Moksh - 6 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 6

पंतांच्या वाड्यावर उस्मान काकांना भीमाने भाजी घेऊन बोलावल होत.

पंतांच्या वाड्यावर भीमा जेवण बनवायचं काम करायचा , तो नेहमीच उस्मानकाकां कडून भाज्या विकत घ्यायचा , आज सुद्धा तो भाजी विकत घ्यायला बाजारात जाणार होता -पन जखोबाने सांगितल्या नुसार जास्तीत जास्त पदार्थ बनवायचे होते..ज्या कारणाने बाजारात जायला त्याला वेळ मिळाला नव्हता.. म्हणुनच त्याने उस्मान काकांना फोन करून वाड्यावरच बोलावल होत.

उस्मान काकांबरोबर आर्य्ंश पंताच्या वाड्यावर आला..
उस्मान काकांनी भाजी विकली होती.! परंतू भीमाकडे त्यांना द्यायला पैसे नव्हते. कारण भाजी खरेदीचे पैसे जखोबा देणार होता ! पन ज्खोबा वाड्यात नसल्याने उस्मान काकांना आता तिथे थांबन भाग होत.

आर्यंश आणि उस्मान काका पंतांच्या वाड्यावरच थांबले होते..


......

योगायोगाने


आनिषा - आर्यंश दोघांचीही अद्याप भेट झाली नव्हती.
आनिषाने स्वत:हासाठी एक महागडा मोबाईल घेतला होता.
मोबाईल घेऊन तीने बाजारात थोडीफार खरेदी सूद्धा केली..! लहानपणीच्या तिच्याकाही मैत्रिणी देवपाडा गावात होत्या - त्यांच्यातल्या काहीजनीँशी तिची ओळख झली होती.

मग ते पाहूणचार आल, चहा -पाणी घेण आल...दहा-वीस मिनिटांसाठी घरी बसण आल..

आनिषाच ह्यातच अर्धा दिवस निघुन गेला होता..

जखोबा सुद्धा अर्धादिवसभर तिच्या बरोबरच होता..
म्हंणजेच आनिषाची कोणी मैत्रीन भेटली - आणि जो पर्य्ंत आनिषाच पाहूणचार होऊन ती तिच्या मैत्रिणीच्या घरातून बाहेर येत नसायची तो पर्य्ंत तो गाडीत बसलेला असायचा..

xxxxxxxxxxxxx

संध्याकाळ झाली होती. सुर्य अस्ताला निघुन गेला.. होता. देवपाडगावाला चारहीदिशेने अंधाराने घेरल होत.
संध्याकाळचा मंद वारा सुटला होता.

व्हू , व्हू करत भुतासारखा गाव हिंदड़त सुटलत होता.

देवपाडगावातल्या घरा घरांत देवांच्या तसबीरी समोर दिवा पेटला होता..

आज देवासमोर पेटलेल्या दिव्यांच्या तपकीरी उजेडात देवांचे फोटो भेसूर दिसत होते.. जणु देव अखुष, अप्रसन्न होते.

देवपाडा गावातल्या महादेवाच्या मंदिरातली आरती नुकतीच संपली होती.



सतरा फुट लांबीचा आणी पंधराफुट रुंदीचा हॉल होता. खाली काळसर ओटा , आणि त्यांवर चार पाषाणी खांब होते..खांबांच्या आधारावर कौलारू छप्पर उभ होत.

पाषाणाच्या खांबावर एक एक अश्या चार मशाली जळत होत्या. देऊळात लाईट वगेरे नव्हती.. ! समोर महादेवाची - पाषाणाची काळसर व्याघ्रंबरावर विराजमान असलेली काळ्या रंगाची मुर्ती होती. ही मुर्ती म्हंणजे साक्षात महादेवच समोर बसला होता अस गाववाल्यांच म्हंणन होत.

देऊळात काम करणारे पुजारी तुकडोजी जे काही सात आठ गावकरी पुजेला हजर होते त्या सर्वाँना प्रसाद वाटत होते.

प्रसाद म्हंणजे लाह्या , गोड साखर ,चणे फुटाने !

गावातली शेंबडी चड्डी न घातलेली नागडी पोर प्रसादाच्या कारणाने रोज हजर असायची. आज सुद्धा होती.

तुकडोजी पुजारी तसे प्रेमळ स्वभावाचे , सर्वात प्रथम ते मोठ्यांना प्रसाद वाटत आणि मग त्या लहान पोरांना उरलेल जास्त प्रसाद सर्व देऊन टाकत. आजही त्यांनी तेच केल..

" अवो तुकडो बाबा ?" एक गावकरी म्हंणाला.

त्याच्याबाजूला अजुन दोन गावकरी उभे होते.

" हो बोळ बाबा , काय म्हंणतोस !"

" अव इतकी वरीस झयली, पन आपल्या संकराच्या
मंदिरात अजुन लाईट का नाय लागली. आण हा मंदिर अजुन असा जुनाच का हाय !"
तो गावकरी म्हंणाला. त्यावर बाजूला उभ्या दोघांनी नुकतंच मान हलवली.

" अरे बाळा !" तुकडोजी जरासे हसले..
" हा मंदिर म्हंणजे साक्षात महादेवाच घर आहे !
तुला काय वाटत ? की हा मंदिर चांगल ऐस पेस व्हाव, हा जुनाट ओटा तोडून इथे खाली महागडी फरशी बसावी , ह्या पाषाणी खांबांना तोडून तो कौलारू छप्पर काढून तिथे स्लाप बसाव ! अश्या ह्या सर्व सुविधांसाठी सरकारने इथे अर्ज केला होता , पन त्याला मान्यता दिली गेली नाही."

" का ? ओ बाबा !" त्या गावक-याने विचारल.

" कारण , इथे महादेवाचा जागृत अंश आहे !
माझे पुर्वज असे म्हंणतात की ह्या मंदिराच उदयच साक्षात महादेवाच्या शक्तिने झालंय ! महादेवाने खुद्द स्वत:हा हा छ्त्र उभा केला आहे ! आणि विळक्षण बाब अशी , की दिडशे दोनशे वर्ष होऊन सुद्धा ह्या मंदिराचा एकही पाषाण गरमी उन्ह पाऊस खाऊन सूद्धा तडकला नाही , भिंतींना तडे गेले नाही , सर्वकाही नव्यासारख आहे. ह्याला दैवी योग म्हंणाव नाहीतर काय? म्हंणूनच महादेवाच्या ह्या घराला नव आकार देण आम्हाला तरी पटत नाही. कारण हे मंदिर जागृत आहे.."

तुकडो पुजारींचे सर्व बोल त्या गावक-यांना पटले होते.
पुजारींना हात जोडून नमस्कार करत ते गावकरी आप-आपल्या घरी निघुन गेले. आता मंदिरात ते एकटेच होते.नाही नाही एकटे नव्हते आणखी कोणितरी त्यांच्यासोबत होत ? ...


XXXXXXXXXXXXX

पंतांचा वाडा:

भल्यामोठ्या हॉलमध्ये छताला काचेचा झुंबर पेटला होता. अवतीभवती सुद्धा काही बाही पांढ-या लाईटस पेटलेल्या.

वीस मांणस सहज बसतील असा मोठा ड़ायनिंग टेबल दिसत होता.

डायनिंग टेबलावर खुप सारी व्यंजन मांडली होती.
चपात्या, पू-या, बिर्याणी, मटण-चिकण, भात, वरण, बटाट्याची भाजी, वटाण्याची भाजी, भरलेली भेंडी,आल्लू टीक्की, कांद्याचे भजे, गुलाब जामून, रसगूल्ले, मेवा अजुन खुपसारे पदार्थ तिथे होते. एकंदरीत शाकाहारी -मांसाहारी दोन्हीही .

टेबलाच्या वरच्या खुर्चीवर लताबाई बसल्या होत्या.
त्यांच्या डाव्या बाजुला एक (49) वय असलेले इसम बसलेले- त्यांच नाव रघुवीर पंत लताबाईंचे दोन नंबरचे पुत्र, रघुवीर यांच्या बाजुलाच एक हिरवी साडी नेसलेली स्त्री म्हंणजे निषाबाई वय ( 47) बसलेल्या त्या रघुवीर रावांच्या पत्नी होत्या .

त्या दोघांच्या बाजुलाच दोन खुर्च्यांवर त्यांची एकूलती एक मुलगी रिया वय (21) बसली होती.

..

" आनिषा ? काय ग दादा कसा आहे ?"
रघुवीर रावांनी आपल्या मोठ्या भावाची विचारपूस केली.

" हो अप्पा , सर्व ठिक आहेत !" आनिषा बोलली.

एक दोन मिनिट सर्वाँच बोलन सुरु राहील..तेवढ्या वेळेत भीमाने सर्व काही पदार्थ डायनिंग टेबलवर आणुन ठेवले होते.

जखोबा ड़ायनिंग टेबलपासून बाजूलाच उभा होता.
भीमाने त्याच्याशी दोन शब्द बोलून त्याला जरा आडबाजूला आणल..

स्वयंपाक घरात उस्मान काका आणि आर्यंश उभा होता.

" अन्ना ह्या उस्मान काकांचे पैसे राहीलेत !"

जखोबाने उस्मान काकाकडे मग आर्यंशकडे पाहील दोन क्षण तो एकटक आर्यंशकडेच पाहत होता.

जखोबाने खिशातून तीन पाचशेच्या नोटा काढुन
उस्मान काकाला दिल्या.

" निघा आता , इथून !" जखोब खेकसला..

त्याच हे वाक्य आर्यंशला उद्देशून होत.

" चल बेटा! " उस्मान काका आर्यंशला घेऊन बाहेर
जाऊ लागले..

हॉलमधून ते दोघे जात होते.

आनिषा लताबाईंच्या उजव्या हाताला असलेल्या खुर्चीतच जेवत बसली होती . तिच्या समोरुनच वीस पावलांवरून आर्यंश जात होता. काहीमीटर अंतरावरूनच तो जात होता.

अचानकच आनिषाच्या चेतना तंतूना कशाचीतरी चाहूल लागली..! तिचे अवयव , मेंदू एकदम जरासा उत्तेजित झाल्यासारख वाटल आणि तीने गर्रकन वळून हॉलच्या दरवाज्याकडे पाहिल..

तस तिला दरवाज्यातून आर्यंश बाहेर जाताना दिसला..

" अरे हा तर ?" ती अस म्हंणतच जेवत्या ताटावरून उठली..

ललिताआज्जी , रघुवीरराव , निषाबाई , रिया सर्वाँनी तिच्याकडे जरास गोंधळूनच पाहिल.

तो पर्यंत ती जेवणावरून उठून हॉलच्या दिशेने धावली..

" आनू sss? अंग काय करतेस पोरी ? "

ललिताबाई म्हंणाल्या . परंतू त्यांच ऐकायला आनिषा तिथे थांबली नव्हती . हॉलच्या दारातून ती बाहेर सुद्धा पडली..

पाय-या उतरून ती अंगणात आली.

समोर आर्यंश बैग घेऊन पुढे पुढे जाताना दिसत होता..

" काय नाव आहे ह्याच ? कशी हाक मारू ?" ती स्वत:शीच म्हंणाली.

" ओय , ए मुला ? " तीने हाक दिली परंतू आर्यंशने मागे वळुन पाहिल नाही.

" ए हिरो , ए सुपरहीरो ?"

तीने पुन्हा हाक दिली परंतू आर्यंशने मागे वळुन पाहिल नाही.

शेवटी तीने एक मोठा श्वास घेतला आणि मोठ्याने ओरडली.

" ए खडूसsssss थांब !" तिचा आवाज आर्यंश पर्य्ंत पोहचला तो जागेवर थांबला त्याने वळुन मागे पाहिल..

तीच ती थंड नजर

आनिषा त्याच्याकडे हसून पाहत होती तर आर्यंश मात्र ढ्ब्बूसारखा थंड नजरेने तिच्याकडे पाहत होता. ती त्याच्यापाशी पोहचली..

" तू ? इथे काय करतोयेस?" तीच्या चेह-यावर हास्य होत.

आर्यंशने त्याच्या काळया पेंटमध्ये हात घातल.

आणी तोच हात त्याने बाहेर काढला त्याच्या हातात एक काळ्या रंगाचा स्मार्टफोन होता.

" हा काळ तू तिथेच विसरली होतीस ! तोच देण्यासाठी मी इथे सकाळीच आलो होतो." आर्यंश म्हंणाला.

" सकाळी आला होतास ? मग मला कोणीच का नाही सांगितल !"

" आनिषा !" ललिताबाई तिथे पोहचल्या..

" हा मुलगा कोण आनिषा?" समोर आर्यंशला पाहून ललिताबाई म्हंणाल्या.

" हे बघ आनिषा बाळा , तुमच जर काही प्रेमप्रकरण असेल , तर ते तिकडे शहरात - इथे नाही ! ह्या मुलाला इथून आताच जायला सांग पाहू- जखोबा? !"

ललिता बाईंनी जखोबाला हूकूम सोडला..

तसे गेटवर असलेले दोन मांणस धावतच तिथे आले..

" औह भाई, हात मत लगाओ उस बच्चे को? तुफान है तुफान ! ऐसा मारेगा ना , अस्पताल मैं भी जगहा ना मिळेगी
इलाज को !" उस्मान काका म्हंणाला.

तशी आनिषा खुद्दकन हसली.


" अंग आज्जी , तू शांत हो पाहू आधी ! अंग प्रेम वगेरे अस काही नाही ग , मी म्हंणाले होते ना मला काळ त्या गुंडापासून एका मुलाने वाचवल ?तो हाच !"

" अंग पहिले सांगायच ना !" ललिताबाईंचा पवित्रा बदल्ला.

" चला चला आत जाऊन बोलू चला ! आणि तुम्ही सुद्धा चला !" ललिताबाई उस्मान काकांना म्हंटली.

" नही नही , मुझे देर होत आहे ! घरी माझ्या पोरी माझी वाट बघत असतील. "

" अहो मग तुमचा हा मुलगा ?"

" नाही नाही , हे मेरा बेटा नाही ! बट बेटे जैसे ही है !
इस बच्चे को , आपके वाडे पे ही आणा था ! इसलीये मै ले आया !"

उस्मान काकांचे अर्ध शब्द ललिताबाईंना सुद्धा कळाले नाहीत .

आणी त्यांनी विचारल सुद्धा नाही. तो पर्य्ंत उस्मान काका निघुन गेले होते.

" चल बाळा तू ही आमच्यासोबत जेवायला बस्स! आधी जेवण करून घेऊयात ! मग तुझी ओळख होइलच !" ललिताबाई म्हंणाल्या.

सर्वजन वाड्यात निघुन गेले....


xxxxxxxxxxxxxx

तिच ती लाल रंगाची खोली ! खालची जमिन शेणाने सारवलेली होती. खोलीमधोमध एक हवनकूंड पेटल होत..
त्यात लाल रंगाची आग रक्तासारखी धगधगत होती..खोलीतल वातावरण अपशकूणी अशुभ होत !

हवनकूंडासमोर ती म्हाता-या स्त्रीची आकृती बसली होती. अंगात काळी साडी, डोक्यावर त्याच साडीच पदर घेतलेल , हनूवटी वर असलेल्या गोंदवणाच्या तीन हिरव्या चांदण्या व्यतिरिकत चेहरा दिसत नव्हता.

हातात चांदीच्या बांगड्या आणि गळ्यात सुद्धा चांदीचा हार होता.

हळु हळू ती आकृती पुढे मागे झुलत होती.

धगधगत्या हवनकूंडासमोर खाली तीन चौकोनी पासपोर्ट साईज फोटो ठेवले होते.

पहिला होता देवपाडगावातल्या - सरपंच नामदेव आबांचा, आणि दुसरा उपसरप्ंच सुर्यकांतरावांचा..! आणि शेवटला तिसरा फोटो होता - महादेवाच्या मंदिरातल्या तुकडोजी पुजा-याचा.

" सैतान कलि पुत्र पिशाच्छ भ्वं! भ्वं पिशाच्छ पुत्र कलि सैतान!"

त्या म्हाता-या आकृतीच्या तोंडून खर्जातला घोगरा आवाज बाहेर पडला. त्या आकृतीच्या एका बाजूला एक लाल रंगाची पिशवी होती..

त्यात हात घालून त्या म्हाता-या चेटकीणीने तीन काळ्या, पाच इंचाएवढ्या हात-पाय-डोक असलेल्या काळ्या बाहुल्या बाहेर काढ़ल्या.

त्या बाहूल्यांच्यात फक्त भुसा भरला होता -
वर वर पाहता त्या साधारण वाटत होत्या..पन...

पन काळ्या शक्तिमार्फत त करणी करून त्या बाहुल्यांमार्फत शत्रुचा काटा काढल जात होत.

त्या म्हातारीने पुन्हा एकदा लाल पिशवीत हात घातला ..आणि एक चांदीचा सुरा बाहेर काढला..

चांदीच्या सू-यामार्फत कलंगडी कापून त्या म्हातारीने

त्या तिन्ही फोटोंवर लाल रक्ताची एक टिळ्यासारखी रेष ओढली.

मग एक एक फोटो उचलून , त्या बाहुल्यांच्या तोंडावर काळ्या धाग्याने बांधला.

हवनकूंडा पल्याड पांढरट धुराची वलये निर्माण झाली.. ! सापासारखी हवेत वळवलत असतांना त्यात आकार निर्माण झाल .

भयान ह्दयाचा ठोका चुकवणारा अभद्र , अमन्विय आकार..

टक्कल पडलेल डोक, प्रेताड त्वचा असलेल पांढरट थोबाड ! घारे चिंचोळे बिन भुवयांचे डोळे, सहा फुट उंच अंगात काळा झब्बा ! कान सश्यासारखे मोठे होते..

खांद्यावरून गुढघ्यापर्य्ंत लोंबणा-या हातांची प्रेताड पंज्यांची नख तीन तीन इंचा पर्य्ंत वाढली होती..

वळ्वलत होती.

" सकाळी जे खायला दिलं ना ? तेच आहेत हे ! नीट बघ एकेकाला..! "

त्या अभद्र अमानविय ध्यानाने सरड्या सारखी जीभ थंडगार काळसर ओठांवरून फिरवली..! आणि चिंचोळ्या डोळ्यांनी त्या तिन्ही बाहुल्यांकडे पाहील...

" खल्लास करायचं तिघांना ! काय?"
त्या म्हातारीचा खर्जातला आवाज.

" हा हा खाऊन टाकीन कच्चा खाऊन टाकीन एकेकाला हिहिही!" ते अभद्र ध्यान घोग-या आवाज बोलल..

" न्हाई ! आतड्या कोतड्या थोबाड , आण प्रेत मांग ठेवायचं ! काय? लोक भ्याला नको का ? मांस खाऊन टाकायचं , रक्त लुचून टाकायचं! पन प्रेत ...प्रेत..मांग ठेव ! काय? लोक भ्यायला हवीत ...घाबरायला हवीत लोक घाबराला हवी...! मसान पेटाला हव गावातल ...! गावाची शोभा वाढवायची हाई तुला...! काय?"

" हा , हा ! मस्त मस्त , एकेकाच म्हढ काळ निळ करून टाकतो , खिखिखी! मसाला (रक्त)..मसाला.. पाहिजे..मला ! ए आये... ए..आये मसाला ....मसाला....पाहिजे मला... हिहिह्हिहिही!"

पुन्हा तेच धुळ वलय त्या अभद्र ध्यानाच्या देहाभोवती फिरकली..आण ते गायब झाल ...

शिकारीवर निघाल.!


क्रमश...







Share

NEW REALESED