Champa - 18 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 18चंपा
"लेकीन तुझे समझता नही हें अरे चंपा धंदेपे बैठेगी तो क्या होगा। गजब होगा, गली मे घुसने के लिये भी जगा नही होगी। हम लाखों मैं खेलेंगे तुझे समझ कैसी नाही रे...?“ चाचा बोलत होता तसे राघवन चे हात शिवशिवत होते.

"देख तू वो वकील लोंडा हे न उसका उसे लेकर आयेगी साथ, नक्की उन दोनो का प्लॅन होगा कुछ तो, साली रंडी की औलाद उसे पता नही उसकी जगा यही हें। कुछ किताब पढि और शानपत्ती करने लगी। साली हरामी आंटी सर पे बिठाया उसको बोला था मत सून लेकींन नही, मेरी बेटी धंदेपे नही बैठेगी... दूसरोंकी लडकिया लाके बिठाएगी लेकिन खुदकी बेटी ना।"

'चाचा…' राघवन जोरात ओरडला आणि सूरी घेऊन त्याच्याकडे धावला.

"गाली देता हें मेरी चंपा को, मेरी चंपा को, कल भी बताया था की चंपा सिर्फ मेरी हे वो धंदेपे नाही बैठेगी लेकीन तू … तू नही सुधारेगा।"

चाचा राघवनचा असा अवतार बघून घाबरला होता. चाचा भिंतीचा आधार घेऊन मागे टेकून उभा होता राघवांचा हातातली सूरी त्याच्यापासून दोन इंच लांब होती.

"राघवन, राघवन बेटा मुझे माफ कर, तुझे चाहीये चंपा तू ले ले लेकींन ये बाजू कर. मे एक शबुत भी नही बोलूंगा चंपा के बारेमे सच्ची; देख तेरी कसम." चाचाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. राघवांचा राग अजूनही शांत झाला नव्हता. मै नही छोडूगा, चुत्या समझ रखा क्या तुने मुझे." राघवन ने त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये जोरात लाथ घातली तसा चाचा जोरात व्हीव्हळायला लागला.

"देख चाचा मेरी 'तेरी साथ कुछ भी दुश्मनी नही हें। तुझे पता हे चंपा मेरी जान हे। पागल हूं मे उसके लिये, कुछ भी कर सकता हूं मे उसे पाने के लिये. कूछ भी… " राघवन वेड्या सारखा विव्हळणार्या चाचकडे बघत बोलत होता. राघवन चाचकडे गेला आणि त्याला हात दिला.

"उठ चाचा, साले मेरे सीवा तेरा हेही कौन." चाचा त्याच्या हाताचा आधार घेत उठला.

"मुझे घुस्सा आता हे न चाचा, क्यों बोलता हे इतना? मेरा घुस्सा तुझे पता हे फिर भी, ले पाणी पी.” राघवनने चाचाला पाणी दिले."

चाचाने घटघट एक तांब्या पाणी पिले.

"तुझे जो करना हे वो कर राघवन, मे चलता हूं." चाचा उठून निघायला लागला.

"रुक, किधर जाता, चंपा को मिलके जा."

“तू मिल, तुझे मिलेगी की नहीं फिरसे क्या पता?“

"साले 'तेरी मस्ती नही जाती; जायेगी भी कैसे बरसोसे इस कोठी मे जो रहतां हे। पकडो इस मादरचोत को."

राघवन ने पाळलेले दोन तीन गुंडांनी चाचाला पकडले आणि खुर्चीला बांधले.

"तुझे तो मी अब एसी मौत नही दुगा। जब चंपा मेरे पास होगी तब तूझे तडपा तडपा के मारुंगा जितना तूने उसे सताया हैं उतना तुझे सताऊंगा।"

चाचा गप्प उभा होता. त्याला कळून चुकले होते आता जर आपण तोंड उघडले तर राघवन मारून टाकले. जे होतंय ते उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय पर्याय नव्हता.

राघवनच्या मनाची घालमेल काही वेगळीच होती. राघवनला त्यांचे बालपण आठवत होते. लहानपणापासून राघवन आणि चंपा एकत्र मोठे झाले. राघवनला त्याची आई कोण होती ते माहीत होते पण बाप …? लहान मोठी काम करून थोडे पैसे कमवायचा पण त्याचे समाधान त्याच्यात होत नव्हते.

राघवन 14 वर्षांचा होता तेंव्हापासून दलाली करायला लागला त्यामध्ये त्याला पैसे मिळायला लागले. चंपा मात्र त्याच्यापासून हळू हळू लांब जायला लागली. राघवनला कळायला लागले तेंव्हापासून चंपा त्याला आवडत होती. चंपाला त्याने सांगायचं प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे ती त्याच्यावर हसायची. राघवनला राग यायचा, मी नाही का प्रेम करू शकत .

चंपाच्या मनात त्याच्याविषयी कधीही प्रेम भावना नव्हती. हे त्याला जाणवायचे आणि म्हणूनच आंटीला त्याने मेन कोठीवर बसवले होते कारण त्याला चंपा हवी होती. आंटी वयाने, अनुभवाने मोठी असली तरी राघवन तिथला व्यवसाय संभाळत होता. आंटी राघवनला मुलाप्रमाने मानत होती.इकडे चाचाने त्याची माणसं सगळीकडे सोडली होती. पाटिल, देशमुख सगळे त्यांच्या मागावर होते. मोबाईलवर सिद्धार्थचा फोन आला होता. गाड़ी बाजूला घेवुन रामने सिद्धार्थला सगळे सांगितले. मागे वळुन पाहिले तर चंपा गाड़ीमध्ये नव्हती.

रामला काहीच सुचत नव्हते. गाड़ीच्या बाजूला जाऊन त्याने सगळीकडे पाहिले पण चंपाचा कुठेच पत्ता नव्हता. तो स्वतःवर वैतागला.

“का मी गेलो तिला सोडून ? कुठे शोधू?” त्याने सिद्धार्थला पुन्हा फोन केला. गाड़ी स्टार्ट केली आणि राम सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये पोहचला. सिद्धार्थ त्याची वाट बघत होता.

“राम अरे तू मला काहीच कस सांगितले नाहीस?” सिद्धार्थ रामवर सगळ्या प्रकाराने थोडा चिडलाच होता.

“सिद्धार्थ मी विष्णुकाकांना फोन केला होता त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या मी.” राम टेन्शनमध्ये होता.

“आणि मला नाही सांगावसे वाटले? पण ठीक आहे आता चंपाला शोधणं जास्त महत्वाचे आहे.” दोघानी बराच वेळ चर्चा केली आणि निर्णयापर्यंत पोहचले.इकडे चंपा एका अंधाऱ्या खोलीत बंद होती. तिला जाणवत होते की एका खुर्चीवर बसवून तिला बांधून ठेवले आहे. काळोखा व्यतिरिक्त तिला काहीच दिसत नव्हते. अंग जड़ झाले होते. डोक भनभन करत होते. बराच वेळ बेशुद्ध असल्यामुळे तिला अस्वस्थ वाटत होते. बऱ्याच वेळाने तिला शुद्ध आली होती. बाहेर येणारा आवाज तिच्या कानावर येत होता.

“राघवन...” चंपा जोरात ओरडली. तिचा आवाज कोणापर्यंत जात नव्हता कारण तिच्या तोंडामध्ये कापड़ कोंबले होते हे ही तिच्या बऱ्याच वेळाने लक्षात आले. बाहेर होणार्या चर्चेमधून काही समजेल म्हणून तिने खुर्ची हलवन्याचा प्रयत्न केला. खरतंर तिच्या अंगामध्ये कसलेच त्राण नव्हते. इतके करकचून तिला बांधलेले होते. दरवाजा उघड्ल्याचा आवाज आला थोडा उजेड त्यातून आत डोकावला. तिने पुन्हा बेशुद्ध झाल्याचे नाटक केले.

“इसे तो अभी तक होश नही आया. क्या करे?” एकजण दुसऱ्याला बोलला. तिघेजन असल्याचा अंदाज चंपाला आला होता.

“हा चार घंटे हो गये इधर रखके इसको... चाचा फोन भी नही उठा रहा है| कुछ भी पता नही है उसका.” चंपाला हे समजले होते की हे काम राघवनचे नसून चाचाचे आहे. ती तशीच पडून राहिली. मनातून चाचाचा खुप राग येत होता आणि रामची अवस्था का्य झाली असेल याचे वाईट वाटत होते.

“जाने दे जब तक चाचाचा फोन येत नाही तोपर्यंत आपण चंपाको हम इधरीच रखते है|”

तिघेही बोलत बाहेर गेले. चंपाच्या कानावर आले.

“भूक लगी है, नाना की गाड़ी से वड़ापाव ला...”

“नानाकी गाड़ी... म्हणजे मी कोठीच्या अगदी जवळ कुठेतरी आहे. पण कुठे? अंदाज येत नाही.” चंपाला का्य करावे सुचत नव्हते यातून सुटका करायची कशी हे तिला समजत नव्हते. चाचा या शहरात आता काही दिवस तरी मला ठेवणार नाही. रामला कसे सांगू? मी का्य करू? काहीही करून इथून बाहेर पडावे लागणार नाहीतर आता माझी सुटका नाही. एकीकडे राघवन तर दुसरीकडे हा चाचा”

इकडे सिद्धार्थ कोठीवर येवून पोहचला होता. एवढ्या सगळ्यामधून रश्मीला शोधन कठिन होत.

“इता टकाटक आया लोंडा...चल बे आ...” सिद्धार्थच्या अंगाला एक अगदीच सुंदर मुलगी आली. पण सिद्धार्थला ड्रामा करन गरजेचे होते.


इतरांसारखे न जगता,
मला माझ्या मनासारखं जगायचंय,
आता मला फक्त माणूस व्हायचंय...क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत