Champa - 5 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 5

चंपा

“तुझ आणि माझं वाढणं वेगळ होत ताई... मलाही शिकायच होत. आंटीला म्हणाले मी पण तिने माझ नाही ऐकल. पण मी जास्त विचार नाही केला. तू वेगळ्या मुहुर्तावर जन्माला आली अणि मी वेगळ्या. अहह... कधी तुझ्या बरोबर बरोबरी नाही केली ताई कारण... जे जे तुला मिळालं ते ते मला सुद्धा मिळाल फक्त फरक शिक्षणाचा राहिला. तस आंटीचे उपकार लई माझ्यावर. तुला आठवत ताई? मी मधल्या चौकात खेळत होते. अकरा वर्षांची अशिन चाचाने हाक मारली मी नाचत नाचत त्याच्या जाऊन मांडीवर बसले. मला वाटल चाचा लाड़ करतोय म्हणून अंगावरून हात फिरवतोय माझ्या लक्षात नाही आल. त्याचा हात एका ठिकाणी थांबला, नुकतच उमलणार छातीचं फुल त्याने अंगठा आणि बोटांन इतक्या जोरात दाबल, चुरगाळलं की वरच्या माडीतल्या सगळ्या माझ्या किंचाळण्याच्या आवाजानं भायेर आल्या. आंटी जोरात पळत आली आणि चाचाला इतका मारला की विचारू नकोस. आंटी माझ्या नजरेत हिरो बनली. ती का्य मला धंद्यात आणनार न्हाय माझा इश्वास बसला. तिनं लगीच मला डॉक्टरकड नेल. दोन दिवस मला जवळ घेवुन बसली होती. तिच्या डोळ्यात मी आईच प्रेम पाहिलं. वयात आले आणि समजल, तस संपल आंटी माझ्या हिरोच्या भूमिकेतून भाईर पडायला लागली. सुरवातीला या सगळ्याचा त्रास झाला, नंतर मजा वाटायला लागली. त्यानंतर अंगाची चाळण व्हायला लागली तेंव्हा मात्र थांबव वाटल. हितन सुटका न्हाय म्हाईत व्हत म्हणून हा पर्याय शोधला. भारी की न्हाई आइडिया...” गौरी मोठ्या मोठ्यान हसू लागली. चंपाला रडू आवरेनास झाल. गौरीला घट्ट मिठीत घेवुन चंपा कितीतरी वेळ तिला कुरवाळत होती.चंपा दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोहचली तेंव्हा रामने तिच्या हातात चेक ठेवला.पहिला पगार अगदी वेळेवर तिला दिला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद निखळ होता. ती कदाचित ह्याच दिवसाची वाट बघत असावी असे वाटत होते. दहा वेळा तरी ती “थँक यु!” म्हंटली असेल.
न राहवून मीच म्हंटले... “अग थँक यु कशाला म्हणतेस? हे तुझ्या हक्काचे पैसे आहेत.”
“नाही सर...तुम्हाला कल्पनाही नसेल हे पैसे माझ्यासाठी काय आहेत?” एवढ्या दिवसानंतर चंपा पहिल्यांदा इतक्या मोकळेपणाने बोलली असेल पुढे तिला काही प्रश्न विचारावा असे मला नाही वाटले.मी खिडकीमधून सतत बाहेर बघत होतो. रात्रभर मला झोप लागली नाही. आज सूर्य लवकर उगवत नव्हता. मला स्वतःचा राग येत होता. घड्याळ पहिले. “सिद्धार्थला सांगावे का? नको... आजपर्यंत एकही गोष्ट त्याच्यापासून लपवली नाही मग ही का नको...?” मन मानायला तयार नव्हते.६ वाजले होते. आज घड्याळ पुढे सरकतच नाही असे वाटत होते. चंपाच्या नावाचा आत्ता मला अर्थ लागत होता. आज जरी ती माझ्यासमोर आली तरी मी कसा रिअॅक्ट होणार आहे हे माझे मलाच माहित नव्हते. पण मी का तिला काही बोलू? माझ्या इथे ती व्यवस्थित, मनापासून तीच ती काम करत आहे. ऑफिस मधून बाहेर पडल्यावर तिचा नी माझा काय संबंध?तिला काहीही बोलणार नाही आणि सिद्धार्थला आत्ताच काहीच नको सांगायला. हे माझे मीच ठरवले.
११ वाजायच्या आत मी आज ऑफिसमध्ये येवून बसलो. सिद्ध्या पाठोपाठ आला. बराच वेळ झाला तरी तो आलेला रामच्या लक्षात आले नाही. त्याने टेबलवर दोन वेळा हात आपटला. तेंव्हा रामच्या विचारांची तंद्री तुटली.

“का्य कुठे हरवलास? कितीवेळ येवून बसलोय?”

“नाही अरे एका केसचा विचार करत होतो.” रामने दयायच म्हणून उत्तर दिले.

“राम माझ्याशी खोट बोलतोयस, आज ओळख


तो का मी तुला?” सिद्धार्थ त्याच्या जवळ जात म्हणाला.

“काही नाही रे राम मी चंपाचा विचार करत होतो. सिद्ध्या मी तुला सांगणार नव्हतो. चंपा आपल्याला खुप साधी वाटत होती, अरे चंपा... मला नाही बोलवत.”

“राम मला सांगणार आहेस का? काय झाल आहे?” राम त्याच्याच तंद्रित बोलत होता.

“माझे मित्र नेहमीपेक्षा जास्त वेळा यायला लागले? कारण... चंपासाठी ?”

“चहावाला चारवेळा येवून चहा विचारायचा ? कारण... चंपा ?”

“रद्दीवाल्याला चार वेळा फोन करून विचाराव लागायचं रद्दी पडलीये घेवून जा, आता तोच आठवड्यातून चार वेळा येतो आणि विचारतो साहेब रद्दी...? कारण ... चंपा ?”

बोलत असताना चंपा कधी येवून कामाला लागली या दोघांना समजले सुद्धा नाही.

“राम मी येतो. रात्री बोलू.” सिद्धार्थ निघून गेला.

रामने आज तिच्याकडे एकदाच पहिले आणि त्याच्या कामाला सुरुवात केली.

तिने स्वतःहून रामला आवाज दिला .

“सर.”

“का्य?”

“काल माझ्या मागे आला होतात, अर्ध्यातून माघारी का गेलात?”

रामला मेल्याहून मेल्यासारखे झाले.

“सॉरी.”

“सर आलात तर पूर्ण बघून जायचे मी कशासाठी तिथे जाते.?”

“मला काहीही इंटरेस्ट नाही.” राम रागामध्ये बोलला.

“का? तिथे फक्त बायका धंदा करायला जातात?”

“माइंड युअर टंग... “ राम जोरात ओरडला.

“ओरडून काय होणार आहे सर?”

“मी रोज जाते तिथे.” ती पुन्हा उद्धटपणे बोलली.”

“चंपा...?”

“सर तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील? रात्रभर माझा विचार करून तुम्हाला झोप लागली नसेल? दिवस कधी उगवतोय याची वाट बघत असाल आणि कधी एकदा मला तू तिथे का आणि कशासाठी जातेस हे विचारल? हो न!”

“अरे हिला कस माहित?” रामला खूप मोठा गहन प्रश्न पडला?

“सर प्रश्न पडला न? मला हे कसं ठाऊक? पुरुष माझ्याशिवाय जास्त कोणाला समजणार?”

रामला आता चंपा सहन होत नव्हती.

“सर आज माझ्या सोबत चला मी काय करते ते बघायला ? “

“त्याची गरज नाही वाटत मला ?”

“प्लीज सर एकदा ...”

खूप विचार केला आणि हो म्हणालो... ती नेहमी प्रमाणे काम करू लागली. तिला काहीही फरक पडला आहे असे मला एकदाही जाणवले नाही. माझे आज कामांमध्ये लक्ष लागत नव्हते.

उगीच हो म्हणालो...माझी इच्छा नाही ती काय करते हे पहायची.

५ वाजले... तिने भरभर आवरायला सुरुवात केली.

“सर...येताय ना...”

प्रश्न विचारला कि ऑर्डर दिली हे काही मला समजेना.

“हो...” म्हणालो आणि टेबल आवरला तिच्या मागोमाग निघालो. ती झपझप पावलं उचलत होती. शेवटी पोहचलो त्या गल्लीत... अर्धवट उघड्या बायका तिचे हसून स्वागत करत होत्या. पण मला पाहून मात्र वेगळेच हावभाव करत होत्या.

मधून मधुन एखादी “चलता है क्या हंड्सम!” असेही म्हणत होती. आणखी एखादी अंगचटीला यायची. कससं होत होत. गल्लीबोळ असली तरी स्वछता होती. नाकात एक उग्र वास होता. वेगवेगळ्या सेंटचा किंवा भड़क लावलेल्या कॉस्मेटिकचा… अर्धवट कपडे, उघड्या मांड्या...

“कशासाठी हे सगळ ? सौंदर्य ओसंडून वाहत होत. या बायकांचं...” “फक्त पोटासाठी...“

“बापरे... चंपा हि त्यातलीच एक...” उगीचच लावलेल्या पिवळ्या लाईट डोळ्यात जात होत्या. मोठ्याने लावलेली गाणी आईटम सोंग्स कानात जात होती. जसजस पुढे जात होतो तसतसा आवाज कमी होत होता.

एका बोळांमधून वाट काढत आम्ही प्रशस्त खोलीमध्ये पोहचलो. या वस्तीमध्ये एवढी मोठी खोली... ? प्रश्न पडला.

प्रोजेक्टर, कम्पुटर, छोटे टेबल,ब्लॅकबोर्ड...

“पुन्हा प्रश्न? हो न सर ...” चंपा म्हणाली.

सहनशक्ती इतकी असते की,
आपल्या व्यक्ती बोलल्या तरीही
आपण शांत राहतो,
कारण त्यांना दुःख झालेले
आपल्याला सहन होत नाही.क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
पुणे