Marriage Journey - 10 books and stories free download online pdf in Marathi

लग्नप्रवास - 10

लग्नप्रवास- १०

एकदाचे प्रीती आणि रोहन घरी पोहचले. तो दिवस पूर्णवेळ त्या दोघांनाही आराम केला.दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे घरच्यांनी सांगितले, कि तुम्ही महालक्ष्मी आणि मुंबादेवीचे दर्शन घेऊन या. दोघांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले. कारण दोघेही थकलेले आणि त्याचा आराम करायचा मूड होता. परंतु नाही कसे बोलणार म्हणून त्यांनी होकाराथी मान डोलावल्या. सकाळी दोघांनाही नाश्ता करून तयारीस लागेल. प्रितीने छानशी साडी नेसली आणि रोहन शर्ट पॅन्ट घालून जाण्यास निघाले. पहिले त्यांनी महा लक्ष्मीचे दर्शन घेतेले. तिकडे खण नारळाची ओटी घेतली, तिथेही दर्शन व्यस्थित झाले. थोड्यावेळेने त्या दोघानाही मुंबादेवीचेही दर्शन घेतले. आणि संध्याकाळी थकून भागून घरी आले.

दुसऱ्या दिवशी प्रीती ऑफिस मधील सर्व काम उरकून लवकर निघाली. रोहनची लवकर काम आटपून निघणार होता. दोघेही कॉफी शॉप मध्ये भेटणार होते. पण त्याआधी प्रीती घरी येऊन थोडा आराम करून रोहनला भेटायला जाणार होती.रोहन आणि तिच्या प्रेमाच्या आठवणी काढत काढत ती कधी घरी पोचली तिला सुद्धा कळले नाही. घरी आल्यावर ती फ्रेश झाली. आणि पलंगावर झोपी गेली. एक तासाने रोहनचा फोन आला. मी ऑफिस मधून निघालो आहे. तर तू लवकर निघ. तशी ताडकन प्रीती पलंगावरून उठली आणि तिने तयारीला लागली. रोहनने दिलेला निळाशार पंजाबी ड्रेस प्रितीने परिधान केला. त्या ड्रेस मध्ये प्रीती खूपच सुंदर दिसत होती. केस वाऱ्यासारखे मोकळे सोडलेले, कानामध्ये मोत्याचे टॉप्स घातलेले. प्रीती रोहनला भेटण्यास ठरलेल्याला ठिकाणी गेली. जरा लगबगीने प्रीती तिथे पोचली. आणि तिची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या रोहनकडे गेली. तशी ती लगेचच रोहनच्या जवळ आली.

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,

प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार,

पण काय आहे तुझ्यात मला कळत नाही,

तुला पहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही.

गुलाबाची नाजूक कळी आहेस तू,

चंद्राच्या गालावरची खळी आहेस तू,

कोणासाठी काहीही असलीस तरी,

माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तू..

दोघांनाही मस्त वेळ कॉफी शॉप मध्ये घालवला. कॉफी शॉप मध्ये बराच वेळ घालवल्यानंतर प्रितीने रोहनकडे एका लॉन्ग ड्राईव्हचा सारखा तगादा लावला. रोहन ऑफिस ते कॉफी शॉप स्कूटर चालवून खूप दमलेला. अखेरीस नाईलाजाने रोहनला प्रीतीच ऐकावंच लागल. दोघेही कॉफी शॉप मधून निघाले लॉन्ग ड्राइवर वरती. त्याची स्कूटर मरीनलाईन्सच्या निसर्ग रम्य समुद्र पाहण्याची संधी दोघांनाही मिळाली. मावळलेले आकाश, आणि जोरात सुटणार वारा. प्रीती आणि रोहनने मरीनलाईन्सच्या कठडयावर बसून बरेच सेल्फी काढले. समुद्रच्या ठिकाण चाट मसाला,भेळपुरी आणि पाणीपुरी खाण्याची मज्जा काही वेगळीच. दोघांनाही ती निर्सगरम्य संध्याकाळी अगदी आनंदात घालवली. कधी एकत्र वेळ गेला दोघांनाही कळाले सुद्धा नाही.तेव्हा प्रीतीला जुन्या पिक्चर मधला संवाद आठवला. प्रियकर नेहमी आपल्या प्रेयसीला म्हणतो, तुझ्यासाठी मी चंद्र आणि तारे सुद्धा आणू शकतो. असे वाटत होते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत. स्वर्गाच्या गाठी बांधणारा तो वर बसलेले देवच असतो. आता मात्र दोघांनीही परतीची वाट धरली. रोहन स्कूटर भरधाव वेगाने चालवत होता. की कोणास ठाऊक. त्यांनी समोर बरीच गर्दी बघितली. रोहन आणि प्रीती खाली उतरले तेव्हा त्यांनी पाहिले. तेव्हा तेथे एका मुलीचा accident झाला होता.दोघेही खाली उतरले. जमाव झाला होता. पण जमावापैकी कोणीही त्या मुलीच्या मदतीला आले नाही. उलट घोळका करून सगळे तमाशा बघत होते. लगेचच रोहन ने रिक्षा थांबवली आणि दोघांनीही त्या मुलीला रिक्षाने इस्पितळात दाखल केले.

डॉक्टरांनी त्या मुलीला operation theater मध्ये घेतले. तातडीने तिच्यावर उपचार करण्यात आले. इकडे रोहन आणि प्रीती मात्र खूप चिंतेत होते. तेवढ्यातच रोहनचा मोबाईल वाजला. रोहनच्या आईचा फोन होता. घडलेली सर्व प्रसंग रोहनने आपल्या आईला सांगितला. थोड्यावेळेने operation theater मधून डॉक्टर बाहेर आले. आणि त्यांनी रोहन आणि प्रीतीला घाबरण्याचे का कारण नाही आहे. patient आता अगदी ठीक आहे. तुम्ही तिला वेळेवर आणले नसते तर कदाचित जास्त रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू ही होऊ शकत होता. पण तुम्ही तिला वेळेवर आणले. रोहन आणि प्रीती हे ऐकून खूप आनंद झाला. आणि ते तिला भेटायला गेले.घरी आल्यावर सगळी हक्कीकत त्यांनी आई व वडिलांना सांगितली. त्यांनी रोहन आणि प्रीतीच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. खरंच दोघांनीही आज आपापल्या आई व वडिलांना अभिमान वाटेल असेच कृत्य केले आहे.

कधी वाटते वाटते तुला दयावे असे काही

ज्यात लपेल आकाश लोपतील दिशा दाही.

असे काही तुला द्यावे भाबडे नि साधे भोळे

राधेचीही पडो दृष्टी द्रौपदीचेही दीपो डोळे..

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तोपर्यंत थांबतो. भेटू पुढील भागात.