Champa - 20 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 20

चंपा




का्य चालू आहे याची खात्री करुन घ्यावी यासाठी तिने खिडकीच्या फटीमधून आत पाहिले. तिला समोरच दृश्य पाहून धक्का बसला. चाचाला बांधून ठेवले होते. तेही राघवनने? तिला प्रश्न पडला तसे उत्तरही तिनेच शोधले.

“साला हैं ही हरामी...” तिने तिथून पळ काढला. खाली आली तर चाचाची माणंस लगबगीन वरती चाचाला भेटायला निघाली होती. रश्मीन त्याना थांबवले.

“किधर जा रहे हो ?” रश्मीने विचारले.

“बाजु हट हमें चाचा को मिलना है|” रश्मीला हाताने ढकलत त्याचे लोक पुढे जायला निघाले.

“जाव सांलों इस रंडी की नहीं सुनोगे...चाचा की तरह राघवन भी तुम्हारी हालत बनाये गा…" चाचाचे लोक दोन पायर्या चढलेले खाली उतरले.

“क्या हुआ?” त्यानी विचारले.

“जावो ऊपर जावो अपनी आँखों से देखलो.” रश्मी मगरुरित बोलली.

“राघवन भाई हैं क्या?” एकजण

“हाँ... चाचा को मार मार के रस्सी से बांधा है क्या हुआ पता नहीं|” रश्मीने त्यांच्याकडून काही माहिती मिळते का ते पाहण्यासाठी सांगितले.

“वो चंपा दीदी का म्याटर होगा|” दूसरा बोलला. तसे पहिल्याने त्याला टोकले.

“चुप तू तुझे पता नही राघवन मार डालेगा अगर पता चला की चंपा दीदी हमारे पास है|” पहिला.

“क्या चंपा तुम्हारे पास? किधर? सालों आवाज मत करो नही तो इधरही मरोगे.” रश्मीची शंका खरी निघाली.

“ हा हा... चल मै दिखता.”

“तुम बताओ और यहाँ ही रहो नहीं तो खाली फ़ोकट मर जावोगे. हरामी तो मरने वाला हैं, तुम भी खाली फ़ोकट मरोगे.” रश्मीला पुन्हा धोका पत्कारायचा नव्हता.

“हा सही बात है, राघवन कुछ भी कर सकता हैं| वो नाना की गाड़ी हैं न वड़ापाव की उस गल्ली मै चार रास्ते जाते है उसमें गिनकर तीसरे रास्तेसे अन्दर जा... गली खतम होगी तो तुझे एक माँ दुर्गा का छोटा मंदिर दिखेगा उसके पीछे एक छोटी खोली हैं उसमे है चंपा दीदी...”

“हरामी हो तुम एक तरफ उसे दीदी बुलाते हों और दूसरी तरफ उसे माँ दुर्गा के मंदिर के पास बंद करके रखते हो... अब जावो नही तो मै ही मार डालूंगी|” दोघेही पटकन तिथून सटकले. रश्मी पाय तसाच लंगडत घेवुन चंपा आहे तिथे जावून पोहचली. “एकला शरीर मिळाव या लालसेने तर दुसऱ्याला हिचे शरीर विकून पैसे मिळाव या लालसेने चंपाची ही अवस्था केली.” रश्मी बडबड करत चालत होती. एवढ्या कोपऱ्यात तिला एवढी छोटी रूम बघून आश्चर्य वाटले. बाहेरून फक्त कड़ी होती. तिने पटकन कड़ी उघडली. चंपाला अंधारात एका खुर्चीला बांधून ठेवले होते. ती पटकन आत गेली. चंपाने डोळे उघडले समोर रश्मीला बघून तिला खुप आनंद झाला. रश्मीने तिला पटकन सोडले. चंपाने तिला घट्ट मीठी मारली तशी रश्मी कळवळली.

“रश्मी क्या हुआ?”चंपाने तिच्याकडे बघत विचारले.

“कुछ नही, जल्दी यंहासे निकल और राम के पास जा... वो बेचारा कब से तुम्हारा इंतजार कर रहा है|”

“नही रश्मी तू नाही बतायेगी तो मैं यहांसे नही जावुंगी.” चंपा

“ पागल हैं तू... वो दोनों तुझे पगालोंकी तरह ढूंड रहे है| और दोस्ती मैं इतना तो चलता हैं|

“मतलब ये सब मेरी वजह से?” चंपाच्या डोळ्यात पानी आले.

“ये सब तुझे खुश देखने के लिये| अब जा तू...” रश्मी डोळे पुसत म्हणाली.

“ हाँ जा रही हूँ लेकिन उस चाचा को मै नही छोडूंगी.” चंपा तिथून पळाली. रश्मीला खुप आनंद झाला होता.



चंपा हुशारीने रामकड़े पोहचली होती.राम दरवाजा उघडा ठेवून सोफ्यावर पडला होता. त्याचा सुकलेला चेहरा तिला बघवत नव्हता. तिने त्याच्या तोंडावरून हात फिरवला. रामला जाग आली त्याने चंपा कड़े पाहिले आणि ताडकन उठला.

“चंपा...” तिला घट्ट मीठी मारली. चंपाला रामकड़े रडू आले.

“कुठे सोडून गेली होतिस?” रामने तिच्या दोन्ही दंडाला पकडले.

“चाचाची माणसं आपल्या मागावर होती. मलाही समजले नाही मी तुमच्यापासून कशी गेले.” तिने तिचे डोक रामच्या छातीवर ठेवले.

“रश्मीने तुला सोडावले न ?” राम

“हो... पण तुम्हाला कस माहित?” चंपाला काहीच कल्पना नव्हती.

“सिद्धार्थ गेला होता रश्मीकड़े त्यानेच तिला तू हरवल्याचे सांगितले. अरे.... सिद्धार्थ...

सिद्धार्थ...” राम मोठ्याने आवाज देवू लागला.

“सिद्धार्थ अरे चंपा आली.” सिद्धार्थचा काहीच पत्ता नव्हता.

“ओह त्याला आज रश्मी ने पुन्हा बोलावले होते. बहुदा तो मला न उठावता एकटाच गेला.” रामने त्याचा फोन ट्राय केला पण फोन लागत नव्हता.



सिद्धार्थ पुन्हा तिथेच आला होता. गौरी त्याची वाटच बघत होती.

“आ गया तू...?देख में तेरी रांह में कबसे खड़ी हु|” गौरी आज जरा जास्तच नटली होती.

“कमली मै दस मिनिट मै आता हूँ, रश्मी को मिलके...” सिद्धार्थ घाईने निघाला.

“क्या रे हरवक्त रश्मी रश्मी करता है? आज तो मैं सुनने वाली नहीं तुजे तो मेरे साथ आना बस मुझे कुछ नाही सुनना|” तिने सिद्धार्थचा हात पकडला.

“गौरी हात छोड़...” सिद्धार्थला थांबायला वेळ नव्हता. त्याने कसा बसा तिच्याकडून हात सोडवून घेतला आणि निघला. पुढे अजून एक भेटली.कमली

“ये हैण्डसम आ मेरे पास... क्या दिखता हैं साला...” कमली त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली.

“ये कमली जाने दे उसे...रश्मी का आदमी हैं वो... वहासे अनेके बाद मेरा” गौरी मोठ्याने हसायला लागली.

“अरे सुन तो... स्माल तिन मिनिट दीडशे रुपये, मीडियम पाच मिनिट तीनशे रुपय अन लार्ज दहा मिनिट पाचशे रुपये... किस...” तिचे रेट ती पटकन सांगत होती. कमली हसत होती.

"साली मेरा ट्रिक उठाया ना तुने… कमली देख साली… मै तुझे झोडूंगी नही.. कमली तिथून पळून गेली.

“जावो साहब लेकिन दस मिनिट मैं नही आया न तो देख गौरी क्या करेगी.” कमली ला तिचा अपमान सहन होत नव्हता. सिद्धार्थ तीच काहीही न ऐकताच पुढे निघून गेला होता. गौरी विचार करत बराच वेळ उभी होती. तोपर्यंत गौरी जवळ लगट करत दुसरे कष्टमर आले.

“ हे गौरी कहा ध्यान हे तेरा?|

“मेरा ध्यान किधर होगा बाबु... तेरी ही राह देख रही थी| चल...” गौरी गिर्हाईकाला घेवुन गेली पण तीच लक्ष घडयाळाकड़े होते.

आजही बराच वेळ सिद्धार्थ रश्मीच्या खोलीबाहेर उभा होता. पण त्याला बाहेरुंच जाणवत होते की आतमध्ये कोणी कष्टमर आहे. बऱ्याचवेळाने गिऱ्हाईक शर्टाची बटन लावत गान गुणगुणत बाहेर आले. तसा सिद्धार्थ आत आला.

“रश्मी...” सिद्धार्थ ने आवाज दिला.

“अरे साहब आप? थोड़ी इज्जत दिया करो साहब हमे भी शरम होती है थोड़ी बहुत...” रश्मीने ब्लाउज घातला. खरतर सिद्धार्थने तिच्या उघड्या शरीराकडे पहिलेच नव्हते तो फक्त तिचा चेहरा बघत होता. त्याला चंपाची माहिती हवी होती.

“कुछ पता चला?” सिद्धार्थने मुद्द्याला हात घातला.

“चंपा घर नही आई?” रश्मीला आश्चर्य वाटले.

“मतलब?” रश्मी रात्री घडलेला प्रकार त्याला सांगू लागली. खरतर त्याला आनंद झाला होता पण ती घरी आली नाही म्हणून काळजी वाटत होती. तेवढ्यात दरवाजा वाजला. रश्मी दरवाजा उघडायला निघाली.

“गौरी होगी, उसने मुझे धमकी दी हैं| पागल लड़की...”रश्मी मागे फिरली.

“क्यों?” रश्मीने विचारले.

“उसे लगा की मै तुम्हारे पास...” रश्मी हसायला लागली.

“साहब हर आदमी नजर हम पहेचानते हैं... बहोत अच्छे हो साहब लेकिन ज्यादा देर रहोगे तो खतरा है| भाग जावो| रश्मीने दरवाजा उघडला. राघवन दरवाजात उभा होता.

“रश्मी इतना देर दरवाजा खोलने मैं?” राघवन आत आला.

“देर तो होगी गिऱ्हाईक है न...” पाठोपाठ गौरी आत शिरली. गौरीला बघून सिद्धार्थ उभा राहिला.

“राघवन पंधरा मिनिट हुआ है आया हुआ, देख मै बोलती डाल मैं जरुर कुछ काला हैं|”

गौरी सगळी रूम बघत होती.

“पागल है क्या? मेरा गिऱ्हाईक को कुछ मत बोल, देख राघवन एसा कुछ भी नही हैं| तू जा सिद्धार्थ...”रश्मी बोलली.

“सिद्धार्थ? क्या बोली?” “अरे राघवन इसने तो मुझे जयेश नाम बताया था.”

गौरी त्याच्याकडे बघत बोलली.



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


Share

NEW REALESED