Moksh - 1 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 1






मोक्ष भाग 1

मुंबई रेल्वेस्टेशन !

मध्यरात्रीची वेळ.. 3:30 am...

मुंबई रेल्वेस्टेशनवर प्लेटफॉर्म नंबर एकवर ती लांबसडक डब्ब्यांची ट्रेन थांबली होती.

त्याच ट्रेनच्या एका डब्ब्यातून एक पंचवीस
वर्षीय युवती बाहेर आली.

मोठ्या कष्टाने तिने ती मोठी काळ्या रंगाची बैग गाडीतून बाहेर काढली..तसा...

' पोंमम्म!' रेल्वे हॉर्न वाजला.

" थँक गॉड ! आधीच बैग उतरवली, नाहीतर वाट लागली असती !" ती युवती स्वत:शीच म्हंणाली.

तिच्या टपो-या डोळ्यांच्या नाजुक पापण्या फडफडवत ती आजुबाजुला पाहू लागली..!

स्टेशनवर काही मोजकीच लोक होती. ती लोक म्हंणजे स्टेशनवर झोपलेले भिकारी होय ! आता ती काही त्या भिका-यांकडून मदत घेणार होती..?

" स्वामी ...देवाSSSS आता तूम्हिक्ष काहीतरी करा बाबा...!" ती म्हंणाली. तिचा आवाज किती लाघवी होता.मनमोहिंत करणा-यांमधला होता.

धडक धडक आवाज देत , गाडीच इंजीन ड़ब्ब्यांना आपल्या समवेत हळकेच घेऊन जाऊ लागल होत..तोच..
एका ड़ब्ब्याच्या उघड्या दरवाज्यातून प्रथम एक निळी बैग स्टेशनवर फ़ेकली गेली.

तिने त्या दिशेला पाहिल..

" नक्कीच कोणीतरी उतरत अशणार?"

ती स्वत:शीच म्हंंणाली. तिने दोन्ही हात जोडले ..व कपाळाला लावले..

" थँक्यू स्वामी!" ती एवढ म्हंणुन पुन्हा पुढे पाहू लागली..!


तोच त्या डब्ब्यातून एक युवकाची आकृती वेगाने बाहेर आली..! हवेतच दोन क्षण ती आकृती थांबली..!

ब्लैक -हाल्फ टी-शर्ट, खाली ब्लैक ट्रैक पेंट, पायांत व्हाईट शूज ! हातात स्मार्ट वॉच ! एक जंप घेत तो रेल्वेस्टेशनवर हाजिर झाला..!

त्याला पाहून तिला किती धीर आला..

" एस्क्यूज मी !" तिने स्वत:हाच त्याला आवाज दिल..
त्याने वळुन डाव्या दिशेला पहिल.

ती त्याच्या कडे हसून पाहत होती..परंतू ह्याचा चेहरा मात्र कोरा होता. त्यावर गंभीर भाव होते...नजर स्थिर , तीक्ष्ण होती.

त्याची शरीरयष्टी उन्हा तहाणात काम केल्यासारखी दिसत होती. पोट आत होत..हातांचे स्नायू फुगीर होते..छातीवरची स्तनाग्रे जरा पुढे आली होती.

ती चालत त्याच्या जवळ आली.

" अहो !" तीने अस म्हंणतच जीभ चावली.
त्याच वय काही तीशीच्या आसपास नव्हत ! की डोक्यावरचे केस पांढरट झाले होते. दिसायला तो काही पुरूष वाटत नव्हता - पाहणा -याच्या नजरेत भरेल अस त्याच पिळदार शरीर , अगदी तरण्याबांड होत.

" सॉरी हं ! पन तुम्हाला अहो म्हंटल तर चालेल ना ?"
ती .

" हो , चालेल !" तो इतकच म्हंणाला.

मग एकटक तिच्याकडे पाहू लागला.. तस ती बोलू लागली.

" अं एकच्युअली , इथे स्टेशनवर मदतीला कोणीच नाहीये! मग मला तुम्ही दिसलात .तर म्हंटल तुमचीच मदत घ्यावी. माझ नाव आनिषा, ( तिने हात मिलवण्यासाठी हात वाढवल -त्याने सुद्धा हात मिळवल , त्याच्या हाताचा स्पर्श पौलाद जणु, खुप जाड्जूड कातडीचा होता. बोटे जराशी मोठे होती) मी काही दिवस माझ्या आज्जीकडे राहायला आलीये !

पन प्रोब्लेम हा आहे ! की मला त्या गावाचा नाव तर माहीतीये , पन रस्ता माहीती नाहीये."

एवढवेळ तिच बोलण ऐकणारा तो म्हंणाला.

" काय नाव आहे गावाच !" आवाज अगदी सौम्य , थंड होत. तशीच नजर सुद्धा होती .

" देवपाडा!" ती म्हंणाली. ती अद्याप त्याच्याकडे हसूनच पाहत होती..तिच्या पांढ-या शुभ्र दातांवर प्रकाश पडला होता. ते अजुनच पांढरे दिसत होते.

" ठीके चल माझ्या बरोबर !" तो इतकंच म्हंणाला.

त्याने त्याची ती निळसर रंगाची बैग एका हाताने उचल्ली. तस आनिषाच तोंड वासल, इतकी जड बैग त्याने अलगद उचल्ली होती.

" अस कस येऊ मी तुमच्या सोबत ? एकटी सुंदरी मुलगी मी , अस कोण्या अनोळखी तरूणासोबत कस जाऊ शकते ? "

आनिषाच्या वाक्यावर तो अद्याप तसंच थंड चेह-याने पूढे पाहत होता. शेवटी तो एकदाच मागे वळला.

" मी ही देवपाडा गावातच चाल्लो आहे ! यायचं असेल तर या , नाहीतर नका येऊ !" अस म्हंणतच पुढे निघुन सुद्धा गेला.

" एवढ कसल एटीट्यूड आहे ह्याला ?जो माझ्या सारख्या सुंदर मुलीला सुद्धा भाव देत नाही हा , खडूस कुठचा!" आनिषा एकटक मनातच बोलत होती.. शेवटच्या वाक्याला तिने नाक मूरडल..

" भौsss!" एक कुत्रा मागून तिच्या अंगावर भुंकला , तस तिची दचकून तंद्री भंग पावली.त्या स्टेशनवर आपल्या वाचुन कोणिही नाही हे पाहून ..ती तिथून पळालीच.

कधी मागे तर कधी पुढे पाहत अस ती धावत होती..

तोच अचानक खाली कशालातरी ठेचकाळून तीचा तोळ
गेला..ती खाली पडणार होती.. परंतू अचानक एक बलदंड बाहूचा हात आला त्या हाताने तिच्या कमरेखाली विळखा घालत तिला हवेतच आधार देत पकडल.

आपल्याला कोनी पकडल हे पाहण्यासाठी तिने समोर पाहिल. तर तिथे एक

एक चाळीस -पंचेचाळीस वय असलेला माणुस उभा होता.

त्याचा हात अद्याप तिच्या कमरेभोवतीच होता..त्याच्या नजरेतली वासना , तोंडातून येणारा दारू - सिगारेटचा आमली वास ! ती पुन्हा जागेवर नीट उभी राहीली..

" थेंक्यू !" त्या मांणसाकडे न पाहतच ती( आनिषा) म्हंणाली..
त्याच्या वासनांधीश नजरेला ती ओळखून होती..त्या नजरेला नजर देण्याची हिंम्मत तिला काही होत नव्हती.

आपली बैग घेऊन ती पुढे जाऊ लागली तोच.. मागून त्या इसमाने तिची बैग पकडली..

" मी मदत केली ना तुमची ,मंग आता तुम्ही माझी मदत करा ना !" त्याने जिभेवरून ओठ फिरवली निर्लज्जासारखा हसला.

आनिषाने तिच्या बैगमधुन दोन पाचशेच्या नोटा काढल्या.

" हे घ्या !" तिने हात पुढे केला.

" पैशा कशाला देताय " त्याने एकदमच तिचा हात पकडला.

" मला तर तू पायजेस , झxxxयला !"
त्याच्या मुखातून निघालेला तो घाणेरडा शब्द तिच्या मस्तकात आग निर्माण करून गेला. तिने झटकन आपला हात त्याच्या हातून सोडवून घेतला.आणि त्याच उजव्या हाताची एक जोरदार चापट त्याच्या कानाखाली बसवली..

' फट्ट ' आवाज झाला.

" लाज नाही वाटत अस बोलताना !"
ती रागात म्हंणाली..तिचा आवाज मोठा होता.

चहाच्या टपरीपाशी तो युवक उभा होता..
त्याने तोंडात सिगार धरली होती..दुस-या हातात लाईट होत.. तेव्हाच त्याच्या कानांवर हा आवाज पडला..तस त्याच
लाईटर धरलेला हात जागीच थांबला..

" सायेब , माफ करा ! पन इथ रेल्वेस्टेशन बाहेर दोन गुंड , महिला प्रवाशांची छेड काढतात ! तुम्ही एकदा पाहून आल तर बर होइल, नाही म्हंणजे कोणाला मदत पाहिन्र असली तर !"

त्या चहावाल्याच्या वाक्यावर त्या युवकाला काहीवेळा अगोदर भेटलेल्या त्या युवतीची आठवन. झाली.

दिसायला ती सुंदरच होती..तिचा पुर्णत चेहराच त्याच्या नजरे समोर चमकून गेला..

आनिषाचा आवाज ऐकून अजुन एक गुंड तिथे आला..
आता तिथे दोघे जण उभे होते.

आनिषाची उंची चार फुट होती..आणि हे दोघे काळेकुट्ट राकीट देहाचे साडे पाच फुट उंचीचे दैत्य होते.

त्या दोघांना पाहून आनिषाची भीतीने पाचावर धारण बसली होती.


" ए काश्या , आज तर जाम भारी माळ भेटलाय रे ? मस्त जाइल रात्र ! " तो दुसरा गुंड म्हंणाला.

" चल गज्या , करू मज्या !" काश्या व गज्या दोघेही आनिषाच्या दिशेने सरसावले..

" हिहिहि, खिखिख्ज!" हसत खिदळत , जिभळ्या चाटत दोघेही तिच्या दिशेने आले..

दोन दलभद्री जनावारांच्या कचाट्यात एक कोवळी हरीण आयतीच सापड़ली होती.

आनिषाने डोळे बंद केले. काश्याचा हात त्याने तिच्या खांद्यावर ठेवण्यासाठी वाढवला..

" स्वामी !" ती मनात म्हंणाली आणि तेव्हाच..एक चमत्कार घडला..

क्षणात काश्याची एक आर्त किंकाळी उभा आसमंत दणानूण गेली..!

" आssssssssss!" काशाचा किंचाळण्याचा आवाज इतका मोठा होता..की आनिषाची दोन्ही कानसूळ काहीक्षण बंद पडली..

त्यातून (सुंन्न असा) विशिष्ट ध्वनी ऐकू येऊ लागला..

तिचे विस्फारलेले डोळे मात्र समोरच ते द्रुष्य साठवुन
घेत होते.

काशाच्या हाताचा पंजा तुटुन खाली जमिनीवर पडला होता. काशा मोठ्याने ओरडत होता.

आनिषाने मागे पाहिल, मागे तोच युवक उभा होता -त्याच्या हातात एक तलवार होती. त्यानेच काशाचा पंजा छाटला होता.

परंतु त्या कृत्याच त्याला बिलकुल पश्चाताप झालेला दिसत नव्हता..त्याच्या चेह-यावर तेच ते थंड भाव होते.

" ए हरामखोर" गज्या खेकसला .

आपल्या मित्रावर झालेला हल्ला त्याच मसत्क ठनकवून गेला होता. रागातच तो त्या युवकाच्या अंगावर धावला..!

परंतु आधीच सावध असलेल्या त्या युवकाने , वेळीच गज्याच्या पोटात लाथ घातली.

" आsss!" पोटावर वेदना झाल्या , गज्या खाली झुकला. तीच संधी साधुन त्या युवकाने तलवारीच खालच टोक गज्याच्या टाळूवर हाणल..!

गज्या जमिनदोस्त झाला , एक दोन सेकंद विव्हळला मग तो बेशुद्धावस्थेत गेला होता.

" चल !" तो युवक इतकेच म्हंटला.

त्याने तिची बैग उचल्ली, शॉक बसलेली आनिषा चालत त्याच्या मागोमाग त्या ट्परीजवळ आली.

" हे घ्या ताई !" चाळीशी गाठलेला तो टपरीवाला म्हंणाला. त्याने एक बिसलेरीची अ-थंड बाटली आनिषाला दिला. तिने ती घेऊन सर्व पिऊन टाकली..पाणि पिल्यावर तिला जराशी तरतरी आली.

" काय ओ ताई बर वाटतय ना आता ? आणि इतक्या रातच्याला कुठ जायचं तुम्हाला ?"

' फर्र्रर्र ' आवाज करत त्या युवकाने माचिसचा कांडा पेटवला..! लाईटर पेटत नव्हत ना? संपल असाव.

पेटलेल्या कांड्याने त्याने गोल्डफ्लैक सिगार पेटवली.

" दादा मला देवपाड़ला जायचं ! माझे आज्जी आणि आजोबांकडे काही दिवस मी रहायला आलीये !"

" अस आहे काय ? काय नाव काय तुमच्या आजोबांच ?" चहावाला.

" जी नरहरहर पंत !"

" नरहर पंत.? म्हंजी पंतांचा वाडा ? " पंत हे नाव ऐकून चहावाल्याच्या बोलण्याचा पवित्रा किती बदलला. त्या एका श्ब्दाने त्या चहावाल्याला दरदरून घाम फुटला होता.

काहीवेळा अगोदर आदबीने बोलणारा तो अचानक
परक्यासारखा बोलू लागला होता.


" म..म्म..म्हंजी तुम्ही नरहर पंताची ना..नात व्हय !"

त्या चहावाल्याचा काफरा स्वर, भीतिने त्याच्या कपाळावरून येणार घाम - त्याचा हा बदललेला स्वभाव
त्या युवकाच्या थंड नजरेतून सुटला नाही.

तेवढ्यात एका गाडीच्या इंजिनचा घरघराट तिथे ऐकू आला..एक चारचाकी तिथे गाडी तिथे आली होती. गाडीत एक ड्राईव्हर होता..ड्राईव्हरच्या बाजुच्या दरवाज्यातून एक पन्नास-साठ वर्षीय , अंगयष्टीने काठीसारखा दिसणारा माणुस बाहेर आला.

" बाईसाहेब !" तो माणुस अस म्हंणतच तिथे पोहचला.

" माफ करा बाईसाहेब , जरा जास्तच उशीर झाला. तुम्हाला काही तफलीक नाही ना झाली ! "

" तफलीक जखोबा !" ती घटना पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांसमोर तरळली...तिच्या रागाचा पारा उफाळून वर आला त्याचा उद्रेक झाला.. आनिषाचा स्वर चढला होता.
तिने अस म्हंणतच काहीवेळा अगोदर झालेल ते सर्वकाही
वाईट कृत्य त्या म्हाता-या जखोबाला ऐकवल.

जखोबा हा पंताच्या वाड्यात खुप वर्षांपासून कामाला होता.नोकर चाकर , बागकाम करणारे त्याच्या हाताखाली होते . घरात लागणार सामान,
इत्यादी सर्वकाम तोच पाहायचं !

(त्याला तसे पैसे दिले जायचे.)

" माफ करा बाईसाहेब , पन त्या हरामखोरांना !"

जखोबा पुढे काही बोलणार तोच मध्ये
आनिषा म्हंणाली.

" बस्स आता त्या विषयावर मी आज्जी आईशीच बोलेन ..मला लवकर वाड्यावर घेऊन चला. मी थकलेय खुप ."


" जी बाईसाहेब चला !" जखोबाने खाली मान घालत म्हंटल.

आनिषा पाय आपटत गाडीत जाऊन मागे बसली..


त्याने तीची बैग ऊचल्ली..! एक कटाक्ष त्या चहावाल्यावर टाकला.! जखोबाचे डोळे वटारून त्याला पाहत होता..तस त्या चहावाल्याने एक आवंढ़ा गिळ्त बाजूला पाहिल . त्या नजरेला जणु तो नजर देऊ शकत नव्हता.

मग जखोबानेत्या युवकावर एक कटाक्ष टाकला. तो युवक मात्र थंड चेह-याने त्या जखोबाकडे पाहत होता. त्यात कसलीच भीती चिंता नव्हती. शेवटी ती बैग घेऊन जखोबा गाडीपाशी निघुन गेला.

बैग डिकीत ठेऊन तो सुद्धा पुढे बसला इंजीनचा आवाज होत गाडी सुरु झाली...व लाल लाईट दाखवत निघुन सुद्धा गेली.

" चला भौ निघतो मी , टपरी बंद करायची वेळ झाली."
तो चहावाला जरासा घाईत असल्यासारखा म्हंणाला.

त्याचे हात आजुबाजुच सामान जागेवरून हळवताना थरथरत होते. त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा जरा जास्तच वाहत होत्या.


" काय झाल ? इतक घाबरलायेस का?"

त्या युवकाने विचारल.

" काही नाही ओ भौ असंच !"

तो खोटच हसला.

" ठीके !"

त्या युवकाला सुद्धा जास्त काही विचारावस वाटल नाही..
त्याच तो पाहून घेईल ! आपल्याला दुनियेशी काहीच घेण देन नाही. लोकांच पाहायल आपण काही कोणी स्ंत-महात्मा नाही.

एकदा समस्या विचारल्यावर जर दुसर कोणी सांगू शकत नसेल ! तर त्याला जास्त भाव देन त्याच्या स्वभावातच नसाव.

त्या युवकाने आपली बैग ऊचल्ली.
व जाणार तोच.

" ओ भौ थांबा सांगतो ! सांगितल नाही तर मनातली भीती मारून टाकल मला ! "

तो चहावाला म्हंणाला.

तस तो युवक त्याच्याकडे एकटक थंड गंभीर नजरेने
पाहू लागला.

क्रमश :

पुढील भाग लवकर !

Share

NEW REALESED