Champa - 19 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 19



चंपा




इकडे सिद्धार्थ कोठीवर येवून पोहचला होता. एवढ्या सगळ्यामधून रश्मीला शोधन कठिन होत.

“इता टकाटक आया लोंडा...चल बे आ...” सिद्धार्थच्या अंगाला एक अगदीच सुंदर मुलगी आली. पण सिद्धार्थला ड्रामा करन गरजेचे होते.

“अरे तूझे कौन छोड़ेगा... कितनी स्वीट है तू. लेकिन आज नहीं” सिद्धार्थने तिला आणखी जवळ ओढले.

“ क्यों आज क्यों नहीं..” ती थोड़ी लांब सरकत म्हणाली.

“ आज रश्मी को वादा किया था|” सिद्धार्थ तिचा पुन्हा हात पकडला.

“साली मरती क्यों नहीं, हर वक्त बिच मै आती..” तनतन करत ती बोलत होती.

“गुस्सा क्यों करती? ये जयेश तुमसे मिलने कल आयेगा ये वादा है| आज जाने दे|” सिद्धार्थने स्वतःचे नाव बदलले.

“हा... हा... जा मैं कोन तुझे रोकनेवाली... लेकीन मेरा दिल तुझे देखकर जोरोसें धड़कने लगा है| मैं राह देख रही हूँ तेरी... एसा तो नहीं होता कभी लेकिन प्यारे... पसंद आया तू इस गौरी को...” गौरीने स्वतःचे नाव मुद्दामच त्याला सांगितले.

“वा गौरी... क्या बात हैं!” सिद्धार्थच्या तोंडून तिचे नाव एकून गौरी शहारली.

“इश्श्श्श.... और भी पागल बनायेगा तू” सिद्धार्थला आता रश्मीला शोधायच होत.

“गौरी मैं चलता हूँ| कल आवुंगा... लेकिन ये बता रश्मी कहाँ है? मै उसके यहांसे जा के आया लेकिन उसका पता नहीं| तू दिखायेगी मुझे?”

“हा हा क्यों नहीं... उतनाही तेरे साथ वक्त बिताउंगी...” कमली म्हणाली. खरतंर कोणाच्या भावना दुखावाव्या अस त्याला अजिबात वाटत नव्हते. पण आज फक्त रामसाठी अस वागव लागत होते. गौरी त्याच्याकडे बघत ढूमकत त्याच्या बरोबर चालत होती. एवढी डार्क लिपस्टिक नसती लावली तर लावण्य आणखी काहीतरी वेगळ सांगुन गेले असते.

“ऐसे क्यों देख रहे हो साहब?” गौरी जरा लाजतच बोलली.

“कुछ नही...” सिद्धार्थ आजुबाजुची वस्ती न्याहाळत होता.

“बोलो ना साहब... मुझे इते प्यारसे आजतक किसीने देखा नहीं.” गौरी

“कितनी प्यारी दिख रही हो.” सिद्धार्थने पुन्हा तिच्याकडे पाहिले.

“तो कायको उस रश्मी के पास जा रहे हो? मेरे साथ आवो साहब...” गौरीला सिद्धार्थ हवा होता. तिने त्याच्या मानेवरून एक बोट लाडाने फिरवले. त्याच्या कानाजवळ ओठ नेले.

“ में उस नजरसे नही देख रहा था गौरी.” गौरी थोड़ी नाराज झाली आणि त्याच्यापासून थोड़ी लांब सरकली. सिद्धार्थ कुठून कुठे निघलाय हे त्याच्या लक्षात येत नव्हते.

”सुन...रश्मीने रूम चेंज की है क्या? बहोत दूर लग रहा है|” सिद्धार्थकड़े बाहेर उभी असणारी प्रत्येक पोरगी बघत होती.

“नही साहब... लेकिन हा मै थोडा रास्ता बदल के ले जा रही हू|” गौरी हसली.

“क्यों?” सिद्धार्थ थांबला.

“मुझे आपके साथ थोडा ज्यादा वक्त मिलेगा.|” गौरीने त्याचा हात हातात घेतला.

“ठीक है| लेकिन बता रश्मी तो अलग जगे रहती थी न ?” सिद्धार्थने विचारले.

“हा उसका और चाचा का थोडा लफडा हुवा इसलिए...” गौरीने विषय टाळला.

“क्या हुआ? चुप क्यों हो गयी?” सिद्धार्थ आणि गौरी एका दरवाजा समोर येवून थांबली.

“ये तो बंद है?” सिद्धार्थ

“लाईन रेहती है उसके पास कस्टमर होगा कोई...मै जाती, साहब रुकना यहाँ| कस्टमर बाहर आने तक यही रुको|” गौरी जायला निघते.

“तूम जा रही हो?” गौरी त्याच्या प्रश्नावर हसते.

“ इधर रुकके क्या करू साहब... कोई नया कस्टमर देखती मै... पेट का सवाल है| लेकिन कल आना साहब, राह देखूंगी| गौरीने सिद्धार्थ हाताला हळूच दाबले आणि गौरी पटकन निघून गेली. बराच वेळ सिद्धार्थ थांबला थोडा विचार केला आणि दरवाजा उघडला. आत पिवळ्या उजेडात, छोट्या खोलीत रश्मी उघडी व्हिवळत पडली होती. दरवाजाचा आवाज आल्यावर तिने चादर अंगावर ओढली.

“कौन?” रश्मी दरवाजाकड़े बघत म्हणाली.

“सिद्धार्थ... राम का मित्र...” सिद्धार्थने त्याची ओळख सांगितली.

“राम...? कौन राम?” रश्मी उठून बसली.

“चंपा का...” त्याच्या तोंडून चंपाचे नाव एकून ती ताडकन उठली. तिच्या उघड्या अंगावरून चादर खाली पडली. सिद्धार्थने तिच्या अंगावर उठलेले माराचे वळ पाहिले अणि तो तिच्या जवळ गेला.

“साहब चंपा का नाम मत लो यहाँ| सबके कान मेरे रूम की तरफ होते हैं|” सिद्धार्थ अजुनच तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर उठलेल्या वळावरून हलकेच हात फिरवला. रश्मीच्या तोंडून “हा...” असा आवाज आला.

“ये क्या है?” रश्मीने दोरीवरचा गावुन ओढला आणि घातला.

“कुछ नही साहब ये तो दोस्ती की निशानी है| रोजका है साहब अब दर्द नही होता.” रश्मी हसत बोलली.

“मतलब?” सिद्धार्थ छोट्या खाटेवर बसत म्हणाला.

“साहब यहांसे निकल जावो किसीको पता चला की आपको चंपाने भेजा है तो आप भी गए और मैं भी...” रश्मी त्याला उठवत म्हणाली.

“देखो रश्मी मुझे थोड़ी मदत चाहिए थी|” सिद्धार्थ बोलला तशी रश्मी थोड़ी विचार करू लागली.

“नही नही क्या भरोसा साहब आपको चंपाने भेजा है? मुझे यकीन कैसे होगा?” रश्मी दाराजवळ जावून इकडे तिकडे बघू लागली आणि दरवाजा लावून घेतला.

“तुम्हे यकीन करना होगा रश्मी क्योंकि चंपा राम के साथ नही है| शायद उसे राघवन या चाचाने किडण्याप किया है|” सिद्धार्थ

“ क्या? कैसे?” रश्मीला हे एकून धक्का बसला. सिद्धार्थने तिला घडलेला प्रकार संगितला तेंव्हा तिचा विश्वास त्याच्यावर बसला.

“बापरे... दोनों भी कमीने, कुत्ते है साहब... कलसे राघवन यही हैं और चाचा भी... उन्होनेही मेरा ये हाल किया है| चंपा को भागते समय किसी ने देखा था उसके साथ मै थी ये भी उनको पता चला| इसकी वजह से... रश्मी रडायला लागली.

“लेकिन पता कैसे चलेगा की चंपा को किधर रखा है? पुलिस भी उनके साथ सामिल है|” सिद्धार्थला खात्री होती की रश्मीला काहीतरी नक्कीच माहिती असेल.

“साहब अभी आप यहाँ से निकालो मै कुछ पता लगा तो आपको बोलती. आप कल आ जाना.” रश्मी

“रश्मी इतना टाइम नही है हमारे पास, कुछ भी हो सकता है| राम भी मेरे साथ है|” सिद्धार्थ

“साहब मुझे थोडा वक्त दो... जान जाएगी तो भी चलेगा... लेकिन चंपा बचेगी| अभी आप जाओ साहब| सिद्धार्थ निघतो. राम गल्लीच्या बाहेर सिद्धार्थची वाट बघत होता. सिद्धार्थला बघून त्याला हायसे वाटले.

“भेटलास रश्मीला?” रामने त्याला प्रश्न केला.

“हो भेटलो.” सिद्धार्थने गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्राइविंग सीटच्या बाजूच्या सीटवर बसला. रामही ड्राइविंग सीटवर येवून बसला.

“आजचा दिवस हवा आहे तिला.” सिद्धार्थ

“आजचा दिवस कस शक्य आहे? चंपाला काही झाले तर?” इकडे राघवनची ही तीच अवस्था झाली होती. चंपा कुठे गेली असेल? तिने फसवल का आपल्याला? कुणी तिला काही केले तर नसेल ना? पण चाचा तर माझ्या सोबत... कोण असेल?

रामला रात्र होवून झोप लागत नव्हती. सिद्धार्थ त्याला समजावत होता.

रश्मी अंधारात बाहेर पडली. चाचाच्या ठेल्यावर कसही करून पोहचायच होत. मारामुळ अजुनही पायावरची सूज उतरली नव्हती. पाय उचलत नव्हते. तरीही लंगडत लंगडत ती चालत होती. बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगजवळ पोहचुनही चाचाचे लोक तिला दिसत नव्हते. एक एक पायरी ती हळुहळू चढत होती. तशी पायाखालची वाळू सरकत होती. ती जशी जवळ जात होती तशी धडधड वाढत होती. रश्मी ला ग़म सुटला होता. पदराने ती घाम पुसत दबक्या पावलांनी पुढे पुढे जात होती. का्य चालू आहे याची खात्री करुन घ्यावी यासाठी तिने खिडकीच्या फटीमधून आत पाहिले. तिला समोरच दृश्य पाहून धक्का बसला. चाचाला बांधून ठेवले होते. तेही राघवनने? तिला प्रश्न पडला तसे उत्तरही तिनेच शोधले.


पायाला लागणारी ठेच
यापेक्षा कितीतरी पटीने
मनाला लागलेली दुःखाची ठेच
वेदना देणारी असते.



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत