थेट प्रतापगडाच्या पायथ्याशी थांबली. पार खिंडीचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याचे बांधकाम करण्याचे काम मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी १६५६ मध्ये पूर्ण केले. शिवाजी महाराज आणि अफझल खानची ऐतिहासिक प्रतापगडाची लढाई ह्याच किल्ल्याच्या तटबंदीच्या खाली झाली. किल्ल्यावरती खूप जुनी तोफ बघितली. त्या दोघांनी भरपूर किल्ल्यावर फोटो काढले.तळपत्या उन्हाच्या गर्मीत आता प्रीती चालता चालता खूप दमली होती. तिला खूप तहान पण लागली होती. अगदी घसा सुकला होता तिचा. तेव्हाच तिच्यासमोर एक मोठं झाड आलं. आणि तिने विचार केला, रोहनला सांगून थोडा वेळ ह्या झाडाच्या पडणाऱ्या सावलीवर विश्रांती घ्यावी. तसे रोहन आणि प्रीती दोघेही तिथे थोडा वेळ विश्रांती करण्यास थांबले. दोघेही चालूनचालून गडाच्या टोकापर्यंत आले होते. अजून त्याना प्रतापगड फिरायला खूप वेळ लागणार होता. प्रीती आणि रोहन थोडा वेळ झाडाला टेकून त्यांनी डोळे मिटले होते. तेवढ्यातच रोहनला एका वेगळ्या संगीताचा आवाज ऐकू येऊ लागला. दोघेही उठून उभे राहिले बघतात तर काय एक बंजारी समूहाचा काफिला जात होता. ह्याच्याकडे पाणी मिळेल ह्या उद्देशाने प्रीती आणि रोहन त्याच्याकडे विचारयण्यास गेले. 

"बाबा, आम्हला थोडं पाणी मिळेल का तुमच्याकडील?" आम्हला खूप तहान लागली आहे.

हो, मिळेल ना. आणि बाबाने रोहन आणि प्रीतीला पाणी पिण्यास दिले. त्या दोघांची तहान भागली. रोहन आणि प्रितीने त्याचे मनोमनी आभार मानले. आणि त्या बंजारा काफिल्याबरोबरच रोहन आणि प्रीतीने पुढील वाटचालीस सुरूवात केली.

ती काळजाच्या कागदावर दोन शब्द गिरवून गेली 

तो गोड ओठांच्या कळांवर हात फिरवून गेला.

तो विस्कटलेल्या तिच्या मनाच्या तुकडयांना पटकन आवरून गेला 

ती त्याच्या भरकटणाऱ्या पावलांना क्षणात सावरून गेली..

तो तिच्या डोळयांवर खिळणारी तिची नजर घेऊन गेला 

ती त्याच्या ओठांवरच हसू चोरून डोळ्यात अश्रू ठेवुन गेली... 

      आता प्रतापगढ दोघेही उतरू लागले कारण ड्रायव्हरने दिलेली वेळ पूर्ण होत आली होती. सर्व जण गाडीत बसले आणि गाडी हॉटेलच्या दिशेने धावत होती. संध्याकाळ होत आली होती. वाटेतच ड्रायव्हरने गाडी थांबवली. आणि सांगितले सूर्य मावळताना इथून स्पष्ट दिसत आहे तरी कृपया सर्वानी खाली उतरून ही दृश्य आपल्या कॅमेरामध्य कैद करावी. गाडीतून उतरून तो नजारा सर्वाना बघितला. आता सर्व जण थकून गेले होते. प्रीती तर रोहनचा खांदा आधाराला घेऊन झोपी गेली. रोहन मात्र जागा होता, खिडकीमधून निसर्गरम्य दृश्य पाहत होता. थोड्यावेळेने गाडी हॉटेलवर पोहचली. आणि रूमवर जाऊन दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला. दोघेही थोडावेळेसाठी झोपी गेले. बेलचा आवाज झाला. रोहनने दरवाजा उघडला तर रूम सेर्व्हन्ट म्हणाला, डिनर रेडी आहे जेवायला या.

हो, ठीक आहे. त्याने प्रीतीला उठवले आणि दोघेही तयारीला लागले. नेहमीप्रमाणे ते डिनर रूम मध्ये गेले. तेव्हा त्याना सांगण्यात आले, डिनरची अरेंजमेंट स्विमिंगपूल पाशी करण्यात आली आहे. तर कृपया करून तुम्ही तिथे स्थानापन्न व्हावे.दोघेही लगेचच तिथे गेले आणि बघितले तिथली अरेंजमेंट काहीतरी वेगळीच होती. तिकडे सगळीकडे कॅण्डल लाईट लावण्यात आले होते.प्रीतीला ते फार सुंदर वाटले एकीकडे स्विमिंगपूल आणि दुसरीकडे जेवण्याची संपूर्ण व्यवस्था आणि तिसरीकडे मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यात आले होते. ह्या संधीचा फायदा घेत रोहनने स्टेज वर धाव घेतली आणि त्याने तेथील लोकांना सांगून गाणे गाण्यास सुरूवात केली. हे पाहून प्रीती एकदम थक्क झाली. तिला स्वप्नातही वाटले नव्हते तिचा भावी नवरा इतका सुंदर आणि रोमँटिक असेल. 

मी पहावे तू दिसावे 

पारणे या मनाचे फिटेना 

अंतराची अंतरे ही 

का तरीही सारी मिटेना?

हीच प्रीती, हीच भीती 

वीण दोघातली ही तुटेना

हेच कोडे रोज थोडे

सोडवावे तरी सुटेना. 

रोहनचे गाणे संपल्यावर तिकडे उपस्थित असलेल्या सर्वानी टाळ्या वाजवून रोहनच्या गाण्याला प्रतिसाद दिला. हे सर्व झाल्यावर त्यांनी गप्पा मारत जेवण पूर्ण केले. आणि रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्यास निघाले. वाटेतच त्यांना हॉटेलच्या परिसरात एक छोटेसे हनुमानाचे मंदिर दिसले. त्यांनी देवाचे दर्शन घेऊन पुढील वाटचाल सुरु केली. आता ते रूमच्या दिशने जाण्यास निघणार तितक्यात प्रीतीला एक झोपाळा दिसला. तिने रोहनने हट्ट केला, आपण पाच मिनिटे तरी त्या झोपाळयावर जाऊया का. रोहनने होकाराथी मान डोलावून ते दोघेही झोपाळ्याकडे गेले. इतके सुंदर वाटत होते, की रात्रीच गार वारा सुटलेला. झोपाळ्यावर दोघेही झोके घेत होता. आणि दुसरीकडून छान गाण्याचा आवाज ऐकू येत होता.

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तोपर्यंत थांबतो. भेटू पुढील भागात.

                                                                                                              

Rate & Review

Trupti Gawde

Trupti Gawde 4 months ago

Nice

Payal Karlekar

Payal Karlekar 4 months ago

I M

I M 4 months ago

सागर भालेकर
Dipali Bakale

Dipali Bakale 4 months ago