चंपा

(107)
  • 156.8k
  • 8
  • 109.4k

प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, शहरात एक कोपरा असतो जिथे पुरुषाची शारीरिक भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया नटून थटून थांबलेल्या असतात. कोणी स्वतःच्या मर्जीने आलेल्या, काही घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, काही मनाविरुद्ध, काही फसवणुकीचा शिकार झालेल्या, कोणा एखादीला विकलेले. कुठे त्याला गंगा जमाना म्हणतात तर, कुठे कामाठी पुरा किंवा बुधवार पेठ की आणखी काही, त्यातून मर्जीविरुद्ध आलेल्या मुली बाहेर पडण्याची धडपड करत नसतील का? कदाचित कोणाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असेल तर काही आयुष्यभर तिथेच अडकून पडत असतील. ज्या मुली सुटकेसाठी प्रयत्न करतात तेंव्हा त्या मुलींना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल? वर्तमानपत्रात अनेक बातम्या असतात अश्या मुलींची सापळा रचून कशी पोलिसांनी सुटका केली. पण त्यांना सुटका झाल्यावर काय वाटले असेल?घरचे, आजूबाजूचा समाज स्वीकारेल का त्यांना? याच सगळ्या विचारांमधून त्या स्त्रियांमधील प्रातिनिधित्व करणारी स्त्री चंपा या नायिकेचा जन्म झाला. तो येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Full Novel

1

चंपा - भाग 1

अर्पणपत्रिकात्या सर्व स्त्रियांमधीलप्रत्येक चंपाला... प्रस्तावना:प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, शहरात एक कोपरा असतो जिथे पुरुषाची शारीरिक भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या वयाच्या नटून थटून थांबलेल्या असतात. कोणी स्वतःच्या मर्जीने आलेल्या, काही घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, काही मनाविरुद्ध, काही फसवणुकीचा शिकार झालेल्या, कोणा एखादीला विकलेले. कुठे त्याला गंगा जमाना म्हणतात तर, कुठे कामाठी पुरा किंवा बुधवार पेठ की आणखी काही, त्यातून मर्जीविरुद्ध आलेल्या मुली बाहेर पडण्याची धडपड करत नसतील का? कदाचित कोणाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असेल तर काही आयुष्यभर तिथेच अडकून पडत असतील. ज्या मुली सुटकेसाठी प्रयत्न करतात तेंव्हा त्या मुलींना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल? वर्तमानपत्रात अनेक बातम्या असतात ...Read More

2

चंपा - भाग 2

मला वाटले ती निघेल, पण ती जरा वेळ ऑफिस निरखून पाहत होती. पंधरा वीस मिनिट झाले असतील तरी फाइल्स, टेबल अगदी बारकाईने पाहत होती. माझा एक टेबल आणि दोन खुर्च्या सध्यातरी इतकचं होत. मी तिच्या टेबलचा विचार करत मोबाईल उचलला आणि एक टेबल आणि खुर्चीची ऑर्डर दिली. तिचे माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. मी फोन ठेवला तशी ती ताडकन उठली आणि म्हणाली."येवू सर..."मला लाजल्यासारखे झाले. इतका वेळ बसून तिला पाणी देखील विचारले नाही."नाही थांबा चहा, कॉफी सांगतो.""नाही नको... येते मी ."चालेल… अस म्हणायचे होते पण मी काहीच बोललो नाही.चंपा गेली. नाव अगदीच जुनं वाटत होत. " 'चंपा' तिच्या आईवडिलांना ...Read More

3

चंपा - भाग 3

चंपा दुसरा दिवस उजाडला राम चंपाचा विचार करत रात्री उशिरा झोपला त्यामुळे सगळ्याच गोष्टीला उशीर झाला. सिद्धार्थला उठवले सिद्धार्थ गेला आणि मी ऑफिसमध्ये… ऑफिसमध्ये पोहचायला अकरा वाजेल. चंपाकडे ऑफिसची चावी नव्हती. मी गाडी ऑफीससमोर लावली. चंपा दारात उभी होती. “सॉरी उशीर झाला. खूप वेळ येवून उभी राहिलीस का?” “नाही... साडेदहाला आले मी .” अर्धातास हि रस्त्यावर उभी होती. मला वाईट वाटले. “एक्स्त्रीमली सॉरी !” “नो प्रोब्लेम सर.” तेवढ्यात मागून आवाज आला. “काय साहेब? साडेदहाला मला मालकांनी हाकलून लावले पाहिलं राम साहेबांच्या हापिसात टेबल खुर्ची पोस्त कर आणि तुमीच उशिरा.” “गणपत तू कधी आलास?” “मी पण ह्या बाई आल्या तेंव्हापासून ...Read More

4

चंपा - भाग 4

चंपा चंपा रश्मीच्या रुममध्ये जायला निघाली. रश्मीकडे एक गिर्‍हाईक असल्यामुळे तिने आतून दरवाजा लावला होता. रश्मी दरवाजा खोल. रश्मीचा आतून आवाज येत होता. साले, हरामी उठ… वक्त भी खतम हुआ और पैसे भी साले 'तेरी तो… रश्मीने गिर्‍हाईकाला अंगावरुन बाजूला केला. उठ हरामखोर…तसं रश्मीला गिर्‍हाईकाने पुन्हा खाली खेचले. अरे साली रुक अभी तो बाहर आ रहा है दो मिनट रुक.गिर्‍हाईक जबरदस्ती करू लागले. "साले आधा घंटा तो खडा होनेको जाता है, हर रोज का नाटक है साले तेरा अगला टाइम आयेगा ना तो आधे घंटे के पैसे ज्यादा लेकरं आना.". रश्मीच्या बोलण्याकडे त्याचे लक्षसुदधा नव्हते, तो त्याचे काम करत ...Read More

5

चंपा - भाग 5

चंपा “तुझ आणि माझं वाढणं वेगळ होत ताई... मलाही शिकायच होत. आंटीला म्हणाले मी पण तिने माझ नाही ऐकल. मी जास्त विचार नाही केला. तू वेगळ्या मुहुर्तावर जन्माला आली अणि मी वेगळ्या. अहह... कधी तुझ्या बरोबर बरोबरी नाही केली ताई कारण... जे जे तुला मिळालं ते ते मला सुद्धा मिळाल फक्त फरक शिक्षणाचा राहिला. तस आंटीचे उपकार लई माझ्यावर. तुला आठवत ताई? मी मधल्या चौकात खेळत होते. अकरा वर्षांची अशिन चाचाने हाक मारली मी नाचत नाचत त्याच्या जाऊन मांडीवर बसले. मला वाटल चाचा लाड़ करतोय म्हणून अंगावरून हात फिरवतोय माझ्या लक्षात नाही आल. त्याचा हात एका ठिकाणी थांबला, नुकतच ...Read More

6

चंपा - भाग 6

चंपा “हो...” राम “जवळपास वर्ष होत आलंय मी इथल्या मुलांना शिकवतीये. आई का्य करते? हे समजायला नको म्हणून या मी त्यांची शाळा भरवते. एक छोटा प्रयत्न... पण समजायच ते समजतेच, कारण वेगळी जागा नाही न कुठे.” “माझा कोणताही स्वार्थ नाही यामध्ये जे मी सोसलं आहे ते यांना मला सोसू द्यायचं नाही हे आणखी एक कारण...” “म्हणजे ?” मला पुन्हा प्रश्न पडला. ताई ताई करत चार पाच लहान लहान मुल तिच्या जवळ आलीत. “गुड इविनिंग ताई...” मी आवाक होवून बघत होतो. “ बाळांनो तुम्ही जरा वेळाने या... “ मुलांनी तिने दिलेली सूचना पाळली आणि बाहेर गेले. “मी हि याच वस्तीतल्या ...Read More

7

चंपा - भाग 7

चंपा फ्रेश होऊन खाली आली तर राम फ्रेश होऊन कॉफी घेत बसला होता. “तुझ्यासाठी कॉफी मी करणार होते.” तिच्यासाठी भरलेला कॉफीचा मग उचलत बोलली. “मारिशा सॉरी…” “आता काय झालं? काहीतरी नक्कीच बिनसलंय?” “मी अस बोलायला नको होतं… तूला वाईट वाटले ना?” मारिशा मोठ्याने हसली आणि म्हणाली, “मला का वाईट वाटेल… तुला मी आज ओळखते का? “ मारिशा त्याच्या जवळ गेली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि कॉफीचा एकेक सिप घ्यायला लागली. राम सावरला… ”चल खूप दमलोय झोपतो.” तो उठला. आणि तडक रूम मध्ये निघून गेला रामचे असे निघून जाणे तिला खटकले. तिला कळेचना हा असा का वागतोय? मारीशा किचनमध्ये गेली. ...Read More

8

चंपा - भाग 8

चंपा चंपा कुठेच दिसत नव्हती.त्याने गाडी पार्क केली आज सगळीकडे शांतता होती ज्या त्या बायका शांत होत्या. आज ना रस्त्यावर उभं होत ना अंगचटी कोणी येत होतं. राम तिच्या स्कूलच्या रुम मध्ये पोहचला. दोन तीन छोटी मूलं होती. "हाय… ऐकाना…" एक छोटा मुलगा जवळ आला. "हा काका" "चंपा टीचर कुठे आहेत…?" "टीचर…? त्या कोठीवर आहेत?" "काय?" "तुम्ही बसा...मी आलोच…तुमचे नाव काय सांगू"?" "राम सर आलेत म्हणून सांगा." चंपाने जॉब सोडून त्यांचा धंदा…? बापरे आलो ती चुक केली का? नाही नाही आपण एकदा बोलू मग तिचा रस्ता वेगळा नि माझा रस्ता वेगळा… तेवढ्यात चंपा आली त्याला पाहून ती क्षणभर दारातच ...Read More

9

चंपा - भाग 9

चंपा "कौन रे तू..? और इतनी रात कहा जा रही हे| " खरंतर या वेळी सगळे आपापल्या कामात असतात रश्मी कशी बाहेर याचा विचार करेपर्यंत रश्मीने चंपाच्या बुरखा उचलला. "चंपा...कहा जा रही हो।"चंपाला पटकन रश्मीने एका बाजूला घेतले. "तू भाग के जा रही हैं?" चंपाचे डोळे पाण्याने भरले. "रश्मी मुझे जाने दे । मुझे इस दलदल मैं नही रहना हे। ये चाचा मेरे लिये गिऱ्हाईक को बता रहा है| क्या करू मै? इधर आज रुकी तो मेरी जिंदगी नरक बन जाएगी. तू बोल मैं क्या करू?" "हाँ मुझे पता हैं साला चाचा हरामी हैं, आंटी गई तो सालेकी कोठी ...Read More

10

चंपा - भाग 10

चंपा रश्मी तिच्याजवळ आली. "चंपा आग काय झालं परत कशी आलीस…? चाचा कसा पोहचला तुझ्यापर्यंत? तुला तर अगदी मी सोडलं होत ग… मग चाचा???" रश्मीला तिच्या प्रश्नांची पाहिजे होती. चंपाने घडलेली घटना तिला सांगितली. रश्मीने कपाळावर मारून घेतले. "क्या हुआ? अब क्या करेंगे रे... ? ये चाचा तुझे छोडेगा ऐसा लगता हें तेरेको… देवा क्या किया तुने…? चंपा चाचा कुत्रा हाय ग, आता किती पिसाळला असलं तो… असा सहज सोडायचा नाय तुला रस्त्या रस्तावर माणसं ठेवली असत्यात पण तुझे आजके आज ही बाहर पडना होगा चाहे कुछ भी हो जाये।" रश्मी विचार करू लागली.काय करता येईल. "रश्मी मी माझ्या ...Read More

11

चंपा - भाग 11

चंपा इकडे चाचा वेड्यासारखा चंपाला शोधत होता. रेशमी हिरवा भडक रंगाचा कुर्ता आणि सोनेरी पायजमा घातला होता, डोक्यावर फरची टोपी घाली होती. दोन्ही कानामध्ये सोन्याच्या जाड रिंगा होत्या. तोंडात पानाचा तोबारा भरलेला होता. दात पान खाऊन खाऊन लाल पिवळे दिसत होते, डोळे रागाने लाल झाले होते. चाचाचा चिडल्यावर एक खांदा उडायचा... आज जरा तो जास्तच उडत होता. “सांलो... हरामो फोकटके पैसे खाऊन हरामी होगये हा...ध्यान नही दिया... रात तक मला चंपा चाहीये.” रश्मी सगळं दारा मागून ऐकत होती तिला चंपाची काळजी वाटत होती. “वो रातको चंपा के साथ रश्मी थी ना?” बोलताना त्याची थुंकी सगळ्यांच्या तोंडावर उडत होती पण ...Read More

12

चंपा - भाग 12

चंपा चंपा...चंपा ही नक्कीच कोल्हापूरला निघून गेली असणार ...राम स्वतःशीच अंदाज बांधत बोलत होता. परत रूम मध्ये गेला आणि घालून गाडीची चावी घेतली बाहेर जाऊन पटकन गाडी काढली आणि एसटी स्टँड गाठले. गाडी एसटी स्टँडच्या पार्किंग मध्ये घातली आणि तसाच पळत प्रत्येक कोल्हापूरच्या बसमध्ये चढून बघत होता. चंपा कुठेच दिसतं नव्हती. चाचची माणसं ही प्रत्येक बस मध्ये चढून चंपाला शोधत होती. त्यांच्या अश्या भरभर गाडीमध्ये चढून बघण्याच्या पद्धतीने सगळे प्रवाशी घाबरत होते. राम तर वेड्यासारखा चालू गाडीतही तिला शोधत होता पण अजूनतरी ती असेल इथेच अशी आशा होती म्हणून प्रत्येक कोल्हापूरला जाणाऱ्या बसमध्ये तो तिला शोधत होता. राम चंपाचे ...Read More

13

चंपा - भाग 13

चंपासगळं सगळं ती डोळ्यात साठवून घेत होती. रामला तिच्या डोळ्यात प्रेम दिसत होते. रामने पटकन टीशर्ट चढवला. चंपाला लाजल्यासारखे नो इट्स ओके...”“खूप वेळ तुम्ही आला नाही बाहेर म्हणू मग मी पोहे घेऊन आले.”“व्वा तुला येतात पोहे बनवता?”“हो मला स्वयंपाकही बनवता येतो.”“म्हणजे माझी काळजी मिटली.” राम चंपाच्या शेजारी बसला नुकताच अंघोळ करून आल्यामुळे तिला त्याच्या केसांचा सुंदर वास आला खरंतर राम तिच्या जवळ बसल्यामुळे तिला काहीही सुचत नव्हते. तिने अंग चोरले ती अस्वस्थ झाली होती. अंग थरथरत आहे हे तिला जाणवत होते. तिला सगळे हवे हवेसे वाटत होते. तिने स्वतःला सावरले.“म्हणजे?” रामला पोह्यांची प्लेट देत चंपा म्हणाली.“म्हणजे... या आधी मलाच ...Read More

14

चंपा - भाग 14

चंपा "हा हा क्यू नहीं… जा वो उसके घर ही गया होगा केसेभी करके चंपा चाहीये।" "जी..." चाचा बंड्या लागणार इतक्यात "रुक पाटील मुझे फोन करने वाला हे। उसका पता पाटील देगा हमे.. " पाटील चा फोन आला चाचाने अड्रेस घेतला आणि स्वतः बंड्यासोबत बाहेर पडला. "चाचा तुम कायको आता में जाके देखता तुम तकलीफ मत लो।" बंड्याने कॉटर मधला शेवटचा एक मोठा घोट एक दणक्यात संपवला. "बंड्या मेरा खुदपे भरोसा नही तुझपे क्या भरोसा करू… गाडी स्टार्ट कर ... आज तो साली मिलेगी ही मिलेगी और आज रात पहिले मैं..." चाचा मनापासून जोरात हसला. चाचाचे हसू बघून बंड्याला ...Read More

15

चंपा - भाग 15

चंपा चाचाने आणखी एक गुद्दा त्याच्या पोटात मारला तसा पुन्हा राम कळवळला. चंपा चाचाच्या पायाच्या इथे आली. "चाचा उसे मे आती तुम्हारे साथ." “साली भागती, हरामी आंटी की हरामी औलाद.” चाचाने पाय झटकला तशी ती बाजूला पडली. चाचा तिच्या जवळ जवळ जात होता राम गुंडांच्या तावडीतून निसटनण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तेवढ्यात बंड्या तिथे पोहचला. “चाचा रुक …” “आ गया तू...तू भी देख आज बारीश मे चंपा की इज्जत का फालुदा…” “चाचा उसे छोड देख मे येसी दस लंडकिया लाता तेरे लिये.” बंड्या चाच्या जवळ जाऊन बोलला… “कायको...” चाचा त्याच्या जवळ जात बोलला “कायको… मुझे तो अभि यही चाहीये...साली ...Read More

16

चंपा - भाग 16

चंपाचाचाने दहा बारा फोन केले होते. चंपा सापडत नव्हती त्याच आता डोकं फिरलं होत.“मादरचोत…. एक लडकी नही ढुंड पाते. बनाके भगाके ले गया साला…” त्याचा आजूबाजूला उभी असलेली मूल फक्त त्याचा राग बघत उभे होते.”साल्या… राघवन को फोन लगा अब वही देखेगा आगे क्या करना हे|”“चाचा… राघवन…?”“हा वही राघवन जो ऐसें चुटकी मे लोगो को चिर देता हे । वही राघवन जो हर नई लडकी पहिले उसकी होती है। वही राघवन जिसके जेब मे सब पुलीसवाले हे । वही राघवन जिसके आनेसे पुरा मुहल्ला थरथरता हे।“ चाचा पुन्हा आपले लाल दात दाखवत हसला.राघवन फोन करताच तासाभरात चाचा समोर हजर ...Read More

17

चंपा - भाग 17

चंपारामला चंपा एका ऑटो रिक्षा सोबत बोलताना दिसली. तो तिच्याजवळ गेला."कुठे चाललीस?" रामने तिचा हात घट्ट पकडला."सर मला जाऊद्यात." हात सोडवत होती पण रामची पकड एवढी मजबूत होती की तिला हात सोडवता येत नव्हता."तुम्ही जा भैया." रिक्षावाला बडबड करत निघून गेला."प्लिज मला जाऊदेत, तुम्हाला माहिती नाही हे लोक खूप भयानक आहेत. हे मलाही सोडणार नाहीत आणि माझी मदत करणाऱ्याला ही नाही सोडणार." चंपाच्या डोळ्यात पाणी आले होते. डोळ्यातले पाणी हाताने निर्धाराने पुसत पुन्हा म्हणाली."सर मला काय करायचं आहे हे माझं मी ठरवलंय. मला कोणाची मदत नको.""मला तुला कमजोर करायचे नाही चंपा, हे बघ चाचाची लोक इथपर्यंत आली आहेत तुला ...Read More

18

चंपा - भाग 18

चंपा"लेकीन तुझे समझता नही हें अरे चंपा धंदेपे बैठेगी तो क्या होगा। गजब होगा, गली मे घुसने के लिये जगा नही होगी। हम लाखों मैं खेलेंगे तुझे समझ कैसी नाही रे...?“ चाचा बोलत होता तसे राघवन चे हात शिवशिवत होते."देख तू वो वकील लोंडा हे न उसका उसे लेकर आयेगी साथ, नक्की उन दोनो का प्लॅन होगा कुछ तो, साली रंडी की औलाद उसे पता नही उसकी जगा यही हें। कुछ किताब पढि और शानपत्ती करने लगी। साली हरामी आंटी सर पे बिठाया उसको बोला था मत सून लेकींन नही, मेरी बेटी धंदेपे नही बैठेगी... दूसरोंकी लडकिया लाके बिठाएगी ...Read More

19

चंपा - भाग 19

चंपाइकडे सिद्धार्थ कोठीवर येवून पोहचला होता. एवढ्या सगळ्यामधून रश्मीला शोधन कठिन होत.“इता टकाटक आया लोंडा...चल बे आ...” सिद्धार्थच्या अंगाला अगदीच सुंदर मुलगी आली. पण सिद्धार्थला ड्रामा करन गरजेचे होते.“अरे तूझे कौन छोड़ेगा... कितनी स्वीट है तू. लेकिन आज नहीं” सिद्धार्थने तिला आणखी जवळ ओढले.“ क्यों आज क्यों नहीं..” ती थोड़ी लांब सरकत म्हणाली.“ आज रश्मी को वादा किया था|” सिद्धार्थ तिचा पुन्हा हात पकडला.“साली मरती क्यों नहीं, हर वक्त बिच मै आती..” तनतन करत ती बोलत होती.“गुस्सा क्यों करती? ये जयेश तुमसे मिलने कल आयेगा ये वादा है| आज जाने दे|” सिद्धार्थने स्वतःचे नाव बदलले.“हा... हा... जा मैं कोन ...Read More

20

चंपा - भाग 20

चंपाका्य चालू आहे याची खात्री करुन घ्यावी यासाठी तिने खिडकीच्या फटीमधून आत पाहिले. तिला समोरच दृश्य पाहून धक्का बसला. बांधून ठेवले होते. तेही राघवनने? तिला प्रश्न पडला तसे उत्तरही तिनेच शोधले.“साला हैं ही हरामी...” तिने तिथून पळ काढला. खाली आली तर चाचाची माणंस लगबगीन वरती चाचाला भेटायला निघाली होती. रश्मीन त्याना थांबवले.“किधर जा रहे हो ?” रश्मीने विचारले.“बाजु हट हमें चाचा को मिलना है|” रश्मीला हाताने ढकलत त्याचे लोक पुढे जायला निघाले.“जाव सांलों इस रंडी की नहीं सुनोगे...चाचा की तरह राघवन भी तुम्हारी हालत बनाये गा…" चाचाचे लोक दोन पायर्या चढलेले खाली उतरले.“क्या हुआ?” त्यानी विचारले.“जावो ऊपर जावो अपनी ...Read More

21

चंपा - भाग 21

चंपा गौरी सगळी रूम बघत होती.“पागल है क्या? मेरा गिऱ्हाईक को कुछ मत बोल, देख राघवन एसा कुछ भी हैं| तू जा सिद्धार्थ...”रश्मी बोलली.“सिद्धार्थ? क्या बोली?” “अरे राघवन इसने तो मुझे जयेश नाम बताया था.” गौरी त्याच्याकडे बघत बोलली. “गिऱ्हाईक का नाम भी पता...? ये अन्दर आवो ओर पकड़ो इसको.” राघवन ने त्याच्या माणसांना बोलावले. दोघेजण आत आले आणि सिद्धार्थला पकडले.“अरे भाईसाहब मुझे क्यों पकड रहे हों? देखो मैंने कुछ नही किया है, गिर्हाईक के साथ एसा बरताव अच्छा नाही है|” त्याच कोणीच एकत नव्हते त्याला राघवनचे लोक घेवुन गेले.“देख रश्मी काम कर तेरा नही तो...और पता चला तू ...Read More

22

चंपा - भाग 22

चंपा"शी, राघवन…?" राघवनने चाचाच्यावर रिवोल्वर रोखली आणि धडाधड गोळया त्याच्या पोटामध्ये छातीवर मारल्या."चंपा इस कुत्ते की बात मत सून था साला, मैंतो तुझसे शादी बनाके मेरी घरवाली बनानेके सपने देख रहा हूं।" राघवन तिच्या अजूनच जवळ गेला"तो तेरा ख्वाब काभि पुरा नही हो सकता." रामने हाताचे स्लीव्हस मागे घेतल्या. राघवन चंपा सिर्फ मेरी हे।"राघवनला राम असह्य होत चालला होता पण रामही काही कमी नव्हता. राघवन धावून रामच्या अंगावर आला तशी त्याने राघवनला पोटाला पकडून त्याला मारले. चंपाला हा राम नव्याने दिसत होता. राघवनची सात- आठ पोर रामच्या अंगावर धावून आली. राम एक एकाला झोपवत होता. राघवन अजूनच पेटून उठला. ...Read More

23

चंपा - भाग 23 - अंतिम भाग

चंपाराम तिच्या जवळ गेला. "चंपा थांब... कायदा हातात घेवु नकोस. त्याला शिक्षा होईलच.""कसला कायदा राम पोलिस सुद्धा यांना मिळाले अरे त्यांना हप्ता मीळाला ना की ते बरोबर ह्याला सोडतील अणि मला कामाला लावतील." तेवढ्यात पोलिस तिथे हजर झाले."मँडम सगळे पोलिस सारखे नसतात. समाजात गुन्हे घडतात म्हणून पोलिसाना हप्ते मिळत असतील म्हणून या गोष्टी घडतात असं होत नाही." इन्स्पेक्टर गोखलेनी चंपाच्या हातातली पिस्तूल घेतली."कायदा हातात घेवु नका. आमच्या सारखे कित्येक प्रमाणिक पोलिस सत्याच्या मार्गावर असतो. अटक करा रे याला, खुप दिवस शोध घेत होतो हाताला येत नव्हता."हवलदारांनी राघवनला ताब्यात घेतले. राघवन लाल झालेल्या रखरखीत कोरड्या डोळ्यानी राम अणि चंपाकड़े पाहत ...Read More