Champa - 13 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 13

चंपा




सगळं सगळं ती डोळ्यात साठवून घेत होती. रामला तिच्या डोळ्यात प्रेम दिसत होते. रामने पटकन टीशर्ट चढवला. चंपाला लाजल्यासारखे झाले.

“सॉरी.”

“नो नो इट्स ओके...”

“खूप वेळ तुम्ही आला नाही बाहेर म्हणू मग मी पोहे घेऊन आले.”

“व्वा तुला येतात पोहे बनवता?”

“हो मला स्वयंपाकही बनवता येतो.”

“म्हणजे माझी काळजी मिटली.” राम चंपाच्या शेजारी बसला नुकताच अंघोळ करून आल्यामुळे तिला त्याच्या केसांचा सुंदर वास आला खरंतर राम तिच्या जवळ बसल्यामुळे तिला काहीही सुचत नव्हते. तिने अंग चोरले ती अस्वस्थ झाली होती. अंग थरथरत आहे हे तिला जाणवत होते. तिला सगळे हवे हवेसे वाटत होते. तिने स्वतःला सावरले.

“म्हणजे?” रामला पोह्यांची प्लेट देत चंपा म्हणाली.

“म्हणजे... या आधी मलाच स्वयंपाक वैगेरे करावा लागायचा पण आपल्या लग्नानंतर तू असशील मग काय मी ऑफिस आणि फक्त आराम करणार.” रामने पोह्यांचा एक घास खाल्ला.

“वा! क्या बात हें! कसले मस्त पोहे झालेत. अप्रतिम... खरच मी लकी नवरा असेन.”

“सर प्लिज...कशाला स्वप्न बघताय?”

चंपा उठली तसा रामने तिचा हात धरला. परपुरुषाचा पहिल्यांदाच असा स्पर्श झाल्याने तिच्या अंगात एक बारीक कळ आली अंग अंग रोमांचल… ओठ थरथरले.

रामने प्लेट बाजूला ठेवली आणि तिचा हात अजून घट्ट पकडला.

“तुला आवडत नाही का मी?“ चंपाला काय बोलावे तेच सुचत नव्हते.

“सर मला तुम्हाला कुठल्याही संकटात टाकायचे नाही.”

“माझा प्रश्न मुळात तो नाहीच मी तुला विचारतोय, तुला मी आवडत नाही का?”

चंपाचे डोळे पाण्याने भरले तिने दरवाजाकडे तोंड केले कसाबसा हात सोडवून घेतला.

“नाही.” चंपा निघायला लागली.

“माझ्याकडे बघून सांगशील.”

“मी नाही म्हणाली आहे सर, मला कोणत्याही बंधनात अडकायचे नाही.”

“ठीक आहे मी तर तुझ्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी प्रेम पाहिले आहे पण तू नाही म्हणत असशील तर एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग.”

चंपाने रामकडे पाहिले तिच्या डोळ्यामधले पाणी गालावर ओघळले.

“वेडाबाई...रडायला काय झाले?” रामने तिचे डोळे पुसले तसे तिला आणखी रडू आले आणि ती त्याच्या मिठीत गेली रामला न बोलता मिळालेल्या उत्तराचा खूप आनंद झाला होता. त्याने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला.

“चंपा I Love You So much…”

चंपाला काय करावे काहीही सुचत नव्हते. ती त्याच्या मिठीतुन बाजूला झाली.

“ऑफिसला जायचे आहे ना.. ? पोहे खाऊन घ्या आणि दुपारी जेवायला या.”

राम हसला आणि म्हणाला...

”न बोलता मिळालेले हे गोड उत्तर एकून कोणाला ऑफिसला जाऊ वाटेल.”

“सर...”चंपा लाजून गेली.

बाहेर धो धो पाऊस कोसळत होता...विजांचा कडकडाड सुरू होता. चंपाला भीती वाटत होती.

बंद ऑफिसच्या समोर आडोश्याला चाचासोबत त्याची लोक रामची वाट बघत उभी होती.

“साला… कब तक एसेही खडा रेहना पडेगा।“ चाचाने तोंडातली बिडी पायाखाली टाकून विझवली.

“चाचा ये भाग तो नही गया होगा ना चंपा को लेके।“ बंड्याला आता टेन्शन आलं होतं.

“किधर भी नहीं लेके जायेगा और गया भी तो कुठून बी आणून खडा करेंगा उसको मे...पाटील को हर रोज का पैसा फोकट का नही देता। सब जगह नाके नाके पे पुलीस लगायी उसने।“ तेवढ्यात राम ऑफिस समोर गाडी लावत त्यांना दिसला. अश्या कोसळत्या पावसात हे सगळे त्याच्या गाडीला घेराव घालायला गेले. त्यांच्यातल्याच एकाने चाच्यांच्या डोक्यावर छत्री पकडली होती.

“नीचे उतर…” बंड्या गाडीचा दरवाजा ओढत बोलला.

“कोण???” राम गाडीतून उतरला.

“चंपा कुठे?” चाचाने पानाच्या डब्यातले एक पान काढून तोंडात घातले.

“कोण चंपा?” रामने त्याच्याकडे रागात बघत म्हंटले.

“बंड्या ठीक से देख यही लोंडा था ना।“

“हा चाचा यही था।“ बंड्या त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या रामच गळा जोरात पकडला.

“बोल कुठे चंपा?” एवढं म्हणेपर्यंत रामला बंड्याने लाथा बुक्यांनी मारले. “साल्या खोट बोलतोस? कायको मूह लगता हे। चाचाकी उपर तक पोहच हे।“

“मी वकील आहे केस करेन. राम कसा बस उठत बोलत होता.” रामच्या डोक्यातून आणि तोंडातून रक्त येत होतं.

“मुझे वकिली मत सिखा... शाना होगा ना तो चंपाको मेरे हवाले कर।“

“नही करूंगा.”

“साला ऐसे नही मानेगा। जब तक मूह नही खोलता तब तक आता इता मारो सालेको की...चंपा को खुद ही वो कोठी तक लायेगा।“

“मारो मुझे किताना भी मारो लेकीं चंपा किधर हे ये नही बताउंगा।“

“किते लोंडे आये प्यार करनेवाले… मजनू… सून रे वकील, प्यार करनेको तुझे कोठीवलीही मिली। देख खुशी खुशी जिना चाहता हे तो चंपा मुझे दे दे… चाचा त्याच्या जवळ जाऊन त्याला बंदूक दाखवतो और मरना चाहता हे तो मर साले...”

चाचा जोरात हसला त्याच्या माणसांना खुणावले एकामागून एक सगळे चाचच्या मागे निघाले.

“इसपे नजर रखो ।“ चाचा बंड्याला म्हणाला…

बंड्या आणि दोघे तिथेच आडोश्याला थांबले.

राम पावसाच्या पाण्यात तसाच बसून होता. कितीतरी वेळाने तो उठला आणि ऑफिस उघडून तिथे बराच वेळ जाऊन बसला… त्याच्या लक्षात आले होते की त्याच्या मागावर नक्कीच चाचाची माणसं असणार काय करावे या विचाराने तो तिथेच बसून राहिला. आता पोलिसांना कॉल करून किंवा केस करून उपयोग होणार नव्हता. सगळेच्या सगळे चाचाला मिळालेले होते. कारण पैसा ओतत होता चाचा त्याच्या समोर… त्याने चंपाला फोन केला आणि तिला सगळे सांगितले.

चंपा धीट असली तरी आतून पार कोसळुन गेली होती. उगीच रामकडे आलो असे तिला वाटायला लागले. काय होणार या काळजीने तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. तिला आंटीची आठवण येत होती. आज ती असती तर ही वेळच आपल्यावर आली नसती तिला सांगितले असते की राम खूप आवडतो आणि त्याच्यासोबत लग्न करायचे आहे तर तिने हसत परवानगी देऊन लग्न लावून दिले असते आज आंटी नसल्याचे दुःख तिला जास्त होत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली चंपा खूप घाबरली काय करावे तिला सुचत नव्हते. तेवढ्यात रामच फोन आला.

“हॅलो... दरवाजा उघड, मी आहे.”

चंपा पळत गेली आणि दरवाजा उघडला तर समोर राम जखमी अवस्थेत होता. चंपाने त्याला आधार देत आत आणले.

“चंपा आपल्याला जास्त वेळ इथे थांबता येणार नाही. मी कसा इथपर्यंत आलोय हे माझं मलाच माहिती आहे .”

“हो जाऊयात पहिल्यांदा जखम क्लीन करून मेडिसिन लावते.”

चंपा पटकन आतमध्ये गेली.

“चंपा ते सगळं राहुदेत. आधी निघुयात आपण...” रामला खूपच लागलेलं होत.

“कुठे जाणार ?”

“गाडी जाईल तिकडे…”

“म्हणजे…?” चंपाने औषध लावले तसे त्याला आग झाली.

“सॉरी… “ चंपाने हळूच जखमेवर फुंकर मारली.

“चाचा मी फोन वर बोलत होतो आणि तो साला पळून गेला.”

“बंड्या ज्यादा यकीन रखके गया मे तेरेपे और तू...” चाचा जाम चिडला होता.” और कोन था तेरे साथ”...बंड्याने त्याच्या बाजूला असलेल्या दोघांकडे बघितले.

चाचाने खिशात हात घातला आणि काही कळायच्या आत बंड्याच्या बाजूला असलेल्या दोघे निपचित जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

“बंड्या मुझे पता हें तू उस चंपा पे मरता हे। लेकीन सून यहा रहना हे तो काम कर..प्यार नहीं...देख मे भूल जाऊंगा की तू मेरा...” चाचाने वाक्य पूर्ण करायच्या आतच बंड्या बोलला

“नही चाचा...यकीन करो मे उसे ढुंडके रहुंगा।“



चंद्र आज शांत वाटत होता,
नभातून ढगांच्या आड जाऊन लपत होता,
डोळ्यातून पाणी ओघळणार तोच,
विजांचा कडकडाट झाला होता...


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत