Champa - 23 - Last part books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 23 - अंतिम भाग

चंपा


राम तिच्या जवळ गेला. "चंपा थांब... कायदा हातात घेवु नकोस. त्याला शिक्षा होईलच."
"कसला कायदा राम पोलिस सुद्धा यांना मिळाले आहेत. अरे त्यांना हप्ता मीळाला ना की ते बरोबर ह्याला सोडतील अणि मला कामाला लावतील."
तेवढ्यात पोलिस तिथे हजर झाले.
"मँडम सगळे पोलिस सारखे नसतात. समाजात गुन्हे घडतात म्हणून पोलिसाना हप्ते मिळत असतील म्हणून या गोष्टी घडतात असं होत नाही." इन्स्पेक्टर गोखलेनी चंपाच्या हातातली पिस्तूल घेतली.
"कायदा हातात घेवु नका. आमच्या सारखे कित्येक प्रमाणिक पोलिस सत्याच्या मार्गावर असतो. अटक करा रे याला, खुप दिवस शोध घेत होतो हाताला येत नव्हता."

हवलदारांनी राघवनला ताब्यात घेतले. राघवन लाल झालेल्या रखरखीत कोरड्या डोळ्यानी राम अणि चंपाकड़े पाहत होता. राम सिद्धार्थकड़े गेला आणि त्याला सोडले दोघनिही एकमेकांना घट्ट मीठी मारली. रश्मी वेड्यासारखी नाचत उड्या मारत सगळ्या मोहल्यात बातमी सांगत होती. तिचे अर्धवट उघडे असणारे उभार तिच्या सोबत नाचत होते या जाणीवेने तिने आपला बाजूला गेलेला दुपट्टा छातीवरुन नीटनिटका केला आणि ताठ मानने अभिमानाने चंपाचे कौतुक करत होती. प्रत्येक बाईच्या चेहर्यावर आनंदाचे भाव होते. अंगावर असणार्या गिर्हाईकाना बाजुल करून कपडे अंगावर चढवत होत्या.

"नमस्कार राम साहेब, मी इन्स्पेक्टर गोखले. तुम्ही वेळेवर विष्णु सरांना या गोष्टी सांगुन लोकेशन पाठवले नसते तर आज एवढी मोठी गोष्ट झाली नसती. ज्यासाठी आम्ही कित्येक वर्ष धडपडत होतो."
"मला माफ़ करा इन्स्पेक्टर. आजपर्यंत मी इथे काम करणार्या पोलिसाना मी फक्त ही काम अशीच चालू रहवित म्हणून पैसे घेताना पहिल आहे. आज मी पहिल्यांदा तुमच्यासारख्या ऑफिसरला प्रमाणिक पणे ड्यूटी करताना पाहत आहे."

"थँक यु... चला येतो राम सर आणि हो लवकरच इथल्या सगळ्यांना हलवन्यात येईल या सर्वांची रहायची अणि व्यवस्था चांगल्या ठिकाणी करण्यात येईल. आजपासून प्रत्येक स्त्री स्वतंत्र असेल."
"थँक यु सो मच गोखलेसाहेब. अजुन एक विनंती आहे. इथल्या सगळ्या लहान मुली अणि मुलाना मी दत्तक घेवुन त्यांच्यासाठी आश्रमाची लवकरच व्यवस्था करतोय." रामचे हे वाक्य ऐकताच चंपाचे डोळे भरून आले.

"रामसाहेब या प्रोसेससाठी तुम्ही एकदा चौकी मध्ये येवून जा. तिथेच बोलू."
राम अणि गोखलेनी शेक हैण्ड केला. सिद्धार्थनेही गोखलेसाहेबांचे आभार मानले. गोखले निघून गेले.
चंपा ने रामला डोळे भरून पाहिले. तिने केलेल्या प्रेमाचा सार्थ अभिमान वाटत होता. चंपा रामच्या गळ्यात पडून मनमोकळ रडू लागली.
रामने तिला कुरुवाळले आणि म्हणाला.
"अजुन अशीच इथे उभी राहून रडत बसलीस ना तर आपल्याला लग्न ही इथेच करावे लागेल." सिद्धार्थ जोराने हसला
चंपाने त्याच्याकडे बघितले अणि हसली.
तिघेही खाली आले. सगळ्या मुली, बायका चोहो बाजूने उभ्या राहिल्या होत्या त्यांच्या चेहर्यावर वेगळाचा आनंद होता आणि प्रश्न ही...रश्मी पुढे आली आणि चंपाच्या गळ्यात पडली.

"साली तू तो बहुतही... सारी... चंपा... आज तो तूने दुर्गा माँ का रूप धारण किया था पर अब हम क्या करेंगे, हमारा गुजरा कैसे होगा?"
सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता. चंपा इतकच म्हणाली...
"मैं हुं ना..." सगळ्यांनी एकच कल्ला केला.
सगळयांनी सोसलेल्या वेदना अणि दुःख आत्ता त्यांच्या चेहऱ्याकड़े पाहून दिसत होतीत. संवेदनशील मन अणि व्यक्ति स्वातंत्र्याची जाणीव त्यांना झाली होती. संपूर्ण आकाश ठेंगण झाल होत. विश्वासच गूढ़ निष्ठा म्हणून त्यांच्या नजरा चंपाकड़े बघत होत्या.


आंटी आई आहे हे चंपाला कळायला फार उशीर झाला होता. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर गिधाडासारख्या खिळून होत्या. तिला धंदा करायचा नव्हता पण कुण्या चांगल्या माणसाला यामध्ये अडकवायचे नव्हते. तिला बाहेर पडायचे होते. वेगवेगळ्या स्वभावाच्या पुरुषी वृत्ती तिच्या भोवती पिंगा घालत होत्या. एक क्रूरतेने नटलेली तर दुसरी करुणेने… शेवटी सामाजिक आशयाला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवणारी कादंबरी
चंपा!!!समाप्त
भाग्यशाली अनुप राऊतजेंव्हा मी एका खेड्यामधून शहरात आले. तेंव्हा यांच्या पेठांमधून जायचा बऱ्याचवेळा योग्य यायचा आणि तेंव्हाच या कादंबरीच्या नायिकेचा जन्म झाला. मग खूप वेळा तिथे जायचे त्यांचे जीवन जवळून बघायचे. अफाट पुस्तक वाचन आणि तलाश किंचा त्या आशयाच्या मुव्ही बघून जेवढ माहीत होतं तेवढंच... त्या व्यतिरिक्त आपल्याला अस प्रत्यक्षात बघायला मिळेल अस वाटलसुद्धा नव्हतं. मग या विषयावर अनुप म्हणजे माझा नवरा यांच्यासोबत बोलायचे. तेंव्हा तो मला म्हणायचा
"या आहेत म्हणून इतर स्त्रिया घरात घराच्या बाहेर सुखी आहेत. त्यांचा आदर करायला हवा" हे वाक्य मला भावलं आणि चंपा या व्यक्तिरेखेचा जन्म झाला.

अभिनेत्री आणि माझी मैत्रिण अश्विनी महांगडे हीचा वॉलपेपर ठेवला याच कारण म्हणजे जी कोणती व्यक्तिरेखा मी लिहिते तेंव्हा मला तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कारण एक व्यक्ती म्हणून ती माझ्या आयुष्यात महत्वाची असली तरी तीच्या अभिनयावर माझं प्रचंड प्रेम आहे. ती प्रत्येक भूमिका जीव ओतून करते. न्याय देते.

चंपा जेंव्हा लिहीत होते तेंव्हा आम्ही दोघी बरंच बोलायचो या विषयावर बऱ्याच गोष्टी बोलून समजायच्या. तू हे पुस्तक वाच, याचा अभ्यास कर. त्यांच्या भाषेतला फरक बघ, कोणते मुव्ही बघायचे हे ती मला वेळोवेळी सांगायची. मैत्री प्रत्येक ठिकाणी कामी येते. आणि त्याचसाठी आयुष्यात मैत्री महत्वाची असते.