Moksh - 5 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 5

देवपाडा बाजारातल्या मातीच्या रस्त्यावर तीस - चाळीस लोक जमली होती. त्या सर्व मांणसांणी गोल गराडा केला होता.

त्या गोल गराड्यामधोमध आर्यंश हातात तप्त तीन
फुट उंचीचा काळा झरा घेऊन उभा होता.
एकट्या आर्यंशला चार गुंडांनी घेरल होत !

शरीरयष्टीने जल्लाद सारखे काळे कुट्ट, ढेरी वाढलेले ..
भरदार मिश्यांचे गुंड! तीन जनांकडे लोखंडी रॉड होते.

तर उर्वरित त्यांच्या मेन म्होरक्याकडे एक धारधार पातीचा चंदेरी सुरा होता.

चौघेही दात ओठ खात एकल्या आर्यंशकडे पाहत होते.
त्या चौघांना पाहून त्याची हवा लीक झाली नव्हती! नाही भीतिने त्याचे अवसान गळाले होते. नाही हाता पायांना कंप सुटला होता.

रेसलिंग करीयर मध्ये मिळालेली ट्रेनिंग त्याच्या अंगी नव्हती का ? मुव्हमेंन्टस -शत्रुचे आघात कश्याप्रकारे मुकवताल, लॉक पॉइंटस- शत्रुच्या कोणत्या भागाला पिल दिल्यावर जास्त वेदना होतील, पंच पॉईंटस - शत्रुच्या कोणत्या शरीरावर कोणत्या भागावर , मुक्के बसवले जाऊ शकतात ज्याने - शत्रु दोन- तीन मुक्क्यांतच धारातीर्थ होईल..! अस सर्वकाही तो ट्रेनर्सकडून शिकला होता!

सात आठ जणांना एकटा पेलू शकेल , अशी त्याची पर्सन्लटी बनली होती.



आर्यंश समोर पंधरा पावलांवर त्या गुंडांचा म्होरक्या उभा होता.

गर्दीपासून जरा लांब दोन हवालदार उभे होते.

" काय यार हे गुंड सुधरत नाय ? कितीदा जेलमंधी टाकल ? पन पैक देऊन सुटतात हरामखोर !" पहिला हवालदार .


" चल मग थांबूयात हे भांडण?" दूसरा हवालदार .

" नाय नग. थांब ! बघूदे तर कोण ह्या हरामखोरांच्या डोक्यावर बसलाय , जो कोणि असल तो साध वाटत नाय? चार चार जण आलत बघ!"

तो पहिला हवालदार म्हंणाला.


त्या म्होरक्याने आर्यंशच्या मागे पहिल- आर्यंशच्या मागे त्या गुंडाचाच एक साथीदार उभा होता. त्या म्होरक्याने नजरेने ये असा इशारा केला.

तसा तो मागचा गुंडा

" आsss.!" आरोळी ठोकत आर्यंशच्या दिशेने धावला.

पाच पावल धावताच त्याने हातातला रॉड , हवेत उंचावला..!

आर्यंश अद्याप थंड नजरेने पुढेच पाहत होता.

टिव्हीच्या दुकानात दरवाज्यात उभा असलेला तो मुलगा सुद्धा डोळे वटारून - त्या गुंडाला पुढे पूढे येतांना पाहत होता.

" आरे मागे.... बघ , मागे ...बघ !" त्या मुलाचा आवाज अगदी बारीक होता.

आर्यंशपासून अगदी दोन पावलांवर येऊन तो गुंड पोहचला होता, त्याच्या हातातला रॉड आर्यंशच्या डोक्यावर आदळायला पुढे आला होता.

" आरे मागे बघssssssss !"
त्या गुंडाला आर्यंशच्या अगदी जवळ येताना पाहून तो मुलगा मोठ्याने किंचाळला..

त्याचा आवाज ऐकून आर्यंशने गर्रकन वळुन एक गिरकी घेतली..तसा त्याचक्षणाला वरून येणारा तो रॉड बाजूला जमिनीवर पडला.. !

तो गुंड सुद्धा थोड खाली झुकला होता - तीच संधी साधुन आर्यंशने हातातला झरा , वेगाने वर नेहला आणि तिप्पट वेगधारण करून खाली आणत थेट , त्या गुंडाच्या पाठणात बसवला -


" फस्स !" पुन्हा एकदा तप्त झ-याचा आवाज झाला..
जमिनिवर तो गुंड छातीवर पडताच खालची धुळ हवेत उडाली..

आजुबाजुला उभे असलेले लोक - डोळे फाडून आर्यंशल पाहत होते.. त्या हवालदारांनी सुद्धा आश्चर्यकारक नजरेने एकमेकांकडे पाहील..

" अर जरा हळु मार की , माझ्या बाबांची लास्ट आठ्वण आहे तो झरा !" तो वडापावला हळकेच पुटपुटला..

" अहो गप्प बसा तुम्ही ? नविन घेऊ आपण!"
त्या वडापाव वाल्याची बायको म्हंणाली.


" व्ही, व्हीईईई!!" दुकानात उभ्या त्या मुलाने एक जोरदार शिट्टी हाणली.

आनिषाने एक हसरा कटाक्ष त्या मुलाकडे टाकला..
मग पुन्हा फोन घेण्यात व्यस्त झाली..

गर्दीला सूद्धा चेव चढला..गर्दीतून शिट्टयांचे आवाज येऊ लागले..



" अहाह्ह्ह्हा अय्यो अय्यो , अहाहा !" दुस-या नंबरचा गुंड सुद्धा वेदनेने तळमळत होता.

तो म्होरक्या अद्याप दात ओठ खात आर्यंशकडे पाहत होता. एक साधारण पंचविशीचा मुलगा त्यांना भारी पडत होता..! त्यांचा अहंकार दुखावला गेला होता..

" ए बघत काऊन बसला आहात ? मारा साल्याला ?"
तो म्होरक्या खेकसला.

त्याच्या हुकमासरशी त्याचे पाळलेले कुत्रे , आर्यंशच्या दिशेने धावले..!

बाजारातल्या मातिवर त्यांच्या पडणा-या धप धप पावलांनी तपकीरी धुळ वर उडत होती.

त्या दोघांनी एकसाथ हातातला लोखंडी रॉड वर हवेत उंचावला..आणि तोच वेगाने आर्यंशच्या डोक्याच्या दिशेने खाली आणला.

आर्यंशने हातातला झरा धनुश्य बाणासारखा वर धरला..! दोन्ही रॉड झ-याच्या पट्टीवर आदळले...तसा तो झरा दोन तुकडे होत तूटला..!

" बाबाss!" झरा तूटला पाहून तो वडापाववाला हलकेच पुटपुटत रडु लागला..

" औह शट!" तो मुलगा पुटपुटला...

झरा तूटताच आर्यंशने एक नजर त्या झ-यावर टाकली..तेवढयात एका गुंडाने त्याच्या छाताडावर लाथ घातली...

त्या लाथेने सुर्यांश पाच फुट मागे जाऊन पडला..!


" हहहह्हह! आता हसा , हसा आता ! हा देड कोडीचा पोरगा आमच्या समोर काय टिकणार रे ? हरामखोर !"

लोकांचा आवाज ब्ंद झाला.

तो मुलगा सूद्धा आशेने आर्यंशकडे पाहत होता.

" जा रे ? संपवा साल्याला , कोण बाप मध्ये येतो बघतो मी !" तो म्होरक्या म्हंटला. तसे त्याचे पाळलेले कुत्रे हातात रॉड घेऊन आर्यंशच्या दिशेने गेले.

" चला वाचू त्या पोराला नाहीतर मारतील त्या बिचा-याला !" दुसरा हवालदार .

" हो हो चल !" ते दोघेही गर्दीच्या दिशेने जाऊ लागले..

आर्य्ंश च्या बाजुलाच दोन फुट उंचीच एक कंपाउंड होत - त्यावर गोल लाईटचे तीन फुट खांब होते .

आर्यंशने त्याच खांबावर हात ठेवला..
आणि जसा हात ठेवला तो खांब भिंतीतन हळकेच बाहेर आला ..

दहा बारा पावल चालून ती दोन्ही गुंड आर्यंशपाशी पोहचली..

" ए मादरsss!" त्या गुंडाने आर्यंशच्या खांद्यावर हात ठेवल..

" ए सोड त्याला !" गर्दीतून तो हवालदार अस म्हंणाला होताच न तोच आर्यंशने तो लाईटचा खांब उपसून काढला ..

आर्यंशच्या गिरकी घेण्याचा वेग इतका वेगवान होता..
की पुढच्या सेकंदाला त्या गुंडाला आपल्या डोळ्यांसमोर तो काचेचा गोळा आलेला दिसला... व एक

" फट्ट!" काच फुटल्याचा आवाज होत...तो गोळा त्या गुंडाच्या थोबाडावर फुटला..!

चेह-यावर पांढरट काच रूतली जात..तो गुंड थेट चार फुट मागे उडून जमिनीवर कोसळला..

" ए sss!" जमिनिवर पडलेल्या त्या गुंडाचा साथीदार ओरडला ,परंतु पूढच्याचक्षणाला त्याच्या हनुवटी खाली तो लाईटचा पाइप बसला - आणि तो गुंडही चार फुट मागे उडून आपल्या साथीदारा पाशी वेदनेने तळमलत पडला..

त्या म्होरक्याने भयग्रस्त नजरेने आपल्या जोडीदारांकडे पाहील..! मग एक कटाक्ष आर्यंशकडे टाकला..तोच आर्यंशनेही त्याच्याकडे पाहिल..दोघांचीही नजरानजर झाली..

तस ती थंड , शुन्यहिंत नजर पाहुन त्या म्होरक्याच्या हातातला चांदीचा सुरा हातातून गळून खाली
जमीनिवर पडला..

" सायेब , सायेब ! मला अरेस्ट करा सायेब !"
तो म्होरक्या स्वत:हून हवालदारांना शरण गेला...

ते दोघेही हवालदार अद्याप आश्चर्यचकित होऊन आर्यंशकडे पाहत होते..

गर्दी टाळ्या वाजवू लागली..

आर्यंशने कोणालाही न जुमानता तो पुन्हा वडापावच्या टपरी जवळ आला..

बाकड्यावर ठेवलेला त्याचा चहा त्याने उचल्ला..
आणि तोच पुन्हा झुरके घेत पिऊ लागला..

" बेटा!" उस्मानकाका आर्यंशसमोर उभे होते...

" खुप उपकार झाले बघ पोरा तुझे !"

उस्मान काकांनी आर्यंशसमोर हात जोडले..

त्यावर तो काहीच बोल्ला नाही.

" काय ओ? कुठल आहात तुम्ही ?"
तो वडापाववाला.

त्याच्या वाक्यावर आर्यंशने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिल..पन काहीच बोल्ला नाही.

" पंतांच वाडा कुठे आहे !" आर्यंश म्हंणाला.

" पंताचा वाडा ? " त्या वडापाववाल्याने जरा भीतच त्याच्या बायकोकडे पाहिल.

" अरे बेटा! मी भाजी घेऊन चाललोय तिकडेच? चल मी पोहचवतो तुल!" उस्मान काका म्हंणाले.

तसा आर्यंश उठला. त्याने पाकिटातून पाच पाचशेच्या नोटा त्या वडापाववाल्या दिल्या.

" अहो चहाचे दहा रूपये झाले फक्त !मफ हे एवढे पैसे का देताय !" तो वडापाववाला..

तस आर्यंशने फक्त त्या झ-याकडे पाहिल..काही बोल्ला नाही ! तो वडापाववालाही समजून गेला..होता."

XXXXXXXXX

क्रमश :



---

.