RIMZIM DHUN - १२ books and stories free download online pdf in Marathi

रिमझिम धून - १२

'लोणावळा सोडून पोलिसांची गाडी काही अंतरावर पुढे जाऊन थांबली. इथे अचानक गाडी थांबवण्याचे काहीही कारण नव्हते. त्याच्या मागे अर्जुन आणि मंगेश यांची गाडी पाच-दहा मिनिटाच्या अंतरावर होती. ते गप्पा मारत होते, तेव्हाच त्यांना ओव्हरटेक करून एक काळ्या रंगाची फॉर्च्युनर पुढे निघून गेली. ती अचानक त्या पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाडीच्या अगदी बाजूला चिकटून निघाली होती. थांबलेल्या पोलिसांच्या जीप मधून गोळीचा आवाज ऐकू आला. काहीतरी झटापटी सुरु झाली होती. अर्जुनला लक्षात आले आणि त्याने गाडीचा स्वीड वाढवला. गाडी चालवताना त्याने मोबाइल हातात घेऊन पुढे असलेल्या पोलीस गाडीचा फोटो काढून ठेवला होता. बाजूलाच असणाऱ्या काळ्या फॉर्चुनरचा फोटो सुद्धा त्या सोबत आला होता. पाहिजे असलेले दोन-तीन फोटो मिळाले होते. पोलीस इन्स्पेक्टर राठोड यांच्या हाताला गोळी लागली होती. दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल त्यांना उचलून गाडीत भरू लागले. आतमध्ये असणाऱ्या त्या संशयीत आरोपीला बाहेर काढून ती फॉर्च्युनर पुढे भरधाव वेगात त्याला आपल्या सोबत घेऊन निघाली होती.

अर्जुन तेथे पोहोचला आणि त्याने दोन्ही कॉन्स्टेबलना पोलीस इन्स्पेक्टर राठोड यांना तातडीने जवळपासच्या  रुग्णालयात घेऊन जायला सांगितले. आणि क्षणाचाही विलंब न करता अर्जुनने त्या पाळणाऱ्या फॉर्च्युनरचा पाठलाग सुरु केला. जवळपास अर्ध्यातासाचा पाठलाग सुरु होता. पण ती फॉर्च्युनर सुसाट वेगाने निघाली होती. पुढे काही अंतरावर एका नागमोडी वळणावर पोहोचल्यावर त्यांची दिशाभूल झाली. पुढे दोन फाटे फुटलेले होते. ती काळी  फॉर्च्युनर नक्की कोणत्या दिशेने गेली असावी ते समजेना. वळणाचा रस्ता असल्याने पुढचे काही दिसणे ही शक्य नव्हते. त्यांना चकवा मिळाला होता. आणि त्या संशयित आरोपीला घेऊन ती काळी फॉर्च्युनर गाडी पसार झाली होती. ताबडतोब जवळपासच्या सगळ्या ठिकाणी त्या फॉर्चुनरचा गाडी नंबर मेसेज करून ती गाडी फरार झाल्याचे कळवण्यात आले.

पोलीस इन्स्पेक्टर राठोड यांना तेथील रुग्णालय ऍडमिट केले गेले होते. अर्जुनने निराश होवून पुन्हा मुंबईचा रस्ता धरला. कारण आपल्या सोबत आरोपीचं नाही, तर पुढे जाऊन तपासणी करण्यात काय अर्थ.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन येऊ लागले होते. सगळ्यांचा एकच प्रश्न होता. 'इनकॉउंटर हेड,  A.D. म्हणजे खुद्द अर्जुन दीक्षित म्हणजे यामध्ये जातीने लक्ष देत आहेत. हातात पॉवर असताना आणि त्यांच्या हाताखाली लोक असताना, ते या केस मध्ये का? पोलिसांना आपले काम करुद्यायचे तर A.D. स्वतः या केसमध्ये का इन्व्हॉल्व्हड झाले आहेत?' असा प्रश्न निर्माण झाला होता. आणि त्यांच्या निरीक्षणाखाली गाडी पुण्यासाठी रवाना होत असताना तो संशयित अपराधी कसा काय फरार झाला? अशी सगळी चर्चा पोलीस अधिकारी वर्तुळात रंगली होती.  हि केस सेन्सिटिव्ह असल्याने अजून अधिकृत रित्या या बातमी बद्दल मीडियाला काहीही खबर मिळालेली नव्हती. अर्जुनाने लगेच फोन करून हि बातमी फुटू न देण्यासाठी वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून घेतले. कॉन्स्टेबल वाजे आणि कॉन्स्टेबल मुंडे, तसेच शुद्धीवर आलेले पोलीस इन्स्पेक्टर राठोड यांना सूचना देऊन ठेवण्यात आल्या कि हि बातमी बाहेर येता काम नये.

******

त्या संशयित आरोपीला घेऊन काळी फॉर्च्युनर गाडी सरळ पुढे निघून कर्जतच्या दिशेने निघून गेली होती. वनवेने त्याने गाडी पळवली होती. आणि ऐन वळणात दुहेरी रस्ता आल्याने  कोणीही कंफ्युज होणं सहजीक होते. त्यात पोलिसांची जीप पोलीस इन्स्पेक्टर राठोड ना घेऊन रुग्णालय गेली. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी अर्जुनच्या सिक्युरिटीची एक गाडी थांबली आणि दुसरी सिक्युरिटीची साठी असली गाडी अर्जुन बरोबर असणे गरजेचे होते. त्याशिवाय तो बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे फॉर्च्युनर गाडीचं पाठलाग करण्यात सगळे अयशस्वी ठरले होते. 

*****

मंगेश साठी हा प्रकार नवीन नव्हता.  पण साहेबांच्या उपस्थितीत एखादी मुंगी गाडीतून बाहेर जाणे अवघड तर मग एक अपराधी कसा काय पळून जातो? कारण असे अपराधी गायब होण्याची हि पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्याला कळेना. त्यातही ती फॉर्च्युनर अर्जुनच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे निघून गेली होती. साहेब गाडी एवढी स्लोव्ह का चालवत होते. ते हि त्याला कळेना. पण अर्जुनने गाडी मुंबईच्या दिशेने न घेता, मध्येच एका हॉटेल मध्ये पार्क केली. त्याच्या सिक्युरिटीसाठी असणारी दुसरी गाडी तिथेच पार्किंगला थांबली होती. हॉटेलच्या मागच्या बाजून बाजूने अर्जुन मंगेशला घेऊन बाहेर पडला. आपल्या सिक्युरिटीला त्याने चकवा दिला होता. आणि पूर्वतयारी नुसार तिथे मागच्या भागात असलेली एक दुसरी स्कार्पिओ घेऊन तो कर्जतच्या फाट्यातून आतल्या रस्त्याला लागला होता. आपण याच हॉटेलमध्ये आहोत असे दाखवत तो मागच्या मागे गायब झाला होता. कारण आपल्या सरकारी सिक्युरिटी च्या लोकांना कळू न देत त्या देता त्याला बाहेर पाळायचे होते.  

मंगेशने त्याच्याकडे गाडी मागितली. पण अर्जुन भरधाव वेगात अलिबागला निघाला. मोबाइल सारखा वाजत होता. पलीकडून मेसेज येत होते. 'साहेब गोळी लागली आहे. डॉक्टरची गरज आहे. लवकर पोहोचा. ' मेसेज वाचून अर्जुनने डोक्याला हात लावला.
''साहेब सगळं ठीक ना? मी गाडी चालवतो. तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय.'' मंगेश त्याला सांगत होता. अर्जुन ऐकायला तयार नव्हता. 

''मंगेश तुला रोड माहित नाही. त्यामुळे मी चालावतो गाडी.''  सुपर फास्ट पळवत अर्जुन काही तासातच कर्जत मधून आतमध्ये अगदी आउट साइडला असलेली त्याच्या फर्महाउसवर पोहोचला. 

अगदी निर्जन ठिकाणी असलेले सुमसान असे ते फार्महाउस होते. समोर तीच काळी फॉर्च्युनर उभी होती. आतमध्ये आल्यावर मंगेशच्या लक्षात आले की हा सगळा प्रकार काय आहे. 

सोफ्यावर त्या संशयित आरोपीला ठेवण्यात आले होते. आणि ते त्याला किडन्याप  करणारे चौघेही त्याच्या बाजूला टेन्शनमध्ये उभे होते. अर्जुन आत आल्या आल्या त्यांनी अर्जुनाला सॅल्यूट केला. ते सगळे तोंडाला काळ्या कलरचे मास्क घालून उभे होते त्यामुळे कोणाचाही चेहेरा पाहायला मिळत नव्हता.
''साहेब त्या राठोड ने याला उजव्या खांद्याजवळ गोळी मारली. जखमी आहे. तातडीने उपचार सुरु करायला पाहिजेत.'' त्या अपहरण कर्त्यांपैकी एकाने सांगितले.

''इथल्या एका ओळखीच्या कंपाउंडरने तात्पुरते बँडेज केले आहे. पण ऑपरेशन करावं लागेल. आणि इथल्या लोकल कंपाउंडरला ते नाही जमत. दुसऱ्या कोणाला बोलावण धोक्याचं आहे.'' दुसरा म्हणाला.

''साधा डॉक्टर नाही सर, सर्जन पाहिजे. तो हि ओळखीचा. नाहीतर हि बातमी लीक व्हायला वेळ लागणार नाही.'' तिसरा म्हणाला.

''तुमचं सामान आणि तिकिट्स घेऊन तुम्ही निघा. आणि च्या फॉर्च्युनर ची नंबर प्लेट बदलली का?'' अर्जुन त्यांना विचारत होता.

''होय साहेब. गाडीची व्यवस्था करून आम्ही पुढे होतो.'' म्हणत ते चौघे बाहेर पडले. निघताना अर्जुनने त्यांना एक पैशांचं बंडल दिले. आणि अर्जुन सोफ्यावर झोपलेल्या त्या संशयित आरोपीकडे गेला. त्याला हाताला वेगैरे चेक करून जखमेचा अंदाज घेतला. गोळी अजूनही आत होती. ती ऑपरेशन करून बाहेर काढण्याशिवाय त्याच्या जीवाचा धोका टळणार नव्हता. अर्जुन विचार करत नसला. काय करावे त्याच्यापुढचा प्रश्न होता.

आता हा सगळं प्रकार मंगेशच्या लक्षात आला होता.
''साहेब तुमच्या नव्या फ्रेंड डॉक्टर मॅडम येतील का? त्या मोठ्या सर्जन आहेत ना?'' मंगेशने अर्जुनला क्ल्यू दिला होता. आणि त्याला थँक्स म्हणत अर्जुनने मुंबईला एक फोन करून जुईला इथे घेऊन येण्यासाठी माणसांची व्यवस्था केली.

******

'ऑपरेशन उरकून जुईने बॅग भरली. आजचे पेशन्ट्स संपले होते. संध्याकाळ झाली होती. त्यामुळे सिस्टरला बाय करून ती घरी जाण्यासाठी निघाली. घरी आईची विचारपूस करण्यासाठी तिने फोन लावायला हातात घेतला, तोच अर्जुनाचा तिला फोन आला होता. तिने उचलला.'

''हॅलो अर्जुन, गुड इव्हनिंग.'' जुई

'''गुड इव्हिनिंग जु. ऐक ना, आय नीड युअर हेल्प.'' वेळ कमी होता. अर्जुन पटकन तिला बोलून गेला.

''काय झालं? आर यु ओके?'' जुई

******

क्रमश