Champa - 15 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 15

चंपा



चाचाने आणखी एक गुद्दा त्याच्या पोटात मारला तसा पुन्हा राम कळवळला. चंपा चाचाच्या पायाच्या इथे आली.

"चाचा उसे छोडो मे आती तुम्हारे साथ."

“साली भागती, हरामी आंटी की हरामी औलाद.” चाचाने पाय झटकला तशी ती बाजूला पडली.

चाचा तिच्या जवळ जवळ जात होता राम गुंडांच्या तावडीतून निसटनण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तेवढ्यात बंड्या तिथे पोहचला.

“चाचा रुक …”

“आ गया तू...तू भी देख आज बारीश मे चंपा की इज्जत का फालुदा…”

“चाचा उसे छोड देख मे येसी दस लंडकिया लाता तेरे लिये.” बंड्या चाच्या जवळ जाऊन बोलला…

“कायको...” चाचा त्याच्या जवळ जात बोलला

“कायको… मुझे तो अभि यही चाहीये...साली भागती...देख अभि ऐसें मे कैसे रस्ते पे.”

“चाचा लडकी अपनी है।“ बंड्या चाचाला समजावत होता.

“अपनी होती तो भागती…" बंड्याला बघून चंपाला थोडा धीर आला होता. ती उठली आणि रामकडे जाऊ लागली तोच चाचाने तिचा हात घट्ट पकडला बंड्याला आता राग अनावर झाला होता.

“चाचा...छोड उसे नही तो ...” बंड्याने रिव्हॉल्व्हर दाखवली तसा चाचाने हात वर केले.

“और एक मजनू...चाचा पुन्हा जोरात हसला…” चंपाचा हात सोडला.

“ले छोड दिया अब क्या करू ? “

“राम को छोड दे।“

“छोडो उस लोंडे को...” चाचाने हुकूम सोडला तसे सगळे बाजूला झाले. चंपा धावत त्याच्याकडे गेली. रामला सावरले.

“ये लो और भागो।“ बंड्याने गाडीची चावी रामकडे टाकली आणि दोघे गाडीच्या दिशेने गेले.

“बंड्या ये तू सही नहीं कर रहा वो कही भी जाये मेरी पहुचं बहुत उपर तक हें मे पाताल से भी ढुंडके निकालुंगा।“

चंपा आणि राम गेल्यानंतर बंड्याने रिव्हॉल्व्हर खाली टाकली. “चाचा वो तो मेरी नही हो सकती लेकिन वो जहाँ भी रहे खुश रहेगी।“

चाचाने रिव्हॉल्व्हर घेतली आणि बंड्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या सन सन सन तीन गोळ्या बंड्याच्या छातीत घुसल्या तसा तो साठलेल्या पावसाच्या पाण्यात कोसळला.

“जिसका नमक खाता साला उसकोही बेईमान हुआ। साले को फेक दो गंधी नाली में...” चाचाने त्याला एक लाथ मारली आणि निघून गेला. रक्ताच्या थारोळ्यात बंड्या निपचित पडला होता.

रात्रीचे बारा एक वाजले होते. राम वेगाने गाडी चालवत होता. तसा वारा भरभर करत खिडकीमधून आत येत होता. चंपा पावसात भिजली होती वाऱ्याने आणखीच हुडहुडी भरत होती रामने गाडीच्या काचा वरती केल्या.

“सर मला थंडी नाही सहन होत.” चंपा न राहून रामला म्हणाली.

“आज हॉटेल मध्ये राहुयात…? रात्र खूप झाली आणि हॉटेलमध्ये सांगून काही कपड्यांची व्यवस्था करता येईल.”

“हो चालेल...” खर तर रस्त्यावर काहीच दिसत नव्हते. चंपा अस्वस्थ होती थंडी वाजताच होती. रामने तिच्या कपाळाला हात लावला चंपाचे डोक गरम लागत होते.

“चंपा तुझं डोकं गरम लागतंय …”

“ हो मला खूपच थंडी भरलीये.” चंपाचे अवस्था रामला बघवत नव्हती. रामला लांबूनच एक हॉटेल दिसले.” हे बघ इथे हॉटेल दिसतंय तू थांब गाडीत मी रूम अविलेबल आहे का बघतो.”

रामने गाडी हॉटेलच्या गेटसमोर पार्क केली हॉटेल मोठं होत गाडीमधून उतरून रूमची इन्कवायरी करू लागला.

“हॅलो...मी राम पटवर्धन…”

“बोला सर…”

“2 रूम हव्या आहेत.”

“एक मिनीट हा...मॅनेजरने रजिस्टर चेक केले.”

“सॉरी सर एकच रूम आहे.”

काय करावे रामला सुचत नव्हते. इथून बाहेर पडलो तर कुठे दुसऱ्या हॉटेल मध्ये रूम असेलच असे नाही…चंपाला ताप चढलाय. रामने सगळं विचार केला आणि रूम बुक केली.

“सर… एक रिक्वेस्ट होती. काही कपड्याने ही सोय होईल का?”

“कपडे? मॅनेजर जर चक्रवला. “हो म्हणजे मी बघतो लेडीज का जेन्ट्स…?”

“एक लेडीज एक जेन्ट्स..”

“ओके ओके…”

“थँक्यू...” राम चंपाला घेऊन रूम मध्ये गेला. तापामुळे तिचे डोळे लाल सुजले होते चेहरा लाल झाला होता.

“रात्रीचे 2 वाजलेत मेडिसिन कुठे मिळणार आता?” भूक ही खूपच लागली.

चंपाचे डोळे उघडत नव्हते.” तेवढ्यात दरवाजा वाजला.”

“येस कम इन…” वेटरने कपडे आणले होते.

“साहेब अजून काही हवं होतं?” वेटरने चंपाकडे पाहत म्हणाले.

“मेडिसिन मिळतील का?”

“इथे???” वेटरने आश्चर्याने विचारले

“म्हणजे तुमच्याकडे असेल तरी चालेल… मॅडमला खुप ताप आहे आणि आत्ता मेडिकल किंवा हॉस्पिटल ओपन नसतील.”

“साहेब मी पाहतो.”

“आणि प्लिज मला मीठ पाणी आणून दे…” ओके म्हणत वेटर बाहेर गेला. रामने चंपाला उठवले.

“चंपा उठ...चंपा… ड्रेस चेंज कर.” चंपाच्या तापामुळे डोळा उघडत नव्हता. “चंपा… “

रामला काय करावे सुचत नव्हते? कपडे खूप ओले असल्यामुळे तिला थंडी वाजत होती. रामने तिच्या अंगावर पांघरून टाकले आणि वॉशरूम मध्ये जाऊन कपडे बदलून आला. त्याने पुन्हा चंपाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिले… ओठ थंडीने थरथर कापत होते...त्याला तिची अवस्था पाहवत नव्हती. पुन्हा दरवाजा वाजला. रामने पटकन दरवाजा उघडला.

“हे घ्या साहेब… मेडिसिन बॉक्स… आणि मीठ पाणी… “दरवाजा लावून राम चंपा जवळ बसला. तिला पुन्हा उठवायचा प्रयत्न करू लागला.

“चंपा उठ औषध घे.” चंपाला त्याने मानेखाली हात घालून उठवले चंपाच्या अंगामध्ये त्राण नव्हते ती त्याच्या खांद्यावर टेकली रामने उशी बेडला टेकवली आणि तिला मागे सरकवून बसवले. पण तिने तीची मान त्याच्या खांद्यावर ठेवली. रामने तिला सावरले. “चंपा मी ड्रेस देतो आणि बाहेर जातो चेंज नाही केलस तर आणखी थंडी वाजेल तुला… चंपा….” चंपाने अर्धवट डोळे उघडले मी बाहेर जातो. रामने तिला ड्रेस दिला आणि बाहेर गेला.

रामला आता चंपाची काळजी वाटत होती त्याच्या डोक्यातून देशमुखचा विचार जात नव्हता. पैशासाठी हे हरामखोर लोक वर्दीची किंमत लावतात. त्याला मी सोडणार नाही. अस लपून किती दिवस राहणार? सिद्धार्थ...” त्याने फोन काढला तर मोबाईल स्विच ऑफ झाला होता. शीट...विचार करत असतानाच चंपाने त्याला आवाज दिल्याचे त्याला जाणवले… राम पटकन आता गेला. चंपा भिंतीचा आधार घेत बेडकडे जात होती.

“चंपा...“ रामने पळत जात तिला सावरले. केसांच्या ओल्या बटा चेहऱ्याचे रूप आणखीच खुलवत होत्या. राम पुन्हा तिला बघण्यात हरवला. चेहऱ्यावरच्या केस बाजूला करत रामने तिच्या डोळ्यात पाहिले चंपा काहीच बोलत नव्हती जणू राम तिच्या जवळ गेलेला तिला आवडले होते. पण...रामने तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि तिला अलगत उचलून बेडवर ठेवले. उचलून ठेवताना चंपा रामच्या खूप जवळ होती तिला भरलेल्या थंडीमुळे रामची ऊब तिला हवीहवीशी वाटत होती. आज सगळं विसरून एकरूप व्हावं अस तिला मनापासून वाटत होते. रामलाही कळत होते पण त्याला घाई करायची नव्हती. रामने तिला बेडवर ठेवले आणि तिच्या बाजूला बसला.

“भूक लागली आहे ना? रामने मेडिकल बॉक्स उघडत तिला विचारले.” तिने मानेनेच नाही म्हटले.

“हे बघ ही गोळी घे…” त्याने गोळी आणि पाण्याचा ग्लास तिला दिला. चंपाने गोळी घेतली.

“रामने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. शांत झोप बर वाटल तुला.”

“का करताय एवढं???” चंपाने त्याचा हात हातात घेत विचारले.

“हा प्रश्न… तुलाही माहिती आहे याचं उत्तर… माझं प्रेम आहे तुझ्यावर.”

“हो… माहिती आहे … माझं ही खूप प्रेम आहे तुमच्यावर…” चंपाला भरलेल्या तापामुळे ती मनातले ओठांवर आणत होती रामला तिच्या होकाराने खूपच आनंद झाला होता.

“पण...” चंपा पुन्हा बोलली.

“पण काय?”

“हे लोक आपल्याला एकत्र नाही येऊ देणार मला पुन्हा जावं लागेल तुम्हाला सोडून. मला प्रेम करायचा अधिकार नाही न बोलून दाखवायचा.” रामचा हात तिने आणखी घट्ट पकडला आणि तशीच झोपून गेली.

रामने पुन्हा तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिले.

“चंपा आता आपल्याला कोणीही वेगळे नाही करू शकणार. मी तुला अस एकटीला नाही सोडणार कारण माझं प्रेम आहेस तू…” बराच वेळ राम तिच्याशेजारी बसून होता . त्याची तशीच तिथे झोप लागली.

प्रेम "तारुण्य"

नातं "विश्वास"

नवरा " श्वास"

बायको " साथ"

कुटुंब " जिव्हाळा"

आयुष्यात प्रत्येकाला

यातला "क्षण" जगायला मिळावा.



क्रमशः

भाग्यशाली अनुप राऊत