Champa - 21 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 21

चंपा




गौरी सगळी रूम बघत होती.

“पागल है क्या? मेरा गिऱ्हाईक को कुछ मत बोल, देख राघवन एसा कुछ भी नही हैं| तू जा सिद्धार्थ...”रश्मी बोलली.

“सिद्धार्थ? क्या बोली?” “अरे राघवन इसने तो मुझे जयेश नाम बताया था.”

गौरी त्याच्याकडे बघत बोलली.

“गिऱ्हाईक का नाम भी पता...? ये अन्दर आवो ओर पकड़ो इसको.” राघवन ने त्याच्या माणसांना बोलावले. दोघेजण आत आले आणि सिद्धार्थला पकडले.

“अरे भाईसाहब मुझे क्यों पकड रहे हों? देखो मैंने कुछ नही किया है, गिर्हाईक के साथ एसा बरताव अच्छा नाही है|” त्याच कोणीच एकत नव्हते त्याला राघवनचे लोक घेवुन गेले.

“देख रश्मी काम कर तेरा नही तो...और पता चला तू इसमें है तो...”गौरी राघवनाला उगीचच लगट करत होती. राघवन अणि गौरी बाहेर पडले. रश्मी काळजीत पडली.

वीजा कड़ाडत होत्या. धो धो पाऊस कोसळत होता. चंपाला कशाचीच पर्वा नव्हती. चंपा झपझप पावल उचलत चालली होती. आपल्या सोबत राम आहे हे सुद्धा तिच्या लक्षात राहिले नव्हते. आज के तो सोक्ष मोक्ष लावायचा हे तिने मनाशी पक्क केल होत. एवढ्या छोट्या गल्ली-बोळानंमधुन गाड़ी जाणार नाही म्हणून रामने बाहेरच गाड़ी पार्क केली. रामने चंपाच्या फोनवरून विष्णु काकांना लोकेशन सेंट करून ठेवले होते. चंपा एक गल्ली मधून दुसऱ्या गल्लीत मोठ्या सफाईने जात होती. राम भांबावलेल्या नजरेने गल्लीचा नजारा पाहत होता. आपण कुठून आत शिरलो हे त्याला सांगता आले नसते. सिद्धार्थ ठीक असेल का आणि असेल तर कुठे? गल्लीच्या सुरुवातीलाच भरून वाहून चाललेली कचऱ्याची पेटी होती. त्याच्या वासाने रामला उबळ येत होती. त्याच डोक भनभन करायला लागल होत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिगरेट अणि पानाच्या टपरया होत्या. काही होटेल्स होती जिथे होटल्सच आहेत का नक्की हे समजायला थोडा उशीर लागत होता. गजरे विकायला वय नसूनही म्हाताऱ्या दिसणाऱ्या बायका बसलेल्या होत्या. जसजसे आत जात होतो तसतसा रस्ता छोटा होत चालला होता. छोटे रस्ते अणि अगदीच एकमेकांच्या जवळ असलेल्या चाळी कम बिल्डिंग्स सुर्याला आत डोकवायला मज्जाव करत होत्या. पिवळे,लाल,नीळे उजेड दिसायला लागलेले होते. त्या उजेडात भरमसाट मेकअप करून काळ्या, गोऱ्या, जाड्या, अशक्त, बुटक्या अशा कित्येकजणी सुंदर दिसण्याच्या प्रयत्नामध्ये दारा खिड्क्याना उभ राहून उगीचच खानाखुणा करत होत्या. कोणी पारदर्शक साड्या नेसल्या होत्या तर कोणी अगदीच छोटे कपडे घातले होते. या बायकाना बघ्यांची गर्दी कमी नव्हती. हे आतमध्ये एवढं मोठ असेल याची कल्पनाच त्याला आली नव्हती.

“इथे, इथे रहायची चंपा! ” तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड़े पाहून त्याला वाईट वाटले.

चंपाकड़े पाहून वाटत नव्हते की ती याठिकाणी लहानाची मोठी झाली. हिने जवळून सगळ्या गोष्टी पाहील्या असतील. का्य झाले असतील तिच्यावर परिणाम? चंपा मी तुला माझी बायको म्हणून स्वप्न बघतोय.

“यातून तू बाहेर पडायला हवी ग! मी काढेन तुला यामधून सुखरूप बाहेर. मधुनच त्याला एकीने हाक मारली.

“अरे ओह... हँडसम चल तुझे जन्नत की सैर करके लाती में, चलता हे बाबु.” एवढ्या अप्रतीम, देखण्या मुली पाहून रामला आश्चर्य वाटत होते. या पोरी कश्या येत असतील इथे? पोटासाठी? का या सुंदर पोरिनी शरीरासोबत तडझोड़ करायची अणि किती? पण खर आहे या आहेत म्हणून आपल्या समाजामध्ये राहणाऱ्या स्त्रिया सुखरूप,ताठ मानने राहता आहेत. यांचे मनापासून आभार...

दोन्ही बाजूला बायकांचे स्पर्श चुकवत राम चुपचाप चंपाच्या मागे निघाला होता. उघडे वाघडे स्पर्श त्याला नको वाटत होते चुकून स्पर्श किंवा लगट करायला आलेल्या बायका चुकवता चुकवता राम परेशान झाला होता. अश्या कितीतरी मुली त्याच्या आग मागे करायच्या पण ह्या? कशासाठी छाती उघडी ठेवून अर्धवट देहाचे दर्शन द्यायचे गिर्हाईक येणार यांच्याकडे म्हणून? चंपा भान हरपून चालत होती अणि तिच्या मागे राम. बघता बघता राम अणि चंपा एक बिल्डिंग खाली आले. चंपा मागे फिरून रामकड़े पाहिले. डोळ्यात पुन्हा आसव जमा झाली होती.

“तुम्ही इथेच थांबा.”

“का? मी येतोय तुझ्या सोबत.”

“नको, मी इथे नाही थांबणार.” काही वेश्या गिऱ्हाईकां सोबत सौदा करत उभ्या होत्या. काहीजणी उगीचच हसत पुरुषांसोबत लगट करत होत्या. कारण नसताना उगीचच फिदीफिदी हसत होत्या. रामला त्याला हा सगळा प्रकार किळसवाना वाटत होता. तेवढ्यात रश्मी त्याच्याजवळ आली. तिने चंपाकड़े न बघताच रामला स्पर्श केला.

“क्यों बे चिकने आना हे क्या? नया लगता हें| अबे कुछ नही होता. पहिलीबार आये हो तो रश्मीही चाहिये. रामने रश्मीला झिड्कराले,

“प्लीझ डू नॉट टच मी.” राम तिच्यापासून लांब झाला.

“अबे साला अंग्रेजी मारता हें|” रश्मी त्याच्या अजुनच जवळ गेली.

“रश्मी उसे गाली मत दे.” रश्मी अवाक् होवून चंपाकडे बघत होती.

“चंपा, पागल हे तू? फिरसे कायको आयी| कितनी मुश्किल से तुझे यहाँ से निकला मैंने|”

“रश्मी सिद्धार्थ?” तिने रामकड़े पाहिले. क्षणभर तिला वाईट वाटले.

“चंपा उसके लिये तो मैं यहाँ खडी... राघवन को शक आया उसके ऊपर उसे लेके गए| देख तू मत जा ऊपर... वो बहुत पागल हुआ हैं तेरे वास्ते|” रश्मी मैं जाउंगी सिद्धार्थ को निकलना हैं, मेरी वजह से उसे कुछ भी नही होना चाहिए”

“चंपा उसे मैं निकलती...” रश्मी.

“नहीं रश्मी...” चंपा वर जायला निघाली.

“भेजा फिसल गया हे तेरा, ये बाबु इसे लेके जा नही तो ये भी नही बचे और तू भी नही बचेगा, सिद्धार्थ साहब को मैं निकालती|”

“नही में उसे अलेके छोडके नही जाऊंगा, मुझे देखना हे राघवन क्या हे? कौन हे? और सिद्धार्थ को भी कुछ नही होगा| चल चंपा.” चंपा आणि राम निघायला लागले.

“बस्ती में आज शोक होगा, आज रात कोई भी लड़की धंदेपे नही बैठेगी| पगला गए हो तुम दोनों| राम अणि चंपा वरच्या मजल्यावर निघाले. दिवस असून रात्र भासत होती.

राघवन चंपाची वाट बघत बसला होता. चंपाला दारात बघताच राघवन तिच्याकडे बघून प्रेमाने हसला. चंपाही त्याला बघून हसली पण जरा वेळातच राघवनने रामला पाहिले अणि प्रेमाची जागा रागने घेतली.

“इसको कायको लाइ? “राघवन पिसाळलेला होता.

“देख इससे तेरा क्या वास्ता? मुझे तुझसे बात करनी हे|” चंपा त्याच्याजवळ गेली.

“चंपा में हम दोनों के बीच में ये नही चाहिये| उसे जानेके लिए बोल|”

“नही जाऊंगा में, वो मेरे साथ आयी हे में उसे लेकर वापिस जाऊंगा|” रामला पुढे का्य करायचे हे त्याने ठरवले होते.

"सुनो बे पकडो इस साले को।" राघवांचा दोनचार मुलं रामच्या दिशेने धावली.

"राघवन तुझे मेरी कसम! उसे हात मत लगा।" राघवनने मुलांना थांबवले.

"तो... इसपे जान आ गयी तेरी, देख चंपा मुझे ये लडका यहा नही चाहीये, और ये देख।" त्याने चाचाकडे बोट दाखवले. सिद्धार्थला त्याच्या बाजूला बांधले होते. सिद्धार्थला बांधून मारले होते. त्याच्या चेहर्याला लागले होते. ओठांमधून रक्त येत होते.

चंपाने जळजळीत नजरेने चाचाकडे पाहिले.

"ह्याची जागा हीच होती. राघवन मेरा भरोसा था तुझपे, ये मुझे धंदेपे बिठाना चाहता हें।"

"तो ये साला क्या अलग करने वाला हे, रखेल बनाके रखेगा तुझे।" चाचा पुन्हा घाणेरडा हसला.

"शी, राघवन…?" राघवनने चाचाच्यावर रिवोल्वर रोखली आणि धडाधड गोळया त्याच्या पोटामध्ये छातीवर मारल्या.


वाहून गेले अश्रू,
मुसळधार पावसात भिजताना,
सोडली गाठ सैल भावनांची,
सोबत तू नसताना...



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत