Champa - 11 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 11

चंपा


इकडे चाचा वेड्यासारखा चंपाला शोधत होता. रेशमी हिरवा भडक रंगाचा कुर्ता आणि सोनेरी पायजमा घातला होता, डोक्यावर फरची पांढरी टोपी घाली होती. दोन्ही कानामध्ये सोन्याच्या जाड रिंगा होत्या. तोंडात पानाचा तोबारा भरलेला होता. दात पान खाऊन खाऊन लाल पिवळे दिसत होते, डोळे रागाने लाल झाले होते. चाचाचा चिडल्यावर एक खांदा उडायचा... आज जरा तो जास्तच उडत होता.

“सांलो... हरामो फोकटके पैसे खाऊन हरामी होगये हा...ध्यान नही दिया... रात तक मला चंपा चाहीये.” रश्मी सगळं दारा मागून ऐकत होती तिला चंपाची काळजी वाटत होती.

“वो रातको चंपा के साथ रश्मी थी ना?” बोलताना त्याची थुंकी सगळ्यांच्या तोंडावर उडत होती पण कोणी काहीच बोलत नव्हते.

“हो चाचा रश्मी और गौरी.” त्यातला एकजण बोलला.

“बोलावं इधर साली रश्मी को... नक्कीच किसींने तो देखा होगा उसको भागते हूये। और उसके साथ वो गौरी सोई थी न उसको भी लेके आओ.“

“चाचा लेकीन वो भागी ऐसें नही लगता मेरेको… “ चाचा चा उजवा हात असणारा बंड्या त्याला म्हंटला.

“बंड्या सवेरेसे वो खोली में देखा नहीं किसने मला मालूम...वो आंटी की पैदाईश हे ऐसें तो हात नहीं आयेगी| चल वो पाटील को फोन कर…”

“कौन पाटील?” बंड्याने विचारले.

“अरे वो इन्स्पेक्टर ...रातको उसकी ड्युटी होती हे उसने देखा होगा तो सांगेल मला.”

तोपर्यंत रश्मीला एकजण ओढत घेऊन येतो. तिच्या पाठोपाठ गौरी लचकत मूरखत येत होती.

रश्मीने भडक लाल लिपस्टिक लावली होती...छाती अर्धवट दिसेल असा लाल रंगाचा ब्लॉउज घातला होता…आणि हिरव्या रंगाची साडी बेंबीच्या खाली नेसली होती. गोरगोमट शरीर त्या पारदर्शक साड़ीमधून उठून दिसत होते.

“साले हात छोड...कायको पकडले लाया।“

“चाचा देखो रश्मी…”

“उसे क्या देखना …? साली को किती बार देखा मैने… छोड हात छोड उसका ...” रश्मीने त्या मुलाचा हात झिडकरला.

“रश्मी चंपा को देखा तुने?” बंड्याने रश्मीला विचारले..

“रातको तो रूम मे पडी थी। रातको बोला था ना रो रही थी साली… मेरा तो कष्टमर चल रहा था… ये थी ना गौरी… उसीको पूछो... अभि तो मिली नही मे उसको। “

“मिलने के लिये होनी तो चाहीये वो…” चाचा मोठ्याने बोलला तशी रश्मी दचकली. चाचा रश्मीच्या जवळ गेला आणि तीचे गाल जोरात दाबले.

“बता किधर गयी ? एक बार पोलीस स्टेशन अब भाग गई या किसीने उसे भागणे के लिये मदत की???”

“चाचा मेरा और उसका किधर जमता... और होगी इधर कही तो… मोबाईल लगावो... ठेरो मे देखती |” रश्मीने कमरेला लावलेल्या छोट्या पिशवीत हात घातला आणि मोबाईल काढला तसे चाचाने तिच्या जोरात कानशिलात लगावली... रश्मीच्या हातातला मोबाइल उडून बाजूला पडला. गौरी घाबरली.

“पागल हे क्या हम…? जा लेकीन पता चला की तुझे खबर थी तो तेरा काम तमाम...पुरे मुहल्लेको को पता तेरा और चंपा का कित्ता जमता मुझे शानपत्ती सिखाती” रश्मीला घाम सुटला होता.

“चाचा वो पाटील की कल छुट्टी थी। फोन किया था।“ बंड्याने चाचाला संगितले.

“हप्ता लेना तो छुट्टी नही होती । बंड्या जावो बस स्टँड, आजू बाजू सब जगह ढुंडो.” सगळे जायला निघतात.

“ठेर बंड्या...वो काम पे थी उस जगह भी जा और लगेच मला फोन कर और गौरी इधर आ| गौरी चाचा जवळ गेली. ”

बाकीचे सगळे भराभर बाहेर पडले.

”कल तेरे साथ थी न चंपा?” चाचाने तिच्या दंडाला धरले.

“हा मेरे साथ थी... मैंने बहोत देर बात भी की उसके साथ लेकिन वो रो रो के सो गई ... बाद मै मेरी आँख लग गई.” गौरी घाबरून बोलत होती.

“सुन वो रश्मी है न उसपे धन रख.” चाचाने तिला सहज सोडून दिले याचे जरा गौरीला आश्चर्य वाटले.

“तू पाताल में जा तुझे एसे नही छोडुंगा. लोगोंको क्या जवाब दु। आज तो तेरेसे 50,000 की भवानी थी।“ चाचा एकटाच बडबडत होता.

“ये चाचा… “कष्टमर चाचाला हाक मारतो.

“अरे आ गये… नैना... अरे नैना... साहेब को सरबत आन.”

“सरबत पीने नही आया चाचा ये लो 50,000 का चेक आज लडकी दिन रात मेरी…” कष्टमरच्या दोन्ही हाताच्या बोटात सोन्याच्या अंगठया होत्या, गळ्यात चैन आणि हातात सोन्याचे ब्रेसलेट होते.

चाचाने चेक घेतला मोठी रक्कम बघून डोळे विस्फारले.

“साहेब हा घ्या चेक... मेरोको रोकड चाहीये| कौन बँकमे झेंझटगीरी करने जायेगा।“

कष्टमरने खिशातून 50,000 ची रोकड काढली.

“चाचा मुझे पता था तू एसेही बोलगा….ले…”

चाचाला आता काय उत्तर द्यावे समजत नव्हते. ”साहेब पोरगी तैयार नहीं हे। ये लो वापस आपके पैसे…”

“अरे तुने फोन करके बुलाया की नवीन माल हे सब छोड के आया और अभि बोलता हे की लडकी नहीं हे… येसा धंदा हे क्या तुम्हारा?” रागाने कशटरमरने पैसे घेतले आणि गेला.

“अरे साब आये हे तो वापीस मत जाओ रश्मी हे ना...” कशटरमर काहीही न ऐकता रागाने निघून गेला.

“हरामी… 50,000 हजारको चुना लगा।“ चाचा दातओढ खात बोलला.

चंपा थोडा वेळच झोपली, अंघोळ केली आणि हॉलमध्ये आली तिने रात्री ठरवल्याप्रमाणे निघायचं ठरवलं. तिला एकदा रामला पहावस वाटलं त्याच्या खोलीमध्ये गेली राम शांत झोपला होता. त्याला पाहिले अन चंपाचे डोळे भरून आले. "मला यांना संकटामध्ये नाही टाकायचे" ती रामच्या जवळ गेली त्याच्या कुरळ्या केसांमध्ये हात फिरवला आणि तिचे ओठ कपाळावर टेकवले तिला रामला सोडून जाताना त्रास होत होता पण तिला त्याला त्रास झालेला पाहायचा नव्हता ती लगेचच निघाली बाहेर पडली. सगळीकडे शांतता होती पक्षांचा कीलकीलाट सुरू होता चंपा झपझप चालत होती. रस्त्यावरून एखादी गाडी भुर्रकन जात होती. रामच्या घरापासून एसटी स्टँड लांब होते. गारवा चांगलाच होता. चंपाने रिक्षा केली. रिक्षा वेगाने एसटी स्टँड च्या दिशेने जात होती. चंपा पुढे काय होणार याचा विचार करत होती एक महिनाभर भागेल एवढे पैसे आहेत तिला एकच पर्याय दिसत होता. ‘कोल्हापूर…’ एसटी स्टँड दिसले, मिटरप्रमाणे तिने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि स्टँड मध्ये कुठे कोल्हापूरला जाणारी बस मिळातीये का ते बघत होती तेवढ्यात तिला बंड्या तिथल्या लोकांसोबत बोलताना दिसला. तो तिचाच फोटो लोकांना दाखवून चौकशी करतोय हे तिला समजले. त्याच्याबरोबर आणखी चारजण होते त्यांनाही तिने कोठीवर पाहिले होते तिच्या लक्षात आले नक्की हे मलाच शोधत आहेत. चंपाला कोल्हापूर बस दिसली पटकन ती त्या बस मध्ये चढली मधल्या सीटवर जाऊन खाली वाकून बसली पण खरोखर आता तिला खुप भीती वाटत होती.

“आज जर आपण सापडलो तर …???”

चंपाला राम घरभर शोधत होता. आवाज देत होता. त्याला शंका होती की रात्रीची न सांगता निघून जाईल म्हणून तो रात्रभर जागा होता पण त्याला खात्री पटली आणि त्याचा पहाटे पहाटे डोळा लागला.

“चंपा...चंपा ही नक्कीच कोल्हापूरला निघून गेली असणार ...” राम स्वतःशीच अंदाज बांधत बोलत होता.


वेळेवर खूप काही अवलंबून असते,
माणसं अनुभवायला
चांगली वाईट वेळ यावी लागते,
आपण सगळ्यांना चांगलं म्हणायचं
वेळ ठरवते आणि अनुभव शिकवतात.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत