Moksh - 2 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 2

ep - 2 )


रातकीड्यांची किरकीर्र मंद गतीने ऐकू येत होती.
एक पिवळ्या रंगाचा पेटलेला बल्ब दिसत होता.

त्या पेटलेल्या बल्बच्या अवतीभोवती एक दोन उडणारे किडे गोल गोल फे-या मारत होते ! त्याच बल्बच्या उजेडा जवळून वाकडीतिकडी वाफ उडत गेली.

बाजुलाच एक चौकोनी स्टो पेटला होता -त्यावर एक चांदीची गोल टोपशी होती, त्यात उकळता चहा होता. . बाजुलाच तीन चार बिस्किट, खारी, नाणखट, शिळेस ह्यांच्या बरण्या होत्या. तर एका बाजुला एक काळ्या रंगाचा रेडीयो होता.

एक चमचा धरलेला हात आला आणि चहा लागला. (हा तोच तो टपरीवाला होता)


त्या टपरीवाल्याने सांशीमार्फत चहाची टोपशी उचल्ली, आणि एक काचेच ग्लास वाफाळत्या चहाने भरल.

" घ्या सायेब !" त्याने तो कप - त्या युवकाला दिला..

" सायेब तुम्ही इथल वाटत नाही बघा , कुठून आला आहत तुम्ही आण नाव काय तुमच ? " तो चहावाला म्हंणाला.

त्या चहावाल्याच्या वाक्यावर त्या युवकाने
त्याच नेहमीच्या थंडगार नजरेने त्याच्याकडे पाहील..

" अस नका ना बघू सायेब, भ्या वाटत मला ! "
तो चहावाला बायल्या स्वरात म्हंणाला.

त्यावर त्या युवकाने बाजुला पाहिल..!

" माझ नाव आर्य्ंश , मी एक सिक्रेट रेसलिंग मध्ये रेसलर आहे ! " त्या युवकाने चहाच एक झुरका घेतला.

" मग तुम्ही इथ काय करताय सायेब , तुमच्या फाइटी असतील ना ?" तो चहावाला जरा कुतूहलाने म्हंणाला.

" हो आहेत ! पन सद्या मी सुट्टी वर आहे !"
तो युवक म्हंणाला. परंतु तो सुट्टी वर का आहे? हे त्यालाच ठावूक होत.एका पीपीवी मैच मध्ये त्याच्या हातून एका रेसलरचा चुकून खून झाला होता. पन त्याने हे त्या टपरीवाल्याला सांगितल नाही.

" वा भारी भारी..म्हंणुन तुम्ही त्या दोन काशा गज्या गुंडाची पार वाट लावली ना !" तो चहावाला म्हंणाला..परंतु त्याने हे पाहिल नव्हत , की आर्य्ंशने कसा त्या दोघांचा कायमचाच बंदोबस्त केला होता.

पुर्णत अपंगच बनून टाकल होत त्या दोघांना.

" चल, आता मला त्या वाड्याबदल सांग ?"
आर्य्ंशने चहाच रिकाम ग्लास बाजुला ठेवल.

वरच्या खिशातून एक गोल्डफ्लैक हळुच बाहेर काढली..ती ओठांत धरली, लाईटर काढुन तो जोरात हळवला..आणि मग बटन दाबल..तसा तो लाईटर खसकन पेटला.

निळ्या-पिवळ्या आगीवर त्याने ती सिगार पेटवली .

एक झुरका आत ओढला..आणी नाका तोंडा वाटे धुर बाहेर सोडत त्या टपरीवाल्या कडे पाहू लागला..

त्या टपरीवाल्याने खांद्यावर असलेल्या टॉवेलने कपाळावरचा घाम पुसला..!

एक आवंढ़ा गिळत त्याने बोलायला सुरूवात केली.

" गोष्ट तशी जुनी आहे दादा , जेमतेम तीस -बत्तीस वर्षा आधीची.

ह्या स्टेशनपासून वीस की:मी अंतरावर देवपाडा गाव आहे . अस म्हंणत्यात ह्या गावात एक शंकराच मंदिर आहे , त्या मंदिरात म्हंणे साक्षात महादेवाने अवतार घेऊह स्वत:ला मूर्तीत बदलवल बघा , मंदिरात जाऊन म्हंणे तुम्ही तुमची इच्छा, नवस जे काही देवासमोर बोलून दाखवाल, तर ते पुर्ण होतंच. " चहावाला बोलत होता आणि आर्यंश गपगूमान सर्वकाही ऐकत होता. मध्ये मध्ये त्याच सिगार ओढन , तोंडातून धूर सोडन सुरुच होत.

" गाव कस मजेत व्हत बघा ! "
तो चहावाला पुढे बोलू लागला.

" साहेब असं म्हंणत्यात , " चहावाल्याचा स्वर जरासा चिरकस , भयग्रस्त, हळुवारपणे बाहेर येऊ लागला.

" आनंद हा जास्त काळ टिकत नसतो , पन दुख, सुतक
जास्त काळ टिकतात ! सुखाला नेहमीचंच दुखाची नजर लागते बघा !

देवपाडा गावात एक सावकार होता..
नरहरपंत नाव होत त्याच ( थु) ," नाव घेऊण तो चहावाला लगेफ थुंकला.

त्याच्या चेह-यावर जरासा उग्र, तापट पणा आला.

" नरहरपंत म्हंजी एक नंबरचा कंजूश्या, आणि कटकारस्थानी, माणुस ! उभा चेहरा , मोठ कपाळ, टक्कल केलेल डोक , आणि भोव-याच्या जागी एक लांबसडक शेंडी ! अंगावर नेहमीच एक लाल शाळ , आणि खाली एक भगव दोन झापांच धोतर असायचं ! डोळे घा-या रंगचे आणि भुवया वाढलेल्या होत्या. ते घारे डोळ्यासमोर उभ्या मांणसाकडे पाहतांना हळकेच चकाकायचे. "

त्या चहावाल्याने पुन्हा एक आवंढा गिळला. आणि मग त्याने डावीउजवीकडे तिरकसपणे पाहत हळुच आपल डोक पुढे सरकवल व हळु आवाजात बोलू लागला.

" ह्या नरहरपंताला दोन सक्खे भाव होते. नरहर पंत मोठे , दोन नंबर माहीपतराव , आण शेवटला - रामनाथ !
नरहरपंतांच लग्न झाल होत ! तर दोघे भाव अविवाहित होते.
जस की मी म्हंणालो की नरहरपंत एक नंबरचा कंजूस होता..
त्याच कंजूशी पोटी ! " तो चहावाला डोळे वटारून एकदम स्तब्ध उभा आर्य्ंशकडे पाहत होता.

" कंजूशी पोटी काय ?" शेवटी आर्यंशच म्हंटला.
पुढे काय घडल हे जाणुम घ्यायची ती त्याची जिज्ञासा होती की आणखी काही ! ..

" त्याच कंजूशी पोटी त्याने आपल्या दोन्ही भावांना खपवल !"

थंड नजरेने त्या चहावाल्याकडे पाहणा-या आर्यंशला सुद्धा एकक्षण धक्का बसला.

" रक्ताच नात बी पैश्या पुढ त्या हैवानाला दिसल नाही बघा ! एवढंच नाही सायेब तर गावातली अस म्हंणत्यात की माहीपतराव आण रामनाथरावांच प्रेत बी जाळाया भेटल नाही. "


" व्हॉट , काय म्हंणायचं तुला ? जर त्यांनीच त्यांच्या भावांचे खून केले , अस गावकरी म्हंणतायेत ! मग प्रेत मिळाली नाहीत कस शक्य आहेत? "

आर्यंशला पुढे जाणुन घ्यायची जिज्ञासा लागली होती.

" कारण ते वामपंथी होते.!" तो चहावाला पटकन म्हंणाला. पाच सहा सेकंद तिथे एकदम शांतता पसरली.

" यू मीन सैतानाला पुजणारा !"
आर्यंशचा स्वर.

" व्हीई व्हीई तेच ! नरहरपंत सैतानाला पुजणारे होते.
काळी जादू, करणी, तंत्र-मंत्र , भानामती , मुठ-मारण जारण-मारण, वशीकरण करण सगळच्या सगळ शिकल होत त्याने .! एवढच नाही सायेब , तर देवपाडा गावची मांणस अस भी म्हंणत्यात ! की त्या चांडाळाने त्याच्या वाड्यात कायतरी पाळल व्हत. काय तरी इचीत्रच ब्याद बोलावली होती त्यान पाताळातून ! गावातल कोणि पंतांशी वाकड गेल..
की दुस-या दिशी त्याची तिरडी सजायची , खांद्यावरण मयताची मसनात वरात निघायची. काही काही जणांनी तर ते इचीत्र ध्यान पाहिल भी व्हत , साडे पाच फुट उंच काटकुळ शरीर, प्रेताड़ चूना चोळलेली कातडी. चेहरा म्हंणजे एक चौकोणी पांढरट पुठाच , त्यावर चिंचोळ बिन बुभळांचे डोळे. अंगात काळा झब्बा , आण रातच्याला हे असल ध्यान दरवाज्या बाहेर येऊन आवाज द्यायच.

" ये ऊठ बाहेर ये , मालकाची आज्ञा हाय बोलावलं तुला चल !"
त्या ध्यानाचा खर्जातला खसखसता आवाज ऐकून काही जण गुलामासारखी दार उघडायची ..आणि मग एकदा
दरवाजा उघडला तस ...काम खल्लास व्हायचं..

नरहरपंतांने ह्या वाममार्गाने जाम पैसा कमावला बघा..
पन म्हंणतात ना , जसे कर्म तसे फळ ! शेवटी संतप्त गावक-यांनीच नरहर पंतांना ठार केल आण त्यांना.."



" बस्स !" आर्यंश अचानक मध्येच म्हंणाला .

" निघतो मी! " त्याने काळ्या पाकीटातून शंभरची नोट चहावाल्याला दिली ..

" बाकीचे तुलाच ठेव ! आणि ह्या अश्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही मी " आर्य्ंशने बैग हातात घेतली.

व देवगडच्या दिशेने निघाला.

" ओ भौ , थांबा ! ओ भौ ..!" तो चहावाला पुढे पुढे जाणा-या आर्यंशला आवाज देत होता..पन आर्यंशने मात्र मागे वळुन पाहिल..! त्याची जिज्ञासा जणु उडाली होती.
तो चहावाला अद्याप आर्यंशकडेच पाहत होता..तोच

अचानक त्याच्या पुढ्यात असलेला काळ्या रंगाचा रेडीयो सुरु झाला व एका स्त्रीचा आवाज बाहेर पडू लागला..

" आताची ताजा खबर! मुंबई पोलिसांनी काहीतासां अगोदरच कुख्यात गुन्हेगार डाकु मंगल सिंगला सापळा रचून अटक केली होती! जंगली हाईवेने दोन जीप आणि एक कैदी गाडी कडक सुरक्षेसहित मंगल सिंगला ठाण्यातघेऊन येत होते.परंतू अचानक न जाणे काय झालं की पोलिसांच्या दोन जीपचा आणि कैदी गाडीचा अपघात झाला आहे.
पाच पोलिस मृत झाले आहेत . त्यात तीन कोंनस्टेबल्स..आणि दोन सब इन्स्पेक्टर आहेत..तर काही सेक्युरीटी गंभीर जखमी झाले आहेत. " न्यूज सांगणारी ती बाई एकापाठोपाठ बोलत होती. तिचा मोठा आवाज रेडीयोतून येत होता.

" घ्या ! ...इथं एक सुरु आहे , आण तिथ मुंबईला एक सुरु आहे ! कलियुग आलं कलियुग !" तो चहावाला स्वत:शीच म्हंणाला व त्याने आवराआवर करायला घेतली.
दुकान बंद केल..

क्रमशः
XXXXXXXXXX